गौरव - गार्गी, तू त्यादिवशी तुझ्या आणि प्रतिकबद्दल मला सगळं सांगितलं.. मीही ऐकलं.. आणि आजकाल सगळ्यांनाच भूतकाळ असतो.. त्यात काहीच नवल नाही.. पण एक प्रश्न मला पडला की हे सगळं तू मला आधी का नाही सांगीतलं?? आणि त्यादिवशी अचानक तुला त्याची आठवण आली आणि ती इतकी तीव्र की तू चक्क तापाने फणफणली.. म्हणजे आजही तू प्रतीक आणि त्याच्या प्रेमासाठी किती भावूक आहेस.. गार्गी तुझ्या त्यादिवशीच्या त्या भावुक होण्याने माझ्या मनात खूप खूप सारे प्रश्न निर्माण केलेत ग.. आणि त्याची उत्तर मी स्वतःच स्वतःला द्यायचा प्रयत्न करतोय..
गार्गी - हो गौरव काही वेळासाठी मी भावुक झाले होते कारण खरच प्रेम होतं रे माझं.. पण याचा अर्थ असा तर नाही ना की मी जे सोडून आयुष्यात पुढे निघून आलीय त्याला पुन्हा कवटाळून बसेल.. अरे तो पाहिलं प्रेम होता माझं त्याला विसरणं मला शक्यच नाही, पहीलं प्रेम विसरणं कुणालाच शक्य नसतं गौरव.. पण ते फक्त प्रेम होतं.. माझं आयुष्य नाही.. माझं आयुष्य तर तू आहेस ना रे.. आणि मी तुला आधी नाही सांगितलं यासाठी मला खरच माफ कर.. आपल्या नात्याला नुकतीच सुरुवात झाली होती आणि मी अस काही सांगितलं तर तू मला समजून घेशील की नाही, मला भीती वाटत होती.. आणि जेव्हा सगळं सोडून मी तुझ्या बरोबर आपल्या संसारात पुढे वाटचाल करत होती तेव्हा मी सुद्धा त्या सगळ्या आठवणींतून कधीचीच बाहेर पडली होती रे.. तुझ्याबरोबर मी इतकी गुंतले होते की खरच माझ्या हेही लक्षात राहीलं नाही की तुझ्या आधी माझं प्रेम कुण्या दुसऱ्यावर होतं.. पण त्यादिवशी अचानक त्याचा विषय आईच्या बोलण्यात निघाला आणि नंतर माझही त्याच्याशी बोलणं झालं म्हणून मला ते सगळं पुन्हा आठवलं होतं.. आणि यावेळी तुला सांगितलं कारण मला वाटलं आपल्या नात्यात आता एवढा विश्वास नक्कीच आला आहे की आपण एकमेकांना समजून घेऊ.. मला जर माहिती असतं की या सगळ्याचा तुला इतका त्रास होणार आहे किंवा तू इतकं मनाला लावून घेशील तर मी खरच नसत सांगितलं.. आताही ज्या दिवसापासून मी प्रतिकबद्दल तुला सांगितलं आणि तू अचानक असा अबोल झाला तेव्हापासून मला फक्त हेच वाटतय की मी उगाच सांगितलं.. पण माझं सगळं काही तूच आहेस रे माझा मित्र, माझा प्रियकर, माझा नवरा, माझं आयुष्य.. तुला सांगितलं नसत तरी मनात एक सल कायम राहिलीच असती माझ्या, की मी माझा भूतकाळ तुझ्या पासून लपवला .. आता ती सल राहणार नाही पण मी तुला कस समजावू..
गौरव - खरच ना गार्गी??.. कारण त्या दिवसानंतर मला अस वाटायला लागलं होतं की माझ्याशी लग्न करणं ही फक्त तू तुझ्या आयुष्यात केलेली तडजोड आहे.. त्यानी तुला काही कारणांमुळे लांब केलं आणि माझ्यात तुला ते सगळं पूर्ण होण्याच्या संभावना वाटल्यात म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस ..
गार्गी - तुला अस तर म्हणायचं नाहीय ना गौरव की फक्त पैशासाठी मी तुझी फसवणूक केली??
