गीतच्या लग्नानंतर काही दिवसांनी रोहितच्या घरच्यांकडून गार्गी साठी विचारनी झाली होती पण तेव्हा गार्गी प्रतिकची वाट बघत होती.. त्याला मनवण्याचा असफल प्रयत्न करत होती.. त्यामुळे तिने रोहितला नकार दिला होता.. आणि कारण देताना तो खूप लांब राहतो मला इतकं लांब आईबाबांना सोडून जायचं नाही मला तिकडे राहवणार नाही असं सांगितलं होतं.. आई बाबांनी तिला खूप समजावलं पण तेव्हा ती तयार नव्हती... आणि तिच्या इच्छेविरुद्ध तीच लग्न ते लावून देणार नव्हतेच... तिला वाटायचं आज उद्या प्रतीकला माझं प्रेम नक्की कळेल आणि तो परत येईल माझ्याकडे.. एकदा तिने तपास केला असताना तिला कळलं होतं की त्याच्या आयुष्यात तिच्या नंतर कुठलीच मुलगी आली नाही म्हणून कदाचित तिची ही वेडी आशा होती..
प्रतिकला गार्गीच प्रेम कळत होत पण तो मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचं दाखवी.. पण त्याचे डोळे मात्र त्याला खोटं पाडत असत आणि त्याच ते चोरून लपून तिला बघणं ते ही तिच्या लक्षात आलं होतं पण हा असा का वागतो हे तिला कळत नव्हतं.. आणि विचारण्याचा कधी चान्स नाही मिळाला.. तो तिला एकटा कधी भेटलाच नाही आणि फोनवर विचारायचं तर तो टाळत असे.. एकदा गार्गीने प्रतिकला फोन केला असताना..
गार्गी - हॅलो, प्रतीक!!
प्रतीक - हं, बोल काही काम होतं??
गार्गी - मी तुला कामानिम्मितच फोन करू शकते का??
प्रतीक - नाही का!! बरं मग बोल, काय म्हणते??
गार्गी - कामात आहेस का?? असा घाईत असल्यासारखा बोलतोय तू म्हणून विचारलं..
प्रतीक - नाही काही कामात नाहीय.. तू बोल..
गार्गी - मला तुला काही विचारायचं होत म्हणून फोन केलेला..
प्रतीक - काय??
गार्गी - गीतच्या लग्नात मला एका मुलानी बघितलं होतं, त्याच स्थळ आलंय मला.. रोहित नाव आहे मुलाचं.. बँगलोरला राहतो..
प्रतीक - अरे वाह म्हणजे आता तुझा पण नंबर लागणार आहे वाटतं.. चांगलं आहे की कर ना मग लग्न... आणि आम्हाला बोलावं लवकर लग्नाची पार्टी खायला..
अस बोलताना प्रतिकला खूप वाईट वाटत होतं पण त्याचा विचार ठाम होता ..
गार्गी - चांगलं आहे?? लग्न कर?? पार्टी खायला बोलावं??!! खरंच का?? प्रतीक तुला काही कळतच नाही की कळून पण न कळल्याच सोंग घेतोय तू??
गार्गी थोडं रागातच बोलली.. पण काहीच समजून न समजल्यासारखं करत तो म्हणाला..
प्रतीक - यात काय कळण्या आणि न कळण्यासारखं आहे?? तुला स्थळ आलं मुलगा चांगला आहे तर लग्न कर.. काय चुकलं माझं?? तसही तुझं वय झालय ना आता लग्नाच!! बघ गितच पण झालं आता, तुझं पण होणारच ना आज ना उद्या..
गार्गी - बस प्रतीक 😠( गार्गी रागाने चिढूनच बोलली) तू इतकं सहज अस कस बोलू शकतो रे?? विसरला का तू ते सगळं जे आपल्यात होतं?? मी अजूनही तुझी वाट बघतेय रे.. ( आता गार्गी बोलताना जर हळवी झाली होती, अगदी कळकळीने त्याला ती सांगत होती आणि थोडं थांबून)
आणि हो त्या मुलाला मी नकार कळवलाय..
प्रतिकला खूप वाईट वाटत होतं पण त्याला पुन्हा तिला स्वतःत अडकू द्यायचं नव्हतं..
प्रतीक - अग वेडी आहेस का तू? नकार कशाला दिला? चांगले स्थळ परत परत नाही येत.. आणि तू अजूनही तेच धरून बसलीय का मी तर कधीच विसरलो.. आता किती वर्षे झालीत त्या गोष्टीला.. मी तर कधीच त्याातून बाहेर पडलोय.. माझं ऐक आणि तू पण सोड ते सारं.. आयुष्यात अस होत असतं म्हणून तेच घेऊन बसणार आहेस का?? आपण नेहमी चांगले मित्र म्हणून नाही का राहू शकणार??
