फसवणूक - 1 लता द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फसवणूक - 1

फसवनूक. भाग १ला

आज सकाळी सकाळीचं काँलेजला जायच्या आगोदर अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे सहकारी आमच्या घरी आले.म्हणाले"सर,न बोलावता आणि पूर्व सुचना न देताचं आलोय.थंडीचा, वहिणींच्या हातचा आल्ल घालून केलेला चहा प्यावां आणि तुमच्यासोबतच काँलेजला जावं असं वाटलं.म्हणून आलो.चालेल ना?"कँन्टींमध्ये नाही मिळतं हो असा चहा.
ते सर दुस-या ठिकाणाहून इथे अपडाऊन करतं असतं.त्यामूळे ते सकाळी लवकरचं घर सोडतं.
" अरे हक्कानं येत चला,पूर्वसुचना कशाला हवी.बसा मिही निघतचं होतो आता काँलेजला.चहा पिऊनचं जाऊया मग."असे म्हणून ते दोघे हाँलमध्ये गप्पा मारत बसले.
"दोन कप चहा टाक गं"अण्णाने आईला सांगितले.
चहा झाला आणि मी तो द्यायला हाँलमध्ये गेले तर सर माझ्या वडीलांना स्टेशनवर झालेल्या अपघाताबद्दल सांगत होते.म्हणून मिही ऐकत तिथेचं थांबले.सर आण्णानां म्हणाले "हिच्याऐवढीचं होती ती मुलगी.का कोण जाने पण मुद्दाम गाडिपुढे उडी मारूनआत्महत्या केली तिने.आमच्या डोळ्यासमोर घडली ही घटना,पण एवढ्या अचानक झालं ना सारं आम्ही कोणीचं काहीचं करू शकलो नाही.स्टेशनच्या थोडं पुढ.दोन तुकडे झाले हो पोरीचे.फरफटतं गेली कुठपर्यंत.धक्काचं बसलाय खरं म्हणजे.त्या धक्यातून सावरू शकतं नाहीये म्हणून आलोय बघा इकडे."
"बापरे,म्हणजे असं झालं तर.बरं वाटतयं ना आता? की जायचं डाँक्टरकडे."आण्णांनी विचारले.
"नाही, आता बरं वाटतयं.सरांना चहामुळे जरा हुशारी आली होती.
"कोण असावी?काही,समजलं का?"आण्णा
आम्हाला या गावातील ब-यांचं जनांच्या ओळखी होत्या.
"काय नाव सांगितलं बरं?हा!राही पाटील,आपल्याचं काँलेजमधून Graduateझालीयं म्हणे दोन वर्षापूर्वी......
"बापरे,राहीने आत्महत्या केलीय.मी जोरात ओरडले आणि रडायला लागले.
"का?तू ओळखतेस तिला.?"सरांनी विचारले.
"हो,हिची बालपनापासूनची मैत्रीण होती ती.असं करायला नको होतं राहीने.आण्णांचाही स्वर जड झाला होता.
"का केलं तीनं असं?"सर
" डिप्रेशनमध्ये होती गेल्या दोनवर्षापासून,लग्न झालं आणि साडेसाती लागली बिचारीच्या मागे,चंचल,हसरी आणि मन मिळावू होती पोर.आई-वडीलांची एकटी.
मागचा सगळा इतिहास माझ्या डोळ्यापुढून सरकतं होता आणि डोळे गळायचे थांबतं नव्हते.
आज पाहाटेपासूनच घरात लगबग सुरू होती.कुणी घर साफ करत होतं तर कुणी घर सजवत होतं,कुणी स्वयंपाक घरात स्वंयंपाकाची तयारी करत होतं तर कुणी त्यांना मदत करतं होतं.छोटी मुलं ईकडून तिकड पळतं होती सगळ्यात आधी तीच तर उठली होती.जसं काही त्यांच्याशिवाय घरची कामचं आवरली नसती.आजीबाई त्यांच्यावर ओरडण्याचे काम करतं होत्या"कशाला उठलेत एवढ्या लवकर काय माहीत?धिंगाणा घातलाय नुसता.लागायचं एखाद्याला तर काम सोडून धावावं लागेलं यांच्यांच मागे.आंघोळी आवरा म्हटलं तर तेही नाही.मेल्या या म्हातारीचं कोण ऐकतय म्हणा पण आपलं तोंड शांत बसत नाही ना.मिचं जाते आता आंंघोळीला आणि खरचं आजींच्या म्हणन्याप्रमाणे तिचं कोणीचं कानावर घेत नव्हतं सगळी मुलं दंगामस्ती करून घर डोक्यावर घेत होती.म्हातारीच्या ओरडन्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं.म्हणून रागाने आजीचं निघाली आंघोळीला पण तेवढ्यातं पळतं येवून प्रसाद घुसला आत आणि परत आजीचा पारा चढला.तिने आपले प्रवचन सुरू केले.
ही सगळी घाई जिच्यासाठी चालली होती ती मात्र आणखीन उठलीचं नव्हती.राही,राजाराम पाटलाची एकुलती एक सुंदर मुलगी.Graduate,तिला पाहन्यासाठी आज पाहूणे येणार होते आणि त्यासाठीचं तर सगळी लगबग चालली होती.मुलगा Engineer,पुण्याला एका कंपनीत मोठ्या पगाराच्या पोस्टवर.मुलाच्या घरी तो,त्याची एक छोटी बहीण आणि आईवडील एवढचं कुटूंब! सगळी मंडळी सुशिक्षित.राजाराम पाटलांना जसं पाहीजे होतं तसंच स्थळ होतं हे.ते आज खूप खुश होते आणि म्हणूनचं आज घरातं राहीचे काका-काकी,चुलतं भावंडं आणि मामा-मामी त्यांची मुलं असं गोतावळं जमलं होतं.राही मात्र आणखीन बेडवरचं लोळत होती आणि आजची ती सेलिब्रेटी असल्यामूळे तिला ओरडायला किंवा उठवायला कोणिही आलं नव्हतं.
राही बेडवर पडल्यापडल्या येणा-या मुलाविषयी विचार करतं होती.फोटो आणि बायोटडाटा न्याहळत गालातल्या गालात हसत होती.डोळे मिचकावत होती,नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवत होती."मुलगा Engineer,चांगल्या पोस्टवर, आणि दिसायलाही सुंदर.मी दिसायला जरी सुंदर असले तरी फक्त graduate.तो पंसंत करेल का मला?कसा असेल त्याचा स्वभाव मनमिळावू,हसरा,समजुतदार. समजून घेईल का मला?की घमेंडी असेल? पुण्यात असतो म्हणे राहायला. स्वत:चं घर आहे तिथे त्याच.एकटाचं असतो. तिथे.आई-वडील आणि बहीण गावी.छान आहे सगळं.एवढ सगळं असल्यावर तो हो म्हणेण मला? त्याला तर इंजिनियर मुली सांगूण येत असतील?मग तो का बघायला येतोय माझ्यासारख्या सामान्य मुलीला?तसे मावशे सांगत होते त्यांना नोकरी करनारी सुन नकोय म्हणून.मी ऐकलं होतं चोरून!त्यांनां बोलतांना.

लता भुसारे ठोंबरे