कादंबरी - प्रेमाची जादू भाग- ३३ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू भाग- ३३ वा

कादंबरी -प्रेमाची जादू

भाग – ३३ वा

-------------------------------------------------------------

सकाळी सकाळी येऊन गेलेल्या दोन मोठ्या सेठलोकांनी यशने काही तरी केले पाहिजे अस बोलून दाखवले ,

तसे तर यश कुणालाही मदत करण्यास तयार असतो हे त्या सेठलोकांना माहिती होते .

पण , यावेळी त्याला त्याच्याकडे नोकरीस असणार्या नारायणकांना मदत करायची होती .

त्यात ही गोष्ट साधी सुधी नव्हती त्यात लपलेल्या अनेक गोष्टी होत्या , त्या उघडकीस आल्या तर ..त्रास होणार ..!

या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते .

काकांच्या जावयाने करून ठेवलेल्या पैश्याच्या भानगडी ऐकून ..यशचा मूड पार बिघडून गेला . काय करावे ? काही सुचेना ,

शांतपणाने आणि विचारपूर्वक यातून मार्ग काढावा लागणार आहे .

बागेत बसून राहिलेल्या यशच्या समोर उभे रहात माळीकाका म्हणाले –

यश ..हे नारायणकाका राहतात तो एरिया माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. कामगार –वस्ती अशीच ओळख आहे या एरियाची .

माझ्या ओळखीच्या जुन्या लोकांच्या गाठी-भेटीसाठी तिकडे माझे येणे-जाणे असते .

खरे सांगू का ..यश -

माझा आणि नारायणकाकांचा दोस्ताना तसा जुना –पुराना आहे .एकाच वयाचे म्हणा कि ,

मग,आमच्या भेटीत घरगुती विषयावर सुख-दुखच्या विषयावर बोलणे होतच असते . त्यांनी खुपदा मनातले सांगून

मनातले दुखः हलके केले आहे ,त्यामुळे नारायणकाकांना काय नि कसा त्रास होतो आहे याची मला जास्त डिटेल मध्ये माहिती आहे..

त्यांचे बोलणे ऐकून घेत यश म्हणाला – माळीकाका ,हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.

तुम्ही आज मला सुरुवाती पासून सगळी स्टोरी सांगावी ,

म्हणजे, नारायणकाकांना या संकटातून बाहेर कसे काढता येईल ? हे मला ठरवता येईल.

यश बागेतच बसून ऐकू लागला –माळीकाका सांगू लागले -

आपल्या नारायणकाकासारखा सज्जन आणि पापभिरू माणूस शोधून सापडणार नाही.

त्यांना एकच मुलगी तिलाच त्यांनी लाडाकोडात वाढवले . काका-काकूंची ही पोरगी तशीच गुणी स्वभावाची आहे,

आई-बापाला शोभेल अशीच साधी-सरळ मुलगी. शालिनी नाव तिचे ..अगदी नावा प्रमाणेच शालीन “आहे , सगळेजण

तिला ..”शालू “ असे म्हणतात .

काकांना एकच बहिण ..पार्वती – पारू “, तिला एकच मुलगा ..जगन्नाथ आहे नाव ..

त्याला सगळे जग्गू “म्हणतात .

काकांचा मेहुणा ..तडकाफडकी गेला - कोणत्या आजाराने मेला “ हे कुणालाच कळाले नाही.

बहिणीचे घर – तिचा अर्धवट संसार , उघड्यावर –रस्त्यावर कसे टाकायचे ?

नारायणकाकांनी –आपल्या बहिणीचा- पारुचा तिच्या मुलासाहित सांभाळ केलाय .

नारायणकाकांच्या घरी राहून लहानाचा मोठा झालेला जग्गू – हा त्यांचा भाचा आयटीआय मध्ये शिकला ..मेकेनिक झाला .

.त्याच्या हातात चांगली कला आहे.इलेक्ट्रिकची म्हणा ,इलेक्ट्रोनिकचे म्हणा ,मशीनची म्हणा , सगळ्या वस्तू रिपेअरिंग करून देण्यात त्याचा हातखंडा आहे .

हुशार ,चलाख ,आणि महा –डोकेबाज आहे हा जग्गू .

तो वायरमन -फिटर, प्लंबर, सगळं काही आहे.नव्या नव्या वस्तू – बाजारात आल्या की ,सहा महिन्यात जग्गूकडे कस्टमर फोन करतात

–अरे जग्गू -

“आम्ही परवाच घेतलेली मशीन, फ्रीज , वाशिंग मशीन , मिकसर , ए सी. ओव्हन बिघडले की ,मशीन प्रकार कोणताही असो ,जग्गू ते ओके करून देणार.

जग्गूराव टेक्निकल कामात नंबर एक ..असा तो फेमस झाला .

