प्रतीक बसमध्ये बसला आणि त्याच विचारचक्र गाडीच्या चाकांसोबतच फिरू लागलं..
" काय करत होतो मी आज.. काय विचार करून गार्गीला भेटायला निघालो होतो.. कशीतरी सावरली असेल ती.. गौरवसोबत रमली असेल नि मी तिच्यापुढे येऊन आज पुन्हा तिला विचलित करणार होतो.. बरं झालं आधीच लक्षात आलं आणि लगेच परतलो.. स्वतःहून तिच्याशी दुरावा निर्माण केला, कधीच तिच्याशी नीट बोललो नाही, मनावर दगड ठेऊन तिला दुखावत राहिलो , कशासाठी?? तिने मला विसरून तिच्या संसारात मन रमवावं यासाठीच ना, आणि आज हे काय करणार होतो मी..
पण आता माझा साखरपुडा होणार आहे , गार्गीबद्दल मनात इतकं प्रेम आहे की ते विसरणं तर शक्य नाही पण पुढच्या आयुष्याला सुरुवात करण्याआधी एकदा तिला भेटावस वाटत होतं.. तिला न भेटल्याची सल राहील माझ्या मनात.. रोज तिच्या आठवणींच्या आधारे आजपर्यंत मी आनंदात जगत आलो पण आता त्या आठवणींनी बाजूला ठेऊन कुणाला तरी माझ्या मनात मला वेगळी जागा द्यायची आहे, माझ्या आयुष्याचा भागीदार बनवायचं आहे.. आणि ते सगळं करण्या आधी एकदा गार्गीला भेटायचंच आहे मला..
पण अस अचानक जर आज गेलो असतो तर, तिच्या घरी तिचे सासुसासरे पण असतात, त्यांनी काय विचार केला असता? उगाच गार्गी अडचणीत आली असती आणि तसही ते असताना मला तिच्याशी नीट बोलताही आलं नसतं.. गौरांगी अजून लहान आहे तीला बाहेर पण निघता येणार नाही मी कुठे भेटायला बोलावलं तर ती येऊ शकणार नाही.. आणि कदाचित ती अजूनही माझ्यावर प्रेम करत असेल तर काहीही आटापिटा करून येईलही पण त्यासाठी तिला घरच्यांशी खोटं बोलावं लागेल उगाच.. मला हे नकोय.. नको त्यापेक्षा नकोच भेटायला.. तिला विश्वास झालाच असेल की मला आता तिच्याबद्दल फारसं काही वाटत नाही मी फक्त मैत्रीण म्हणून तिच्याकडे बघतो.. आणि त्यामुळे तीही माझ्यातून बाहेर पडून तिच्या संसारात रमली असेल.. तेव्हाच तर त्यादिवशी मी साखरपुड्याच निमंत्रण पाठवल्यानंतर तिने मला फक्त अभिनंदन एवढंच पाठवलं.. नाहीतर काही तरी बोलली असती निदान मुलीची तरी थोडीफार चौकशी केली असती, मी तयार आहे का, खुश आहे असं तरी निदान विचारलं असतं. पण तिने अस काहीच विचारलं नाही म्हणजे तिला काहीच वाटत नसेल आता.. याचा तिला काहीच फरक पडला नसेल.. नक्की असंच असेल ना?की msg बघून तिला शॉक लागला आणि काय बोलावं सुचलं नसेल म्हणून फक्त अभिनंदन पाठवलं.. कस समजणार हे सगळं मला? गौरवशी बोलून बघू का?? तो सांगेल मला.. हो हो उद्या करेन त्याला एकदा फोन.. पण काय म्हणून फोन करू मी त्याला, गार्गी खुश आहे की नाही अस विचारू?? काय विचार करेल तो? नको नको.. हे तर त्याच्यावर शंका घेतल्या सारखं होईल , तो गार्गीला खुश ठेऊ शकतो की नाही मी याचा पडताळा करतोय अस वाटेल त्याला उगाच..
गार्गी तिच्या संसारात खुश असेल ना? कधीचं तिला बघितलं नाही.. आणि काहीही झालं तरी ती मला काहीच सांगणार नाही.. पण गौरव किती प्रेम करतो तिच्यावर नक्कीच खुश ठेवत असणार तो तिला.. मला खात्री आहे.. पण तिला बघितलं असत तर मनाला समाधान मिळालं असतं, आज एवढ्या लांब येऊनही तिला भेटलो नाही.. काहीतरी बहाणाच केला असता, ' इथे कामानिमित्त आलो होतो ' वगैरे.. पण तिला कळलंच असत मी खोटं बोलतोय ते.. कस काय माहिती नाही पण तिला लगेच कळतं मी काही खोट बोललो की, लगेच माझं पितळ उघडे पाडते ती ..
पण मला नवीन आयुष्याची सुरूवात करण्याआधी एकदा गार्गीला भेटायचंच आहे..माझ्या मनातल्या भावनांचा ओझं थोडं कमी होईल.. मी येणाऱ्या व्यक्तीला स्वीकारू शकेल.. खरंच जेव्हा गार्गीच लग्न होणार होतं, तेव्हा तिला यासगळ्यांमधून बाहेर पडताना किती कठीण गेलं असेल हे आज मला कळतंय.. मला तिला भेटायचं आहे असं आज मी म्हणतोय तस कदाचित तेव्हा तिलाही मला भेटायचं असेल ना.. पण मी नाही भेटलो.. खूप खूप दुःखावलं आहे मी गार्गीला.. तिच्या सुखासाठी तिचा आनंद हिरावून घेतला.. असंख्य यातना दिल्यात मी तिला.. जेव्हा भेटेल तेव्हा मी नक्कीच यासर्वांची तिला माफी मागेल. आणि ओह शीट मागे मी तिला तीच लग्न झाल्यानंतर माझ्या भावना सांगितल्या होत्या, तिने स्वतःला एक नव्या आयुष्याचा सुरुवातीला तयार केलं असेल आणि मी तिला हे सगळं बोलत बसलो, काय केलं मी हे किती त्रास झाला असेल तेव्हा तिला.. हो झालाच होता तेव्हाच तर गौरव मला भेटायला आला होता.. तेव्हा ही मी चुकलो, माझ्या मनावरचं ओझं कमी केलं पण ते सर्व ओझं मी तिला दिलं.. तेव्हा ती मला एकदा भेटशील का म्हणाली होती.. पण मी कधी भेटलोच नाही.. कदाचित तिला तेव्हा असच काही वाटत असेल जे आज मला वाटतेय..
तिच्या मनाचा ठाव घेण्यासाठी मला तिला भेटायलाच हवं.. ती काही नाही बोलली तरी तिचे डोळे मात्र खूप काही बोलतात माझ्याशी.. मी नक्कीच तिचे डोळे वाचून घेईल.. आणि मला गार्गीच्या मनात आता काय आहे ते कळेल.. असं करतो, लग्नाची पत्रिका देण्याच्या निमित्ताने जाईल मी तिच्या घरी .. पण ते तर साखरपुडा झाल्यावरच करता येईल.. ठीक हे तस तर तसंच.. नंतर भेटेल.. पण नक्की भेटणार.. "
स्वतःशीच विचार करता करता कधी त्याचे डोळे भरून यायचे तर कधी आसवं गळायची.. बस मध्ये असल्यामुळे त्याने ते इतरांपासून लपवले होते.. आणि आता त्याचे अगदी निस्तेज डोळे एकटक कुठेतरी बघत होते.. थोडा वेळात त्याचा स्टॉप आला आणि तो खोलीवर गेला..
इकडे गार्गी सुद्धा प्रतिकच्या विचारांमध्ये गढून गेली होती.. गौरवनी प्रतिकबद्दल संगीतल्यावरच तिला असं वाटलं की आता लगेच विचारावं त्याला..लगेच त्याच्याशी बोलावं.. पण गौरव समोर तिने आपल्या मनाचा उतावीळ पणा लपवत थोडं धीराने घेऊन उद्या बोलेल म्हणून संगीगल होतं.. पण आता एकांतात त्याचे विचार आणि काही प्रश्न सतावत होते..
" तो नक्की मलाच भेटायला आला असणार , पण अस ना भेटता का निघून गेला?? काहीतरी माझाच विचार करून निघून गेला असणार.. मला माहिती आहे त्याला पुढच्या आयुष्याची सुरुवात करण्याआधी मला भेटायच असेल.. पण मग यायचं होत ना भेटायला.. नाहीतर मला तरी बोलवायचं होत.. अस ना भेटताच फिरून गेला.. मी विचारू का त्याला आता.. तो का आला होता ते.. नको उद्याच विचारेल.. पण तोपर्यंत माझं मन लागणार आहे का.. एक मेसेज तरी करून बघते.. "
तिला राहवलं नाही आणि तिने मोबाइल उचलला आणि लगेच त्याला मेसेज केला..
