अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 16 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 16

सुरुवातीचे दोन महिने सगळ्यांचाच अतरंगीपणा करण्यात गेला असल्या कारणाने कोणाचाही अभ्यास असा झाला नव्हता. कॉलेजचे लेक्चर सोडले तर त्या व्यतिरिक्त कोणीही स्वतःहुन पुस्तक उघडुन अभ्यास केला नव्हता त्यामुळे परीक्षेच्या भीतीने दुसऱ्यादिवशी सगळेच आपापल्या रूममध्ये बसुन अभ्यास करत होते शिवाय शौर्य.. त्याच मात्र त्याचा लॅपटॉप आणि तो.. वृषभ आणि रोहनची दुसऱ्या दिवशी डिस्ट्रिक्ट लेव्हलची मॅच असल्यामुळे पूर्ण दिवस दोघेही त्यात गुंतून गेलेले असतात. प्रॅक्टिस संपताच रोहन आणि वृषभ ग्राउंड मधुन बाहेर पडतात.

"वृषभ मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय..", रोहन थोडा गंभीर चेहरा करतच बोलतो.

वृषभ : "बोल की मग एवढं काय विचार करतोयस??"

रोहन : "ते.. कस बोलु कळतच नाही रे.."

वृषभ : "काय झालं??"

रोहन : "शौर्य अजुन नाराज आहे का माझ्यावर आणि मनवीवर??"

वृषभ : "नाही रे.."

रोहन : "मनवीने जाणुन बुजून नाही केलं रे.. त्याला.."

"रोहन.. तु अजुनपण तोच विचार करतोयस..", वृषभ मध्येच रोहनला थांबवत बोलला.

"विसरून जा ना.. जे झालं ते झालं."

रोहन : "काल बघितलं ना तो कसा निघुन गेला ते. मला थोडं हर्ट झालं. म्हणजे मनवी त्याला सॉरी बोलत होती तरी तो.."

वृषभ : "उद्या जेव्हा तो आपली मॅच बघायला येईलना तेव्हा दोघांनी भेटुन बोला आणि मी जेवढं त्याला ओळखतो तो तुझ्यावर कधी नाराज होऊच शकत नाही.. तु उगाच नको ते टेन्शन घेत बसतोयस.. अभ्यासाचं टेंशन कमी आहे का जे नको ते विचार करतोयस?? ह्या अभ्यासावरून आठवल.. अभ्यास करायचाय यार मला. जाम टेन्शन आलय यार एक्सामच. निघुयात का आपण..?? मला पप्पांना भेटायला पण जायचय.."

"तुझे पप्पा पण दिल्लीत आहेत ना??" रोहन वृषभला विचारतो..

"हो.. आत्ता निघुयात?",वृषभ आपली बॅगखांद्याला अडकवतच रोहनला बोलतो..

"चल मी तुला सोडतो तुझ्या पप्पांकडे.. त्या निमित्ताने मी पण भेटेल त्यांना..", रोहन अस बोलताच वृषभ खुश होतो..

"तु कॉलेजच्या गेटजवळ थांब मी कपडे चेंज करून येतो..", वृषभ पळतच आपल्या रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून खाली येतो..

रोहनच्या बाईकवर बसुन तो आपल्या वडिलांना भेटायला निघुन जातो. वडिलांना भेटुन येताच वृषभ स्वतःच्या रूममध्ये न जाता शौर्यच्या रुममध्ये घुसतो.

शौर्यला लॅपटॉप मध्ये बघुन वृषभला आश्चर्य वाटत.

वृषभ : "शौर्य तुला काही टेन्शन वैगेरे आहे का नाही??"

शौर्य : "कसल??"

वृषभ : "एक्सामच यार.."

शौर्य : "आयत्या वेळेला अभ्यास केला की मग टेन्शन येत आणि आयत्या वेळेला अभ्यास करणाऱ्यांपैकी मी नाही.. "

वृषभ : "म्हणजे तुझा अभ्यास झालाय.."

शौर्य : "येस.."

वृषभ : "बरंय मग..चल मग तु बघ मुव्ही मी निघतो.."

शौर्य : "प्रॅक्टिस झाली तुमची??"

वृषभ : "हो.. तु येशील ना उद्या बघायला.."