गौरव - नाही माझी फसवणूक केली अस नाही पण तू विचार कर ना तुझी इच्छा नसताना तू जर हे लग्न केलं असशील आणि त्यात तू खुष राहूच शकणार नसेल तर तू स्वतःचीही फसवणूकच केलीय ना..
गार्गी - किती किती गैरसमज करून घेतलेत तू गौरव.. अस काहीच नाहीय, अस अजिबात काहीच नाहीय.. हे सगळं घडून 3 वर्ष झाले होते जेव्हा मी लग्नासाठी तयार झाले तेव्हा.. मी या सर्वांमधून स्वतःला सावरायचा प्रयत्न केलेला होता आधीच.. आणि हो हे खरं आहे की त्याने दुरावलं म्हणून मी आज तुझी आहे.. पण हे ही तेवढाच सत्य आहे की आज मी तुझी आहे फक्त तुझी.. लग्नाच्या वेळी आई वडिलांनी निवडलेल्या मुलाबरोबर मी कुठलीही तक्रार न करता राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच तुझं माझं नात जुळलं.. तू अनोळखी होता माझ्यासाठी तेव्हा .. म्हणून तुझ्या एकदम जवळ यायला मला जमलं नाही.. आणि हो मला थोडं स्वतःला माझ्या भूतकाळातून सावरून तुझ्याबरोबर आयुष्य सजवायच होतं म्हणून मी सुरुवातीला बराच वेळ घेतला.. आणि तूही तो दिलासच ना.. मग पुढे तर मी तुझीच झाले आहे..
गौरव - गार्गी, माझ्या मनात हाही प्रश्न आला होता की तू खरच मनापासून माझी झाली आहेस ना की फक्त आपलं लग्न झालय आणि आता तुला माझ्याबरोबरच राहायचं म्हणून तू मला तुझ्या जवळ येऊ दिलं.. आणि माझ्या वाढदिवशी उगाच काहीतरी माझ्या इच्छेनुसार वागायचं, आणि आपल्या नात्याला कसतरी पुढे ढकलायचं म्हणून तू स्वतःला मला सोपवलं होतस??
गार्गी - काहीही काय बोलतोस तू गौरव ?? जर अस असतं तर मी पहिल्याच रात्री स्वतःला तुझ्याकडे सोपवलं नसतं का?? तूच नीट आठवून सांग त्यादिवशी माझ्या कुठल्याही वागण्यातून , हालचालींमधून तुला खरच अस वाटलं का की जे काही आपल्यात होतंय त्यात माझी इच्छा नाहीय?? आणि तेव्हाच नव्हे तर नंतर सुद्धा तुला कधीतरी अस जाणवलं का?? ... कधीच कुठली बळजबरी ना तू माझ्यावर केलीस ना मी तुझ्यावर, आणि ना ही मी स्वतःवर केली.. अरे या एका गोष्टींमुळे तू आपल्यातल्या त्या सुंदर क्षणांना असा बट्टा कसा लावू शकतोस??.. गौरव मी तुझ्याकडूनच नव्याने प्रेम करायला शिकले रे.. माझ्या प्रेमाला तडजोड अस म्हणून त्याची किंमत कमी करू नकोस.. प्रतीक माझा भूतकाळ होता तो माझं पाहिलं प्रेम होता, मी त्याला नाहीच विसरू शकणार पण गौरव विश्वास ठेव माझ्यावर.. तू माझा वर्तमान आणि भविष्य आहे माझं आजच जागृत प्रेम आहेस, माझं संपूर्ण आयुष्य आहेस.. कधीतरी प्रतिकच्या प्रेमाच्या कोंडलेल्या भावना माझ्या मनात जागृत होतील किंवा कधी त्याची आठवण आली तर मी सैरभैर होईलही , तेव्हा तू प्लीज मला समजून घेशील का, तुझ्या प्रेमाच्या ओल्याव्याने त्या आठवणींच्या धारांना बोथट करून तुझ्या प्रेमात विलीन करशील का?? मी विनंती करते तुझ्याकडे गौरव.. आज माझं पूर्ण हृदय मी तुझ्यापुढे उघड करून ठेवलंय .. या सर्वांसोबत तू मला स्वीकारशील का?? तू तुझा निर्णय घेऊ शकतोस.. अजूनही तुला जर तुझी मी फसवणूक केली किंवा मी तुझ्या प्रेमाच्या किंवा तुझ्या आयुष्यात राहण्याच्या योग्य नाही अस वाटत असेल तर तू मला तस स्पष्ट सांगू शकतोस , मी कुठलंच ओझं बनून नाही राहणार तुझ्यावर.. तुझा निर्णय मला मान्य असेल.. फक्त विनंती आहे की एकदा आपण भेटलो तेव्हापासून आजपर्यंत सगळं पुन्हा आठव आणि माझ्या वागण्यातुन कधीतरी कुठेही 'मी तुझी नाही' अस तुला कधी जाणवलं आहे का याचा विचार कर आणि मग निर्णय घे.. पण हे ही तेवढाच सत्य आहे की आज मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करते, मी तुझी आहे आणि मला तुझी होऊनच राहायला आवडेल.. बाकी तुझी इच्छा..
