Tujhi Majhi yaari - 21 - last part books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 21 (अंतिम भाग)

अंजली आणि नेहा ऑफिस ला जाण्यासाठी तयार होत होत्या तोपर्यंत बेल वाजली..नेहा ने जाऊन डोअर ओपन केलं .. तर डोअर मध्ये तीन चार गुंड टाईप व्यक्ती उभ्या होत्या..त्यातल्या एकाने नेहा ला पाहून विचारल..

व्यक्ती: अंजली ?

नेहा : नाही..नेहा ..आपण कोण ?

त्या व्यक्ती ने नेहा ला डोअर मधून बाजूला केलं व स्वतः आत घुसला त्याच्या सोबत त्याचे मित्र ही आत आले..नेहा मागून ओरडत आत आली.

नेहा : ओ हॅलो..तुम्ही आहात कोण ? आणि अस कसं जबरदस्ती आमच्या घरात घुसत आहात ?

तिचा आवाज ऐकून अंजली ही बाहेर येता येता बोलली .

अंजली : नेहा ,काय झालं कोण आहे ?

अंजली ने हॉल मध्ये येऊन त्या व्यक्तींना पाहिलं व विचारल .

अंजली : आपण कोण ?

त्यातला एक तिच्या कडे पाहून कुस्तिक पने हसला व बोलला.

व्यक्ती : ज्या व्यक्तीला साध ओळखत ही नाहीस त्याच्या वर केस टाकली .. भारी काम आहे ..

त्याने हसत हसत आपल्या हातांनी टाळ्या वाजवल्या..त्याचे साथीदार ही त्याच्या मागे हसले.अंजली त्याच्या बोलण्यावरून समजून गेली तो हरीश आहे ते..

अंजली : ओ ह..हरीश भाऊजी... सॉरी.. सॉरी..भाऊजी म्हणवून घ्यायची लायकी नाही तुमची...फायनली आपली भेट झाली ..मला तर वाटलं होत ..मी डायरेक्ट तुम्हाला गुन्हेगाराच्या कठद्यात पाहीन...

तिचं बोलणं ऐकून हरीश चिडला व रागात बोलला.

हरीश : चांगलीच मैत्री निभवत आहेस...मैत्रीण वारल्या नंतर..चार वर्षांनी ..तू तिला न्याय मिळवून द्यायला चालली आहेस ? माझी बायको होती ती...एक अपघात होता तो..स्वयंपाक करताना भाजली ती...ते सर्व तेव्हाच सिद्ध झाल आहे ..तू का पुन्हा त्या गोष्टी उखरून काढत आहेस ?

अंजली थोड हसतच बोलली.

अंजली : ते तुझं... गूड लक होत ..आणि माझं बॅड लक ..जे मला सरु बद्दल तेव्हाच समजू शकले नाही...नाही तर तू आता पर्यंत असा मोकळा फिरत नसता...कधीच जेल मध्ये सडत पडला असतास...आणि सरु चा मृत्यू कसा झाला ..हे कोर्टा त कळेलच...

हरीश : ये जास्त बोलू नकोस तू...ओळखत नाहीस तू मला..हरीश शी पंगा घेणं खूप माहाग पडेल तुला..

अंजली : धमकी देतो मला ? तुला घाबरायला मी सरु नाहीये...आणि तुझ्या सारखे खूप हरीश सरळ केलेत मी..

हरीश जास्त च भडकला.. व तो अंजली ला मारायला तिच्या अंगावर धावून जातच होता की ..ती बोलली.

अंजली : मारायचं आहे मला ? मार....

बुद्धो कलुषभूतायां विनाशे प्रत्युपस्थिते। अनयो नयसङ्कशो हृदयात्रावसर्पति ॥

सॉरी ह...संस्कृत श्लोक आहे कळलं नसेल ..म्हणून मराठीत सांगते..जेव्हा पापी माणसाचा विनाश जवळ येतो ना ..तेव्हा त्याची बुद्धी सुद्धा त्याची साथ सोडते.... आणि त्यामुळे तो ..फक्त पाप मार्गावरच पाऊल टाकत पुढे जातो...तुझं ही तसचं झालं आहे..मला माहित होत ..तू नक्कीच या थराला जाशील ...म्हणून तर अगोदरच ..तुझ्या विरुद्ध तक्रार नोंदवून ठेवली आहे मी पोलिस स्टेशन मध्ये..माझ्या अंगावर एक जरी ओरखडा आला ना ..तरी तू जेल मध्ये जाशील..मारायचं आहे ना मला ? मार..

