प्रेमगंध... (भाग - १०) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - १०)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयची बहिण अमृता दोघांना बोलते, "अरे पण तुमच्या अशा वाटण्याने त्या बिचारीला किती गैरसमज झाला."
मित्र अजय- "गैरसमज झालाच पण त्या गोष्टींचा दोघांनाही खूप त्रास झाला असेल, त्याचं काय..." आणि तो हसू लागला. तसं सगळ्यांनाच हसू आलं. अशाच त्यांच्या हसतखेळत गप्पा चालल्या होत्या. अजय तर खुपच खुश होता. 😊😊😊
आता पुढे....)

राधिकापण घरी येऊन पोहोचली. पुर्ण रस्त्यात तिला अजयचं बोलणं आठवत होतं आणि ती स्वतःच्या मुर्खपणावरच हसत होती. 😊😀 असेच काही दिवस निघून गेले.
आता अर्चना पण रजेवर होती. आणि गैरसमज दूर झाल्यामुळे राधिका आणि अजय पुन्हा पहिल्यासारखेच एकमेकांशी बोलू लागले. अजयला पण खुप छान वाटत होतं. अजय तिच्यावर प्रेम करतो हे तिलाही कळत होतं. तीलाही तो आवडत होता. पण अजयची राधिकाला प्रपोज करण्याची हिंमत होत नव्हती. त्याला असं वाटायचं की ह्यामळे आमची दोघांची इतकी छान झालेली मैत्री तुटेल आणि मी एक चांगली मैत्रीण गमावून बसेन अशी त्याला नेहमी भिती वाटत राहायची. म्हणून अजय तिला विचारण्यांस टाळायचा. आणि राधिका मात्र अजयने जर मला लग्नासाठी विचारलं तरच आपण होकार द्यायचा असा ती विचार करायची.

आज अर्चनाच्या बाळाचं बारसं होतं, त्याचं नामकरण करायचं होतं म्हणून अजयने शाळेतील सर्व शिक्षकांना आमंत्रित केलं होतं. राधिकाने अर्चनाच्या घरी जायची तयारी केली. ती तिच्या घरी जाऊन पोहोचली. बरेच पाहुणे जमा झाले होते. त्यांच्या शाळेतले शिक्षक पण आले होते. राधिका थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलत उभी राहिली. नंतर ती अर्चनाला भेटायला जायला निघाली. तर तिथेच अजय आणि अमृता पण उभे होते. अजयने राधिकाला पाहिलं आणि तिला बघतच राहिला.

राधिकाने छानशी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. कानात झुमके आणि केसात मोगर्‍याचे गजरे माळले होते. हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर छोटीशी टिकली, डोळ्यांत काजळ आणि फिक्कट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. खुपच सुंदर दिसत होती ती. अजय तिला एकटक पाहतच राहिला.

"वाव, किती सुंदर दिसतेय ही." असं तो मनातच बोलला. राधिका अजयला तसं बघून लाजली 😌 आणि तीने मान खाली घातली. ती गालातच हसू लागली. 😊 अमृता दोघांनाही बघून हसत होती. 😁 अमृताने अजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच त्याच्या कानात म्हणाली, "अहो भाऊराजे, माहिती आहे... आमच्या वहिनीसाहेब खुप सुंदर दिसत आहेत म्हणून काय असेच पाहत बसणार आहात का तुम्ही." तसं अजयपण लाजला. 😌 अमृता हसू लागली. 😀

अमृताने राधिकाचा हात पकडला आणि म्हणाली, "राधिका ये ना आत... चल..." आणि राधिका तिच्यासोबत आतमध्ये निघून गेली. अजय मात्र तिला जाताना बघतच राहिला. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने पाहिलं तर त्याचा मित्र अजय होता. तो त्याला बघून हसत होता. 😀😀

मित्र अजय- "काय रे एवढा काय टक लावून पाहत होतास तिला...?" तसा अजय लाजला. 😌😌

मित्र अजय- "साहेब... चला आता लाजायचं बंद करा आणि लवकरात लवकर प्रपोज करा मॅडमना... कळलं का. किती दिवस असं लांबूनच बघत बसणार...?" तसे दोघेही हसू लागले. 😅😀😂

अजय- "हो बरोबर आहे तुझं... आता घाई करायलाच हवी..." दोघेही एकमेकांना टाळी देऊन हसू लागले. 😅😂

अमृता आणि राधिका दोघीही अर्चनाच्या रूममध्ये आले.
तिथे अमृताचा मुलगा समर्थ बाळाजवळ बसला होता.
अमृता- "अरे समर्थ, तू इथे काय करतोयस...? जा बाहेर जाऊन खेळ..."
अर्चना- "अगं ताई शांत बसलाय तो... बसू दे त्याला... बाळाला बघायला आलाय तो..." ती हसतच म्हणाली. 😁
अमृता- "हो का... आमचे बाळराजे छोट्या बाळाला बघायला आलेत का... बरं... ठिक आहे..."

