पुढे गौरव आणि गार्गी आनंदाने सोबत राहू लागले.. सोबतच आता गौरवचे आई वडीलही इकडेच कायमचे राहायला आले होते.. त्यामुळे घरात दोघांच्या अगदी बिनधास्त आणि बेधडक वावरण्यावर थोडासा प्रतिबंध लागला.. पण गार्गीचा दिवसभरचा घरात जाणवणारा एकटेपणा दूर झाला.. गार्गी त्यांच्या सोबत आदराने वागायची.. मुळातच बोलका स्वभाव असल्यामुळे गार्गी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करायची.. त्यामुळे त्यांनाही बोर होत नसे आणि गार्गीलाही करमायचं..
तसही आता गार्गीने आपल्या भावनांना कसं लपवायचं शिकून घेतलं होतं, त्यामुळे तीच्या मनाची अवस्था आता गौरवला कधीच कळत नव्हती.. तिला प्रतिकची अनेकदा आठवण यायची पण तस कधीच तिने गौरवला जाणवू दिलं नाही.. ती खुश आहे आणि कदाचित प्रतिकला विसरत आहे असाच समज घेऊन तो जगत होता.. पण गार्गीच्या मनातल्या मनात कुढत बसण्याचा परिणाम हा तिच्या शरीरावर आणि त्या दोघांच्या कुंटुब विस्तारावर होत होता..
लग्नाचे 3 वर्ष संपलेत आता सगळ्यांना त्यांच्याकडून नवीन जीवाची अपेक्षा लागली होती.. तशीच ती गार्गी आणि गौरवलाही लागली होती.. पण अथक प्रयत्न करूनही त्यांना मूल होत नव्हतं, दोघांचे सगळे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल होते तरी पण कसली अडचण त्यांच्या या मार्गात येत होती त्यांना ही कळत नव्हतं..
गार्गीच्या आणि गौरवच्या आई वडिलांनी तर किती तरी वेळा त्यांच्याकडे या बाबत विचारणा केली होती .. एवढंच नव्हे तर मित्रामंडळी सुद्धा गमती गमतीने हा प्रश्न विचारायचेच की "गुड न्युज कधी देते गार्गी??" गार्गी तर अक्षरशः वैतागली होती जो तो याच विषयावर बोलतो म्हणून .. या सगळ्यामुळे गार्गीच्या मनावर बरेच घात व्हायचेत.. आधी प्रतिकच्या आठवणीं आणि आता हे सगळं.. तीच नाजूक मन असं किती भावनांचा मारा सहन करू शकणार होतं.. त्यामुळे ते हळूहळू कमजोर होत चाललं होतं.. तिच्याही नकळत तीच अस ताण तणाव तिच्या हृदयावर वाईट असर करत होतं.. त्यात भरीस भर म्हणून की काय एकदा प्रतीकशी बोलताना तो ही या विषयावर बोलून गेला..
प्रतीक - हॅलो, काय सूरु आहे?
गार्गी - काही नाही बस मजेत आहे तू सांग.. तुझा अभ्यास कसा सुरू आहे??
प्रतीक - ठीक सुरू आहे.. आता पुढच्या महिन्यात परीक्षा आहे
गार्गी - अच्छा.. चांगला अभ्यास कर.. ऑल द बेस्ट.. बाकी काय म्हणतो?? कसं काय msg केला आज??
प्रतीक - सहजच केला.. गीतचा मुलगा आज 2 वर्षाचा झाला छान वाढिवस केला तिने .. मी फोटो पाहिले ..
गार्गी - हो मी पण बघितले छान केला वाढदिवस.. खरंच...
प्रतीक - प्रिया कडे पण गुड न्युज आहे म्हणे आता .. शेवटचा महिना सुरू आहे तिचा.. पुढच्या महिन्यात कळेलच आपल्याला आणखी एक गोड बातमी..
गार्गी - अरे वाह.. मस्तच.. मला नव्हतं माहिती.. तिनेही नाही सांगितलं काही.. उद्या बोलते तिच्याशी..
प्रतीक - हम्म..बोलशील.. बरं मी काय म्हणतो!!
गार्गी - हा बोल ना..