प्रतीक अस काहीतरी बोलायचा.. त्याच्या तोंडून अस ऐकून ती खूप दुःखी व्हायची .. तिला काही पूढे बोलवेना आणि लगेच फोन ठेवून दिला.... अर्थातच त्याच ते बोलणं खोटं होतं पण फोनवर बोलत असताना तिला त्याच्या डोळ्यात बघता येत नव्हतं म्हणून तिलाही ते खरच वाटलं.. आणि एक दिवस त्यांचं असाच बोलणं झालं आणि मन कठोर करून तिने विरहाचा निर्णय घेतला.. ती स्वतःला त्याच्या प्रेमापासून दूर करून आयुष्यात पुढे जायला तयार झाली..
पण जेव्हा प्रतिकचा विचार सोडून पुढे जायचा विचार केला तेव्हा मात्र 'मला खूप लांब जायचंय आता, या शहरात किंवा इथे आसपासही नको' अस तिला वाटायचं.. कारण त्या शहरात तिचा संबंध प्रतीक शी नेहमी आला असता आणि मग तिला कदाचित त्याला विसरणं कठीण झालं असत म्हणून असेल..
पुढे एक वर्षाने तिला एक स्थळ आलं.. पाहण्याचा कार्यक्रम उरकला नि दोन्ही बाजूने पसंती झाली.. गार्गीने आधीच ठरवलेलं की घरचे म्हणतील तिथे लग्न करूयात.. आणि हा मुलगा घरच्यांना खूप पसंत होता.. मुलगा पुण्यात एक नामांकित IT कंपनीमध्ये नोकरी करत होता.. तिनेही घरच्यांनी विचारल्या वर काहीच विचार न करता होकार दिला.. पाहणी झाल्यावर 15 दिवसातच साक्षगंध चा कार्यक्रम झाला , साखरपुडा होईपर्यंत गौरव ( तिला बघायला आलेला मुलगा) आणि गार्गी फक्त बघण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी एकदा बोलले होते, नंतर मात्र ते सरळ त्यांच्या साखरपुड्यालाच भेटले होते..
दोघांमध्येही एक अवघडलेपणा होता.. दोघेही एकमेकांसाठी अनोळखीच होते.. आणि त्यात फोटोग्राफर मात्र त्यांना रोमँटिक अशा काही पोज द्यायला सांगत होता.. त्यात दोघांचीही फार तारांबळ उडत होती.. गार्गीला खूप जास्त awkward वाटत होतं.. आणि गौरव मात्र ते सगळं एन्जॉय करत होता.. विधी आणि फोटो सेशन आटोपल्यावर बऱ्याच वेळानंतर दोघांना बोलायला एकांत मिळाला.. त्यातही काय बोलावं काही सुचत नव्हतं.. इतकी बोलकी गार्गी कुणासमोर अशी अबोल होईल असं तिलाही कधी वाटलं नसेल .. मग न राहून गौरवनीच सुरुवात केली..
गौरव - अ... ते तुझा नंबर दे ना... माझ्याकडे नाहीय.. आता फोनवर बोललं तर चालेल ना??
गार्गी - हो चालेल ना गार्गीनेही लगेच तिचा नंबर दिला.. आणि पुन्हा शांतता..
गौरव - ते ... फ़ोटो काढताना थोडं जास्त च झालं नाही का??
गार्गी - हो ना.. म्हणजे, मला जरा awkward वाटत होतं, माफ करा पण अस एकदम फ्रॅंक आणि फॅमिलिर व्हायला मला जमणार नाही.. म्हणजे आपण कधी बोललो पण नाही साधं 15 दिवसंपूर्वीची आपली भेट तीही फक्त एकदा आणि आता अस अचानक इतक्या जवळ येऊन फोटोस शूट करणं खूप अवघडलेपण होत माझ्यात.. तुमच्यावर शंका नाहीय पण अस एकदम ... म्हणजे ... म्हणजे... ते ...
गौरव - मी समजू शकतो, माझीही तशीच काहीशी स्थिती होती..
गार्गी - हो का... या फोटोग्राफरला कुणी सांगितलं काय माहिती हे असे फोटो काढायला...
" आम्हीsssssss" तिकडून सगळी यांची गॅंग आणि त्यात गार्गीच्या भावंड सगळे मिळून सोबतच ओरडत त्यांच्याकडे आले.. त्यांच्या अश्या अचानक ओरडत येण्याने दोघेही पुरते गोंधळून गेले होते..
गार्गी - काssय?? म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता...
स्वरा - हो ताई, म्हणजे तेवढच तुम्हाला जवळ यायला भेटेल म्हणून अमित दादाची कल्पना होती ही..
गार्गी - थांबा तुम्ही सगळे, कार्यक्रम संपला की बघते तुमच्याकडे.. आणि तुम्ही सगळे इथे काय करताहेत?? चला निघा इथून, दुसरे काम नाही का आम्हाला छेडण्याशिवाय..
प्राची - अच्छा म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे.. आम्ही तुम्हाला जवळ आणायसाठी एवढं केलं आणि तू आम्हालाच ओरडशील...