राधिकाने तिच्या बॅगेतले चाॅकलेट 🍫 काढून त्याला दिले आणि म्हणाली, "हे घे तुझ्यासाठी... चाॅकलेट आवडतात ना तुला..."
समर्थ- "हो... आवलतात मला..." त्याने ते चाॅकलेट घेतले आणि धावतच बाहेर निघून गेला. तशी अमृता त्याला ओरडली, "अरे समर्थ... सावकाश... पडशील ना... हा पोरगा ना दिवसभर धावत फिरतो..." अर्चना आणि राधिका दोघीही त्याला हसत होते.😁😀

अर्चनाची तयारी झाली होती. छान हिरव्या रंगाची साडी, नाकात नथ खुप सुंदर होती ती. राधिका तिच्या जवळ गेली आणि तिने अर्चनाचे दोन्ही गाल खेचले आणि म्हणाली, "अर्चू खुप सुंदर दिसतेस आज तू." तशी अर्चना हसू लागली. 😀😀

अर्चना- "राधिका मॅडम तुम्ही स्वतःला पाहिलं का नीट आरशात... खुपच सुंदर दिसतेस तू आज... ताई आज कोणाची तरी विकेट पाडूनच जाणार आहे राधिका इथून असं वाटते." आणि तिघीही हसू लागल्या. 😀😅

राधिका- "अर्चू, काहीही असतं हा तुझं... असं काहीही होणार नाही कळलं ना..."
अमृता- "अग अर्चू... आताच बाहेर एक विकेट पाडली हिने बरं का..." तसं राधिका खूप लाजली 😌😌 ती बाळाला घ्यायला वळली. तिला दोघीही हसू लागल्या. 😀तेवढ्यांत अजय आणि अर्चनाची आई दोघीही आतमध्ये आल्या.

अर्चनाची आई- "बघितलं ताई सांगितलं ना तुला मी या पोरी ना गमतीजमती करून फक्त हसत बसल्या असतील, वेळेचं भान नाही या पोरींना." अर्चनाची आई अजयच्या आई कडे बघून बोलली.

अजयची आई- "अगं, कशाला एवढी घाई करतेस...? झालेलीच आहे त्यांची तयारी बघ."
अर्चना- "हो मावशी झालंय आमची तयारी... ही आई ना नुसतीच घाई करत असते बघ..."
अर्चनाची आई- "अगं घाई काय... सगळे पाहुणे जमा झालेत बाहेर... किती वेळ त्यांना असं ताटकळत ठेवायचं." आणि आईचं लक्ष राधिकाकडे गेलं तसं आई राधिकाला म्हणाली, " अगं राधिका तू कधी आलीस...?" राधिकाने जाऊन तिला नमस्कार केला. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवून आशिर्वाद दिला.

राधिका- "आई मला येऊन अर्धा तास झाला." आईने तिच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली, "अगदी नक्षत्रावानी दिसतेस तू पोरी आज... नजर न लागो कुणाची तूला."

अर्चना- "हो का... तिचीच तारीफ कर तू फक्त... मी तुला कधी सुंदर दिसतच नाही ना..." ती आईला लटका राग दाखवतच म्हणाली. 😔😔 तसे सगळेच तिला हसू लागले. 😁 आई तिच्याकडे वळली. तिच्या दोन्ही गालांवर तिने हात फिरवला आणि तिच्या केसात तिने आपले ओठ टेकवले आणि म्हणाली, "अगं तू तर माझी सोनपरी आहेस... कळलं का..." तशी अर्चना हसू लागली आणि सगळ्यांनाच हसू आलं. 😀😀 नंतर आई म्हणाली, "चला तयारी झाली ना... मग या पटकन बाहेर सगळे." आणि आई बाहेर निघून गेली.

अमृता- "राधिका ही माझी आई आणि आई ही राधिका... अजय आणि अर्चूची मैत्रीण. एकाच शाळेत सोबत काम करतात तिघेही." तसं राधिकाने अजयच्या आईलाही नमस्कार केला.
अजयची आई- "सुखी राहा पोरी. बघितलंत तुम्ही दोघींनी... ह्याला म्हणतात संस्कार... बघा शिका जरा या पोरीकडून... नाहितर या दोघी... एकत्र भेटल्या ना की दिवसभर यांचं हसणंखिदळणं चालू असते." तशा अमृता आणि अर्चना परत दोघी हसू लागल्या. 😅😅 राधिकाही तोंडावर हात ठेवून हसू लागली.

