शेवटचा क्षण - भाग 18 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेवटचा क्षण - भाग 18

भाग 16


दोन आठवडे असेच निघून गेलेत पण गार्गीने अजूनही तिच्या मनातल्या भावना सांगितल्या नव्हत्या... त्याला कितीदा वाटलं जे नेहमी तिच्या नजरेतून त्याला दिसतं ते तिने लवकरात लवकर तिच्या ओठांवर आणावं.. पण गार्गी मात्र अजूनही काही बोलत नव्हती.. अशातच तिचा वाढदिवस आला.. आणि प्रतिकनेच तिच्याशी बोलायचं ठरवलं.. त्या रात्री बराच वेळ दोघे मॅसेज वर बोलत होते.. बोलता बोलता रात्रीचे 11:30 वाजले असतील की प्रतीकचा मॅसेज आला..

प्रतीक - "गार्गी दार उघड, मी तुझ्या घराबाहेर उभा आहे.."

गार्गीला वाटलं हा मस्करी करतोय, तिने पुन्हा त्याला मॅसेज केला..

गार्गी - " काहीही काय मस्करी करतो?? एवढ्या रात्री माझ्या घराबाहेर काय करतोय तू??"

प्रतीक - " गार्गी अग मी खरच आलोय, गम्मत नाहीये ही ,आणि तुला भेटायला आलो आहे.."

तीने दरवाजाच्या बारीक फटीतून बघितलं तर खरच तो बाहेर उभा होता.. तीने लगबगीने दरवाजा उघडला.. आईबाबा घरात झोपले होते म्हणून दोघेही हळू आवाजात बोलत होते..

गार्गी - " तू एवढ्या रात्री इथे काय करतोय?? कुणाला कळलं तर काय विचार करेल कुणी?? आणि काय उत्तर देणार आहे आपण?? अस कस वेड्यासारखं काहीही करतो तू प्रतीक!!"

प्रतीक - " इथे नको बोलायला, कुणाला आवाज गेला तर येईल कुणी आपण वर गच्चीवर जाऊयात.. "

गार्गी - " तू मरवशील मला, तू जा, मी आलेच माझ्या जागेवर उश्या ठेऊन म्हणजे कुणी मला बघायला आलं तर मी तिथेच आहे असं वाटेल त्यांना.."

प्रतीक वर गच्चीवर निघून जातो, गार्गी तिच्या पलंगावर उश्या ठेऊन त्यावर पांघरून घालून त्याच्या पाठोपाठ जाते..

गार्गी - " अरे काय आहे हे वेड्यासारखं प्रतीक?? एवढ्या रात्री कुणी अस येतं का कुणाकडे??"

प्रतीक - " तुला नाही आवडलं वाटतं , मी आलेलो.."

गार्गी - " अरे तस नाही पण कुणाला कळलं तर म्हणून मला भीती वाटतेय.."

प्रतीक - " कुणाला काहीच नाही कळणार तू नको काळजी करू.. "

गार्गी - " हम्म , बरं का आलास एवढ्या रात्री?? आपण मॅसेज वर बोलत होतोच की.."

प्रतीक - " मला तुला भेटायचं होतं, तुला बघायचं होतं, मला नाही राहवलं, म्हणून मग आलो.. तुला आठवते मी तुला बोललो होतो की गार्गी मनातलं सांगायला जास्त वेळ करू नको.. नाहीतर मीच बोलेल.. दोन आठवडे झाले मी वाट बघतोय.. तू कधी सांगशील? शेवटी आज मला नाही स्वतःला आवरता आलं म्हणून आलोय, तुला माझ्या मनातलं सांगायला.."

तिच्या डोळ्यात एकटक बघत तो बोलला.. तस गार्गीच हृदय तीव्र गतीने जोरजोरात धडकू लागलं.. त्याच्या अशा बोलण्याने आणि बघण्याने तिच्या मनात भीती , उत्सुकता, प्रेम, अधीरता दाटून आली होती.. त्याने एकदा मोबाइल मध्ये बघितलं, घड्याळात 12 वाजायला 5 मिनिटे बाकी होती...

प्रतीक -" बस फक्त 5 मिनिटं, मग मी इथे का आलो ते सांगतो तुला.. तोपर्यंत आपण एक गेम खेळायचा??"

गार्गी - " कसला गेम??"

प्रतीक - " नजरेचा गेम.. आपण एकमेकांच्या डोळ्यात बघुयात ज्याने आधी पापणी लपकवली तो हरला"

गार्गी - " नाही हा मला नाही खेळाचा हा गेम.. "

प्रतीक - " का ग??"

गार्गी - " मला अस नाही बघता येणार.. "

प्रतीक - " एरवी तर सारखी बघत असतेस, मग आता काय झालं??"

