सरोवराच रहस्य gaurav daware द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सरोवराच रहस्य

ही एक काल्पनिक गोष्ट आहे. याचा जीवित आणि मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. आणि जर संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा.

ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी तिला आपल्या कल्पनेच्या विश्वात जिवंत करून पाहावी. आणि एक आगळ्या वेगळ्या प्रवासाचा आनंद घ्यावा. नक्कीच गोष्ट तुम्हाला थक्क करून सोडेल.

18 सप्टेंबर 2017 (शुक्रवार)
अर्पित आपल्या कॉलेज ची बॅग पुस्तकांनी भरून कॉलेज ला जायला निघाला. त्यांनी आपली सायकल काढली आणि तो जंगलाच्या मार्गाने आपल्या कॉलेज कडे निघाला. जंगलातुन जात असतांना वाटेत तो एका पाण्याने भरलेल्या सरोवरा जवळ थांबला. त्यांनी आपली सायकल स्टॅन्ड वर लावली आणि आजूबाजूला कोणीच नाही याची खात्री करून तो सरोवराच्या दिशेने चालत गेला आणि सरोवराच्या काठावर उभ राहून त्या खोल सरोवराकडे एकसारखं बघत तिथेच उभा राहिला. तेवढ्यात काही क्षणातच अर्पित चे दोन जिवलग मित्र म्हणजेच सारंग आणि कुणाल त्या सरोवराजवळ सायकलने आले. त्यांनी आपापली सायकल उभी केली आणि अर्पित कडे पाहून म्हनाले ......

सारंग : अरे अर्पित, आज नक्की आत्महत्या करणार न?

अर्पित : -----------------------------------

(अर्पित काहीच बोलत नाही आणि एकसारखं त्या सरोवराकडे बघत असतो.)

कुणाल : अरे हो सारंग आज अर्पित नक्की आत्महत्या करणारच.

अर्पित : -------------------------------------

सारंग : अरे अर्पित आम्ही काय म्हणतोय ते ऐकतोय न? अरे रागावू नको, आम्ही मस्करी करतोय रे तुझी.

कुणाल : अर्पित..... अर्पित.

(सारंग आणि कुणालने आवाज देऊनही अर्पित काहीच प्रतिक्रिया देत नाही हे बघून सारंग आणि कुणाल एकमेकांकडे आश्चर्यने बघतात. आणि अर्पितकडे चालत जातात. )

(सारंग अर्पित च्या खांद्याला हात लावतो आणि अर्पित म्हणून हाक मारतो तेवढ्यात अर्पित अचानक सारंग कडे बघतो.)

अर्पित : अरे तु कधी आला. अरे कुणाल पण आलाय.

सारंग : अर्पित तु इथे काय करतोय आणि आम्ही दोन तीन हाक मारूनही तु उत्तर का दिल नाही?

अर्पित : (स्मित हास्य करत) काय?

कुणाल : हो सारंग ने आणि मी दोन तीन हाक देऊनही तु काहीच प्रतिक्रिया दिली नाही, आणि तु या सरोवरा जवळ काय करतोय.

अर्पित : अरे काही नाही मी इथे सहजच उभा होतो. आणि चला रे आपल्याला कॉलेजला जायला उशीर होईल.

(येवढ बोलून अर्पित लगेच आपली सायकल काढतो आणि कॉलेजच्या दिशेने निघतो. सारंग ला आणि कुणाल ला मात्र अर्पित च असं वागणं थोड विचित्र वाटत पण ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपली सायकल काढतात आणि कॉलेजच्या दिशेने निघतात.)

(अर्पित, सारंग आणि कुणाल तिघेही रोज जंगलाच्या मार्गानेच कॉलेज मध्ये जातात पण कधीच त्यातलं कोणीही त्या ओसाड पडलेल्या सरोवराजवळ थांबत नाही पण आज अर्पितला तिथे असं एकट पाहून मात्र सारंग आणि कुणाल थोडे काळजीत असतात. सारंग आणि कुणाल अर्पितला वेगवेगळ्या मार्गाने तो तिथेच का उभा होता? असं विचारण्याचा प्रयत्न करतात पण अर्पित त्या गोष्टीच उत्तर देण्याच टाळतो.)

(काही वेळानंतर ते तिघेही कॉलेज मध्ये पोहोचतात आणि आपल्या नेहमीच्या गप्पा गोष्टी आणि अभ्यासात गुंतून जातात. अर्पित सरोवराजवळ का उभा होता हे अर्पित बोलण्याच टाळतो म्हणुन सारंग आणि कुणालही त्याला याबद्दल जास्त काही विचारत नाही.)

त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पुन्हा सारंग आणि कुणाल त्याच जंगलाच्या मार्गाने कॉलेज मध्ये जायला निघतात आणि कालप्रमाणेच अर्पित पुन्हा त्याच सरोवराच्या काठावर उभा असल्याच सारंग आणि कुणालला दिसत पण दोघांनाही नक्की समजत नाही की तो असा इथे का उभा राहत असेल.

