तू_ही_रे_माझा_मितवा... - 2 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 24

    भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न क...

  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

श्रेणी
शेयर करा

तू_ही_रे_माझा_मितवा... - 2



#भाग_२

रूमचा दरवाजा सरावाने धाडकन उघडत ऋतुजा आत आली आणि बेडवर पर्स फेकत ती तनुच्या गळ्यात पडली. तिच्या रुमी तनु आणि प्रिया आवक होऊन एकमेकांकडे बघत होत्या.
तिच्या डोक्यावरून हात फिरवत तनु म्हणाली-

“ये ऋतू काय झालं? जॉबच्या पहिल्याच दिवशी अशी का वैतागली आहेस?”

तिच्यापासून बाजूला होत बेडवर बसत वैतागून ती म्हणाली-

“यार तने बघ ना पहिल्याच दिवशी एका अत्यंत खडूस,स्टुपिड,मूर्ख आणि बेअक्कल मुलाशी पंगा झाला..”

तनु आणि प्रिया दोघीही तिच्या ह्या वाक्यावर हसल्या.तिच्या डोक्यावर टपली मारत प्रिया म्हणाली-

‘ऋत्या आता कॉलेज संपल ..हे नवीन लाइफ आहे,प्रोफेशनल लाइफ..! पंगे घ्यायचे दिवस संपले आता. Be matured ...चल आता फ्रेश हो,मी मस्त कॉफी करते ...मग तुझं फर्स्ट डे पुराण ऐकुया ओके?”

“ओके” थोडंस हसू चेहऱ्यावर आणत ती म्हणाली.

बिबवेवाडीत एका शांत सोसायटीमध्ये ऋतूची रूम होती.तिच्या रुमी प्रिया आणि तनुदेखील एका फर्ममध्ये जॉबला होत्या.
ऋतूचे आईबाबा गव्हमेंट बँकेत कामाला असल्याने दोन वर्षांपूर्वी ते इंदापूरला शिफ्ट झाले होते व ऋतूला आधी कॉलेजसाठी आणि आता जॉबसाठी पीजी म्हणून राहावं लागतं होत.
सुखवस्तू कुटुंबातील ऋतू, श्रीकांत मोहिते यांची धाकटी मुलगी होती तर मोठ्या मुलीचं लग्न झालेलं होतं.

रूमच्या प्रशस्त बाल्कनीत आपल्या आवडत्या झुल्यात,हातात गरम कॉफीचा मग घेऊन ती बसली होती. तनु आणि प्रियाही खुर्चीवर बसल्या.

“बोल ऋत्या काय झालं...कसा होता फर्स्ट डे...”

प्रिया ने कॉफीचा सिप घेत विचारलं.

“यार द डे वॉज अमेझिंग...मला नेहमीप्रमाणे पोहचायला उशीर झाला As you know me .. but एका interactive session ला मी अगदी भन्नाट अन्सर दिलं.. आमचा जो सिनियर आहे ना आरुष ....डॅम हँडसम यार ... ” थोडंस ब्लश होत ती म्हणाली.
“ओह्ह हो ....आरुष ..” प्रियाने तिला चिडवायला सुरुवात केली.

“येस...ही इज हँडसम....पण मुद्दा हा आहे की त्याने माझी तारीफ केली पण एक अत्यंत ओव्हरस्मार्ट मुलगा आमच्या सोबत ट्रेनी म्हणून आहे आणि त्याला पहिल्याच दिवशी माझ्या अन्सरचा,views चा आणि डॅम it माझ्या गाडी पार्किंगचा ही प्रॉब्लेम झाला....” डोळे बारीक करत ती म्हणाली.

“ऋतू तू गाडी भयानक पद्धतीने पार्क करते ह्याबाबत मी मात्र त्या मुलासोबत आहे बरं...” हसत तनु म्हणाली.

“ये मी पण“ तिला दुजोरा देत प्रिया म्हणाली.

