दिवाळीचा सण एक महिन्यावर आला होता.. आणि गौरवची आई बोलली की या दिवाळीला आपल्या सुनेला घरी बोलवूयात.. गौरव तर खूपच खुश झाला गार्गीला घरी बोलवायचं म्हंटल्यावर.. त्यालाही तिला भेटावस वाटतच होतं .. त्याने लगेच फोन करून गार्गीला सांगितलं..
गौरव - हॅलो , गार्गी.. guess what??
गार्गी - अम्म्मम... तुला hike मिळाली?? किंवा प्रोमोशन मिळालं??
गौरव - नाही माझ्या नोकरीशी रेलेटेड नाहीय.. आपल्या दोघांशी रिलेटेड आहे..
गार्गी - मsssग... लग्नाची शॉपिंग करायचीय??
गौरव - गार्गी अग अजून किती वेळ आहे आपल्या लग्नाला, इतक्या लवकर शॉपिंग करत का कुणी...
गार्गी - अरे मग मला नाही माहिती.. तुच सांग पटकन.. तुझा आनंद पाहून माझी excitment वाढत आहे..
गौरव - ok... या दिवाळीला .... आपण ... भेटणार आहोत.. त्यानी एकदम उत्साहित होत सांगितलं..
गार्गी - काssय?? म्हणजे?? कस शक्य आहे?? तुम्ही आमच्याकडे येणार आहेत का दिवाळीला??
गौरव - नाही ग वेडे, तू येतेय आमच्याकडे, म्हणजे आपल्याकडे..
गार्गी - तू चेष्टा करतोय का?? की आपलं अजून लग्न नाही झालेलं ते विसरलास.. अस लग्नाच्या आधी मला तुझ्या म्हणजेच होणाऱ्या आपल्या घरी येऊन राहण्याची परमिशन मिळेल का माझ्या घरून?? आणि ते तुझ्या म्हणजेच आपल्या आई बाबांना पटणार आहे का??
गौरव - अग , हो.. आईच बोलली मला आत्ता, की या दिवाळीला आपण गार्गीला आपल्या घरी बोलवूयात... थांब तू एक मिनिट आईशीच बोल मी फोन देतो तिच्याकडॆ.. आईने सांगितल्यावर तर तुला खरं वाटेल ना...
गार्गी - अरे पण अस कसं..
गौरव - अस कसं म्हणजे?? मी जेव्हा तुला भेटायला येतो तेव्हा मी तुझ्याच घरी राहतो ना.. त्यात तर कुणाला काही प्रॉब्लेम नाही झाला मग आता तुला माझ्या घरी यायला कुणी कशाला विरोध करेल.. अग हे लग्न जर इतकं उशिरा नसत निघालं तर आपण आज नवरा बायको असतो.. मला तर त्या पंडितचा पण कधी कधी राग येतो इतके दिवस लांबच मुहूर्त देत का कुणी.. असो .. हा पण अनुभव असेल आपल्या आयुष्यात एकमेकांच्या भेटीसाठी झुरण्याचा.. हो ना??
गार्गी - हम्म.. तू म्हणतो पण मला जरा शंकाच आहे.. अस लग्नाआधी ... कुणी ... सणाला ??
गौरव - एक मिनिट तू आईशी बोल म्हणजे तुला खरं वाटेल..
अस म्हणत त्याने फोन त्याच्या आईकडे दिला सुद्धा..
आई - हॅलो, बेटा गार्गी , कशी आहेस??
गार्गी - नमस्ते आई, मी चांगली आहे.. तुम्ही कसे आहात??
आई - आम्ही पण मजेत आहोत.. ते या दिवाळीला आम्हाला तुला बोलवायचं होत घरी.. आता तू आमची सूनच आहेस ना ..मग तू असली तर घराला घरपण आल्यासारखा वाटेल...
गार्गी - अ..हो मला गौरव बोलला .. पण असं .. म्हणजे..
आई - अग , एवढा कसला विचार करतेयस? आता असं काही राहीलं नाहीय.. आपल्यात बऱ्याचदा मुली जातात अस सणाला किंवा काही कार्यक्रम असला की .. आणि आम्ही बोलणार आहोत तुझ्या आईबाबांशी याबद्दल.. पण तू यायला तयार आहेस ना??