आई- "बघितलं राधिका... मी काय खोटं बोलते का...? बघ ह्यांचं दोघींचं परत चालू झालं... आणि आता हसत नका बसू चला... नाहीतर तुझी आई येईल परत त्रागा करत." आई हसतच म्हणाली. तशा तिघीही हसू लागल्या. 😅😅आणि नंतर बाळाला घेऊन त्या बाहेर आल्या.

बाहेर हाॅलमध्ये सगळ्या बायका जमल्या होत्या. पाळणा फुलांनी छान सजवला होता. तिथे जमलेल्या बायकांनी बारशाच्या विधीला सुरूवात केली. सुवासिनींनी अर्चनाची ओटी भरली. नंतर राधिकाने बाळाला तिच्या मांडीवर दिले. सुवासिनींनी "कुणी गोविंद घ्या... कुणी गोपाळ घ्या..." असं म्हणत त्यांनी गोपा खेळवला... नंतर अमृताने बाळाच्या कानात हळूच नाव सांगितले आणि नंतर त्याला पाळण्यांत ठेवले... आणि ती बाळाचा पाळणा हलवू लागली.

अजय- "ओ मॅडम... आम्हाला पण सांगा की काय नाव ठेवलं ते...?
अमृता- "हो हो, सांगते ऐका... तर एका वेदाचे नाव म्हणजेच अथर्ववेदकर्ता, म्हणजे आपल्या बाळाचं नाव "अथर्व" असं ठेवलेलं आहे."

"वाह... खुपच छान नाव ठेवलंय बाळाचं..." असं सगळेच म्हणू लागले. नंतर सगळ्या बायका पाळणा हलवून गाणं म्हणू लागल्या.

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

सजली गं मऊमऊ मखमालीची शैय्या
निजली गं बाळाची गोरीगोरी काया
बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना

खेळवा लाडानं गोपा बायांनो
गोविंद घ्या... गोपाळ घ्या... म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचा हा राजा देखणा

कुर्रर्र करा कानात हळूच भेटा गं
बारशाचा सोहळा घुगर्‍या वाटा गं
हो, आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा....
हलके हलके जोजवा... जोजवा... जोजवा...
(चित्रपट- बाळा गाऊ कशी अंगाई)

खुप छान आनंदाचं वातावरण झालं होतं... सगळे खुप खुश होते. नंतर अजयने सगळ्या पाहुण्यांना पेढे वाटले. अजयचं मात्र अधूनमधून राधिकाकडे चोरून बघणं चालूच होतं आणि त्याचा मित्र अजय त्याला चिडवत होता. थोड्या वेळाने अर्चनाला आणि बाळाला घेऊन राधिका तिच्या रूममध्ये घेऊन गेली. सगळे गप्पा मारत बसले होते.

अमृता- "आई आता आपल्या अजयचे पण लवकरात लवकर लग्न उरकून टाकायला हवे, हो ना..."
अजयची आई- "हो गं खरंय तुझं... मला पण तेच वाटतंय. पण त्याला एखादी पोरगी आवडेल तर ना... विचारलं होतं मागे मी त्याला, कोणी मुलगी आवडते का म्हणून... पण तो नाही बोलला... बघू आता पुढे काय करायचं ते..."

अमृता- "अगं तुला खोटं बोलला तो..." ती हसतच म्हणाली. 😁😁
आई- "काय...? आणि तुला कसं माहिती गं तो मला खोटं बोलला ते...? तुम्ही दोघं बहिणभाऊ ना माझ्या पाठीमागे काय खिचडी शिजवतात काय माहिती." तशी अमृता हसू लागली. 😅😅
आई- "अमृते... मला खरं खरं सांग काय भानगड आहे...? अजयला कोणी मुलगी आवडते का...?"
आई तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली.
"हो आई... आवडते त्याला एक मुलगी... आणि ती आता इथे आपल्यासोबत बारश्यात आहे." अमृता हसतच म्हणाली. 😁😊
आई- "काय...? खरंच बोलतेस तू...?" आई आश्चर्याने तिला म्हणाली. तेवढ्यांत तिथे अर्चनाची आई आली आणि म्हणाली, "ताई, काय झालं गं...? एकदम अचंबित झाल्यासारखी बघतेस ती."

अजयची आई- "हो मग... काय करू आता...? माझ्या पोराने पोरगी पसंत केली आणि म्हणे ती इथे बारशात पण आलेली आहे तरी मला माहिती नाही. काय दिवस आलेत माझे..." आईने मान नकारार्थी हलवून डोक्याला हातच लावला. तसे अर्चनाची आई आणि अमृता दोघी हसू लागल्या. 😁😅

अर्चनाची आई- "अगं ताई काळजी नको करूस... पोरगी अगदी छान आहे... दिसायला सुंदर आहेच पण तेवढीच प्रेमळ आणि संस्कारी पण आहे...." तसं अजयची आई तिच्याकडे बघतच राहिली.

