"व्हॉट सरप्राईज आहे शौर्य.. कधी आलास तु इथे?? काल तर माझ्याशी बोललास पण सांगितलं नाहीस की तु इथे आलास ते आणि आंटी सुद्धा काही बोलल्या नाहीत.. आणि आता तर....", ज्योसलीन आनंदाच्या भरात बोलत होती..
"ज्यो किती प्रश्न करतेयस..???एखादा प्रश्न करून शांत बसलीस की मी उत्तर देईल ना..", ज्योसलीनला थांबवतच शौर्य बोलला..
ज्योसलीन : "तु कधी आलास इथे ते सांग.."
शौर्य : "मी आज सकाळीच आलोय इथे आणि मॉमला काहीच माहीत नाही ह्याबद्दल.."
ज्योसलीन : "ओहहह! आंटीला पण सरप्राईज देणार वाटत."
शौर्य : "तस नाही ग"..
"शौर्य आमची पण ओळख करून देना.. मला पण ओळख करून घ्यायला आवडेल", समीरा दात चावतच आणि थोडस खोट हसु चेहऱ्यावर आणत शौर्यला बोलली..
"शौर्य कश्याला हवाय त्यासाठी.. मीच माझी ओळख करून देते..", शौर्य काही बोलणार तोच ज्योसलीन बोलली
"मी ज्योसलीन.. शौर्यची शेजारी, शौर्यची शाळेतली मैत्रीण, ट्युशन मधली मैत्रीण, इव्हन कॉलेजमधली पण.. He is my BBF.. means best frend forever..", ज्योसलीन शौर्यच्या खांद्यावर हात ठेवतच त्याला बोलते..
समीरा तिने ठेवलेल्या त्या हाताकडे बघत शौर्यकडे रागाने बघते...
"मी समीरा..", समीरा ज्योसलीनच्या समोर आपला उजवा हात धरतच बोलते..
"मी ह्याची कॉलेजमधली मैत्रीण, हॉस्टेलमधली मैत्रीण, इव्हन वि आर ए लाईक फेमिलियर.. He is my BF..." ज्योसलीन शौर्यच्या खांद्यावरच्या हात काढुन सरळ उभी राहते.. एव्हान सगळेच तिच्याकडे शॉक होऊन बघतात.. सगळ्यात जास्त धक्का बसला असेल तर तो मनवीला..
"please don't be misunderstand.. BF means Best Friend.. हो ना शौर्य..", शौर्यला नजरेने राग दाखवतच ती बोलते..
"अ....हो.. ऐकणं ज्यो.. मी तुला बाकीच्या मित्र मैत्रिणीशी ओळख करून देतो.."एक तिरकी नजर समीराकडे फिरवतच शौर्य ज्योसलीनची इतरांसोबत ओळख करून देऊ लागला..
ज्योसलीन ही सगळ्यांना हाय हॅलो करत त्यांच्याशी गप्पा मारू लागली.. समीरा मात्र शौर्यकडे डोळ्यांची पापणी न हलवता एक टक बघत होती..
ज्योसलीन : "छान आहेत तुझे मित्र.. आणि मैत्रिणी पण.. किती दिवस आहेस इथे??"
शौर्य : "टेन डेस मे बी..,
"येहहह.. म्हणजे माझ्या बर्थडे ला पण तू इथेच असशील..", ज्योसलीन थोडी एक्साईट होत बोलली.
शौर्य : "अरे हा 10th ला तुझा बर्थडे ना.. विसरलोच होतो मी"
ज्योसलीन : "तुम्ही सगळ्यांनी या हा.. शौर्य तु तर पक्का येतोयस.. आपली गेंग मिस करतेय यार तुला.."
शौर्य : "ओके..",
"आम्हाला आवडलं असत पण आम्ही इथे समीराच्या भावाच्या लग्नासाठी आलोय आणि तेही 10th ला आहे..", वृषभ शौर्यकडे बघतच बोलतो..
ज्योसलीन : "ते सकाळी असेल ना.. बर्थडे पार्टी तर लेट नाईट आहे.."
समीरा : "लग्न सकाळी आहे बट रिसेप्शन इव्हीनींगला आहे.."