गार्गी - "तेव्हा तू माझ्या कडे नाही ना बघत.. ही तुझी नजर अशी माझ्या डोळ्यातून आत शिरली ना की मला खुप कसतरी होतं.. मनात खूप चलबिचल होते.. म्हणून मला नाही खेळायचं... एक मिनिट, एक मिनिट... म्हणजे तुला माहिती आहे मी तुझ्याकडे बघते?? "

प्रतीक - " हो मला कळतं तू बघत असली की पण मी बघितलं की लगेच नजर फिरवते तू.. बरं मला सांग का होते अशी तुझी चलबिचल??"

गार्गी - " मला नाही माहिती रे.. अस बाकीच्यासोबत असताना नाही होत पण तू असला की माझ्या मनात वेगळेच भाव दाटून येतात.. तू एकदा जरी माझ्या नजरेत बघितलं ना की मला एक वेगळीच हुरहूर लागते.. जीव कासावीस होतो.. काही सुचतच नाही.. मला काही कळतच नाहीय हे अस का होतं.. माझं मन तुझ्याकडे का एवढं ओढल्या जातं.. तू सांगशील का मला , मला हे अस काय होतं??"

आता तिच्याही नकळत तीने तिच्या मनातल्या भावनांची कबुली दिली.. आणि त्याच्या नजरेत एका आशेने बघू लागली.. जे भाव आतापर्यंत तिचे होते तेच आता प्रतिकचे झाले.. काय बोलावं त्याला सुचत नव्हतं..

त्यादिवशी पौर्णिमा असल्यामुळे सगळीकडे चंद्राचं चांदण पसरलं होतं... त्याने पुन्हा एकदा मोबाइलला मध्ये बघितलं 12 वाजले होते.. तिच्या डोळ्यात बघत, तिचा हात हातात घेत तो बोलला..

प्रतीक - " गार्गी.. विष यु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.. विष यु अ वेरी हॅपी बर्थडे... गॉड ब्लेस यु.. "

एक हात खिशात घालत एक छान छोटसं गिफ्ट त्यानी काढलं.. आणि तिच्या हातावर ठेवलं.. आणि डोळ्यांनीच इशारा करून ते गिफ्ट उघडायला लावलं.. एक काचेच्या चंबू मध्ये एक सुंदर कपल उभं होत.. मुलीचा एक हात मुलाच्या खांद्यावर आणि मुलाचा एक हात मुलीच्या कमरेवर आणि दोघांचाही एक हात एकमेकांच्या हातात.. अस ते दोघे सालसा डान्सच्या पोज मध्ये उभे होते.. ती त्या गिफ्टकडे निरखून बघत होती तोच त्याने तिच्या हातातून ते गिफ्ट घेऊन त्याच्या खालच्या बाजूला असलेलं बटण सुरू केलं.. आणि एका रोमँटिक म्युझिक बरोबर गिफ्टमधले ते दोघेही डान्स करू लागले.. सोबतच त्यात रंगीबेरंगी प्रकाशही पडत होता.. इतकं सुंदर आणि रोमॅंटिक गिफ्ट आणि ते ही प्रतीककडून या सगळयामुळे गार्गी खूपच भारावून गेली होती.. कितीतरी वेळ ती त्या गिफ्टकडे आणि त्या नाचणाऱ्या कपलकडे बघत होती.. जणू त्या गिफ्टमधल्या कपल मध्ये ती स्वतःला आणि प्रतिकला बघत होती.. प्रतिकने तिच्या हातातून ते गिफ्ट घेऊन तसच बाजूला ठेवलं आणि गार्गी समोर हात केला.. गार्गीनेही काहीच काणकुनं न करता त्याच्या हातात तिचा हात ठेवला आणि त्या गिफ्टच्या त्या रोमँटिक म्युसिकवर आता एक खरंखुरं कपल म्हणजेच गार्गी आणि प्रतीक नाचू लागले.. एकमेकांच्या नजरेत आकंठ बुडून ते तसेच गच्चीवर नाचत होते..

थोडावेळणी भानावर येत दोघेही थांबले.. थांबल्यावर मात्र गार्गी अवघडली, आपण हे काय करतोय?? असा उगाच प्रश्न तिला पडला.. आणि त्या विचाराने ती लाजत होती.. प्रतिकला तिचा गोंधळ उडालेला कळलं.. पण तो आज आणखी एक सरप्राईज घेऊन आला होता तिच्यासाठी.. ती खाली मान घालून तशीच उभी होती.. प्रतिकने गिफ्टच बटन बंद केलं.. दुसऱ्या खिशातून एक गुलाबाचं फुल बाहेर काढलं.. गार्गीपुढे एका गुडघ्या बसत त्याने ते तिच्या समोर पकडलं.. त्याच्या या हालचालींमुळे तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं.. त्याच्या या सगळ्या हालचालींमुळे गोंधळून ती बोलली..

गार्गी - अरे प्रतीक काय करतोय??

प्रतीक - गार्गी, डोळे बंद कर, शांत हो, एक दीर्घ श्वास घे, आणि डोळे उघड..

त्याने सांगितल्या प्रमाणे तिने तसे केले, तीच मन शांत झालं.. जी हुरहूर मनात दाटली होती ती बंद झाली आणि तिने डोळे उघडून पुन्हा त्याच्याकडे बघितलं.. तिला शांत झालेलं बघून तिच्या डोळ्यात बघत तो बोलू लागला..