शौर्य : "बस काय.. हे पण काय विचारणं झालं का.. बघु तर दे कशी मॅच असते डिस्ट्रिक्ट लेव्हलची.."

वृषभ : "तु फक्त बघतच रहाशील मित्रा.. पण नक्की ये.. पण आज सुद्धा यायला हवं होतं तु. आज माहिती का फुटबॉल प्रॅक्टिसला एकदम भारी मज्जा आली यार. रोहनला चकवा दिला मी ते ही तीन वेळा हा बट एक गॉल होता होता राहिला यार.. थोडक्यासाठी.. बट मी एकट्याने तीन गॉल केले.."

(वृषभ त्याला ग्राउंडवर आज प्रॅक्टिस खेळताना काय झालं ते सांगु लागला..शौर्य पूर्ण पणे वृषभ जे सांगतो त्यात हरवुन गेला.)

"खुप म्हणजे खुपच पण मज्जा आली.. तु असतास तर अजुनच मज्जा आली असती यार.. तुझा पाय बरा झाला असता तर तु ही खेळला असतास ना.. लवकर बरा कर ना ह्या तुझ्या पायाला"

शौर्य : "हम्मम.."

"उद्या मॅच बघायला नक्की ये.", एवढं बोलुन वृषभ स्वतःच्या रूममध्ये निघुन गेला..

शौर्यला खुप वाईट वाटत असत.. शौर्यला वृषभचे शब्द आठवतात.. तुझा पाय बरा झाला असता तर तु ही खेळला असतास ना.. तो मनात विचार करू लागतो की खरच माझा पाय बरा झाला तर मी ही उद्याची मॅच खेळू शकेलं.. तो मनात आता काही तरी विचार करत लॅपटॉप बाजुला ठेवुन उभं रहाण्याचा प्रयत्न करतो.. बेड खाली असलेला त्याचा फुटबॉल तो काढतो. उजवा पाय घाबरतच जमिनीवर टेकवत तो स्वतःच बेलेन्स करतो. हलकीशी कळ त्याला त्याच्या पायातुन जाणवते पण तो लक्ष देत नाही..

"एवढं तर मी सहन करूच शकतोच", अस मनात बोलत तो डाव्या पायावर उभा रहात उजव्या पायाने फुटबॉल सोबत खेळु लागतो. पाय दुखत असतो पण तो ते सगळं विसरून लंगडत का होईना फुटबॉल सोबत एकटाच खेळत असतो.. उद्याची मॅच खेळायला मिळणार नाही म्हणून एक वेगळाच आक्रोश जणु त्यात संचारला असतो.. पायाला फ्लेक्चर लागलंय हेही ती विसरतो. जवळजवळ अर्धा तास तो पायातुन येणाऱ्या कळा विसरत एकटाच फुटबॉल खेळत असतो.

जेवणासाठीची मोठी रिंग वाजते तसा शौर्य भानावर येतो.. आता मात्र असह्य वेदना त्याला होत असतात. तसाच लंगडत तो बेड वर आडवा होतो.. पाय पोटाजवळ धरतच लोळतो. डोळ्यांतुन घळा घळा पाणी येऊ लागते..

नेहमीप्रमाणे राज आणि टॉनी शौर्यच्या रूममध्ये त्याला जेवणासाठी सोबत न्यायला येतात. शौर्य त्यांना बेडवर लोळत रडत असलेला त्यांना दिसतो..

टॉनी : "काय झालं?? पाय दुखतोय का??"

"खुपsss..आहहss मम्मा" वेदनेने तो कळवळत असतो..

राज : "औषध घे मग बर वाटेल.. कुठे ठेवलीस??"

शौर्य बोटाने त्यांना त्याचा ड्रॉवर दाखवतो.. राज पटकन ड्रॉवर मधली औषध काढुन त्याला देतो.

टॉनी : "फोन तरी करायचासना.. एकटाच रडत बसलायस ते.."

तोच वृषभ येतो..

वृषभ : "चला गाईज जेवून येऊयात... ह्याला काय झालं??"

टॉनी : "पाय दुखतोय म्हणुन रडतोय. औषध दिलय आता बर वाटेल."