“ अरे..ये अरे ..... ..काय .....तुमच्या मैत्रिणीला खुन्नस दिली त्याने “शिस्तीत गाडी लावायची” असं म्हटला तो मला...त्याची काय बाजू घेताय..” त्या दोघींवर चिडून ती म्हणाली.

“अग ..गम्मत केली..बर ते जाऊदे ..आरुष विषयी सांग ना...? डोळे मिचकावत प्रिया म्हणाली.

“अग तो तर खूप क्युट आहे यार !!...जाम भारी....आणि आज फर्स्ट डे ला खूप पर्सनल अटेन्शन दिलं त्याने मला!!” ऋतू ब्लश होत म्हणाली.

आता मात्र तिच्या ह्या बोलण्यावर थोडं गंभीर होत तनु म्हणाली-

“ऋतू यार बास ना आता लिंक अप,ब्रेक अप, क्रश....I mean college life is over now आता लाइफकडे थोडं realistic view ने बघ ना...I know तुझा प्रेम ह्या संकल्पनेवर अजिबात विश्वास नाहीये पण तुझा जो attitude आहे तसं नाही आयुष्य निघत गं राजा.”

हातातला कप बाजूला ठेवत मोठ्याने हसत ऋतू म्हणाली –

“प्रेम...!! You mean love…आणि मी....ह्या जन्मात शक्य नाही..बास यार लाइफ हेच आहे..लिंक अप,ब्रेक अप..क्रश...!!!ह्या पोरांवर माझा विश्वासच नाही..ही जातच मतलबी आहे.. घरात मी अनुभवलंय बाबांचं कधी असं आईवर प्रेम नव्हतच..जीजू आणि ताईचा संसार म्हणजे निव्वळ adjustment आहे. मला कमिटमेंट नकोय आयुष्यात...! आपलं बरयं

“हेल्लो हाय..टाटा स्काय..नाही पटलं बाय बाय...”

भेटायचं,बोलायचं..कॉफी,मुव्ही, हँग आउट..बस्स...कुणी जास्तच जवळ येऊ पाहत असेल तर ब्रेक अप ....it is that simple…!!”

“it is not that simple ऋतू... सगळीच मुलं तशी नसतात... तुला इतकं प्रेम करणारा कुणी भेटला नाही अजून म्हणून तू प्रेमाला नावं ठेवतेस पण जेव्हा खरोखर प्रेमात पडशील ना..तेव्हा तुला त्या अडीच शब्दांत काय ताकद असते ना ते कळेल..” तनु आपली बाजू रेटत म्हणाली.

“ओह्ह्ह हो...अडीच शब्दांची ताकद and all….तन्या..!!! सॉलिड लेखक होशील तू ...”अडीच शब्दांची ताकद तूम क्या जानो ऋता बाबू ”
--पुन्हा मोठ्याने हसत तनुला चिडवत ऋतू म्हणाली.

“ऋतू मार्क द फेमस वर्डस ”The girl with the tallest wall around the heart have deepest love in the heart…” तू जे strong असल्याच दाखवतेय ना ..ते निव्वळ आवरण आहे..तू किती सेंटी आहे ते बघितलंय मी..किती तरी लव्ह स्टोरीज बघतांना रडली आहेस तू ..तेव्हा ...”
तनु तिचं बोलणं पूर्ण करणार तोच तिला मध्येच अडवत प्रिया म्हणाली-

“ये ये पोरींनो...काय चालूये...तो आरुष घरी निवांत टीव्ही बघत पडला असेल आणि आपण त्याच्या विषयावरून लिंक अप,प्रेम मग सरळ लग्न इथपर्यंत मजल मारली...chill Yaar!!...आणि ऋतू ..हे मात्र खरं हा.. की प्रेम एक केमिकल लोचा आहे ...हे झालं की समजत नाही..याचे साईड इफेक्ट मात्र बेक्कार असतात.सो मी तर सरळ वधू परीक्षा देऊन बोहल्यावर चढणार आहे..शादी के बाद प्यार कॅटेगरी...”