गार्गी - hii, कसा आहेस??
प्रतीक बिछान्यावर पडलाच होता की त्याचा फोन वाजला.. त्याने लगेच बघितलं तर गार्गीचा मेसेज होता.. त्याला खूप आनंद झाला भेट नाही पण निदान आज छातीवर तरी बोलता येईल.. म्हणून त्याने लगेच उत्तर दिलं..
प्रतीक - मी छान, मजेत आहे.. तू कशी आहे??
गार्गी - मी पण ठीक आहे.. आता तर तू मजेतच असशील तुझं लग्न जुळलं आहे ना.. आता काय मनात लड्डू फुटत असतील तुझ्या..
तिच्या या बोलण्यावर काय बोलण्यावर काय बोलावं तेच प्रतिकला कळत नव्हतं..
प्रतीक - हम्म.. अस एवढं काही नाही.. आणि अस काय चिढवतेय ग.. मी नको करू का लग्न, तसाच राहू का??
गार्गी - अरे नाही नाही, मला अस नव्हतं म्हणायचं मी तर गम्मत घेत होते.. तू लग्न करतोय याचा मला खरच खूप आनंद आहे..
प्रतीक - हम्म.. बरं वकाय म्हणत होती?? आज कास काय मेसेज केला?
गार्गी - हा.. म्हणजे तू जरी विसरला असला तरी मला नाही अस इतक्या लवकर मित्रांना विसरता येत.. म्हणून तुझे हालहवाल विचारायला सहज मेसेज केला. का आता लग्न जुळलं तर आमचे मेसेज पण नको झालेत का तुला??
प्रतीक - तसं नाही ग.. इयक्या रात्री झोपायच्या वेळेला तू माझ्याशी बोलते आहे म्हणून विचारलं.. गौरवला नाही आवडणार ना असं..
गार्गी - त्याला काही प्रॉब्लेम नाहीय माझ्या मित्रमैत्रिणींपासून मी केव्हाही बोलू शकते कुणाशी पण.. आणि हो आज त्यांनीच सांगितलंय मला तुझ्याबद्दल..
प्रतीक शेवटचं वाक्य वाचून थोडा घाबरलाच..
प्रतीक - माझ्याबद्दल?? आणि गौरवने??...
काय सांगितलं??
गार्गी - अरे तू त्याला आमच्या घराजवळच्या बस स्टँडवर दिसला म्हणे.. तू इकडे आला होता का??
प्रतिकला आता काय बोलू कळत नव्हतं , त्याला गौरवाने बघितलं हर त्याला माहितीच नव्हतं आणि आता बघितलं म्हंटल्यावर खोटं तरी कसं बोलणार म्हणून त्याने थाप मारली..
प्रतीक - अ.. हो ते मी माझ्या एका मित्राकडे काही कामासाठी आलो होतो.. तो त्याच भगत राहतो..
गार्गी - अच्छा!!.. कोणत्या सोसायटी मध्ये राहतो तो??
प्रतीक - अग एवढं नाव वगैरे नाही माहिती मला सोसायटी च..
गार्गी - बरं.. मग इतक्या लांब पर्यंत आल्यावर आणि मी त्याच भागात राहते तुला माहिती होत ना तरी मग घरी का नाही आला?? एवढं परकं केलं का रे तू मला??
प्रतीक - नाही ग तास काही नाही.. मी जरा घाईत होरो ना म्हणून नाही आलो..
गार्गी - धावती भेट तरी घेतली असती ना निदान , नाही तर 5 मिनिटांसाठी मला बोलावलं असत बस स्टोपवर मी आले असते..
प्रतीक - खरच वेळ नव्हता ग.. आणि तुला कस बोलावणार होतो.. तुझ्या घरी तुझे सासुसासरे राहतात आणि त्यात गौरांगी पण अजून लहान आहे तिला सोडून तुला नसत येत आलं अस मला वाटलं..
गार्गी - आली असती मी 5 मिनिटांसाठी.. जेव्हा घरातलं सामान आणायला बाहेर जाते तेव्हा तिला सोडूनच जाते ना.. मग तुला भेटायला ही तिला तिच्या आजीआजोबांकडे थोडावेळ सोपवून आले असते मी.. पण तुला काय भेटीच एवढं महत्व म्हणा.. तू तर तुझ्या होणाऱ्या बायको मध्ये आम्हाला विसरला असशील आणि आता बहाणे सांगतो आहे..