वृषभ : "आता तर बरा होता हा, मी जस्ट अर्ध्या तासापूर्वी ह्याच्या रुममधून गेलो.."

(वृषभच लक्ष फुटबॉलवर जात.. )

"मगाशी तर हा फुटबॉल इथे नव्हता.. शौर्य तु फुटबॉल खेळत होतास.??", वृषभ दम देतच त्याला विचारतो..

शौर्य : "ते मी... जस्ट बघत होतो खेळायला जमतंय का..मग मी पण उद्या आलो असतो ना खेळायला. मला पण उद्याची मॅच खेळायचीय यार."

टॉनी : "शौर्य काय हा वेडेपणा आहे. एक मॅच न खेळल्याने काहीही फरक नाही पडत.. जर तु आता पायाला जास्त त्रास दिलासना तर तु पुढे हीच काय कोणतीही मॅच खेळु नाही शकणार. सो जमेल तेवढा आराम कर. "

वृषभ : "शौर्य तुला तुझ्या मॉमने पण समजवल ना तरी तुझं अजूनही तेच.."

शौर्य : "सॉरी पण फुटबॉलला बघुन मी स्वतःला नाही कंट्रोल करू शकत यार.."

वृषभ : "नेक्स्ट टाईम काळजी घे. फक्त हीच मॅच रे ह्यापुढील मॅचमध्ये तु नक्की खेळशील.."

शौर्य : "हम्मम."

राज : "जाऊयात लंचसाठी?"

शौर्य : "मला नाही वाटत मी खाली येऊ शकेल. पाय खुप दुखतोय आणि बॅकपेन पण होतय.. दुखायच कमी झालं की मी बघतो आणि तसही मम्माने खाऊ दिलंय ते खाईल मी.. तुम्ही या जेवुन"

वृषभ : "एक काम करतो, मी खाली सांगुन तुझं ताट इथेच घेऊन येतो."

शौर्य : "नको अरे मी.."

"मी तुला विचारत नाही सांगतोय..",शौर्यला मध्येच तोडत वृषभ बोलतो.. वृषभ, राज आणि टॉनी लंचसाठी निघुन जातात. येताना ते शौर्यसाठी जेवणाचं ताठ घेऊन त्याच्या रूममध्ये जातात.

शौर्य : "थेंक्स यार."

वृषभ : "तु जेव.. आम्ही आहोत इथे. ऐकट बॉर होशील.."

शौर्य : "कधी कधी वाटत ना मम्माने खुप छान डिसीजन घेतलं मला इथे पाठवुन. नाही तर तुमच्यासारखे मित्र मी मिस केले असते."

वृषभ : "पुरे झालं आधी जेवुन घे..थंड होईल"

टॉनी : "का भरवु??"

शौर्य : "नको मी जेवतो.."

राज : "शौर्य हा डब्बा कसला रे??"

शौर्य : "समीराचा आहे.. लाडु दिलेले तिने पाठवुन.."

राज : "लग्न वैगेरे जमलं की काय तीच??"

वृषभ : "ए मॅड.. ते तिचा दादा घेऊन आलेला ते वाले.."

टॉनी : "मग ह्याला डब्यातून का?? ओहह स्पेसिअल??"

शौर्य : "मग?? स्पेसिअल असणारच ना??"

राज : "मग तु रिटर्न्स गिफ्ट काय देणार.. "

शौर्य : "चॉकलेट्स.. त्यात ठेवलीत तिला द्यायला.."

राज : "मी एक घेऊ??"

शौर्य : "ड्रॉवरमध्ये आहे बघ त्यातुन घे. डब्यातली थोडी स्पेसिअल आहे.. प्लिज उघडु नकोस.."

"आता शौर्य तुझं काही खर नाही..गॉड ब्लेस यु..", वृषभ हळूच शौर्यच्या कानात बोलला.

राज : "मग तर आम्ही उघडणारच.. काय टॉनी??"

टॉनी : "ऑफ कोर्स.."

"अजिबात नाही हा प्लिज.. वृषभ सांगणा ह्यांना..", शौर्य हातातील ताट बाजूला ठेवतच बोलला..

"नका ना त्याला त्रास देऊ.. तो डब्बा आणा बघु इथे", वृषभ राज आणि टोनीला दम देतच बोलतो..