हरीश तर तिचं बोलणं ऐकून शॉक च होतो..तो अंजली ला धमकी देऊन तिथून निघून जातो ..तो गेल्या नंतर नेहा अंजली जवळ येत बोलते.

नेहा : thank God.. अंजली तू अगोदरच कंप्लेंट करून ठेवली आहेस त्या हरीश बद्दल ते..

अंजली पडलेलं सर्व साहित्य उचलत बोलते.

अंजली : कुठली कंप्लेंट ? हा तर हिंदी फिल्म पाहण्याचा असर आहे..

नेहा थोड चकित होत विचारते ..म्हणजे ?

अंजली : मी कुठली ही कंप्लेंट केली नाही...त्या वेळी सुचलं म्हणून मी बोलले..

नेहा चे डोळेच ताठ झाले.

नेहा : oh ..my god .. अंजली त्याने तुला मारल असत तर ? आणि सोबत मला ही..बापरे कसला डेंजर दिसतो तरी तो..तुला भीती नाही का वाटली ?

अंजली: नसत मारल ..अशा वेळी मला मारल असत त्याने तर ..त्याचंच नुकसान जास्त होत...आणि भीती च बोललीस ना..तर वाटली होती ..भीती ..पणं तेव्हा सरु चा चेहरा नजरे समोर येतो आणि सर्व भीती निघून जाते ग..

नेहा केशव ला फोन करून हरीश येऊन धमकी देऊन गेल्याच सांगते..केशव ही लगेच त्यांच्या रूम वर येतो.. व ते खरच हरीश विरुद्ध पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून ठेवतात..केशव ..नेहा व अंजली ला त्याच्या रूम वर न राहता..केशव चा मित्र अजय च्या घरी राहायचा सल्ला देतो..त्याचा मित्र पोलिस इन्स्पेक्टर असतो ..त्याची जॉइंट फॅमिली असते त्यामुळे त्या दोघी तिथे सुरक्षित राहतील अस त्याला वाटत.त्याही तिथे राहायला तयार होतात.
अंजली चे मम्मी पप्पा ही तिला येऊन समजावतात ..केस मागे घेण्या विषयी परंतु अंजली आपल्या निर्णयावर ठाम राहते.

अखेर केस ची सुनावणी सुरू होते.हरीश चा वकील ही हरीश निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो..पणं विजय नेहमी सत्याचा च होतो...शितल हरीश विरुद्ध साक्ष देते..त्यामुळे अंजली केस जिंकते...केस जिंकल्यावर अंजली च्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले..आज तिच्या सरु ला न्याय मिळाला होता.हरीश ला जन्मठेपेची शिक्षा होते..आणि हरीश ला मदत केल्या मुळे त्याचा आई वडिलांना ही दोन वर्ष कारावास होतो.

नेहा ,शितल व केशव च्या हेल्प मुळे सरु ला न्याय मिळतो त्यामुळे अंजली त्या तिघांचे ही आभार मानते.

केशव आणि ,नेहा : अंजली ..thanks नको...फक्त तुझी मैत्री हवी...तुझ्या सारखी मैत्रीण सर्वांना भेटावी ..आम्ही खूप लकी आहोत तू आमची मैत्रीण आहेस.

अंजली : मी ही खूप लकी आहे जे तुमच्या सारखे फ्रेंड्स भेटले मला ..जे माझ्या सदैव पाठीशी राहिले...

सरु ची आई व भाऊ अंजली चे आभार मानतात....अंजली च्या मम्मी पप्पा ना ही तिच्या बद्दल अभिमान वाटतो.खऱ्या अर्थाने अंजली ने तिची यारी निभावली होती.

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED