बदला digi Poetess द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बदला

एक सुखळी गाव आहे. त्या गावात पाटील व राउत हे कुटूंब राहत होते. पाटील कुटूंबात शिवानंद व शिलावंती व मुलगा गणेश असतो. राऊत कुटूंबात सदानंद ,सुमित्रा व मुलगा सदू हे असतात. पाटलांची बहिण सुमित्रा ही सदानंदला दिली असते. सदू व गणेश समवयस्कर असल्यामुळे बरोबरच खेळलेले ,बरोबरच शाळेत शिकलेले असतात. सदू अभ्यासात हुशार असतो. त्या गावात 8 वीपर्यत शाळा असते. दोघेही आठवी पास होतात. आपल्या वडिलांना शेतीकामात हातभार लावतात. दोघेही मोठे झाल्यावर त्यांच्या लग्नाचा विचार दोघांच्याही आई-वडलांच्या मनात येतो.
शेजारीच उमरी गावातल्या पाटील यांची मुलगी अनिता राऊतांच्या घरी सदूकरिता दाखवण्यात येते. तिला पाहण्याकरिता मामा-मामी व मामेभाऊ असतात. अनिता सदूला पसंत पडते. अनिताला पाहून गणेशला ती आवडते पण अनिताला सदू आवडतो. लगेच 2 महिन्यात सदूचे व अनिताचे लग्न होते. लगेच पावसाळा जवळ येतो. पेवातील ज्वारी काढायची याकरिता सदू काही गडी घेऊन ज्वारीच्या पेवाजवळ येतो. तिथे गणेश ही येतो.बादलीला दौर बांधून पेवातून सदू ज्वारी काढत असतो सदूला संपवण्याचा हाच योग्य वेळ आहे. आपल्यावर कोणी संशय घेणार नाही. आपण सदूला धक्का देऊन पेवात ढकलून द्यावे असे गणेश मनाशी ठरवतो व त्याप्रमाणे तो सदूला धक्का देतो. सदू पेवात पडतो. त्याचे डोके पेव बांधलेल्या दगडावर आपटते व तो रक्तबंबाळ होतो. पेवातून लवकर काढता येत नाही. त्यातच सदूचा जीव जातो. पोलीस केस होते. सदूचा पाय घसरला व तो पडला. त्याच्या प्रेताला काढण्यात येते. प्रेत घरी आणतात. एकुलता एक मुलगा,महिन्यापूर्वी लग्न झालेले त्याची बायको व आई बाबा शुद्ध हरपतात. माम व मामी व मामे भाऊ गणेश पुढची तयारी करतात. गणेश मनातून आनंदित होतो. सदूचे दिवस झाल्यावर अनिताला आई-बाबा उमरीला घेऊन जातात.
2 महिन्यानंतर सदूचे आई-वडिल अनिताच्या माहेरी जातात. आता अनिताला आम्ही बरोबर घेऊन जातो व पुढील जीवनासाठी दुसऱ्या लग्नासाठी मुलगा पाहतो असे तिच्या आई-बाबाला सांगतात. मुलगा मिळेपर्यत अनिता आमच्या जवळ राहील असे तिचे आई-बाबा सांगतात. शिवानंद आपल्या मुलाला विचारतो की,तु अनिताशी लग्न करशील का? गणेश पहिले आढे -वेढे घेतो व नंतर तयार होतो. शिवानंद व सदानंद दोघे अनिताच्या माहेरी जाऊन स्वतःचा विचार तिच्या वडलांना सांगतात. त्यांना काहीच हरकत नसते पण अनिता या गोष्टीला तयार नसते. 2-3 दिवस ती विचार करते. आपल्या नव-याला गणेशनेच मारले आहे बदला घेण्याची ही योग्य वेळ आहे व लग्नाला होकार देते. अनिता व गणेशचे लग्न होते. गणेश आनंदीत असतो. अनिताला बदला घेण्यासाठी खूप सांभाळून पावले उचलावी लागतील. सदूच्या आई-बाबाचा गणेशवर संशय असतो.पुरावा नसल्यामुळे काहीच करुशकत नाही.
घरात अनिता येते. कोणतेही काम करत नाही. शिलवंती काही बोलू शकत नाही. अनिता गणेशला तिच्या वर खूप खर्च करायला सांगते. घरातला शिल्लक पैसा संपतो. खर्चाकरिता शेती विकावी लागते. अनिताचा खर्च संपत नाही. कोणी काही म्हटलेकी,भांडण करते. घरात सतत वाद त्यामुळे शिवानंद गणेशला वेगळे घर करून देतात. अनिता त्याला वाईट व्यसनासाठी प्रवृत्त करते. तो व्यसनाधीन होतो. घरातील संपत्ती संपुष्टात येते. घरात काही नसते. अनिता माहेरी चालली जाते.
गणेश एकटाच राहतो नंतर त्याचे आई-बाबा त्याला स्वतःजवळ घेऊन जातात. ते सर्व विचार करायला लागतात अनिताने असे का केले असेल? त्यावर गणेश सांगतो सदूला मी धक्का दिला असे तिला माहिती असेल म्हणून ती बदला घेत असावी बरेच दिवस गेल्यावर पावसाळा येतो. पेवातून ज्वारी काढण्यासाठी शिवानंद जातो सोबत गणेशही जातो व गणेश स्वतः ज्वारी काढायला लागतो. त्याचा पाय घसरतो व पेवात दगडावर डोके आपटून पडतो व त्यात त्याचा अंत होतो. पोलिस येऊन गणेशला बाहेर काढतात. ही सर्व माहिती अनिताच्या माहेरी पाठवली जाते. "गणेश पेवात पडून गेला" अनिता आनंदीत होते. तिच्या आई-वडलांना वाटते,अनिता पागल झाली आहे. मग अनिता सांगते,मी पागल नाही मला माहित होते गणेशने सदूला धक्का देऊन मारले व माझ्याशी लग्न करण्याकरिता तयार झाला. बदला घेण्याकरिता त्याच्या घरात मी वाईट वागले. त्याला व्यसनी केले व गरीब केले व सदूचा मरणाचा बदला घेतला.आता माझा जीव भांड्यात पडला. शिवानंद व शिलवंतीकडे येते व सर्व खरे सांगते. सदूच्या आई-बाबांना सुध्दा घरी बोलवते. बदला घेण्यासाठी मी तसे वागले त्या 4 घेऊन गावातील कपडे शिवून त्यांना सांभाळते.
- सर्व अधिकार लेखकांच्या स्वाधिन राहिल.
- लेखिका-अभिलाषा देशपांडे