संदेश - हो आणि आता आमच्यामुळे तुम्हाला बोलायला मिळालं, तुम्ही थोडं जवळ आलात तर आता आम्हालाच इथून घालवतेय, वाह रे एहसानफरामोश!!!
यश - आम्हाला पण बोलायचंय जिजूनशी...
गार्गी - हो पण त्यांना नाही ना बोलायचं तुमच्याशी .... जा आता उगाच त्रास नको द्या..
आरव - आम्ही का त्रास देऊ . .. आणि त्यांना बोलायचं की नाही हे त्यांना ठरवू दे ना.. तू कशाला ठरवते??
गार्गी - तुम्ही सगळे नि मी एकटी, मी हरणार हे नक्कीच ना उगाच मला नाही झिक झिक करून माझा मूड खराब करायचा , बोला तुम्हीच मग मी चालले..
अस म्हणत ती निघतच होती की प्रतिकनी तिचा हात पकडला..
प्रतीक - अग अस काय करते.. आम्ही दोन शब्द बोलून निघून जाऊ मग बोला ना तुम्हीच, आणि आता यापुढे तसही तुमचं बोलणं चालूच असणार आहे.. तेव्हा आमच्याशी तर आताच बोलता येईल ना त्यांना..
तो बोलत होता पण त्याचे डोळे मात्र काही दुसरंच बोलत होते.. तिला त्याच अस तिचा हात पकडून तिला थांबवणं मनात कुठेतरी सुखावून गेलं होतं.. पण लगेच स्वतःला समजावत ती त्याला एक शब्दही न बोलता गौरवच्या बाजूने येऊन उभी राहिली ..
गौरव - तू निघून गेली असती तर यांना मी एकट्याने कस काय हँडल केलं असतं?? पुन्हा अस सोडून नको जाऊस.. आयुष्यभर साथ द्यायची आहे ना..
तो तिच्या कानात कुजबुजला, त्याच शेवटच वाक्य ऐकून ती बावरून त्याच्याकडे बघू लागली.. तिला त्याच्या डोळ्यातही तिच्यासाठी प्रेम दिसलं.. तो पुन्हा बोलला..
गौरव - देशील ना??
गार्गी - (तशीच गोंधळलेल्या अवस्थेत) अ??
गौरव - आयुष्यभर साथ देशील ना??
तिला काय बोलावे कळत नव्हतं, एकीकडे आताच घडलेला प्रतीक सोबतचा प्रसंग तिच्या मनाला हुरहूर लावून गेला तर दुसरीकडे गौरवचा अनपेक्षित प्रश्न तिला कोड्यात टाकत होता.. त्याच उत्तर 'हो' च असणार होतं किंवा तिला ते द्यायचही होत पण माहीत नाही कुठला तो विचार तीचे शब्द अडवून ठेवत होता..
सगळे जण गौरवच्या या अनपेक्षित प्रोपोजवर गार्गीच्या उत्तराची वाट बघत होते.. गौरव पुन्हा बोलला..
गौरव - काय झालं? बोल ना!! देशील ना मला आयुष्यभर तुझी साथ??
गार्गी एकटक त्याच्याकडे बघत होती.. तेवढ्यात प्रतीकच बोलला, कदाचित त्याला तिची मनःस्थिती कळली असावी ..
प्रतीक - गौरव, आता एवढी अंगठी घातल्यावर तुमचा साथ देणारच झाली ना ती, आता आणखी काही पर्याय आहे का??
विवेक - अरे हो, पण आपली एवढी बडबडी गार्गी, आज जिजूंच्या बोलण्यावर इतकी चिडीचूप कस काय झाली?? हम्मम, म्हणजे गार्गीला चूप बसवणारा आला म्हणायचा..
प्रतीक - अरे विवेक ती लाजते आहे रे आपल्या सगळ्यांसमोर.. नंतर एकांतात सांगेल बघ ती..
पल्लवी - हो का गार्गी ?? अस आहे खरच तू आमच्यासमोर चक्क लाजतेय??
सगळे बोलत होते पण गार्गी मात्र गौरवच्या डोळ्यात बघत राहिली होती.. तिच कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष नव्हतं.. गौरवही एकटक तिच्याच डोळ्यांत बघत होता.. कदाचित तीच उत्तर तो डोळ्यातून जाणून घ्यायचं प्रयत्न करत होता..
त्यांना अस गुंतलेलं बघून ..
प्रिया - चला रे आपण नंतर येऊ, थोडा private scene चल रहा है..
आणि ते सगळे जायला निघाले तोच गार्गीने त्यांना थांबवलं..
गार्गी - अरे तुम्ही बोलणार होता ना यांच्याशी.. आणि न बोलता असाच निघालात का??
प्रिया - अग तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात इतके गुंतले होते की आम्हाला वाटल तुम्हाला एकांत द्यावा..
गार्गी - अस काही नाहीय.. बोला बोला..
आणि सगळे गौरववर एकदम तुटून पडले.. गार्गी मात्र अजूनही तिच्याच विचारात होती..
-------------------------------------------------------
क्रमशः