शेवटचा क्षण - भाग 25 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

शेवटचा क्षण - भाग 25



गार्गीच्या मित्रांच्या ग्रुप मधल्या 2-3 मुलामुलींचे पण लग्न झालेत.. पण गार्गीने मात्र त्यांच्या लग्नाला जायचं टाळलं होतं.. कदाचित तिला भीती होती की लग्नात प्रतिकचा सामना झाला आणि मी पुन्हा विचलित झाली तर गौरव पुन्हा गैरसमज करून घेईल.. किंवा उगाच शंका घेईल म्हणून ... आता पुढचं लग्न अमितच होतं..

आज सकाळी सकाळीच अमितचा गार्गीला फोन आला..

गार्गी - हॅलो, गुड मॉर्निंग अम्या.. आज सकाळी सकाळी फोन??

अमित - हो मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे, बोल देशील??

तो उगाच सिरीयस होऊन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता .

गार्गी - काय झालं अमित?? सगळं ठीक आहे ना?? तुला माझ्याकडून कसलं प्रॉमिस पाहिजे आहे??

अमित - तू आधी प्रॉमिस कर मग सांगतो...

गार्गी - अरे पण आधी सांग तर मग प्रॉमिस करायचं का नाही ते मी ठरवते..

अमित - नाही तस नाही, आधी प्रॉमिस कर.. आणि वेळ नको लावू ग लवकर कर..

गार्गी - बरं ठीक आहे केलं प्रॉमिस.. आता सांग काय झालं??

अमित - माझ्या लग्नाची तारीख निघालीय, आणि तुला यायचं आहे.. तू विवेक, प्रिया आणि निकीच्या लग्नाला चाट मारलीस माझ्या लग्नाला चाट नाही मारायची आणि हो तू प्रॉमिस केलय आता..

गार्गी - किती वेडा आहे तू अमित, काय माहीत तुझी बायको कशी झेलणार आहे तुला... एवढ्याश्या गोष्टीसाठी प्रॉमिस वगैरे.. मी किती घाबरले होते माहीत आहे.. ठीक आहे कधी आहे लग्न?? आणि हो मला रीतसर पत्रिका पाहिजे तरच येईल मी..

अमित - हो हो.. आपला फोन झाला की तू तुझा संपुर्ण पत्ता पाठव, तुला पत्रिका मिळून जाईल.. आणि हो तुम्ही दोघांनी पण यायचं आहे.. एकटीच नको येऊस.. जिजूंना पण आपल्यात मिसळण्याची संधी मिळू दे..

गार्गी - चालेल सांगते मी तुझा msg त्यांना..पण कधी आहे लग्न..

अमित - एक महिन्यानी.. बाकीच पत्रिकेत बघून घेशील.. आधीच कळवलं कारण तुला बुकिंग करावं लागेल ना म्हणून.. आता रेसर्वशन फुल झालं होतं असा बहाणा तुला नाही देता येणार.. मी मोबाईलवर पण व्हॅटस अँप करतो तुला पत्रिका..

गार्गी - हो हो ठीक आहे..

अमित - बाकी सगळं कसं सुरू आहे?? आणि आमचे जीजू कसे आहेत?? तू त्यांना जास्त त्रास तर देत नाही ना..

गार्गी - बस मस्त मजेत आहे.. आणि तुझे जीजू पण छान आहेत.. त्रास मी नाही ते देतात मला..

अमित - ऐ चल.. मला माहिती आहे कोण कसं आहे ते.. उगाच त्यांना बदनाम नको करू.. मी तरी विश्वास नाही ठेवणार या गोष्टीवर.. बरं चल नंतर बोलू मला फोन येतोय एक..

गार्गी - हा हा.. नक्की वहिणीचाच असेल म्हणून तर एवढ्या लगबगीने फोन ठेवतोय.. आता आमच्याशी कशाला बोलशील तू म्हणा.. ठीक आहे चालू दे तुझं.. ठेव.. बाय..

गार्गी त्याची उडवत बोलली..

अमित - बाय.. मी तुला नंतर बघतो.. पण आता बाय..

त्याच्या बोलण्यावर आणि फजितीवर गार्गी मोठमोठ्याने हसत होती.. तीच सगळं बोलणं गौरव नी ऐकलं होतं.. अमितचा फोन आल्यावर गार्गीला पुन्हा प्रतिकची आठवण येऊन ती चलबिचल होऊ शकते.. तिला ती येऊच नये म्हणजे ती सैरभैर होणारच नाही म्हणून काय करायचं हाच विचार तो तिचा फोन संपेपर्यंत करत होता... तिने फोन ठेवला आणि त्याने तिला मागून जाऊन हळूच मिठी मारली, तिचे दोन्ही हात त्याच्या हातानी पकडून घेतलेत आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत तो बोलला..