अजयची आई- "म्हणजे...? तुला पण माहिती आहे सगळं... वा, खुप छान... सगळ्यांनी तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलंत ना..."
अमृता- "अगं तसं नाही गं आई... तुला सांगणारच होतो आम्ही..."
अजयची आई- "बरं ठिक आहे जाऊ दे ते... पण आता माझी होणारी सुनबाई कोण...? ते तरी सांगाल की नाही मला...?"

अमृता- "राधिका... राधिका आवडते आपल्या अजयला..." ते ऐकुन अजयची आई खुपच खुश झाली.
अजयची आई- "काय...? राधिका आवडते अजयला... वा... पोराची निवड अगदी मनापासून आवडली मला... खरंच पोरगी खुप छान आहे. आता तर लवकरच घाई करायला हवी अजयच्या लग्नाची... मी खुप खुश आहे..."
अजयची आई एकदम खूश होत म्हणाली. 😊😊

अमृता- "मग आहेच माझा भाऊ हुशार तेवढा..." ती हसतच म्हणाली. 😄
अजयची आई- "हो गं आहेच तुझा भाऊ हुशार... माझ्यापासून इतके दिवस लपवून ठेवलं... घरी गेल्यावर बघ त्याचे कान कसे पिळते मी." आणि तिघीही हसु लागल्या. 😅😅
अमृता- "आई अजून बाबा नाही आले ते गं, खुपच उशीर झाला यायला त्यांना..."
अजयची आई- "हो... तुझ्या बाबांना कधी कधी उशीर होतो यायला... पण आता जेवणाची वेळ पण होत आली. खुपच उशीर झाला आज... एवढ्यांत यायला हवं होतं त्यांनी." तेवढ्यात अजयचे बाबा येताना दिसले.
अमृता- "आई... हे काय बाबा आलेच." आणि ती बाबांजवळ गेली.

अमृता- "बाबा... आज एवढा उशीर कसा झाला तुम्हाला यायला...?"
बाबा- "हो गं आज बस जरा लेटच झाली. घरी जाऊन फ्रेश होऊन डायरेक्ट इथेच आलो."
अजय आणि अर्चनाचा नवरा पण तिथे आला. अर्चनाच्या नवर्‍याने अजयच्या बाबांना नमस्कार केला आणि म्हणाला, "बाबा, कसे आहात तुम्ही...?

बाबा- "मी एकदम मजेत... तुम्ही कसे आहात जावईबापू...?"
अर्चनाचा नवरा- "हो बाबा मी पण एकदम मस्त आहे..."
बाबा- "आमचे जावईबापू तर काय नेहमी बीजीच असतात... नाही का गं अमृते... कधी मुखदर्शन होणार आहे त्यांचे...?" तसे सगळे हसू लागले. 😅😅
अमृता- "बाबा तुम्ही पण ना... कामानिमित्त ते बाहेर गेलेत माहिती आहे ना तुम्हाला... येतील थोड्या दिवसांत..."
बाबा- "बरं... आणि आमचे छोटे राजे कुठे आहेत...?"
अमृता- "असेल खेळत इथेच."

बाबा- "आणि बारसं व्यवस्थित झालं ना...?"
अजय- "हो बाबा सगळं व्यवस्थित झालं."
अजयची आई- "अहो चला आता... जेऊन घ्या सगळ्यांनी... किती वेळ गप्पा मारत बसणार आहेत... सगळे थांबलेत जेवायला."
बाबा- "बरं... ठिक आहे मग चला जेऊन घेऊया... असं पण खुप भूक लागलंय." ते हसतच म्हणाले. तेवढ्यात समर्थ "आजोबा" आवाज देत धावतच आला. अजयच्या बाबांनी त्याला उचलून घेतलं आणि दोन्ही गालावर गालगुच्चे घेतले आणि म्हणाले, "काय करत होता माझा सोनू...?"
समर्थ- "आजोबा मी खेलत होतो."
बाबा- "अच्छा माझा शोनू खेलत होता... बरं... चला भूक लागली ना तुम्हाला पण आपण आता जेऊन घेऊया."
समर्थ- "हो आजोबा..." त्याने होकारार्थी मान हलवली.
आणि सगळे जेवायला जायला निघाले.

क्रमशः-

💕🌹@Ritu Patil🌹💕
💕💕 प्रेमगंध... 💕💕

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