एवढं बोलून डबडबलेल्या डोळ्यांनी ती तिथून उठून जातच होती की त्याने तिचा मागून हात पकडून तिला थांबवलं.. ती वळली तसच तिला लगेच घट्ट मिठीत घेतलं त्याच्या मिठीत घेण्याने तिचे पापन्यांवर जमा झालेले पाणी घळाघळा वाहू लागलं... आणि तिला तसाच मिठीत घेऊन तो बोलू लागला..
गौरव - बस मला हेच ऐकायचं होतं गार्गी की आज तू माझी आहेस, कुठल्या तानाखाली किंवा कर्तव्याखाली तू माझी झाली नाही तर अगदी तुझ्या मनापासून तू तुझं सर्वस्व मला दिलंस.. मला हेच ऐकायच होतं.. तुझ्याशिवाय मीही कसा राहू शकेल ग वेडे. विसरलीस का अगदी आपण बोलायला लागलो त्या पहिल्या दिवसापासून मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देत असतो.. माझे बरेच गैरसमज झाले होते गार्गी पण ते सगळे आता मिटले आहेत.. मला काही क्षणांसाठी असही वाटलं होतं की तू प्रतीकसाठी कधी मला सोडून तर जाणार नाहीस ना.. पण मी खरच किती वेड्यासारखा विचार करत होतो मला कळलं.. उगाच एवढे दिवस तुझ्याशी न बोलून नको नको ते विचार करत बसलो, आता वाटतंय आधीच माझी घालमेल बोलुन दाखवली असती तर बरं झालं असतं .. पण मला तुला हे सगळं कसं विचारू आणि त्यामुळे तू दुखावली गेली तर.. किंवा तुला असही वाटू शकतं होतं ना की मी तुझ्यावर अविश्वास दाखवतोय.. म्हणून मी तुझ्याशी बोलायचं टाळत होतो.. मला माफ कर... चालेल मला सगळं चालेल, तुझं सगळं काही मान्य आहे, तू माझी आहेस , माझी बनून राहायला तयार आहेस यापेक्षा अधिक माझी काहीच अपेक्षा नाही.. घेईल मी तुला सांभाळून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, तुझ्या प्रत्येक सुख दुःखात.. नेहमी तुझ्या सोबतीने असेल मी.. खरच मला माफ कर.. माझ्या वागण्यामुळे तुला खूप त्रास झाला ना..
दोघही कितीवेळ एकमेकांना मिठी मारून रडत बसले होते, यात आनंदाश्रू होते का दुखश्रु की पच्छताप त्यांनाही कळत नव्हतं पण डोळे मात्र गळत होते.. गौरवने त्याची मिठी सैल करून गार्गीच्या माथ्यावर एक किस दिलं आणि रडणाऱ्या गार्गीच्या चेंजऱ्यावर हसू उमटलं.. तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं, त्याच्या नजरेतले खट्याळ भाव बघून लाजून पुन्हा ती त्याच्या मिठीत शिरली..
----------------------------------------------------------