सारंग : अर्पित....... अरे अर्पित.

कुणाल : अरे अर्पित आम्ही आहोत...... ऐकतोयस न.

(हाक मारूनही अर्पित काहीच उत्तर देत नाही म्हणून सारंग त्याच्या कडे जातो आणि त्याला जवळून अर्पित अशी हाक मारताच अर्पित लगेच मागे बघतो.)

अर्पित : अरे तुम्ही कधी आलेत.

सारंग : आम्ही तर आताच आलोय, पण तु या ओसाड पडलेल्या सरोवरापाशी काय करतोयस.

अर्पित : काही विशेष नाही रे मी सहजच उभ होतो इथे.

सारंग : अर्पित काही प्रॉब्लेम आहे का? तुला कोणीही काही बोललं किंवा कोणी रागावल वगैरे का?

अर्पित : नाही रे मला कोणी काहीही बोललेलं नाही आणि मला कसलाच प्रॉब्लेम नाही रे. बर चल आपल्याला आधीच उशीर झालाय. अजून जास्त उशीर व्हायला नको.

(अर्पित लगेच आपली सायकल काढतो आणि कॉलेज च्या दिशेने निघतो. सारंग आणि कुणाल ला अर्पित का असा वागतोय ते कळतं नाही पण तो नक्की काहीतरी लपवतोय हे मात्र दोघांच्याही मनात पक्क झालेलं असत.)

काही क्षणात सारंग आणि कुणाल सुद्धा आपली सायकल काढून कॉलेज च्या मार्गाने निघतात.

सारंग : अरे कुणाल तु विचार न अर्पित ला तो असं का वागतोय ते कारण माझ्या मते तो नक्की कोणत्यातरी अडचणीत आहे.

कुणाल : हो मलाही तसंच वाटतंय कारण या आधी तो आपल्याशी कधीच असं वागला नाही पण आता त्याच्या चेहऱ्यावरन असं नक्की वाटतंय की तो काही तरी लपवतोय.

सारंग : हो त्याच असं आपल्या प्रत्येक प्रश्नांना टाळण न बोलताही कित्येक प्रश्नांची उत्तरे देऊन जातोय.

कुणाल : हो पण तो असं सरोवराजवळ का उभा राहतो आणि त्याच्या मनात नक्की काय आज हे आपल्याला माहिती करायलाच हवं.

सारंग : हो आणि असं आपण आपापसात बोलण्यात काहीही अर्थ नाही आपल्याला सगळं काही त्याच्याशीच स्पष्ट बोलाव लागेल.

कुणाल : हो चल त्याच्याशीच बोलूया.

(सारंग आणि कुणाल आपल्या सायकल ची थोडी स्पीड वाढवतात आणि सायकल चालवत अर्पित जवळ पोहोचतात.)

सारंग : अरे अर्पित तु आज पण....... म्हणजे आज पण त्या सरोवराजवळ का उभा होता म्हणजे काही शोधतोय वगैरे का तु?

अर्पित : नाही रे, मी तुला सांगितलं न मी सहजच उभा होता.

कुणाल : हो रे पण तु तिथे उभा असताना तूझ्या चेहऱ्यावरचे भाव सहज वाटत न्हवते म्हणजे स्पष्ट सांगायचं तर आम्हांला असं वाटतंय की तु आमच्यापासून काही तरी लपवतोयस.

अर्पित : अरे नाही रे मी तुमच्या पासून काय लपवणार. पण ते सगळं जाऊ दे आपल्याला आधीच कॉलेज ला जायला उशीर झालाय आणि अजून उशीर व्हायला नको म्हणून चला लवकर.
(असं बोलून अर्पित लगेच आपली सायकल वेगाने पुढे घेऊन जातो पण त्याच्या अश्या वागण्याने आता मात्र सारंग आणि कुणाल ला त्याच्यावर प्रचंड संशय यायला लागतो.)

सारंग : बघितलं कुणाल हा नक्की आपल्यापासून काही तरी लपवतोय आणि आपण वीचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना टाळायचा प्रयन्त करतोय.

कुणाल : हो मलाही आधी फक्त संशय होता पण आता मंत्री खात्री पटलीय की तो नक्की आपल्यापासून काहीतरी लपवतोय. पण काय लपवतोय त्याचा मात्र आपल्याला शोध घ्यायला हवा.

सारंग : हो बरोबर आहे आणि मी काय म्हणतोय उद्या आपल्याला सुट्टीच आहे तर आता आपण त्याच्याशी फार काही चर्चा न करता उद्या त्याच्या घरी जाऊनच त्याच्याशी काय ते थेट आणि स्पष्ट बोलूया.

कुणाल : हो ठीक आहे तसंच करूया.

(त्यानंतर थोडया वेळात तिघेही कॉलेज मध्ये पोहोचतात आणि नेहमीप्रमाणे कॉलेज एन्जॉय करतात आणि कॉलेज सुटण्याची वेळ होताच तिघेही आपापल्या घराकडे निघून जातात.)