राज : "अजिबात नाही.. शौर्य आज माझ्या तावडीत भेटलासच तु.. त्यादिवशी माझा मोबाईल फेकत होता काय??"

"राज यार बस काय.. प्लिज दे तो डब्बा इथे..", शौर्य जागे वरून कस बस उठतच बोलला..

टॉनी कॅच अस बोलत राज ने डब्बा टॉनीकडे फेकला..

शौर्य : "टॉनी तु तरी.. "

टॉनी : "आम्हाला तर बघायचं आहे त्यात काय आहे ते.. त्याशिवाय डब्बा मिळणारच नाही.."

दोघेही डब्बा इथुन तिथे, तिथुन इथे फेकत रहातात.. आणि शौर्यची मस्ती करतात....

"आहहह मम्माsss", अस बोलत शौर्य पाय धरतच पुन्हा बेडवर पडला..

तिघेही त्याच्याकडे धावतच जातात..

टॉनी : "शौर्य काय झाल यार.."

वृषभ : "कश्याला त्याला त्रास देत होते.. नको म्हणुनबोलत होतो ना.. तुम्ही दोघ ऐकतच नाही."

राज : "आम्ही फक्त मस्ती करत होतो"

शौर्यने लगेच टॉनीच्या हातातला डब्बा खेचला..

राज : "साला नोटंकी.. एकटींग भारी करतो हा तु.."

टॉनी : "बघितलस वृषभ कसला एक्टर आहे हा.."

शौर्य : "मग काय करू. तुम्हाला बोललो द्या म्हणुन तर तुम्ही ऐकत नव्हते. मग थोडी एकटिंग करावी लागली आणि खर सांगु का.. पायातुन खरच कळ आली. अजुन दुखायचा थांबला नाहीय.."

राज : "राहु दे रे शौर्य.."

शौर्य : "अरे खरच तर.."

वृषभ : "तु आराम कर तुला बर वाटेल.. आम्ही निघतो.."

"बाय.. नंतर भेटशीलच तु..",राज शौर्यला नकटा राग दाखवत तिथुन निघुन गेला.

"काही लागलं तर सांग.. फोन कर.. आणि हो तो डब्बा तर तु संभाळूनच ठेव.. आम्हा दोघांपासून त्या डब्याची काही सुटका नाही. "टॉनी मोठ्याने ओरडतो

तिघेही शौर्यला बाय करत बाहेर पडतात.

शौर्य तो डब्बा न्याहाळत बसु लागला जो त्याला समीराला द्यायचा होता. कधी एकदाच तिला तो डब्बा देतो अस शौर्यला झालेलं.. त्यांनंतर शौर्यला तिची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता होती. उद्या काहीही करून तिला तो डब्बा देऊ अस तो ठरवतो..

★★★★★

दुसऱ्या दिवशी M K कॉलेजमध्ये डिस्ट्रीक्ट लेव्हलच्या मॅचला सुरुवात होणार होती. संपुर्ण ग्राउंड पुर्ण पणे प्रेक्षकांनी भरून गेलेला. शौर्य, राज आणि टॉनी आधीपासूनच ग्राउंडवर जाऊन बसलेले.

राज : "लेडी गेंग अजुन आली नाही वाटत.."

टॉनी : "आली असेल तरी एवढ्या गर्दीत शोधायचं कस??"

राज : "थांब मी फोन करून बघतो.. कुठे आहेत ते.."

शौर्य : "तिथे बघ.."

तिघी जणी नुकत्याच आत येत होत्या..

सीमा : "तरी मी बोलली लवकर निघा.. ह्या समीरामुळे उशीर झाला. लवकर उठायला नको.. रात्रभर झोपायचं सोडुन काय करत असते देव जाणे.."

समीराच मात्र सीमाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.. ती सगळीकडे नजर फिरवत होती.. जणु कोणाला तरी शोधत..

मनवी : "ती बघ तिथे आहे जागा बसायला.."

राजने सीमाला आवाज दिला..

तशी समिराची शोधत असणारी नजर शौर्यवर स्थिर झाली..

शौर्य तिला हातानेच हाय करतो.. तीही लांबुन त्याला हाय करते..