झुल्यावरून उठून ऐसपैस आळस देत ऋतू म्हणाली –

“Ok ..girls…तुमची फिलॉसॉफी तुमच्याकडे. मी तर प्रेम,लग्न ह्या भानगडीत पडून माझं फ्रीडम गमावणार नाहीये... आई बाबांनी अबोला धरलाय ह्या कारणाने पण who cares…लाइफ एकदाच मिळते यार....लव्ह शव्ह,शादीचा ड्रामा बिग नो नो फॉर मी...प्रेम तर मी ह्या जन्मात करणार नाही”

“ऋता प्रेम करायचं नसतंच मुळी..” तनु ही मागे हटायला तयार नव्हती.

“हो हो माहिती आहे .. प्रेम करत नाही, होऊन जातं ...ओके?” बेफिकीरपणे ती म्हणाली.

“नाही, प्रेम होऊन जातं असंही नाही... “प्रेम असतं!!..आणि ज्याच्यासाठी असतं त्याला कुठेही शोधत येतं..” तुमची मर्जी असो वा नसो....”

तिला मुजरा केल्यासारखं करतं,चिडवत ऋता म्हणाली-

“जहापना तुसी ग्रेट हो और ये ग्रेटपणा अपने पास रखो...”

उठून तिच्या गालांचा हळूच चिमटा घेत तनु म्हणाली-

“मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की ह्या वेड्या कोकराला प्रेमात अजिबात पाडू नको त्याला कळणार ही नाही की तो प्रेमात आहे...आणि कुणी त्याला सांगितलं तर तो ऐकणार ही नाही”

दिवस हळूहळू मावळतीला लागला होता...तिघांच्या हसण्याखिदळण्याचा आवाज त्या पार्श्वभूमीत हळूहळू मिसळून गेला.
**********************************

वेदने गाडी जे. एम.रोडकडे वळवली आणि थेट बालगंधर्वच्या पार्किंगला लावली.तिथल्या त्याच्या आवडत्या शांत ,एकांत कट्ट्यावर तो बसला. हे ठिकाण,तिथे घालवलेला “मी टाईम” ही त्याची आवडती गोष्ट होती. घरी औरंगाबादला फोन लावून त्याने आजचा पहिल्या नोकरीचा पहिला दिवस किती छान होता हे आईबाबांना आणि लाडक्या छोट्या बहिणीला आवर्जून सांगितलं. घरातला कमावता, जबाबदार सदस्य झाल्याचं समाधान त्याचा चेहऱ्यावर उमटलं होतं. फोन झाल्यावर थोडं सैलावत त्याने त्याच्या आवडत्या आणि काळजाच्या अगदी जवळ असलेल्या डायरीत काही नोंदी केल्या ..लिहतांना त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्माईल पसरलं गालावरच्या खळ्या हळूच खुलल्या.
पूर्ण दिवस पुन्हा एकदा डोळे मिटून त्याने आठवला आणि डायरीवर आजच्या पानाच्या शेवटी एक प्रश्नचिन्ह काढून त्याने डायरी सॅकमध्ये ठेवली. थोडा वेळ एकांतात घालवल्यावर त्याने गाडी कोथरूडच्या दिशेने पिटाळली.