"ओहहहsss के बट तुम्हांला यायला जमणार नसेल तर मी जास्त फोर्स नाही करणार.. पण शौर्य तु येतोयस म्हणजे येतोयस.. मला काही माहिती नाही..", ज्योसलीन अस बोलताच सगळेच गंभीर चेहरा करत तिच्याकडे बघु लागतात..
शौर्य : "मी ट्राय करेल.."
समीरा : "तु ही लग्नाला येऊ शकतेस.."
ज्योसलीन : "नक्की.. मला एड्रेस सेंट कर.. मी पक्का येईल.."
समीरा : "व्हाट्सएवर कार्ड पाठवलं तर चालेल ना??"
ज्योसलीन : "ऑफकोर्स चालेल.. मी निघू?? मला अजुन खुप शॉपिंग करायचीय.."
शौर्य : "हो चालेल.."
ज्योसलीन : "मग बाय गाईज..'
सगळेच ज्योसलीनला बाय करू लागले..
समीरा : "आपण पण निघुयात घरी वाट बघत असतील सगळे.."
सगळे मॉलमधुन निघु लागले..
"गाईज मी एक मिनिटात येतो तुम्ही पुढे व्हा..",शौर्यला मध्येच काही तरी आठवत.
वृषभ : "तुला काय झालं??"
"मी आलोच तुम्ही गाडीत जाऊन बसा..", अस बोलत शौर्य पळतच तिथुन गेला..
राज :" ह्याला काय झालं मध्येच??"
मनवी : "मला वाटत त्याच्या ज्यो ला भेटायला गेला असेल"
टॉनी : "मला पण.."
मनवीच्या अश्या बोलण्याने समीरा अजुन रागाने लाल होते..
शौर्य देखील खरंच ज्योसलीनला भेटायला जातो.. तिला तो पूर्ण मॉल मध्ये शोधतो आणि शेवटी एका दुकानात ती त्याला भेटते..
"ज्यो ऐक ना मला तुझी हेल्प हवीय.", धापा टाकतच तो तिला बोलतो..
ज्योसलीन : "काय झालं??"
शौर्य : "तु मॉमला अजिबात सांगणार नाही की इथे मुंबईत आहे.. मॉमलाच काय विरलासुद्धा आणि इतर कोणालाही जेणेकरून त्यांच्या थ्रू मॉमला कळेल."
ज्योसलीन : "अस का बोलतोयस तु?? आणि मॅन म्हणजे तुला माहिती सुरज अंकल काही मिनिटांपूर्वी इथेच होते. तुला भेटले का ते..??"
शौर्य : "What!! तो नाही भेटला हेच माझं नशीब... पण ते सगळं तु सोड.. मी काय बोलतोय ते लक्षात ठेव.. तु घरी सांगु नकोस कारण मी कॉलेज बंक करून इथे आलोय.. मॉमला आणि विरला कळलं तर ते दोघे मिळुन माझं काय करतील ते तुला वेगळं सांगायला नको.. तु तर समजुच शकते."
ज्योसलीन : "ओहह.. तो ये बात हे.. मग नाही सांगत पण एका अटीवर.."
शौर्य : "तु बोलशील ते.. पण प्लिज.. एवढं सांभाळुन घे.."
ज्योसलीन : "आधी अट तर ऐकुन घे.. तुला माझ्या बर्थडे ला यावं लागेल.."
शौर्य : "प्लिज ते सोडुन बाकी काहीही बोल.. कारण मी बर्थडे ला आलो तर मॉम वैगेरे असेल.. नाही तर विर सुद्धा.."
ज्योसलीन : "हि पार्टी फक्त आपल्या मुंबई गेंग साठी आहे रे.. बाकी कोणी नाही.."
शौर्य : "मी ट्राय करेल..."
ज्योसलीन : "ट्राय नकोय.. तुला यावच लागेल.. प्लिज.. प्लिज.. प्लिज..."
शौर्य : "बर बाबा..मी येतो.."
(खर तर शौर्यला जमणार नव्हतं पण तीच मन तो अजुन दुखवु शकत नव्हता)
शौर्यने हो बोलताच ज्योसलीन पुन्हा त्याला मिठी मारत बाय करते.. आणि तिथुन निघते.. शौर्य ही तिला बाय करत पुन्हा मागे वळतो.. तर पाठी समीरा..
शौर्य : "समीरा तु.. तु इथे काय करतेस??"