मॅचसला सुरुवात ही झाली.. सुरुवातीलाच MK कॉलेज vs Sterling कॉलेज अशी होती. स्वतःच कॉलेज असल्यामुळे सगळेच एकदम मन लावुन सामना बघत होते.. समीरा हळुच शौर्यकडे बघत होती पण शौर्यच लक्ष मात्र मॅच मध्ये होत..

(मॅच सुरू झालीय तीही आपल्या कॉलेजची म्हणजे सगळंच कॉलेज इथे असेल मग मी शौर्यशी शांतपणे बोलु शकते... समीरा मनात विचार करू लागते. पण शौर्यला काही सांगायला शौर्यच लक्ष मात्र मॅचकडे. कधी शौर्य तिच्याकडे बघतो अस तिला झालं..)

शौर्य लक्ष समीराकडे काही जात नाही राजच लक्ष मात्र समीराकडे जात.

तो तिला इशाऱ्यानेच काय झालं म्हणुन विचारतो.. ती नकारार्थी मान हलवत नाही म्हणून सांगते आणि ग्राउंडवर चालु असणाऱ्या मॅचमध्ये आपली नजर स्थिर ठरवते.

थोड्या वेळाने पुन्हा ती शौर्यकडे बघते. पण राज तिच्याकडेच भुवया उडवत बघत असतो. तिला कळत नसत की कस सांगु शौर्यला..

इथे रोहनकडुन गॉल होता होता राहीला.. तस शौर्य शट म्हणुन ओरडला.. असेच खेळत राहिलो तर ही मॅच आपण जिंकु अस काही त्याला वाटत नव्हतं.. तोच नकळत त्याच लक्ष समीराकडे जात.. शौर्यने बघताच समीरा त्याला इशाऱ्यानेच बाहेर ये म्हणुन सांगते.

"आत्ता.??", शौर्यही तिला इशाऱ्यानेच विचारतो.

समीरा हो म्हणुन सांगते..

"मी बाहेर आहे तु ये", अस बोलत समीरा तिथुन उठुन बाहेर जायला निघते.

सीमा : "कुठे चाललीस आता आपल्या कॉलेजची मॅच चालु असताना??"

समीरा : "पाणी पियायला.. तुला हवंय..??"

सीमा : "नको.. लवकर ये."

समीरा : "आलीच.. "

शौर्य ही तिथुन बाहेर पडायला निघतो.. तोच राज त्याचा हात घट्ट पकडतो.

"कुठे??",आपल्या दोन्ही भुवया उडवतच त्याला विचारतो)

शौर्य : "आलोच."

टॉनी : "बस गप्प.. पाय दुखतोय नी जातोस कुठे.."

शौर्य : "अरे ते.. ते.. पाणी.. हा.. पाणी हवंय.. पिऊन लगेच येतो.."

टॉनी : "पाणी हवंय ना मी आणुन देतो तु बस.."

शौर्य : "टॉनी ऐकणं.. माझं मी घेतो.. मला फोन पण करायचाय.."

राज : "कोणाला??"

(टॉनी आणि राज जाणूनबुजून शौर्यला त्रास देत असतात. समीरा आणि शौर्यचे चालु असणारे इशारे दोघांनीही बघितले असतात.)

शौर्य : "आहे रे पर्सनल.. जाऊ मी..??"

राज : "थांब मग मी येतो सोडायला."

शौर्य : "अजिबात नाही, मी जातो बरोबर.."

टॉनी : "नक्की??"

"हो नक्की..", अस बोलत शौर्य उभा रहातो..

राज : "बर ऐक.."

शौर्य : "आता काय??"

राज : "तो डब्बा पण घेऊन जा. समीरासाठीच आणलायस ना तो??"

शौर्य : "म्हणजे तुम्हांला...₹"

¶¶इशारों इशारों में दिल लेने वाले
बता ये हुनर तूने सीखा कहाँ से¶¶

राज गाणं गातच त्याला चिडवु लागतो..

एकमेकांना टाळी देत टॉनी आणि राज हसु लागतात..

टॉनी : "जा जा ती वाट बघत असेल.."

शौर्य : "काय यार तुम्ही माहीत होत तरी त्रास देत होते मला.. जाऊदे मग बघतो तुमच्याकडे अस बोलत शौर्य एका पायाने थोडस लंगडतच तिथुन बाहेर जाऊ लागला.."