प्रतीक - तू कधी देणार आहेस गुड न्युज?? सगळे वाट बघत आहे तुझ्या बातमीची.. तुझ्या माघून प्रियाने पण दिली आता तूच राहिली आहे.. लवकरात लवकर दे तू पण..
गार्गी - असली की देईलच ना.. आता नाही तर कुठून देऊ..
गार्गी थोडं चिढुनच बोलली..
प्रतीक - ठीक आहे.. चिढतेय कशाला?? लवकर दे एवढंच बोललो ना..
गार्गी - हम्म.. काही बातमी असली तर सर्वात आधी तुलाच कळवेल .. ठीक आहे??. आमच्यापेक्षा तुलाच जास्त घाई आहे आमच्या बाळाची..
प्रतीक - हो मग आहे तर.. मी वाट बघतोय..
गार्गी - बघत बस तू वाट .. मला नाही बोलायचं.. बाय..
म्हणून गार्गी ऑफलाईन झाली सुद्धा..
खरतर प्रतिकला त्या दोघांच्या मधात बोलायचं नव्हतं पण गार्गी आपल्यामधून बाहेर पडून गौरवची झाली की नाही हे त्याला जाणून घ्यायचं होत म्हणून तो मुद्दाम तिला हे सगळं विचारत होता..
नंतर गार्गीने एक गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टरकडून उपचार घेण्याचं ठरविलं.. त्या डॉक्टरच्या औषधींचा परिणाम असेल म्हणून की काय उपचार दरम्यान अगदी चौथ्या महिन्यातच गार्गीला ती गरोदर असल्याचा आभास झाला.. खर तर या आधीही अस झालं होतं पण तपासले असता नेगटिव्ह यायचं.. यावेळीही काही असेल का नाही म्हणून तिच्या मनात हूर हूर चालू होती.. गौरवाने धीर देऊन तिला
गौरव - एकदा तपासून घे.. मनात कसलीच आशा ठेऊ नको.. म्हणजे त्रास होणार नाही..
तिने ठीक आहे म्हणून देवाच नाव घेतच टेस्ट केली आणि काहीच न बोलता गुपचूप बेडवर येऊन बसली.. सगळ्या भावनांना शिताफीने लपवणारी पण आई होण्याची भावना मात्र तिच्या डोळ्यात अश्रू बनून तरळली होती.. गौरवाने लगेच तिच्या पुढे उभं राहून काय झालं असं विचारलं असता तिने किट गौरव पुढे पकडली.. तो ती किट निरखून बघेल आणि काही बोलेल तोपर्यंत ती त्याच्या पोटाला बिलगून रडत होती. टेस्ट पोसीटीव्ह आल्याचा आनंद दोघांनाही झाला होता.. तिच्या पाठीवरून हात फिरवून तो तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.. थोडा भावनेचा सर ओसरला आणि ती बाजूला झाली.. तो तिच्या बाजूला बसला.. तिचे डोळे पुसलेत.. तिच्या कपाळावर ओठ टेकवलेत.. आणि तिला आपल्या मिठीत घेऊन अभिनंदन केलं.. दोघांच्या चेऱ्यावर आता आनंद पसरला होता.. स्वतःला या आनंदाच्या क्षणांमधून सावरत हीच बातमी त्यांनी होणाऱ्या आजी आजोबांनाही दिली..
गौरव आणि गार्गी त्याच दिवशी डॉक्टर कडे जाऊन कन्फर्म करून आले.. पण गर्भ लहान असल्याने sonography मध्ये तेवढं स्पष्ट झालं नाही आणि डॉक्टरांनी आणखी परत 8 दिवसांनी येऊन चेक करा अस सांगितलं.. त्यामुळे गार्गीच्या मनात आणखी भीती वाढली .. डॉक्टरांनी तिला समजावलं होत पण तिला मात्र काहीच कळत नव्हतं बहुतेक.. 8 दिवस तिने स्वतःला जपत जपत कसेतरी काढले आणि नंतर मात्र डॉक्टरांनी लगेच चेक करून ती गरोदर असल्याचं स्पष्ट सांगितलं आणि तीचा जीव भांड्यात पडला..