समीरा काही न बोलता रागातच तिथुन निघु लागते..
"हिला काय झालं आता??", शौर्य स्वतःशीच बोलतो..
"समीरा.. एक तर... काय झालं तुला.. अशी रागात का जातेस..", शौर्य तिच्या मागे पळतच तिला बोलतो.
समीरा : "तु तिला भेटायला इथे आलास.."
शौर्य : "हां.. मग??"
"मग?? वर तु मलाच विचारतोस??", समीरा रागातच बोलते
शौर्य : "तु भडकतेस का अशी?"
समीरा : "एवढं चिकटून बोलायची खरच गरज आहे का?? चिकटण्यापेक्षा गळा भेटीच जास्त तुमच्या.."
शौर्य : "समीरा ती जस्ट फ्रेंड आहे ग.. बेस्ट फ्रँड..तु समजतेस तस काही नाही..".
समीरा : "मग बर्थडे ला जाणार.."
शौर्य : "जावं लागेल ना.. बेस्ट ऑफ बेस फ्रेंड आहे ग ती माझी आणि तु बघितलं ना ती किती फोर्स करत होती.. हवं तर आपण दोघ जाऊयात मग तर चालेल.. माझे इकडचे कॉलेज फ्रँड पण भेटतील ना ग.. मी त्यांना पण मिस करतोय खुप"
"मी अजिबात येणार नाही आणि तुला जायचं असेल तर तु खुशाल जाऊ शकतोस.. मी कोण तुला अडवाणारी.." एवढं बोलून समीरा रागातच निघुन जाते आणि गाडी जवळ थांबते..
समीरा : "वृषभ प्लिज तु पुढे बस.. मला मागे बसायचय.."
वृषभ ही जास्त काही न बोलता पुढे बसला.. आणि सीमा समीरा सोबत मागे बसली.. शौर्य सगळे हे बघत होता.. तो काहीही न बोलता सरळ ड्रायव्हर सीटवर बसुन गाडी चालवू लागला..
राज : "शौर्य एसी चालु कर गाडीत गरमी खुप वाढलीय रे.."
टॉनी : "हो न अचानक खुपच गरम होऊ लागलं ना.."
राज आणि टॉनी दोघांनाही चिडवत होते.. शौर्य काहीही न बोलता गाडी चालवत राहतो..
समीराच्या घरी येताच सगळे गाडीतुन उतरतात आणि घरी येतात.. शौर्य गाडी पार्क करून मग घरी येत असताना समीराचा दादा फोन वर कोणाशी तरी बोलत असताना दिसतो.. खुप टेन्शनमध्ये तो बोलतोय अस वाटत.. त्याने फोन ठेवताच शौर्य त्याच्याजवळ जातो..
शौर्य : "काही प्रॉब्लेम आहे का?? नाही मगाशी फोनवर बोलताना तु टेन्शनमध्ये दिसलास म्हणुन सहज विचारलं.."
दादा : "काय सांगु यार तुला.. पर्वा पासुन एक एक कार्यक्रम चालू होतील.. घर डेकोरेट नको का व्हायला.. ज्या डेकोरेशन वाल्याने काँट्रॅक्ट घेतलेलं.. त्याचे वडील कालच गेले.. त्याला काही जमणार नाही.. ऐन वेळेला दुसरा कोणी मिळत नाही.."
शौर्य : "बस एवढंच ना?? तु अस नाराज नको राहुस.. आम्ही सगळे मिळुन करू डेकोरेट. "
दादा : "पण कस??"
शौर्य : "ते तु माझ्यावर सोड.. एच्युअली मी ही गाडीची किल्ली तुला द्यायला आलेलो पण आता परत घेऊन जातो.. सामान आणायला.."
दादा : "चल मी पण येतो.."
शौर्य : "अजिबात नाही हा.. समीराला कळलं की तिचा दादा ती असताना काम करतो मग??"
शौर्यच्या अश्या बोलण्यावर समीराचा दादा हसु लागतो..
शौर्य : "ऐकणं तु आत जातोस तर वृषभ ला जरा बाहेर पाठवुन दे ना.."
दादा : "बर देतो.."
थोड्याच वेळात वृषभ बाहेर येतो.. शौर्य मोबाईल मध्ये काही तरी बघत असतो..