********************

ऑफिसमध्ये ऋतुजाने पहिल्या दिवसापासूनच चांगल इंप्रेशन जमवलं होतं.हळूहळू तिचं प्रेझेंटेशन स्किल,explain करायची युनिक पद्धत ह्या सगळ्या गोष्टी सिनीअर्सच्या नजरेत आल्या होत्या आणि त्याबद्दल तिचं वेळोवेळी कौतुकही होत होतं. ती सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागायचा प्रयत्न करत होती. वेद, जयराज आणि रेवाचा खूप छान ग्रुप झाला होता,वेदचं जबरदस्त content writing, creative approach तर चर्चेचा विषय झाला होता. नवीन आलेल्या ह्या सगळ्या फ्रेशेर्समध्ये ऋतुजा आणि वेदच्या टॅलेंटची जणू चुरस चालू होती. सेशनमध्ये दोघांचे खटके उडाले नाही असं क़्वचितच व्हायचं.दोघं समोर आले तरी एकमेकांना टफ लूक देऊन नाराजी व्यक्त करायचे. आरुष ऋतुजामध्ये घेत असलेला interest जरी ऋतुजाला कळत असला तरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्याच्या बेस्ट फ्रेंड सलोनीला मात्र मनोमन तिचा राग येत होता.
ऋतु येण्यापूर्वी आरुषचा सलोनीमध्ये इंटरेस्ट होता हे एव्हाना ऋतूच्या लक्षात आलं होतं.वेदच्या ग्रुपमध्ये ऋतू आणि आरुषचा चुकून विषय निघाला तरी वेद चिडून तो विषय बंद करायला लावायचा.
रेवा नकळतपणे वेदच्या कधी हळव्या कधी चिडक्या- ऊन पावसाच्या ह्या स्वभावावर भाळली जात होती आणि जयराज मात्र तिला वेदच्या पाठीमागे चिडवायची एक ही संधी सोडत नव्हता.

ट्रेनिंग संपायला आता काहीच दिवस बाकी होते आणि एक शेवटची exam म्हणून एक ग्रुप टास्क कम कॉम्पिटिशन होणार होती. ज्या टीमची ऍड मोस्ट interesting,creative आणि inclusive असणार त्या टीमला बेस्ट टीम आणि टीम लीडरला “बेस्ट लीडर टायटल” आणि प्राइझ मिळणार होतं.
अपेक्षेप्रमाणे ऋतुजा,वेद त्यांच्या त्यांच्या टीमचे लीडर होते आणि सोबत अजून दोन टीम झाल्या होत्या.
प्रेझेंटेशन आता दोनच दिवसांवर आलं होत. लंच ब्रेकमध्ये वेदच्या ग्रुपची त्यांचा रोजच्या टेबलवर दबक्या आवाजात चर्चा चालू होती. प्रोजेक्ट सिक्रसी ही महत्वाची गोष्ट असल्याने कुठलीही थीम कुणाला कळायला नको होती. वेदने ऍड चे जिंगल लिहिले होते त्यावर रेवा आणि तो स्वतः परफॉर्म करणार होता तर जयराज व्होईस ओव्हर देणार होता. लंच ब्रेकनंतर जयराजकडे व्हाईस ओव्हरची प्राक्टिस म्हणून दिलेले स्क्रिप्ट पेपर थोडावेळ तो टेबलवरच विसरला आणि एका नव्या वादळाची सुरुवात झाली.

***********

“अनुज ...ऐक ना..” लंच ब्रेक नंतरच्या सेशनला सौम्या ने अनुजला बोलावलं.

“काय ग काय झालं..”

“अनु see this ..” मोबाईल मधला फोटो दाखवत ती म्हणाली.

“अरे हा तर स्क्रिप्ट पेपर दिसतोय कुणाचा..” तो फोटो झूम करत म्हणाला.

“येस..वेदचा आहे.. बघ काय सॉलिड कन्सेप्ट आहे जिंगल,परफॉर्मन्स विथ व्होईस ओवर त्यांचे सगळे points कव्हर होतं आहे,आपली कार्टूनची,अनिमेटेड थीम यापुढे काहीच नाही, आपण सेम न करता जरासा बदल करूया एक शॉर्ट प्ले फॉर्म करू, तू आणि ऋतू परफॉर्म करा मी व्होईस ओवर करते...what do you think ?” ती डोळे मिचकावत म्हणाली.

