निर्मात्याचे मानवाशी संवाद
१)हे मानव तू स्वतःला कधी ओळ्खशील?
आयुष्याच्या आतापर्यंतचा प्रवास जरी खडतर असला तरी तू यांवर अतिशय धैर्याने व खंबीर पणे मात केलास, आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत आतापर्यंत तू जिंकत आलेला आहेस. याबाबतीत मी तुझे कौतुक करतो. तुझा सामर्थ्यांची व क्षमतेची जाणीव मला आहे व तुलापण याची पूर्ण जाण आहे. फक्त तू स्वतःला ओळखणे विसरून गेलास. हे तुझी किती मोठी चूक आहे, हे तुला कधी लक्षात येईल मानवा. तुझी परिस्थीती आता असं का होते 'कळते पण वळत नाही' हे पाहून मला खूप दुःख होतंय रे. एवढी प्रचंड क्षमता तुझी असताना देखील का जीवनात पराभव मानून मागे हटत आहेस. जीवन हे एकदाच येते याची जाण ठेव. स्वतःला व इतरांना दोष देने थांबव जरा, स्वतः खंबीर हो जरा, तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार, चल उठ जागे हो. आणि आपले कर्तव्य निष्ठतेने पार पाडत राहा. अशक्य अस काहीच नाही, सगळं शक्य आहे.धीर धर जरा व परिस्थिती बदलाची वाट पहा, संयम व सहनशीलता राख. ज्याप्रमाणे सूर्यास्तनंतर सूर्योदय आहे त्याचप्रमाणे दुःख नंतर सुख येण तेवढंच तथ्य आहे, आता जरी तुझी परिस्थिती वाईट असली तरी तुझे चांगले दिवस नक्कीच येतील.
२)नैतिकता व सामाजिक बांधिलकी ह्यांची जाण तुला कधी होईल?
हे मानवा माणूस म्हणून जन्माला आलास तू हे विसरलास काय? तुझा अशा वागण्याने 'मानवता' या श्रेष्ठ मूल्यांची पायमल्ली झाली, याची तुला कधी जाणीव होते काय? कुठले हे तुझी नैतिकता, कुठले हे तुझे संस्कार.खरचं तुझात मानवता, संस्कार, संवेदना व सामाजिक बांधीलखी ह्या गुण अवगत असले असता तर तुझा स्वभाव येवढा स्वार्थ व भ्रष्ट झालाच नसता.
काय गरज आहे तुला नैतिकता या श्रेष्ठ मूल्यांची पायमल्ली करायची व अनैतिक मार्गाने अमाप संपत्ती जमा करायची. खरं तर तुला याची जाणीव व्हायला पाहिजे की भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा हे कधीच टिकत नाही. ती लोकांच्या घामाचा, अश्रूंचा व कष्टाचं पैसा असतो. नैतिकतेने, निष्ठेने व प्रामानिकपणे आपले कर्तव्य व कर्म करत राहणे हेच धर्म आहे. हा जीवनाचा धर्म तू आचरणात आणला तर स्व-बरोबर सामाजिक कल्याण होईल. लोकांचं आशीर्वाद व पुण्य तुला लागेल.
तुला माहीत आहेच ना, निसर्गात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस संपणारच आहे, मानवाला सुद्धा एक ना एक दिवस हे सगळं सोडून जावंच लागेल, जाताना कमावलेली ही अमाप संपत्ती येतेच सोडून जावे लागेल. हे सर्व तथ्य असताना तरीही तू हे वास्तववादी जीवन सोडून आभासी/कृत्रिम/नकली जीवनाकडे का वळलास. तुझाकडून मला अशी अपेक्षा नव्हती. मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाही.मला या गोष्टीच खूप दुःख होतंय.
३)प्रेम, बंधुत्व व सामाजिक बांधिलकी याची जाण तुला कधी होईल रे?
हे मानव तू येवढा स्वार्थ होशील म्हणून कधी मी कल्पना सुद्धा केली नव्हती रे. का विसर पडला तुला आपापसातील प्रेम, बंधुत्व व सामाजिक बांधिलकी याची जाण. का तू येवढा स्वार्थ, अहंकारी व मतलबी झालास हे मलाही कळत नाही.
तुला याची जाणीव असायला पाहिजे की आपण सर्व मानवजात एक आहोत, सगळ्यांचे रक्त एक आहे. म्हणून एकमेकांविषयी सहकार्याची भावना, प्रेम व सामाजिक बांधीलकी ठेवण हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.
द्वेषाने वैरी निर्माण होते तर प्रेमाने जग जिंकता येते, हे तुला माहीत असून असे का वागतोस तू.
प्रेम, समज व विश्वास याची किंमत पैशात कधीच होऊ शकत नाही. प्रेमाने मोठमोठे युद्ध टाळता येते, माणुसकी जिंकता येते. समज ने आपापसतील गैरसमज दूर होऊन विश्वास प्रस्थापित होते. विश्वासाने नात घट्ट होतात व माणसं जवळ येतात. हे मानवा कधी संवेदनशील होशील रे याबाबतीत.
शेवटी, हे मानवा खरं सांगायच म्हणजे तुझा जीवनातला चिरस्थायी आंनद व समाधान हे तु जेंव्हा स्वतःला व दुसऱ्याला ओळखायला सुरुवात करशील ना तेंव्हाच आहे. नैतिकता जपण्यातच आहे. कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती संवेदनशील राहण्यात व प्रेम बाळगण्यातच आहे .स्वार्थ, अहंकारी व व्देष भावना सोडून देऊन बंधुत्व जपण्यातच आहे. मानवता या श्रेष्ठ मूल्यांची जपवणूक करण्यातच आहे.
तुझासोबत तुझा नावच येणार आहे, सगळं ईथेच सोडून जावं लागणार आहे, हे लक्षात ठेव मानवा. म्हणून आयुष्यभर प्रामाणिक तेत राहून नैतिकता जोपासून तुझा हातून जेवढा चांगला कार्य करता येईल तेवढा करून जाण्यातच जन्म धन्य व सार्थक आहे/होईल रे!
Written by...
एस. एम. रचावाड.
मु.पो.पाळज. ता.भोकर. जि.नांदेड.