गौरव - अच्छा म्हणजे मी त्रास देतो का तुला??

अगदी अनपेक्षित त्याच्या स्पर्शाने ती जरा बावरली पण लगेच शांत होत बोलली..

गार्गी - मग काय !!. आता तुम्हाला ऑफिसला जायचंय आणि मला तुमचा डबा पॅक करायचा आहे तर तुम्ही हे असे माझे हात बांधून ठेवलेत..

गौरवने तिचे हात तेवढे मोकळं केले आणि कमरेला घट्ट पकडलं..

गौरव - घे हात मोकळे केले.. कर तू तुझं काम मी माझं करतो..

अस म्हणत तो तिच्या खांद्यावर, कानाच्या मागे, मानेवर हळूहळू त्याच्या ओठांचा स्पर्श करू लागला.. त्याच्या स्पर्शाने आणि गरम श्वासाने ती शहारून गेली.. तरी उगाच लटका विरोध करत..

गार्गी - गौरव , नको ना रे , आवरायचं आहे मला खूप.. सोड ना प्लीज..

गौरव - तुझे हात मोकळे केले आहेत मी. तू तुझं आवर.. बाकी मी नाही सोडणार.. मी त्रास देतो ना..

गार्गी - अरे नाही देत तू त्रास.. सोड ना..

गौरव - उहूं.. मी सोडणार नाहीय.. तू बघ तुला काय करायचं ते.. माझ्यावर प्रेम करायचं आहे की आवरायचं आहे ते..

आता गार्गीलाही विरोध करता आला नाही.. आणि ती त्याच्याकडे वळली.. त्याच्या गळ्यात हात टाकून अगदी हळूच आवजात

गार्गी - आज ऑफिसला उशिर झाला तर चालणार आहे का??

गौरव - उशीर कशाला ? आज सुटीच घेतो ना.. एवढा सुंदर दिवस उजाडला आहे.. त्यात ऑफिस नको वाटतं..

गार्गी - हम्म.. आज मूड बराच वेगळा दिसतोय हा..

गौरव - हो , तुला आठवतो आईचा आशीर्वाद?? त्याच्यावर अंमल करायला हवं ना आता. म्हणून तसा विचार करतोय जरा.. काय मग तुझा काय विचार आहे??

तो तिला त्याच्या हातांच्या बोटांनी छेडतच बोलत होता.. त्याच्या अश्या बोलण्यावर ती एकदम लाजली.. दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा लपवून पटकन वळून त्याचाकडे पाठ करून उभी राहिली...

गार्गी - तुझं आपलं काहीतरीच असतं..

तिची अवस्था बघून तो आणखी तिला चिढवतच बोलला..

गौरव - अरे , यात काय काहीतरी.. 8 - 8 करायचे आहेत तर आता सुरुवात नको करायला का??

गार्गी - नको ना त्रास देऊ..

तिला स्वतःकडे वळवत तिच्या खांद्यावर हात ठेवून एक हाताने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर करत..

गौरव - काय म्हणते?? घेऊ का मग आज सुटी??

त्याच्या शर्टची कलर नीट करत..

गार्गी - एवढी सगळी तयारी केलीय ना आता .. आज नको, राहू दे.. सुटीच्या दिवशी किंवा मग संध्याकाळी जर लवकर यायला जमलं तर बघ...

गौरव - ओहह, म्हणजे आता हाकलून लावतेय मला आणि संध्याकाळी का मग हे सगळं??

एक सुस्कारा सोडत आणि तिच्या पासून थोडं लांब होऊन आपलं आवरत तो बोलत होता..

गौरव - ठीक आहे, जशी तुझी इच्छा.. संध्याकाळी येतो लवकरच.. तू तयार राहा हं.. तेव्हा मी आज काही नाही ऐकणार..

गार्गी त्याचा डबा त्याच्या हातात देत बोलली..

गार्गी - हो ठीक आहे.. हा डबा..

बॅग डबा सगळं घेऊन गौरव तयार झाला.. आणि गार्गीजवळ येत नेहमीप्रमाणे तिच्या माथ्यावर हलकेच ओठ टेकवून..

गौरव - गार्गी, तू ठीक आहेस ना??

गार्गी - हो , अगदी मस्त आहे मला काय झालं??

गौरव - नाही ते अमितचा फोन आला होता ना म्हणून..