वृषभ : "काय झालं?? काही काम होत का??"
शौर्य : "हो आपल्याला काम आहे.. तु गाडीत बस मी तुला सांगतो.."
दोघेही गाडीत बसुन कुठे तरी जातात.. आणि थोड्याच वेळांत डेकोरेशनच सामान घेऊन येतात..
गाडीचा आवाज ऐकताच सगळे बाहेर येऊन बघतात
दोघेही गाडीतुन सामान उतरवत असतात.. त्यांना अस सामान उतरवताना बघुन इतर जण ही मदत करू लागतात.
रोहन : "मला सांगितलं असत तर मी पण आलो असतो.."
टॉनी : "हो न.. मी ही आलो असतो.."
वृषभ : "जर सगळेच गाडीतुन गेलो असतो मग सामान कस राहील असत.."
शौर्य : "गाईज आपल्याला संपुर्ण घर डेकोरेट करायचंय.. माझ्याकडे काही आयडिया आहेत त्या पद्धतीने आपण पटकन घर डेकोरेट करू शकतो"
"पण त्या आधी जेवुन घ्या.. ताट वाढलीत सगळ्यांच्या जेवणाची आणि हो हात स्वच्छ धुऊन या..", समीराच्या आईने आदेश सोडताच सगळे हात धुवुन जेवायला बसतात.. डायनिंग टेबलवर समीराच्या वडिलांन व्यतिरिक्त सगळेच असतात.. पण कोणाच्या ते लक्षात येत नाही..
शौर्यला मात्र ते जाणवत..
"समीराचे बाबा कुठंत?? त्यांना पम बोलवा ना",शौर्य विचारतो...
काका : "ते रूममध्येच जेवतात.."
शौर्य : "नेहमीच का??"
समीराची आई समीराकडे बघते आणि सरळ किचनमध्ये निघुन जाते.. शौर्यला जे समजायचं ते तो समजुन जातो.. गप्प जेवण आटोपत सरळ तो कामाला लागतो.. जणु घर डेकोरेशनच कॉट्रॅक्ट त्याने स्वतःवर घेतलं असत..
शौर्य आणि त्याचे मित्र मंडळी हसत खेळत रूम डेकोरेशनच्या तैयारीला लागले असतात.. सगळेच हे सगळं एन्जॉय करत असतात..
घरातील मोठी मंडळी ही जबाबदारी त्यांच्यावर टाकत दुपारची झोप काढायला निघुन गेली असतात..
वृषभ एका टेबलवर चढुन लायटिंगच तोरण लावत असतो तर शौर्य एक एक सेलोटेपच्या पट्या ब्लेडने कट करत त्याला देतो... बाकीचे इतरही शौर्यने सांगितल्याप्रमाणे व्हॉल डेकोरेट करत होते.. सगळे कामात बिजी आहे हे बघताच शौर्य समीराला इशारा करू लागला.. समीरा समोरच होती पण शौर्यला अगदी नाक मुरडून नकटा राग दाखवत होती.. शौर्य दोन्ही हात कानाला लावुन तिला सॉरी बोलत होता..
"अरे शौर्य दे की..", शौर्यकडे हात दाखवतच तो त्याच्या कडे सेलोटेप मागु लागला..
शौर्य घाईत सेलोटेप कापू लागला आणि तोच ब्लेडने पटकन त्याच बोट कापलं जात..
"आहहह..",
वृषभ : "काय झालं रे..?? बोट कापलं का काय..??"
शौर्य : "हम्मम."
"समोर समीरा आहे म्हटलं तर तेच होणार.. मुद्दामुन कापलस की आपणच कापल गेल", वृषभ हळुच बोलला..
शौर्य : "मुद्दामुन कापायला मी वेडा आहे का?"
"प्रेमात पडल्यावर झाला असशील म्हणुन सहज म्हटलं रे.. सेलोटेप आण ती इथे आणि जाऊन मलम लावुन ये. माझं मी करतो..", वृषभ शौर्यच्या हातातुन सेलोटेप काढुन घेतच बोलतो..
शौर्य बोट दाबतच थोडं बाजूला येतो..
थोड्या वेळात समीरा तिथे येते.. त्याच बोट आपल्या हातात पकडत.. प्रेमाने फुंकर मारते आणि सोबत घेऊन आलेली बेंडेज त्याच्या बोटाला लागते आणि तिथुन निघते तस शौर्य तिचा हात पकडतो..