पुढे सुरू झाला तिचा गरोदरपणाचा प्रवास.. सगळे तिची खूप काळजी घेत असत.. सासूबाईंनी तर घरातली सगळी काम स्वतःवर घेतलीत.. तिला अजिबात कुठल्याच कामाला त्या हात लावू देत नसत.. तरीही कधीतरी उगाच तिची चिडचिड होत असे, तरीही त्या तिला समजूनच घेत होत्या.. गौरव तर तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे.. डॉक्टरांकडे जातानाही नेहमी तो तिच्या सोबतच असायचा.. तिच खाणं पिण , औषधी गोळ्या सगळीकडे तो लक्ष द्यायचा.. ऑफिसमधूनही फोन करून औषधींची आठवण करून देत असे.. जसजस बाळ पोटात वाढू लागलं तिचे पाठ कंबर खूप लागून येत असे.. म्हणून गौरव स्वतः थकलेला असताना सुद्धा तिला बरं वाटावं म्हणून तिला मसाज करून द्यायचा.. गौरव तिला नव्याने समजायला लागला होता.. तो तिच्या बाबतीत हळवा आहे हे तिला माहिती होत पण तो इतका caring आहे हे तिला नव्याने कळत होतं आणि ती अधिकाधिक त्याच्या प्रेमात पडत होती..
दिवसातून कितीदा ती तिच्या बाळाशी बोलायची.. बाळाला गौरवच कौतुक सांगायची.. कधीकधी गौरवही बाळाशी गप्पा मारत असे.. आणि गौरवच्या बोलण्यावर ते बाळ लगेच हालचाल करायचं.. यावरूनच बाळाचे पप्पा बाळाचे किती आवडते आहे हे कळलं होतं..
सासरच्यांनी मोठ्या हौशीने गार्गीच्या डोहाळे जेवणाचा मोठा कार्यक्रम केला.. तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि हास्य तर आज सरता सरत नव्हतं.. सगळ्यांनी तीच भरभरून कौतुक केलं.. बऱ्याच जणांनी तर तिच्या आवडीच्या वस्तू खास तिचे डोहाळे पुरवण्यासाठी बनवून आणल्या होत्या.. तिनेही त्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला..
बाळंतपण आईकडे करायचं अशी तिच्या आईची इच्छा असल्यामुळे त्यांनी तिला माहेरी आणलं.. तिची आईसुद्धा तिची काळजी घेत होती पण तरीही तिला गौरवच्या आठवणी खूप सतावत होती... रोज त्याच्याशी फोनवर बोलूनही जणू तीच मन भरत नसे.. तशीच परिस्थिती गौरवचीही होती.. तो तर गार्गीपेक्षाही आतुरतेने 9 महिने पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होता.. म्हणजे त्याला लवकरात लवकर गार्गीला भेटण्याचा बहाणा मिळेल..
अखेर तो दिवस आलाच डॉक्टरांनी तिला दवाखान्यात ऍडमिट व्हायला सांगितलं.. आणि तसच तिने गौरवला कळवलं.. गौरवही लगेच 8 दिवसाची सुटी टाकून तिच्याकडे त्याच रात्रीच्या गाडीने निघून आला.. ज्या दिवशी ती दवाखान्यात ऍडमिट झाली त्या दिवसापासून तो फक्त तिच्याच बरोबर होता.. दिवस भरले होते म्हणून डॉक्टरांनी ऍडमिट व्हायला सांगितलं पण तिला अजूनही कुठल्याच वेदना होत नव्हत्या.. थोडासं पोटात जाणवत होतं पण त्या तेवढ्या तीव्र नव्हत्या.. त्यामुळे एक दिवस आणि रात्र त्यांनी वाट बघितली.. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून गार्गी दवाखान्यातच काही व्यायाम करत होती.. तिला उत्साह मिळावा म्हणून गौरव ही तिच्या बरोबर ते सगळे व्यायाम करू लागला..गार्गीच्या आई वडील येत जात होते.. रात्री झोपायला गार्गीजवळ गार्गीची आई थांबणार होती म्हणून गौरवला घरी जायला सांगितलं पण त्याची गार्गीला सोडून जाण्याची इच्छा नव्हती.. आणि विशेष म्हणजे सोबत झोपायला एकच जास्तीचा पलंग होता मग गौरव कुठे झोपणार म्हणून गार्गीनेही त्याला घरी जाण्यास सांगितले.. आणि नाईलाजाने तो घरी परतला.. पण तरीही त्याच लक्ष लागत नव्हतं.. आणि पुन्हा त्याने सगळ्यांशी बोलून घरुन एक सतरंजी आणि चादर घेऊन गार्गीजवळच झोपायला आला.. तो आला तेव्हा डॉक्टरांनी नुकताच गार्गीला तपासलं आणि " गार्गीला दिवस भरून 5 दिवस आणखी वर झाले आहेत तरी तिची नॉर्मल डिलिव्हरी चे काहीच symptoms नाहीत तेव्हा तीच operation करावं लागेल अन्यथा बाळ जास्त मोठं झालं तर बाळाचा जीव गुदमरू शकतो " अस डॉक्टरांनी गार्गीच्या आईला सांगितलं.. त्यांच्याच मागे उभ्या असलेल्या गौरवनेेही ते ऐकलं.. आणि त्याच्या मनात एकदम भीती दाटून आली.. त्याला गार्गीचे शब्द आठवू लागले..