गार्गी - डोन्ट वरी.. गौरव मी एकदम ठीक आहे..

गौरव - ठीक चल येतो संध्याकाळी लवकर.. तस तर जायचीेच इच्छा नाहीय पण तू म्हणते तर...

गार्गी - गौरव , निघ आता , तुला उशीर नाही होत आहे का?? बाय बाय..

तिने त्याला ढकलतच बाहेर काढलं.. आणि तोही मग निघून गेला..

गौरवच्या आजच वागणं आणि तिच्याही नकळत त्याचं तिची काळजी करण तिला खूप आवडलं होतं..

---------------------------------------------------------

आज अमितच लग्न होतं.. लग्नात प्रतिकही असणारच .. त्याला बघून गार्गी पुन्हा डिस्टर्ब तर नाही ना होणार त्यांच्या भूतकाळातल्या आठवणी आज पुन्हा तिच्यावर हावी तर नाही ना होणार.. म्हणून गौरवला खूप टेन्शन आलं होतं.. त्यावेळी त्याला प्रतीकच बोलणं आठवलं.. "आम्हाला एकमेकांच्या समोरासमोर येणं टाळता येणार नाही.. पण त्यावेळी आम्ही फक्त मित्र असू.. " बघू काय होतंय असा विचार करून त्याने सोडुन दिलं.. आणि गार्गीसोबत आनंदाने लग्नात गेला, सोबत गार्गीचे आईबाबाही होतेच.. तिथे सगळे मित्रमंडळी जमले होते.. छान डान्स आणि dj वगैरे arrange केलेलं होतं.. लग्न रात्रीच होतं.. सगळे जमले आणि dj च्या तालावर सगळ्यांनी फेर घेऊन ताल धरला, मनसोक्त नाचले आज सगळे.. आतापर्यंत गार्गी कदाचित माझ्यामुळे येत नसावी याची प्रतीकला पुसटशी कल्पना होती पण आज ती आलेली बघून तो ही खूप खुश होता.. यांचा डान्स बघून गौरव गर्दीतच टाळ्या वाजवत होता.. गार्गी तर मित्रा मैत्रिणींमध्ये त्याला विसरूनच गेली.. नंतर विवेकने विचारलं तिला..

विवेक - गार्गी!! जीजू कुठे आहेत?? त्यांना ही घेऊन ये आपल्यात..

गार्गीने इकडे तिकडे बघितलं.. तिला लगेच गौरव तिच्या वडिलांजवळ उभा दिसला .. ती हातवारे करूनच त्याला बोलावत होती.. पण तो नको नको म्हणत होता.. प्रतिकची ते बघितलं आणि तोच गौरवजवळ जाऊन त्याला ओढतच घेऊन आला.. गौरव आल्यामुळे आणखी सगळ्यांनी भरपूर डान्स केला.. गौरवनेही सगळ्यांमध्ये मज्जा केली..

लग्नाच्या विधी सुरू झाल्यात.. त्या बघताना गार्गीला तिच्या लग्नाच्या विधींची आठवण झाली.. आज गौरवच पूर्ण लक्ष गार्गीवरच होतं.. पण तिचा हसरा चेहरा बघून त्याला हायसं वाटत होतं..

'गार्गी आपली नाही' हे माहीत असताना सुद्धा तिच्याकडे बघण्याचा मोह प्रतीकला आवरता येत नव्हता.. आजही तो तिला लपून बघत होता.. तिला आनंदी बघून खुश होत होता.. आणि आजही त्याला अस लपून बघताना गार्गीने बघितलं होतं..

प्रतीक आणि गार्गीच्या त्यादिवशीच्या चॅट नंतर आज ते दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.. त्याला बघून तिला त्यादिवशीच त्यांचं संभाषण अगदी जसच्या तसे आठवलं त्यामुळे तिच्या मनाचा तळ आज पुन्हा ढवळून निघाला होता.. पण आज काहीही झालं, मनात वादळी उधाण जरी आलं तरी चेऱ्यावर मात्र काहीच दिसु द्यायचं नाही, असं गार्गीने ठरवलंच होतं.. आणि तिच्या भावनांना तिने खूप शिताफीने अगदी कुणाच्याच लक्षात येणार नाही असं त्या हसऱ्या चेहर्या मागे लपवलं होतं.. त्यामुळे गौरवला सारख हेच वाटत राहिलं की आज प्रतिकला भेटून पण तिला काहीच फरक पडला नाही.. पण तिचे डोळे प्रतिकने बरोबर वाचले होते.. त्याच्या लक्षात आलं होतं गार्गी पुन्हा चलबिचल झाली आहे.. पण गौरवच्या सोबत राहिली की थोडावेळणी होईल नॉर्मल हे ही त्याला माहिती होतं..