प्रतीक - गार्गी, मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर.. आणि मला माहिती आहे तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेमाची भावना आहे.. तेव्हा हे गुलाबाचं फुल घेऊन आज माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का??

गार्गीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.. नक्कीच ते आनंदाश्रू होते.. पण तिला अस प्रतिकने प्रेमाची दिलेली कबुली आणि तिच्याही नकळत तीच मन जाणलं हे सगळं खूप आवडलं होतं.. तिने पटकन त्याच्या कडून ते फुल घेतलं आणि त्याला उभं केलं..

गार्गी - थँक यु प्रतीक.. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू मला खूप खूप छान गिफ्ट दिलं.. तुझं प्रेम💓💕.. आणि हे आपल्या प्रेमाच प्रतीक.. 💞

गिफ्टकडे बघत ती बोलली.. तिच्याकडे बघत आणि थोडं जवळ जात

प्रतीक - हे अस कोरडं कोरडं थँक्स का??

गार्गी - हो मग... तुझं प्रेम स्वीकारलं ना मी मग आणखी काय पाहिजे तुला??

प्रतीक - ओह्ह.. म्हणजे बोलणार तू होतीस, तुला बोलायला जमलं नाही म्हणून मी बोललो.. आणि आता मला म्हणतेय की तू माझं प्रेम स्वीकारलं.. अच्छा.. नको स्वीकारू राहू दे चल दे ते फुल इकडे..

अस म्हणत तो तिच्या हातातलं फुल हिसकून घेण्याचा नाटकी प्रयत्न करत होता..पण तीने मात्र ते फुल इकडे तिकडे करत त्याच्या हाती लागू दिलं नाही..

गार्गी - ए अरे.. अरे.. अरे थांब.. काय करतोय?? अस असतं का कुठे??.. एकदा दिलं म्हणजे दिलं, अस कुणी परत मागतं का??

प्रतीक - नाहीच मागत.. पण इतकं सगळं केल्यावर कुणी अस कोरडं थँक्स पण नाही म्हणत हं..

गार्गी - अच्छा!!! मग कसं म्हणतात??

प्रतीक - सांगू??

तो तिच्याजवळ जात तिच्या चेहऱ्यावरची बट कानामागे टाकत बोलला.. त्याच्या स्पर्शाने तिने डोळे बंद करून घेतलेत..

गार्गी - हम्म..

त्याने दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला कपाळावर किस केलं.. ती तशीच डोळे मिटून उभी होती.. त्याच्या स्पर्शाने पूर्ण शहारली होती.. तो थोडा बाजूला झाला तिच्याकडे बघितलं.. आणि तिच्या कानात बोलला..

प्रतीक - हे असं करतात..

तिने पटकन डोळे उघडले.. आणि थोडी मागे सरकली.. चेहऱ्यावर लाजेचे भाव स्पष्ट दिसत होते.. हृदयाची गती तर इतकी वाढली होती की समोर उभ्या असलेल्या प्रतिकला सुद्धा सहज जाणवेल.. त्यातून थोडं सावरत..

गार्गी - बरं बरं कळलं मला, बराच वेळ झालाय आपण अस गच्चीवर आहोत.. तू जा आता.. उद्या बोलू..

प्रतीक - हे काय ग..!! अस लगेच जा.!!. थोडावेळ थांब ना आणखी..

गार्गी - नाही प्रतीक चल जा आता.. उद्या भेटू.. गुड नाईट.. बाय.. स्वीट ड्रीम..

ती त्याला दरवाजाकडे लोटतच घेऊन जात होती.. दरवाज्यापर्यंत गेल्यावर तो पुन्हा वळला..

प्रतीक - आणि आणखी ??

गार्गी - आणखी काय???

प्रतीक - माझ्या प्रोपोजच उत्तर..

गार्गी - फुल घेऊन तुला उत्तर दिलं ना मी.. मग आता काय??

प्रतीक - आता ते 3 शब्द बोलून पण उत्तर दे ना..

त्यांनी डोळे मिचकवले...तसं तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं..

गार्गी - प्रतीक !!! नो.. चल जा तू आता.. बाकीच उद्या बोलू..

प्रतीक - हम्म.. चल जाऊ दे.. ठीक आहे.. हॅपी बर्थडे पुन्हा एकदा.. बाय .. गुड नाईट.. आणि

थोडं थांबून तिच्या डोळ्यात बघत..

"लव्ह यु... "

एवढं बोलून तो स्मित करतच निघून गेला.. तीही तिच्या जागेवर येऊन झोपली.. पण एवढं सगळं झाल्यावर तिला झोप येईल का?? नक्कीच नाही.. आजची रात्र, सत्य का स्वप्न तिलाच कळत नव्हतं.. कितीतरी वेळ ती त्या आठवणींमध्ये गुंतली होती.. आणि त्यातच तिचा केव्हातरी डोळा लागला..

----------------------------------------------
क्रमशः