" गौरव मला काय वाटत माहिती आहे? मला कितीही त्रास झाला तरी चालेल पण माझं बाळ नॉर्मल रित्याच बाहेर पडावं, तस झालं तर ते बाळ सुदृढ असल्याचं ते प्रमाण असेल.."
" आता गार्गीला काय सांगावं?? तिच्या मनाची तयारी काशी करावी?? आणि नॉर्मल नाही होऊ शकणार म्हणजे आमचं बाळ तेवढं सुदृढ नाहीय का?? की गार्गीच काही प्रॉब्लेम आहे?? " एकाच वेळी अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात घर केलं.. आणि त्याचा पार चेहराच उतरून गेला..
गार्गीच्या आईने गार्गीला सगळं व्यवस्थित समजावून संगीतलं आणि गार्गीही ओपरेशनसाठी तयार झाली.. खरतर हे सगळं ऐकून ती खचलीच होती पण तसा कुठलाच भाव चेहऱ्यावर ना दाखवता तिनेच गौरवची समजून काढली..
गौरवचा पडलेला चेहरा बघून
गार्गी - अरे काय झालं?? ओपरेशन तर तेच सही.. आपलं बाळ सुरक्षित बाहेर येणं जास्त महत्वाचं नाही का??
गौरव - हो ग मला त्याबद्दल काही अडचण नाहीय पण तू खरच मनापासून तयार आहेस ना या सगळ्यासाठी म्हणजे तू म्हणत होती ना आपलं बाळ नॉर्मलच व्हावं , त्यासाठी तू किती व्यायाम आणि किती प्रयत्न केलेत पण आता हे अस सगळं अचानक तुझं मन तयार आहे ना??
गार्गी - हो रे गौरव.. ओल्या बाळाच्या सुखरूपतेपेक्षा मला आणखी काय हवंय.. मी अगडी तयार आहे.. मला काहीच अडचण नाहीय.. आणि तू ही काळजी करू नकोस..तुझ्या कडे बघून तर मला हिम्मत मिळते ना मग तूच अस उदास असला तर मी काय करू!!..
गौरव - हो पण तू आईला बोलली की उद्याच करून घेऊ आपण ऑपरेशन .. आई यास डॉक्टरांना पण सांगायला गेल्या आहेत.. पण इतक्या लवकर तू स्वतःला कशी तयार करशील??
गार्गी - अरे मी आता हा काहीच विचार करत नाहीय बस उद्या माझं बाळ आपल्या हाती येणार आहे ना मग यापेकह आणखी आनंद कुठला असेल.. आणि त्यासाठी तर मी काहीही करायला तयार आहे.. अगदीच आता सुदधा.. नको काळजी करू मी ठीक आहे आणि तू ही हा विचार कर ना की उद्या आपल्याला आपलं बाळ मिळणार आहे..
हा विचार करताच गौरवच्या चेहऱ्यावर हसू परतलं.. तेवढ्यात आई सुद्धा डॉक्टरांशी बोलून आली.. उद्या सकाळी 9:30 वाजता ओपरेशन करू असं डॉक्टरांनी सांगितलं..
गार्गीने गौरवला तर समजावलं, त्याला शांत केलं पण स्वतःला समजावणं तिला अवघड जात होतं.. गौरव आणि आई झोपले पण गार्गी मात्र उद्याच्या विचारात जागीच होती...
------------------------------------------------
क्रमशः