विधी आटोपलेत आणि पुन्हा अगदी गीतच्या लग्नात बसले होते तसेच आजही हे सगळे जेवायला बसले.. पल्लवी, प्रिया, प्राची, मेघा( विवेकची बायको) आणि गार्गीने थाळ्या घेतल्यात आणि सगळे सोबतच जेवायला बसले.. गौरवला याची सवय नव्हती त्याला हे अस एकत्र जेवणं नवीनच होतं आणि सगळ्यांमध्ये तो इतका रुळलेला ही नव्हता त्यामुळे प्रतिकनेच थोडा त्याचा विचार करून त्याच्याकरिता एक वेगळी थाळी वाढून आणली.. आणि पुण्याला गौरव त्याला भेटून बोलल्यापासून प्रतिकच्या मनात गौरव बद्दल खूप सन्मान वाढला होता.. गौरवने त्याच्या बायकोचा म्हणजेच प्रतिकच्या गार्गीचा इतका out of the scope जाऊन विचार केला आणि तिला समजून घेतलं.. आज गौरव मुळे ती अगदी आनंदात आहे म्हणून ही असेल कदाचित तो गौरवच्या सोबत सोबत राहत होता आणि त्याच्या कंफर्टसाठी प्रयत्नशील होता..


प्रतीकच्या हातात थाळी बघून संदेश बोलला..

संदेश - काय झालं प्रतीक? आज चक्क तू थाळी वाढून घेतलीस?? तब्येत ठीक हे ना तुझी??

प्रतीक - अरे माझ्यासाठी नाही, गौरव साठी आणलीय..त्याला सवय नसेल ना अस एकत्र जेवायची त्याला awkward वाटेल आणि उपाशीच राहील बिचारा म्हणून आणली..

तेवढ्यात विवेकही तिथे आला त्याने ऐकलं त्यांचं बोलणं..

विवेक - अच्छा.. अरे मग गार्गी घेईल ना ही काळजी.. तू कशाला बसला करत..

प्रतीक - कमाल आहे विवेक तुझी.. जीजू जीजू करत त्याच्या मागे फिरत बसतो पण साळ्याचं एक कर्तव्य तू पार नाही पाडत.. अरे गार्गी तुमच्यासाठी थाळी घेईल का त्याच्यासाठी?? दोन दोन कसं घेणार आहे ती?? आणि परत परत रांगेत लागायचं म्हंटल तर रांग बघ किती मोठी आहे , तीच जेवायचं सोडून बिचारीला थाळ्याचं वाढता जाईल.. आणि काय रे पाहुणा आहे ना तो आपल्यात मग पाहुण्यांचे आदर सत्कार करण्याचे manners विसरला का तुम्ही??

प्रतिकने एक श्वासातच त्यांना एवढं सुनावलं की ते दोघही फक्त मोठे मोठे डोळे करून बघतच राहिले..

प्रतीक थाळी घेऊन पुढे गेला आणि मागे वळून दोघांनाही या जेवायला म्हणून हाक मारली.. तसे दोघेही जेवणाच्या टेबल वर पोचलेत..

प्रतीक - काय गार्गी?? नवऱ्याला विसरली वाटतं तू??

अस म्हणत त्याने गौरव समोर ताट ठेवलं..

गार्गी - का ?? काय झालं??

प्रतीक - स्वतःची थाळी वाढून घेतली आणि बसली येऊन त्याने घेतली का नाही हे कोण बघणार??

गार्गी - अस होय?? तुम्ही सगळे कशासाठी आहेत मग?? आजही मीच काळजी करू का?? मग तुम्ही लोक कधी खातीरदारी करणार आहात त्याची?? म्हणून मी फक्त तुम्हाला एक संधी देत होते..

विवेक - हो आणि आमच्या प्रतिकनी संधीच सोन केलं बरं का गार्गी??

गार्गी - आमच्या प्रतिकनी म्हणजे ?? तो माझा नाही का??

तिच्या अशा बोलण्यावर गौरव आणि प्रतिकने चमकून तिच्याकडे बघितलं.. पण तिच्या चेहऱ्यावर अगदी निरंगस्टचे भाव होते.. बोकण्याच्या ओघात ती बोलून गेली तिचा तसा काहीच उद्देश नव्हता.. हे दोघानाही कळलं, दोघांनीही एकाचवेळी एकमेकांकडे बघितलं आणि फक्त एक अमित हास्य केलं..