प्रतीक - गार्गी तू पण ना.. अजूनही तशीच चिडकी आहेस.. अग आता परत आलो की नक्की येईल.. आणि माझी होणारी बायको तिला नको ग उगाच मधात आणू, मी अजून नीट बोललो पण नाहीय तिच्याशी..
गार्गी - काssय?? तू तिच्याशी बोलला नाही.. अरे मला वाटलं तुम्ही आता रोज बोलत असाल. सहसा लग्न जुळल्यावर फोनवर बोलणं सुरू होऊन जातं ना..
प्रतीक - हो पण मला वाटतं की एकदा साखरपुडा झाला की नंतरच तिच्याशी बोलत जाईल.. नंतर तर बोलावच लागेल ना.. आता काही दिवस शांतीचे जगून घेतो..
गार्गी - वाह रे.. शांतीचे दिवस म्हणे..
प्रतीक - बरं राग शांत झाला का तुझा?? मी पत्रिका घेऊन येईल तुझ्या घरी.. तेव्हा भेटू ... ठीक आहे??
गार्गी - हम्म.. ठीक आहे.. मी काधीची तुला घरी बोलावते आहे पण तु तर इतक्या जवळ येऊन देखील घरी आला नाहीस.. मला खूप वाईट वाटलं तुझ्या अशा वागण्याचं..
प्रतीक - मला माफ कर माते यापुढे अस नाही होणार.. घाई होती म्हणून नाही आलो कितीदा सांगू.. आणी गौरवनी मला बघितलं तर तो बोलला नाही माझ्याशी..
गार्गी - तो तुझ्याकडे येतच होता तेवढ्यात तुझी बस आली आणि तू निघून गेला..
प्रतीक - ओहह.. बरं काय म्हणतो बाकी गौरव, तुझी मुलगी आणि घरचे सगळे कसे आहेत??
गार्गी - सगळे ठीक..
प्रतीक - चल झोप येतेय आज प्रवासामुळे खूप थकलो मी.. नंतर बोलूयात.. बाय.. गुड नाईट..
गार्गी - हो ठीक आहे.. गुड नाईट बाय..
"कमाल आहे याची किती बदलला हा खरच.. विसरला आहे तो मला .. आणि मीच बसली आहे अजूनही याच्या आठवणींना कवटाळून.. याच्याशी बोलताना मी कितीही थकली असली तरी मला झोप येत नाही आणि हा आहे की नेहमी काहीतरी बहाणे करून निघून जातो.. असू दे त्याचही एका दृष्टीने बरोबरच आहे.. का बसायचं त्याच भूतकाळातल्या गोष्टींमध्ये अडकून.. पुढे तर सरकायलाच हवं ना.. मि तर पुढे जगूनही अस वाटत की मागेच राहिली आहे.. आज मी गौरवच्या एक मिठीसाठी त्याच्या त्या मायेच्या स्पर्शसाठी किती तरसते आहे.. पण त्याला काहीच कस वाटत नाही.. मी त्याला नकोशी तर नाही झाली ना.. किंवा त्याच काही बाहेर तर?? नाही नाही अस नाही असू शकत.. त्याची बॅग आज जड होती. तेव्हा मला त्याने नको बघू म्हणून बोलला आणि मी नंतर बघायचं म्हणून विसरूनच गेली.. काय असेल त्यात?? बघायला हवं.. " तिने तिचे विचार थांबवले आणि हळूच खोलीबाहेर पडली.. सगळे शांत झोपले होते.. बाहेर बघताना चुकून गौरवला जाग आली आणि त्यांनी बघितलं तर.. म्हणून तिने ती बॅग उचलली आणि तिच्या खोलीत आणली.. ती उघडून बघितलं तर त्यात काचेची " my dear wife, I love you" ची मोठी शिल्ड होती आणि त्यावर खूप सुंदर मॅटर पण लिहिलेलं होत.. तिने बघितलं आणि तिला खूप आनंद झाला.. ती विचार करू लागली अस अचानक मधातच कस काय याने हे गिफ्ट आणलं माझ्यासाठी.. आता तर लग्नाचा किंवा माझा वाढदिवसही नाहीय मग??.. तिने ते जसच्या तसेंच बॅग मध्ये ठेऊन दिलं आणि बॅग जागेवर नेऊन ठेवली.. बघू उद्या आपल्याला मिळेल तेव्हाच विचारते अस तिने विचार केला.. आणि झोपी गेली..
-----------------------------------------------------