शौर्य : "समीरा, एक ना.. अजुन रागावलीस??"
समीरा : "होsss"
शौर्य : "एक बोलु.. रागात सुद्धा तुझ्याकडे बघत रहावस वाटत ग.."
समीरा : "हो का?? मग चालेल.. रोज रागवत जाईल तुझ्यावर.."
शौर्य : 'मी पण रोज असच मनवत जाईल तुला आणि ऐकणं.. मी तिला प्रपोज करणार आहे.. तिला हवं तसं.. ते ही आज रात्री.. पण ती हो बोलेल ना??"
समीरा : "सहजा सहजी हा बोलणं कठीण आहे बाबा.. बघु तरी डिपेंड करत... तु कस प्रपोज करतोस ते.."
समीरा लाजतच तिथुन निघते..
★★★★★
इथे सुरज घरी येताच विराज त्याच्या रुममध्ये जातो.. तो त्याच्या माणसांना फोन फिरवून शौर्य मुंबईत कुठे आहे हे शोधायला सांगत होता..
विराज : "डॅड थोडं बोलायचं होत.."
सुरज : "हम्मम्म.. बोल..'
विराज : "तु श्री ला ओळखतोस ना??"
सुरज : "श्री म्हणजे तो तुझा मित्र??"
विराज : "होss"
सुरज : "त्याला मी कसा विसरू शकेल?? पण त्याच काय झालं??"
विराज : "त्याच लग्न आहे.. सो मी विचार करतो की मी जाऊन येतो.."
सुरज : "मग त्यात काय एवढं विचारायचं??"
विराज : "तु पण आला असतास तर??"
सुरज : "कधी आहे लग्न??"
विराज : "दहा तारखेला.. तस पण तुझ्या काही महत्वाच्या मिटिंग नाही आहेत मी जस्ट चेक केलं.."
सुरज : "ओके मग जाऊयात.. त्याच्या लग्नाला तर जावंच लागेल"
विराज : "ओके "
सुरज : "बर मी काय बोलतो शौर्यशी काही कॉन्टॅक्ट??"
सुरज ने शौर्यच नाव काढताच विराज घाबरतच त्याच्याकडे बघु लागतो..
सुरज : "अस घाबरायला काय झालं?? केलेलास का फोन?"
विराज होकारार्थी मान हलवत हो म्हणुन बोलतो..
सुरज : "कुठे आहे तो?? म्हणजे काही बोलला का ह्याबद्दल..?"
विराज : "अ हो.. बेंगलोरला आहे तो..."
"नक्की??", एक राग भरी नजर तो विराजवर फिरवतच त्याला विचारतो
"अ..हो.. का??",विराज थोडं अडखळतच त्याला विचारतो
स"नाही काही नाही.. तु जा...",सुरजला माहीत असत विराज खोटं बोलतोय.. कारण त्याने स्वतः त्यांचं बोलणं ऐकलेलं असत.. पण आपल्या मुलाला शौर्यमुळे आणखीन दुखवायच नसत.. म्हणुन तो जास्त काही बोलत नाही.
"मला एक काम आहे.. मी येतो..",एवढं बोलुन विराज तिथुन निघाला आणि सरळ अनिताच्या रूम मध्ये शिरला..
विराज : "मम्मा तु बिजी आहेस का??"
अनिता : "नाही ये ना.. बस.."
विराज : "मम्मा तुला एक सांगायचं होत आय मिन विचारायचं होत.."
अनिता : "काय??"
विराज : "शौर्य मुंबईत आलाय का?? प्लिज खर सांग.."
अनिता लॅपटॉप बाजुला ठेवून विराजडे बघते..
अनिता : "अस का बोलतोयस..? तो तर एका लग्नाला गेलाय आणि तुला आता खरच सांगु तर सुरज मुंबईत आहे तो पर्यंत मी त्याला इथे आणू नाही शकत.."
विराज : "मग डॅड अस का बोलत होता फोनवर??"
अनिता : "काय बोलला??"
"नाहीss काही नाही..", एवढं बोलुन विराज तिथुन जाऊ लागला..
अनिताला ही कळत नव्हतं नेमकं विराजला काय बोलायचं होत ते..