संदेश - नाही हा.. आता आमच्यात कुणीच तुझे नाही.. तुझे फक्त जीजू..

गार्गी - अच्छा.. ठीक आहे मग.. गीत आणि प्रिया साठी पण हेच लागू होईल ना??

सोनू - येस..

गार्गी - ठीक आहे मग आमच्या थाळीत कुणी जेवायचं नाही जा उठा सगळे आपल्या थाळ्या वाढून आणा.. प्रिया, गीत बरं झालं तुमचे नवरे नाही इथे नाहीतर यांनी तुम्हाला पण नसतं सोडलं..

गीत - नाहीं तस काही नाही आमचे या आधीच्या लग्नात होते ना, तेव्हा यांनी काय कमी नाही छळलं आम्हाला.. तू पहिल्यांदा आली आहे ना म्हणून तुझ्यावर डाव आहे त्यांचा.. पण बाकी मस्त उलटवला हा डाव तू.. जा रे आणा तुमच्या थाळ्या..

प्रतीक - ऐ, गीत अस काय करते.. मी नाही हा जाणार मी आणली बघ गौरवसाठी थाळी वाढून.. या बाकीच्यांना पाठव..

संदेश - प्रतीक लेका तू आज आपली पार्टी सोडून दुसरीकडूनच बोलतोय.. पुण्याचा असर झाला का रे??

प्रिया - तो बरोबर आहे.. पुण्याचा असर झाला असेल तर चांगलाच झाला निदान तो सुधारला तरी..

सोनू - म्हणजे तुला काय म्हणायचं आम्ही बिघडलेलो आहे..

प्राची - चोराच्या मनात चांदणं..

विवेक - ऐ तू चूप ग.. चल रे आज आपण आपली थाळी आणू.. नुसती थाळी काय वाढून आणली किती ऐकवायला लागल्या या..

ते तावातावाने पलटले थाळी आणायला जाणार पण तीथे मोठी रांग बघितली आणि आले परत..

पल्लवी - का रे काय झालं?? कुणी तुम्हाला थाळी पण नाही घेऊ दिली का??

विवेक - तस काही नाही आम्ही विचार केला कशाला उगाच थाळ्यांचा खर्च वाढवायचा म्हणून आलो परत..

संदेश - हो आणि आपली प्रथा आहे ना ही.. एकत्र जेवायची ती कशाला मोडायची ??

सोनू - हो म्हणून आम्हीच समजदारपणा दाखवत माघार घेतली आणि आलो परत..

गार्गी - हा हा मोठे आले समजदार.. बहाणे बंद करा आणि या जेवायला आता..

पुढे सगळे फक्त हसत होते आणि जेवणावर तुटून पडले.. यांच्या भांडणात गौरवला फार मजा येत होती... तो मनातच विचार करत होता.. खरच प्रतीक बोलला होता तस लहानपणापासूनचा किती मस्त ग्रुप आहे यांचा.. इतक्या वर्षांनी भेटून पण किती सहजता आहे अजूनही..

लग्न आटोपलं.. आणि सगळ्यांनी आपापली घरं गाठली.. माहेरी असल्यामुळे गार्गी आज आईजवळच झोपणार होती.. गौरवही गार्गी खुश आहे तीला काहीच फरक पडला नाही आज हे बघून खुष होता..

आईला लगेच झोप लागली.. पण गार्गी मात्र लग्नाच्या आठवणींमध्ये रमली.. प्रतीक आज गौरवसोबत जस वागला याच तिला खूप नवलच वाटत होतं.. आणि त्याच्या अशा वागण्याचा तिला आनंदही झाला होता.. प्रतीकच्या ठिकाणी दुसरं कुणी असतं तर त्याच्या प्रेयसीचा नवरा म्हणून त्याची जळफळाट झाली असती पण प्रतिकच्या वागण्यातून गौरव साठी जो आदर दिसत होता त्याने ती सुखावली होती.. बाकी आज दिवसभर तिच्या लाटांसारख्या उसळणाऱ्या भावनांना मात्र तिने खूप बखुबीने तोडमरोड करून मनाच्या कोपऱ्यात डांबून ठेवलं होतं.. चेहऱ्यावर एकदाही तिने त्या भावनांची झळ उमटू दिली नाही.. आधी ही कला प्रतिकला चांगली अवगत होती पण आता गार्गीसुद्धा त्याच कलेला जोपासत होती..

----------–---------------------------------–--------------


क्रमशः