आपल्या बहिणीला चांगले दिवस आले , तिचा मुलगा पायावर उभा राहिलंय याचे समाधान नारायण काकांना वाटू लागले ,

जग्गुचे इन्कम चांगलेच वाढले .. खिशात पैसा खुळखुळू लागला ,

नारयणकाकांच्या बहिणीने पदर पसरीत म्हटले ..

दादा – माझ्यासाठी ,माझ्या पोरासाठी तुम्ही इतक केलाय, आता आणखी एक उपकार करा ..

तुमची शालू ..माझ्या जग्गुला द्या ..केव्हा पासून मी स्वप्न बघतेय ..तुमची शालू माझी सून झालीय ,

आणि तुम्हाला तर ठावं आहे- जग्गुला मायेने सांभाळील तुमची पोरगी ...शालूची बरोबरी करू शकणारी

एक पण पोरगी माझ्या नजरेस अजून पडलेली नाही.

बहिणीची इच्छा – ऐकून ..नारयणकाकांची आणि काकूंची मोठीच काळजी मिटली ..,

लग्न करून संसार करणारी त्यांची लाडकी शालू लग्न झालनंतर ही नजरेसमोरच राहणार ..काळजीच मिटली म्हणायची .

मामाची शालू ..रोजच्याच पाहण्य्तली .

जग्गुला ..बायको म्हणून ती आवडली ..त्याने होकार दिला ..मग..काय

नारयणकाकांनी घरा शेजारीच घेऊन ठेवलेला ..रिकामा प्लॉट ..जग्गुला- होणार्या जावयाला दिला ,पोरगी दिली .

जग्गुची दोस्त कंपनी म्हणते -

लेका –नशीबवान रे तू ..प्लॉट मामाने दिला , पोरगी मामाने दिली ...

सहा-आठ महिन्यात ..राहण्याच्या हिशेबाने नवे घर बांधून दिले ..

थाटात जग्गू आणि शालुचे लग्न लावून देत .. नारायणकाका आणि काकू ..आनंदाने हरी हरी करीत

राहू लागले.

जग्गुची मार्केटमध्ये ओळख ..नारायणकाकांचा भाचा आणि आता जावाई ..अशी होती . स्वतहा

जग्गूने आपल्या कामातील हुशारीने सगळ्या मार्केटमध्ये बस्तान बसवले . कामाची त्याला कधीच

कमी पडत नव्हती . काकांना आनंद वाटायचा ..आपला जावई चांगले नाव कमवतो आहे.

शालू आणि काकांची बहिण .. सून-सासू म्हणून राहत होत्या ..तरी दोघींचे नाते माय-लेकीसारखे ,

दोघी एक-मेकीला सांभाळून राहत आहेत हे पाहून ..लोक म्हणायचे ..

नारायणकाकाची शालू आहे ती ..घरची लक्ष्मी झाली तुझ्या , तुला काही पडणार नाही.

लहानपणापासून काकाच्या घरात राहिलेला ..जाग्गु ..आता मोठा झाला होता , जो पर्यंत त्याचे

घर नव्हते , लग्न झाले नव्हते ..तोपर्यंत काकांच्या घरात तो राहायचा , पण, लग्न झाले, आणि

काकांनी दिलेल्या नव्या घरात राहायला गेल्यवर ..नव्याचे नऊ सरले ..

आता “जग्गू स्वतःच्या मनाप्रमाणे वागू लागला . त्याची आई गरीब ,मऊ स्वभाव्ची , आणि

बायको – शालू ..ती सुद्धा आईला शोभेल अशीच होती.. मग काय ,जग्गुचे नवे रूप पाहून सगळे थक्क झाले.

लोक म्हणायचे –इतके दिवस काकाच्या घरात होता ..तो पर्यंत नीट राहिला , आता बिन-लागामाचा

घोडा , कानात वारा शिरल्यासारखा सुटलाय हा जग्गू ..!

खरे तर, जग्गुला त्याच्या वाईटवृत्तीच्या दोस्तकपंनीने घेरले होते , ठरवून ..सगळे एक झाले होते ,

आणि जग्गुच्याच पैशावर चैन- मौज मजा करून त्याला लुटत होते.

काही कारणामुळे दोस्त कंपनीत फुट पडत गेली ..आणि काही दोस्तांनी फायदा घेत जग्गुच्या मनात बाकीच्या विषयी

काही बाही भरवले ..पाहता पाहता ..दोन दोन टोळ्या झाल्या ..

धंदा –पाणी राहिलं बाजूला ..जग्गू इतर धंद्यात घुसला , त्याने चलाखीने इथे आपले पाय रोवले.

दारू-पार्ट्या व्हायच्या ..त्यासाठी लागणारा पैसा ..तो कुठून आणायचा ?

मग..याला टोपी घाल , त्याला टोपी घाल , बनवा बनवि ..सगळे लफडे –धंदे सुरु झाले.

रेल्वे स्टेशन ..अरिया त्याचा अड्डा ..तिथून सगळ्यांना .सगळा माल ..जग्गू साप्प्लाय करायचा .

या कामात तसा तो कच्चा ,नवा माणूस ..पकडला जायचा ..तेव्हा त्याला नारयणकाका सोडवून आणायचे .

हाणा-माऱ्या करणाऱ्या जग्गुला लोकांच्या तावडीतून सोडवून ..घरी आणून सोडावे लागते ..

इतके करून ही ..जग्गुचे शेपूट वाकडे ते वाकडे “,.

तो शालूला शिवीगाळ करतो, मारण्याची धमकी देतो , तुला कायमची सोडून देईन म्हणतो ,

.मग राहा बापाकडे ..”नवर्याने सोडून दिलेली बायको म्हणून “,

गरीब शालू .हे ऐकून भीतीने थरथरत कापायची .. शेजारीच आपल्या आई-बाबांच्या कानावर हा

गोंधळ जातो , याची तिला लाज वाटते .पण,ती काही करू शकणार नाही ..याची जग्गुला खात्री आहे.

जग्गू आता रेपारिंगची कामे करीत नाही , पण..जुन्या ओळखीच्या कस्टमर कडून , दुकानदार सेठकडून

पैसे उसने घेतो ..परत करीन म्हणतो, देत कधीच नाही..असे हजारो रुपये या जग्गुने

बुडवले आहेत. नारयण काकांनी पदरमोड करून .काही जणांचे पैसे दिले , पण, त्यांचं जे मिळते

त्यात दोन घरे चालवतात ते. जग्गू ने इमानदारीने जगणार्या नारयण काकांचे जगणे कठीण करून

टाकले आहे.

आणखी एक गोष्ट – जग्गून आपल्या ग्यारेज मधून ..ओरीजनल पार्ट चोरी करतो , हलका आणि

सेकंडमाल चुपचाप मिक्स करून टाकतो ,वरवर नजरेने पाहण्र्याला कळणार ही नाही जग्गुची चलाखी .

आपल्या मोठ्या कस्टमर कडून देखील त्याने पैसे घेतले आहेत .बाहेर उभ्या असलेल्या गाड्यातून तो

इतक्या किरकोळ पार्टची चोरी करतो की ..काही चोरीला गेले आहे हेच लक्षात येत नाही ..

लोक म्हणतात ..जुना झालाय ,गेला असेल पडून केव्हा तरी ...घेतात नवा बसवून.

नारयण काकांच्या नावाचा उपोयग करून जग्गुच जातो कस्टमरच्या घरी.आणि दिलेले पैसे स्वतःच्या खिशात

घालून मोकळा होतो.

नारयणकाका मार्केट मधून आपल्या दुकान्साठी क्रेडिटवर जो माल आणतात , त्या बिलाच्या

झेरोक्स कोपया करून ..दोन-दोन वेळा जग्गुने आपल्या ऑफिसातून पैसे उचलले आहेत ,

फार चलाखीने हे काम नारयण काकांना पुढे करून तो करवून घेतो ..

कारण..त्याने नारयण काकांना धमकी दिलीय ..खबरदार हुशारी केलीत तर ..तुमच्या पोरीचे काही खरे नाही.

आता संग यश ..काय करावे नारायणकाकांनी ? ..स्वतःचा जावाई त्यांचा कर्दनकाळ झालाय.

यश म्हणाला – माळीकाका – ही गोष्ट खूप आधी तुम्ही सांगयला पाहिजे होती ,तुम्ही चुकलात .

तुम्ही वेळीच सांगितले असते ..तर नारयणकाकांची या त्रासातून आपण या आधीच सुटका केली असती ..

आणि त्या जग्गुला धडा शिकवला असता.

हात जोडीत माळीकाका म्हणले –

यश , लहान तोंडी मोठा घास कसा घेणार आम्ही नोकर माणसं.

आज ही गोष्ट मोठ्या लोकांच्या मुळे उघड झाली आहे, तेव्हा मी पण तुम्हाला सगळी खरी खरी

गोष्ट सांगितली की हो मालक .

यश म्हणाला – मी रागवलो नाहीये तुम्हाला , पण, इतके दिवस तुम्ही उगीच ही गोष्ट आम्हाच्या

पर्यंत येऊ न दिल्याने सगळ्यांचे नुकसान झाले आहे.

जे झालें ते झाल. आता काय करता येईल ते करू या.

यश ऑफिसला निघाला ..

त्या दिवशी मधुराला ज्या शंका आल्या होत्या ..त्या आज खर्या ठरल्या होत्या .

चौधरीकाकांनी नारयण काकांवर इतका विश्वास दाखवायला नको होता . ते देखील कसे काय

फसले या जागुच्या बोलण्याला ? एकदा ही शंका आली नाही ? कमाल आहे.

मधुरा आणि आताची स्टाफ .यांच्या अगोदर जो माणूस कैश सांभाळीत असेल, तो तर सामील

नसेल ना ..जग्गूच्या या कामात ?

लवकरात लवकर ..याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे ....

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढील भागात –

भाग – ३४ वा लवकरच येतो आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------