★★★★★
शौर्यने समीराच्या दादाला सांगितल्या प्रमाणे एकदम सुंदर अशी घराची सजावट केलेली ते ही अगदी कमी वेळात.. रात्रीच जेवन आटोपुन शौर्य बाहेर विचार करत बसलेला. त्याला अस एकट्यात बसलेलं बघुन वृषभ त्याच्या बाजुला जाऊन बसतो..
वृषभ : "काय झालं?? असं एकटा का बसलायस??"
"काही नाही रे सहज..", शौर्य तोंड फिरवतच बोलतो..
वृषभ : "नक्की??"
शौर्य : "हम्मम"
वृषभ : "नाही सांगायचं मग राहु दे.."
शौर्य : "थोडा वेगळाच विचार करत होतोरे. पैस्यांबद्दल.."
वृषभ : "तु आणि पैस्यांबद्दल विचार..??"
शौर्य : "तस नाही रे.. पैसा खुप वाईट असतो अस मला वाटत.. ह्या पैस्यांमुळे मला माझ्या हक्काच्या घरी जाता येत नाहीय.. कोणाचीच आई आपल्या मुलाला कधी खोट बोलायला शिकवते का?? नाही ना.. पण माझी मम्मा मला बोलते की मी चेन्नईला आहे सांग.. का तर ह्या पैस्यांसाठी माझा जीव जाईल ह्याची भीती वाटते तिला.. माझ्या भावाला ही मी खोटं बोलतोय. त्यालाही भेटता येत नाहीय.. ब्रुनो ज्याला न बघता माझा दिवसच सुरू नाही झाला त्याला सुद्धा मला भेटता नाही येत आहे.. एवढ्या लांब येऊन साधं मी त्याला बघु पण नाही शकत यार.."
वृषभ : "तुला भेटायचंय का ब्रूनोला??"
शौर्य : "जी गोष्ट शक्य नाही तर त्याची अपेक्षा का ठेवावी.."
वृषभ : "तुझा ब्रुनो घराबाहेर पडतो का रे.."
शौर्य : "हो रोज सकाळी.."
वृषभ : "मग उद्या तैयार रहा.. ब्रूनोला भेटायला.."
शौर्य : "मी आत्ता अजुन रिस्क नाही घेणार.. एक तर इथे आलोय ह्याचा संशय आलाय माझ्या घरच्यांना आणि तु मला घराबाहेर चल बोलतोस.."
वृषभ : "मी असताना टेन्शन नको घेऊस हा अजिबात.. आता बिनदास्त झोप आणि तैयार हो उद्या ब्रूनोला भेटायला.. "
दोघांना अस बाहेर बसलेलं बघुन बाकीची मंडळीसुद्धा त्यांचं जेवण आटोपुन बाहेर येतात..
शौर्य : "गाईज इथून चौपटी जवळच आहे आपण जाऊयात??"
समीरा : "एवढ्या रात्री..?? वाजले बघ किती.??"
टॉनी : "मी तैयार आहे.."
वृषभ : "ए मी पण.."
समीरा : "तुम्ही जावा मी नाही येणार.. "
वृषभ : "समीरा.. प्लिज ना.."
समीरा : "गाईज हे माझं घर आहे.. मी घरी काय सांगु?? एवढ्या रात्री नाही सोडणार.."
मनवी : "आम्ही घेतो परमिशन.. आपण लगेच येऊयात घरी मग तर चालेल.."
समीरा : "मी आलेच.. दादाला विचारून बघते.."
समीरा आत जाऊन दादाला विचारून येते. दादा आधी नाही बोलतो पण समीराला तिच्या दादाला मनवायला अगदी सहज जमायचं.. मोजुन दोन मिनिटं लागली असतील तिला तिच्या दादाला मनवायला..
समीराला हसत घराबाहेरर पडताना बघुन सगळेच खुश होतात आणि चौपाटीला जायला निघतात..
शौर्य देखील मनातुन खूप खुश असतो.. त्याने तिच्यासाठीच हे सगळं प्लॅन केलं असत.. काही तर स्पेसिअल अस..
(काय स्पेसिअल प्लॅन असेल शौर्यचा?? त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला तेही कळवा)
क्रमशः
©भावना विनेश भुतल