गार्गी ला काय बोलायचं काही सुचत नव्हतं..
गार्गी - हो .. मी सांगून ठेवते तस आईबाबांना घरी..
आई - चालेल, ठीक आहे बाकी घे काळजी.. देते मी गौरवकडे..
गौरव - आता तरी पटलं ना.. कशी ग तू किती विचार करते खरंच.. आतातरी खुश हो..
गार्गी - हो मी खुशच आहे..😊😊
गौरव - बरं चल बोलूयात नंतर, जेवून घेतो आधी, तू पण करून घे जेवण..
गार्गीला आनंद तर झाला होता पण तेवढच टेन्शन ही आलं होतं.. पहिल्यांदा अस सासू सासऱ्यांसमोर जायचं त्यांच्यात राहायचं, कास वागायचं, काय करायचं?? असे बरेच प्रश्न तिच्यापुढे उभे झाले..
तिने तिच्याघरी तिच्या आईवडिलांना तीच आणि तिच्या होणाऱ्या सासुचं बोलणं सांगून कल्पना देऊन ठेवली.. थोडावेळणी गार्गीच्या होणाऱ्या सासऱ्यांचा फोन गार्गीच्या वडिलांना आला.. आणि त्यांनी त्यांना गार्गीला दिवाळीला पाठवण्याबद्दल विचारलं आणि तिच्या बाबांनीही लगेच होकार दिला..
गौरवने लगेच गार्गीच तिकीट काढून घेतलं.. कारण दिवाळीच्या वेळेला गाड्यांमध्ये खूप गर्दी असते आणि वेळेवर तिकीट ही मिळालं नसतं.. आणि तिला घरी आणण्याची आतुरता तर होतीच..
गार्गीच मास्टर्सचं आता शेवटचं वर्ष होतं.. तिच्या क्लास मध्ये आधी गार्गीचच लग्न जुळलं असल्यामुळे सगळे तिला गौरव च्या नावानी खूप चिढवत असत आणि आता त्यांच्या चिढवण्यावर तिच्या चेहऱ्यावरही लाली पसरायची.. प्रतीक तिचा गतकाळ होता आणि ती त्याला विसरून पुढे जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती.. गौरवच्या प्रेमाने ते तिला हळूहळू साध्य होत होतं..
प्रतिकनेही तिला कधीच स्वतःची जाणीव करून दिली नाही.. त्याला आठवण आली की तो तिच्या कॉलेजमध्ये जाऊन चोरून लपून तिला मनभरून बघायचा.. तिला खुश बघून स्वतः ही तिच्या खुशीतच आनंद मानायचा आणि तिला न भेटता तसाच निघून जायचा.. तिला मात्र हेच वाटत होतं की त्याच्या मनात काही नाही तो आता आपल्याला पूर्णपणे विसारलाय... तिने प्रतिकचा विचार मनातून काढून टाकला आणि अगदी प्रामाणिकपणे गौरवशी जुळण्याचा प्रयत्न करत होती..
आता दिवाळीला सासरी जाऊन 2 दिवस राहायचं अस कळल्यावर तर तिच्या मैत्रिणींनी तिला खूप चिढवलं.. गौरव तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटला होता.. त्यांच्या साखरपुड्याची पार्टी त्यांनी गौरव कडून वसुल केली होती.. त्यामुळे सगळे जण गौरवला पण ओळखत होते.. तीच्या जवळच्या मैत्रिणी तर कितीदा तिच्या फोनवरून त्याच्याशी बोलायच्या... त्यालाही चिढवायच्या.. गौरवही थोडा लाजरा होताच..