“ओ मॅडम ...ऋतू ऐकणार नाही तिला कळलं ना की ही वेदची थीम होती आणि आपण चोरली तर ती नंतर ढुंकूनही पाहणार नाही आपल्याकडे..फ्रेंडशिप तिथेच ब्रेक...” तो आजूबाजूला बघत हलकेच म्हणाला.

“अरे कुणाला कळणार आहे? मी फोटो काढला तेव्हा कुणाला कळणार नाही असा फोन पकडला होता.कुणी नव्हतं त्यावेळी ,त्या पेपरला हातसुद्धा लावलेला नाहीय मी..” चेहऱ्यावर मिश्कील हसू आणत ती म्हणाली.

“यार तसं तर ठीक आहे प्लॅन आणि आपला नंबर अगोदर आहे तर बेनिफिट आपल्याला मिळेल..पण आता ऋतूला कसं पटवायचं...?” त्याने त्याची शंका बोलून दाखवली.

“ हे बघ असही आज आपण ब्रेन स्टोर्मिंग करणार आहोत ना तेव्हा नकळत विषयात विषय काढायचा..आणि हळूहळू कन्सेप्ट मांडायची...काय पटतंय का ?"

“ओके...गुड ...प्राईज तर आपणच घ्यायचं...” टाळी देत अनुज म्हणाला.

ब्रेन स्टोर्मिंग सेशनला सौम्या आणि अनुजने ऋतूला व्यवस्थितपणे घोळात घेत कन्सेप्ट सांगितली आणि त्यांनी त्यांचा शोर्ट प्ले तयार केला आणि त्यांच्या रिगरस प्राक्टिसला सुरुवात झाली,त्यांच्याकडे वेळ कमी होता.

प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला, सगळ्या टीम तयार होत्या.

संपूर्ण शोकेस मिडियाच्या टीम समोर एक एक ऍड प्रेझेन्टेशन होणार होते.
ऋतुजा प्रेझेंटेशनसाठी जे कॅरॅक्टर प्ले करणार होती त्यासाठी तिने सुंदर रेड साडी आणि शिमरी ब्लॅक स्लीवलेस ब्लाउज घातलं होतं आणि रेट्रो लूक केला होता ज्यात ती कमाल दिसत होती.
बघणाऱ्यांची नजर क्षणभर हटतच नव्हती.साडी घातल्यामुळे ती आज जरा लवकर आली होती.साडी सांभाळत, हळुवार पावलं टाकत ती लिफ्ट जवळ आली आणि आत शिरली,लिफ्टचा दरवाजा बंद होत होता तस धडपडत बॅग सांभाळत वेदने लिफ्ट थांबवली.अजूनही त्याचं लक्ष मोबाईलमध्ये होतं.आत जाताच बटन प्रेस करायला म्हणून त्याने वर पाहिलं आणि अनपेक्षितपणे त्याचं लक्ष ऋतुजाकडे गेलं..काही क्षण तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघतच राहिला.
काजळ घातलेले डोळे,कर्ल केलेली,गालावर हलकेच हेलकावे घेणारी बट,हळूवार विलग होणारे लिपस्टिक लावलेले ओठ.. यात हरवत तो क्षणभर सगळं विसरून गेला.ऋतुजाही नकळत त्याच्या नजरेत बांधली गेली होती. त्याच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हलक्या स्माईलमुळे गालावर पडलेल्या खळ्यांवरून तिचीही नजर हटली नाही .हे असं डोळ्यात हरवायचं नाहीये हे मन बजावत असतांनाही हृद्य जणू न ऐकायच्या जिद्दीवर होतं.

एक झटका देत लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर दोघेही खाडकन भानावर आले आणि क्षणभर ओशाळले..आणि अनोळखी असल्यासारखे निघून गेले.

