लग्नानंतर च आयुष्य..... - 6 shraddha gavankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नानंतर च आयुष्य..... - 6

नमस्कार मंडळी कसे आहात सर्व जण मजेत ना. असेच मजेत राहा स्वतःकडे लक्ष द्या कारण आत्ता सर्वाना माहित आहे बाहेर कस वातावरण झालं तर त्याच मुळे काळजी घ्या आणि घरातच राहा. बरेच दिवस झाले मी लिहत नव्हते कारण थोडं घर कामात व्यस्त होते मला बऱ्याच लोकांनी मॅसेज पण केलेत नवीन भाग कधी टाकणार कारण सर्वाना माझ्या कथा खुप आवडतात मी सर्वांचं मना पासून आभार मानते तुम्ही एवढं मला सहकार्य करता. त्याच साठी मी ठरवलं आज वेळ काढून नवीन भाग लिहायचं आणि सर्वाना आत्ता जास्त वाट न बघायला लावता मी आज घेऊन आले तुमच्या साठी नवीन भाग वाचा कसा वाटलं तर मला नक्की कळवा........भाग ६



आत्ता ताईच लग्न पण झालं सर्व आपल्या आपल्या घरी निघाले माझ्या सासर कडचे लोक पण निघाले. जाते वेळेस मी सर्वांचं दर्शन घेतलं त्याच बरोबर माझ्या मिस्टरांनी पण सर्वांचं दर्शन घेतलं आणि ते सर्व जण निघाले. ताईला पण वाटी लावलं आत्ता वऱ्हाड गावाकडे निघालं आणि फक्त आमची भावकी लग्न मंडपात होती. तसेच त्या मधले एक एक कमी होत होत सर्व सामान आवरून सर्व जण घरी परतले पाहुणे मंडळी अजून होते बाकी दुसऱ्या दिवशी जाणार होते. त्याच मुळे घरात खुप गर्दी होती आणि सर्वांच्या गप्पा सुरु होत्या. मी पण ऐकत होते सर्व तेवढ्यात माझा फोन वाजला छोटीशी बेल होती. मॅसेज आल्या नंतर वाजते ना अगदी तशीच मी बघितलं माझ्या मिस्टरांच्या मॅसेज होता. मॅसेज पूर्ण न बघता चेहर्या वर स्मित हास्य आलं मी उठले आणि बाहेर च्या दिशेने निघाले कारण घरात सर्व जण होते त्यांच्या समोर असं हसत बसले असते तर चांगलं नाही वाटत ना मी बाहेर गेले आणि बाहेर गाद्या होत्या तर तिथे जाऊन बसले तिथे पण एकांत नव्हता कारण वडील काका आणि बाकी सर्व भाऊ सामानाची भराभर करत होते. मी मॅसेज ओपन केला आणि बघितलं माझ्या चेहर्या वरचा आनंद कमी होत नव्हता कारण मुलींचं कस असते ना थोडं जरी कोणी कॊतुक केलं ना त्या खुप खुश होतात तसंच माझं पण झालं होत. मी मॅसेज बघितला आणि त्यात लिहलं होत.

""आज खुप भारी दिसत होती तू नेसलेली साडी तुला खुप खुलून दिसत होती तुझा तो साधा मेकअप अगदी मला घायाळ केलं लग्नात कमी आणि तुझ्या वर जास्त लक्ष होत माझं "
खुप वेळेस वाचला मी ते मॅसेज आणि नंतर थँक्स म्हणून मॅसेज पाठवला. लगेच समोरून रिप्लाय आला फक्त थँक्स बरं मॅडम थँक्स तर थँक्स. आत्ता काय म्हणायचं मला कळत नव्हतं तरी सुद्धा काही तरी बोलायचं म्हणून मी त्यांना विचारलं पोहचले का सर्व जण तुम्ही

समोरून उत्तर आलं नाही अजून वेळ आहे मला तर खुप कंटाळा येतो आत्ता प्रवास करायचं पण काय करणार तिथे तुझ्या घरी कास थांबणार


"काय हरकत आहे आजचा दिवस थांबायचं असत असं मी बोलले "


"नको बाबा कश्याला उगाच आणि असं पण मी या घरचा जावई झालो आणि सासर वाडीत राहायला चांगलं नाही वाटतं असं ते म्हणाले बरं असो चल आपण नंतर बोलू कारण आत्ता चार्जिंग खतम झाली बाय!

"मी पण बाय केलं आणि आराम करायला गेले. कारण दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस होत.


"दिवस आत्ता अशेच जात होते बघता बघता ३ महिने झाले आणि आत्ता मुलाकडचे पण खुप घाई करायला लागले कारण कोरोना खुप वाढला होता सर्वाना भीती वाटायला लागली होती दुनिया खतम होते की काय!

त्याच मुळे मुला कडच्यांनी खुप घाई केली लग्नाला हो नाही हो नाही म्हणत लग्न करायचं ठरवलं अगदी जवळची तारीख ठरवली काहीच तयारी नाही सर्व बंद जिकडे तिकडे आम्ही मुली कडचे म्हणाल तर सर्वाना माहित आहे मुलीच्या आई वडिलांना किती काही करावं लागते. मुलीला तिचा पुर्ण संसार द्यावं लागतो तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्या साठी पण बंद असल्या मुळे आम्ही तस काहीच केलं नाही लग्न तस लवकर करायचं नव्हतं. मी सांगितलं होत दिवाळी ला करू पण घरातले मोठे ऐकत नव्हते. माझे वडील त्यांना सांगत होते आत्ता सर्व बंद आहे अंधांन काही देऊ शकत नाही जर तुम्हाला आत्ता पाहिजे तर आपण लग्न लांबणीवर घालु पण मुला कडचे असे बोलत होते जस त्यांना काहीच नको आणि नंतर सर्वांचे गुण दिसायला लागले. जसं जसं लग्न जवळ येत होत तस तस त्यांच्या मांगण्या वाढल्या मुलाची आई आणि भाऊ भावजय यांना खुपच घाई होती. पण मुलगा म्हणाला मला हे काहीच नको आणि मुलाच्या बोलण्या वर माझ्या वडिलांनी विश्वास ठेवला आणि तयार झाले घरात तयारी सुरु झाली. लग्नाची तारीख ३० जुन काढली. द्यन्यवाद.......