पुढे दिवाळीचा सण आला.. चतुर्दशीच्या दिवशी रात्री गार्गी गाडीत बसली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवंशी सकाळीच ती पुण्यात पोचली.. गौरव गाडी घेऊन तिला स्टेशनवर घ्यायला गेला होता.. तिला बघून त्याला तिला मिठी मारायची खूप इच्छा झाली पण त्याने अवतःवर सय्यम ठेवत तिच्या हातून तीच समान घेऊन गाडीमध्ये ठेवलं.. दोघही जण गाडीत बसले आणि घरी जायला निघालेे.. गार्गीला त्याच्या बाजूच्या सीटवर बघून गौरव अगदी लहान मुलांसारखा खुश झाला होता.. गार्गी मात्र काहीच बोलत नव्हती.. अस एकटीने पहिल्यांदा सासू सासऱ्यांसमोर ती जात होती त्यामुळे तीच मन खूप विचलित होत होतं.. तिच्या मनाची चलबिचल गौरवच्या ओळखली, हळूच तिचा हात हातात घेत तो म्हणाला..
गौरव - डोंट वरी.. सगळी काही ठीक होईल.. काळजी करू नको.. मी आहे ना!! हम्म.. आणि वेलकम इन our timmi..
timmi म्हणजे त्याची गाडी.. दोघांनी मिळून गाडीच नाव timmi ठेवलं होतं..
गार्गी - (हसून) थँक्स timmi ..
गौरव - थँक्स timmi??!! आणि ड्रायव्हरला काय??
गार्गी - त्याला कशाला काही हवं..
गौरव - अच्छा.. चल घरी मग सांगतो...
बोलता बोलता दोघेही जण घराच्या पार्किंग मध्ये पोचले.. गार्गीला खूप भीती वाटत होती.. पण गौरव तिचा हात हातत् पकडून तिला बराच आधार देण्याचा प्रयत्न करत होता...
दोघेही घरी आले.. आईने अगदी हसून सुनेच स्वागत केलं.. बाबांनीही अगदी हसून प्रवासबाबद्दल विचारलं.. त्यांच्या इतक्या मोकळ्या वागण्याने गार्गीसुद्धा आता मोकळी राहू लागली.. लगेच सगळं आवरून ती गौरवच्या आईला कामात मदत करू लागली.. सगळी सणाची कामे पटापट आवरून थोडावेळ बसून गप्पा सुद्धा मारल्यात... संध्याकाळची पूजा केली.. दिवाळीनिमित्त आईने गार्गीला एक सुंदर ड्रेस दिला... गार्गीलाही तो खूप आवडला.. पूजेत तिने तोच ड्रेस घातला होता.. गार्गीने अगदी हलकासा मेकअप केला.. ती खूप सुंदर दिसत होती.. गौरव तर तिच्याचकडे बघत होता..
पूजेला आई बाबा बसले होते आणि गार्गी मानलावून पूजा बघत होती.. पूजेसाठी लागणारं साहित्य त्यांच्या मागणी नुसार त्यांना पुरवत होती.. पूजेची मांडणी सुरेख झाली आणि मग आईने कथा वाचली.. सगळ्यांनी तन्मयतेने पूजा केली..
गार्गी आणि गौरव दोघांनीही आईबाबांना नमस्कार केला... आईने गम्मत म्हणून आशीर्वाद दिला "अष्टपुत्र सौभाग्यवती भव।।" असा आशीर्वाद ऐकून गौरव म्हंटला
गौरव - आई !! अष्ट???😲😲😲
आई - (गार्गीकडे बघत)हो म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला किती शक्य होतात ते..
गार्गीमात्र लाजून लाजून चुर झाली.. यावर काय आणि कस रिऍक्ट करावं तिला काही कळतच नव्हतं.. ती खाली मान घालून उभी होती.. तिच्या मनातच बोलत होती.. " बापरे!! सासू बाईं पण गमती आहेत. ".. तसाच गौरव तिच्याजवळ येत हळूच गार्गीच्या कानात बोलला..
गौरव - ऐकलं ना आईने काय आशीर्वाद दिला ते.. लग्न झाल्या झाल्या आपण यावर काम सुरू करून देऊ.. काय म्हणते??
त्याच्या अशा बोलण्यावर मात्र गार्गीने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं.. त्याने तरीही तिला एक डोळा मारला.. तशी ती लाजून लगेच पाणी आणायच्या बहाण्याने किचन मध्ये पळाली..
-----------------------------------------------
क्रमशः