संपूर्ण शोकेस मिडियामध्ये आज ऋतूच्या लुकची चर्चा होती.बरेच इंटरेस्टींग सेशन्स झाल्यावर। लंच ब्रेक नंतर प्रेझेन्टेशनची वेळ आली पहिलाच ग्रुप ऋतुजाचा होता. त्याचं प्रेझेन्टेशन सुरु झालं आणि वेदच्या टीमचा चेहराच पडला. यांची आणि आपली जवळपास एकच थीम आहे हे पाहून टीम वेद वैतागली.
सगळी प्रेसेंटेशन्स झाल्यावर जजेसने ऋतुजाच्या टीमला बेस्ट टीम घोषित केलं आणि का ती टीम जिंकली यावर भलंमोठं लेक्चर देण्यात आलं. जयराज आणि रेवाच्या संतापाचा इकडे कडेलोट झाला होता. कॉम्पिटिशन संपली होती. ऑफिस टायमिंग ही झाला होता.हळूहळू फ्लोअर रिकामा होतं होता.रेवा संतापात, रडवेल्या चेहऱ्याने कॉन्फरन्स रूमकडे निघाली.तिचा रडवेला चेहरा पाहून वेद न जयराज ही तिच्या मागे निघाले. ऋतुजा,सौम्या आणि अनुज सगळ्यांच्या कौतुकाने अगदी आनंदी झाले होते.

सौम्या आणि अनुज निघून गेल्यावर कॉन्फरन्स हॉलकडे मेकअप बॅग घ्यायला निघालेल्या ऋतुजाला आरुषने थांबवले.

“ Congrats ऋतुजा...you and your team performed very well.” तो तिच्या चेहऱ्यावर नजर खिळवत म्हटला.

“Thanks sir…how was the concept ? is it executed well?” आज पहिल्यांदा त्याची नजर टाळत जरा इकडे तिकडे बघत ती उगाच म्हणाली.

“Yes of-course ….it was great but the best part was your performance ..You are looking beautiful ऋतुजा” तो थोडं तिच्या जवळ जात हळूच म्हणाला.

“ओह्ह thanks sir …. We are learning a lot from you…” थोडंस गोंधळून जात मागे सरकत ती म्हणाली.

तिचा हा सावध पवित्रा पाहून मागे सरकत तो म्हणाला-
“ Ok ..see you tomorrow. Bye”

आरुष निघून गेल्यावर आपण त्याच्याशी असे का वागलो याचं कारण तिला समजत नव्हतं त्याच गोंधळात ती हॉलकडे निघाली.
रेवाचं रडणं थांबायचं नाव घेत नव्हतं.जयराज आणि वेद समजावून थकले होते. उशीर झाल्याने जयराज निघून गेला पण वेदला रेवाला त्या अवस्थेत सोडवत नव्हतं म्हणून तो थांबला.

“रेवा बास्स की आता, it was just a competition…किती मनाला लावून घेतेय..”

“वेद त्यांनी नक्कीच आपली कन्सेप्ट चोरली असावी...अगदी परवापर्यंत ते काहीतरी अनिमेशन करत होते आणि आज एकदम परफॉर्मन्स...मला नाही पटत. ती ऋतुजा जिंकायला काहीही करू शकते....” तिने अनपेक्षितपणे शेजारी बसलेल्या वेद्च्या खांद्यावर डोकं टेकवत डोळे पुसले.

वेद भांबावला आणि तेवढ्यात रूमचा दरवाजा लोटून ऋतुजा आत आली.वेदच्या खांद्यावर डोकं टेकवून रेवा बसलेली आहे हे बघताच ती जरा अवघडली आणि तिच्याही नकळत एका प्रश्नार्थक नजरेने तिने वेदकडे बघितलं. तिला पाहताच तो ही अवघडला पण मग रेवाच पर्स सावरत उठून तिच्याकडे निघाली.

उगाचच हँडबॅगची चैन लावत असलेल्या ऋतुजा जवळ जात ती म्हणाली-

“ऋतुजा congratulations , खूप मेहनत पडली असेल ना...कॉन्सेप्ट ढापायची मग एक दोन दिवसांत प्रीपेअर करायचं..excellent…!!”

रेवाकडे अविश्वासाने बघत ती म्हणाली-

“रेवा काय बोलतेय...कळतय का तुला? ही आमची ओरीजनल कन्सेप्ट होती. योगायोगाने आपल्या काही गोष्टी झाल्या मॅच आणि its but obvious. आजच्या मार्केटिंग जगात ऍड अश्याच बनतात, काही नवीन नाहीये,chill yaar,रिलॅक्स”

आणि तिच्याकडे न बघताच ती निघाली.दरवाजाकडे निघालेल्या पाठमोऱ्या ऋतूकडे बघत ती म्हणाली –

“आम्ही नाही ना चिल करू शकत, आम्ही नाही ना सिनियर्समध्ये कुणाला पटवलेलं अस दरवेळी जिंकायला..”

तिचं हे बोलणं ऐकून संतापाने मागे वळून जवळपास ओरडतच ती म्हणाली -
“Reva mind your language ok” तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पण तिचं बोलणं पूर्ण न ऐकून घेता रेवा तशीच फणकारत तिच्या समोरून निघून गेली.

वेद हतबल होऊन दोघींची भांडण बघत होता.रेवा निघून जाताच तो दरवाज्यापर्यंत तिला आवाज देत तिच्यामागे गेला पण ती जराही न थांबता निघून गेली. तो ही बाहेर जाणार तसा थोडा थांबला त्याने मागे बघितलं ऋतू रडत होती. रेवाचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं होतं.तो न राहवून मागे फिरला आणि तिच्या जवळ गेला.

“Hey listen sorry ….”

तो तिच्याकडे बघायचं टाळत म्हणाला. सकाळच्या प्रसंगातला अवघडलेपणा अजूनही डोकावत होता.

हलकेच डोळे टिपत,नाक ओढत,डोळे मोठे करत रागातच तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली-

“ तू ऐकलस ,काय म्हणाली तुझी मैत्रीण ते ? मी कुणाला तरी पटवून जिंकलेय,कॉपी केलीय तुमची?”

दीर्घ श्वास घेत,ह्यावेळी सरळ डोळ्यात बघत तो आपसूकपणे तिच्या अजून थोडं जवळ गेला,त्याच्या फक्त श्वासानेही तिच्या गालावरची बट थोडी हलली, तो हरवल्यासारखा म्हणाला-“मला माहित नाही ती काय म्हणाली आणि का म्हणाली,मी फक्त आता एवढंच म्हणेन ....”

बोलता बोलता तो थांबला,क्षणभर थोडी शांतात पसरली त्याच्या पुढच्या वाक्याची ती स्वतःवर चिडत ,अविश्वासाने वाट बघत होती.
तिच्या गालावर ओघळत असलेला एक थेंब एका बोटाने हलकेच बाजूला करत तो म्हणाला-
“please don’t cry……….”

झटकन बाजूला होत,सारवासारव करत,अडखळत तो म्हणाला-

“I mean रडू नको ...घरी जायचय ना ..तुझा तो मेकप वैगरे खराब होईल..मी रेवूला सांगतो की तुम्ही दोघी बोलून सोर्ट करा तुमचं भांडण...ओके?”
माघापेक्षाही जास्त रागात,साडीची पर्वा न करता ती ताडताड निघून गेली.

क्रमशः

©हर्षदा

थोडंस मनातलं-

कुठलंही असुदे,कितीही असुदे ,कुणावरही असुदे ,कुठल्याही वयात असुदे ....प्रेमाचं मॅजिक असतंच विदाऊट लॉजिक ...!! हो ना?

💖💖💖💖