टॉनी : "येऊ का सोडायला.."

"नको..आय विल मॅनेज..", अस बोलत तो तिथुन निघाला आणि ग्राऊंडच्या बाहेर पडला..

समीरा ग्राउंड बाहेरच त्याची वाट बघत असते..

समीरा : "मला वाटलं तु नाही येत आहेस.."

शौर्य : "तु बोलवलं आणि मी नाही येणार अस कधी होईल का??"

दोघेही शांतच असतात..

"आपण तिथे जाऊन बोलुयात?? तुला चालणार असेल तर", शौर्य प्ले हाऊसकडे बोट दाखवत समीराला बोलला.. समीरा ही लगेच हो बोलते.

दोघेही आत जाऊन बसतात..

शौर्य : "बर झालं तु बोलवलस.. तस माझंच तुझ्याकडे काम होत.."

समीरा : "माझ्याकडे?? काय??"

शौर्य : "अग हा डब्बा तुझा.. तो परत द्यायचा होता तुला.."

"जड का लागतोय हा...?", समीरा डब्बा हातात घेतच बोलली..

शौर्य : "तुझ्यासाठी स्पेसिअल खाऊ आहे त्यात."

समीरा : ,"त्याची काय गरज होती.. ??"

समीरा शौर्यच्या पुढ्यातच डब्बा खोलुन पाहणार..

"अ ह... स्पेसिअल आहे ग.. अस माझ्या समोर खोलून जनरल नको ना करू.. आय मिन तु स्पेसिअल ठिकाणी जाऊन हे स्पेसिअल गिफ्ट स्पेसिअली बघावं अस मला स्पेसिअल वाटत.."

समीरा : "वाह !! काय भारी बोलतोस तु.."

शौर्य : "आवडलं तुला??"

समीरा : "हम्मम"

शौर्य : "तुझं काही काम होत का माझ्याकडे??"

समीरा : "हो.. पण तु खर सांगणार असशील तर बोलूयात."

शौर्य : "काय झालं?? तु अस का बोलतेस."

समीरा : "तु खरंच डेटा एंट्रीच काम करतोस का?? "

शौर्य : "तु अचानक अस का विचारतेस?? काही झालय का??"

समीरा : "मला माहिती मी उगाच तुझ्यावर डाऊट घेतेय प्लिज तु राग नको करुस.. "

शौर्य : "मी राग नाही करत पण तू अस अचानक का विचारतेस.. तुला कोणी काही बोलल का?"

समीरा : "खर सांगु का मला ना खोटं नाही रे आवडत. म्हणजे तु खोट बोललास माझ्याशी अस नाही म्हणायचय मला.. ते तुझी मॉम आली ना अचानक. "

शौर्य : "होsss आली होती मग??"

समीरा : "ती विमानाने आली असेल ना?? त्यासाठीचा खर्च, परत त्यांनी त्या सोबत एवढं सगळ्यांसाठी खाऊ घेऊन आले त्याचा खर्च.. तुझं हॉस्पिटलच बिल.. एवढं सगळं कसं मॅनेज केलं.. म्हणजे तु स्वतः जॉब करून तुझं शिक्षण करतोस अस मला वाटत होतं म्हणजे तु त्याचसाठी डेटा एन्ट्रीचा जॉब करतोस ना..?".

शौर्यला काय बोलावे कळत नव्हतं.. जर खर सांगितलं तर ही माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेईल. शौर्य चलबीचल होऊ लागला..

शौर्य : "समीरा.. ते.. मी..."

"शौर्य, डोन्ट टेल मी तु मला खोटं बोललास..", समीरा थोडं सिरीयस होत बोलली..

शौर्यच हृदय खुप जोरात धडधडू लागलं.. समीराला खर सांगितलं तर ती मला वृषभ बोलल्याप्रमाणे संशयी बोलेलं आणि बोलायचंच बंद करेल. पण एक खोटं लपवण्यासाठी मी किती खोट बोलु..

"काय झालं?? एवढा का विचार करतोयस??" शौर्य विचारांत गुंतून गेला हे बघुन समीरा त्याला विचारते..

(शौर्य काय करेल पुढे?? भेटूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल