सिंहाचा जावई.... shraddha gavankar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सिंहाचा जावई....

सर्वाना माझा नमस्कार आपण सर्व माझ्या कथा कादंबरी वाचता त्या मुळे मला आणखी आणखी कथा आणि कादंबरी लिहण्यात उच्छाह येतो मी तुमच्या साठी आणखी एक कथा घेऊन आले हास्य कथा आणि त्याच बरोबर प्रेरणादायी पण आहे. आणि त्या मधुन आपल्याला एक खुप चांगली गोष्ट शिकायला मिळेल कथा चांगली वाटली तर नक्की मला कळवा काही चुका झाल्या असतील तर मी सुधारणा करेल चला तर मग बघुयात कथा.

एक मोठं असं जंगल होत आणि त्या जंगला मध्ये खुप मोठे मोठे प्राणी होते उदा: सिंह हत्ती हरीण जिराफ वाघ असे भरपूर मोठे प्राणी आणि छोटे पक्षी आणि बाकी जिव जंतु आत्ता एवढं मोठं जंगल म्हणाल तर शिकारी साठी खुप लोक यायचे कधी ते स्वतः शिकार ह्यायचे कधी शिकार करून घरी घेऊन जायचे असच एकदा एक शिकारी जंगलात गेला शिकार करण्या साठी त्याने एक मोठी जाळी अंथरली आणि तो ऐका झाडांवर जाऊन बसला बघत होता कोणता प्राणी अडकतो का तेवढ्यात तिथे एक सिंह त्या जाळ्यात अडकला निघण्याचा खुप प्रयत्न केला पण त्याला काही निघता येईना शिकाऱ्याला वाटत चला अडकला सिंह त्याला काही निघता येत नाही मी अजुन दोघा तिघांना घेऊन येतो मला हा एकट्याला झेपणार नाही शिकारी खाली उतरला आणि तिथून निघुन गेला. तेवढ्यात तिथे एक उंदीर आला आणि त्याने ती जाळे कुरतडून त्याला मुक्त करायचं ठरवलं पण उंदरा ला वाटलं मी याला बाहेर काढलं तर हा मला खाऊन टाकेल.नको नको मी नाही काढत जाऊदे बाबा नको तरी पण त्याला सिंहाची दया येते तो सिंहा जवळ जातो आणि ती जाळी तोडून टाकतो सिंह जाळ्या तुन बाहेर येतो आणि त्या उंदरावर प्रसन्न होतो तु माझा जीव वाचवला मला बाहेर काढलं सांग तूला काय पाहिजे तु म्हणशील ते मी तुला देईल मी तुला कधीच त्रास देणार नाही आणि खाणार पण नाही पण तुला काय पाहिजे सांग देणार मी.

उंदीर खुश झाला त्याच्या मनात लालसा उत्पन्न झाली उंदराला वाटलं मी असं काय मांगु ज्याने मला मान मिळाला पाहिजे शेवटी उंदराने त्याची इच्छा सांगितली आणि म्हणाला, महाराज मला तुमच्या कडुन काहीच नको पण लहान तोंड मोठी गोष्ट मांगतो "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?'

यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'.


यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.

आत्ता शब्द दिला त्या मुळे सिंहाला मोडता आला नाही सिंह तयार झाला आणि उंदराला सांगितलं ठीक आहे मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्या सोबत लावून देतो.

हे ऐकून उंदीर खुश झाला आणि महाराज च्या पाया पडून निघुन गेला दुसऱ्या दिवशी महाराज्या कडुन एक निरोप आला उद्या लग्न करायचं म्हणून तस उंदरांनी ऐकून घेतलं आणि सर्व तयारी ला लागले सर्व जंगल आनंदात होत दुसऱ्या दिवशी उंदीर मस्त तयारी करून आला सोबत वऱ्हाड पण होत. उंदराला वाटत महाराज मोठे आहेत त्यांनी मला शब्द दिला मी जे म्हणेल महाराज ते करतील उंदराने सांगितलं महाराज मला तुमच्या सारखं ह्यायचं मला हि सर्वानी आदराने बोलायला पाहिजे घाबऱ्याला पाहिजे आत्ता मी तुमचा जावई होणार तर मला पण जंगलाचा अर्धा भाग घ्या मी पण राज्य करेल सिंहाने आपल्या मुली साठी हो म्हणाला

( जावई माणसाचा असो या पशु प्राण्याचा लालच तर दाखवणारच )

आत्ता सर्व विधी पार पडल्या आत्ता शेवटची विधी होती ती म्हणजे "सप्तपदी उंदीर आणि सिंहाची लाडकी मुलगी दोघेही उभे राहिले आणि फेरे घेते वेळेस उंदीर नवरीच्या पाया खाली येउन चिरडून ठार झाला. आणि उंदराच आयुष्य खतम झालं त्याच बरोबर त्याची लालच आणि स्वार्था साठी केलीली मद्दत कधीच काही देत नाही ते फक्त आपल्या कडून घेऊन जाते

तात्पर्य : आपल्या कुवतीबाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरली, तर स्वत:चाच नाश होतो उंदराची तेवढी कुवत नव्हती पण त्याच्या मनात लालसा उत्पन्न झाली त्याला मोठं ह्यायचं होत पण शेवटी काय झालं नाशच झाला त्या मुळे कधीच स्वतःला दुसऱ्या पेक्ष्या कमी नाही समजायला पाहिजे जे आहे जस आहे त्यात खुश राहायला पाहिजे....
.

धन्यवाद