Shevtacha Kshan - 34 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 34



मागच्या आणि आतापर्यंत सर्वच भागांवर आपण नेहमीच अभिप्राय देऊन माझं मनोबल वाढवत राहिलात.. त्यासाठी खरच आपले मनापासून खूप खूप आभार!!! तुमच्या प्रतिक्रिया वाचणे माझ्यासाठी खूप आनंददायी पर्वणीच असते.. भाग यायला उशीर होतो पण त्याला काही कारणं आहेत .. थोडं समजून घ्या मी समजू शकते की लिंक तुटते..मीही प्रयत्न करतच असते पण कधी कधी नाहीच जमत वेळ काढायला, गेले काही दिवस घरात बरीच पाहुणे मंडळी आली आहेत त्यामुळे यावेळी वेळ मिळाला नाही.. तुम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी माफ करा.. जमल्यास पुढचा भाग लवकर टाकायचा प्रयत्न करते..
--------------------------------------------------------------

आज गार्गीच ओपरेशन होतं.. सकाळपासून गौरांगी सोबत गार्गी वेळ घालवत होती.. तिला सोडून जाताना का कुणास ठाऊक तिला एक अनामिक भीती वाटत होती. तिचा तिच्या मुलींसाठी खूप जीव तुटत होता.. शेवटी ती वेळ आली.. ओपरेशन थिएटर मध्ये गार्गीला नेलं.. आणि ओपेरेशन करणारे सगळे डॉक्टर तिथे हजर झालेत.. त्यात एक डॉक्टर संदीप होता.. गार्गीला या अवस्थेत बघून त्याला धक्काच बसला.. आणि त्याला तिथे बघून गार्गीला मात्र खूप छान वाटत होतं..

संदीप हा गार्गीचा लहानपणीचा वर्गमित्र होता.. कधीतरी कामानिम्मित्त च तो गार्गीशी बोलायचं पण त्याला गार्गी आवडायची.. पण लाजऱ्या स्वभावामुळे त्याने कधीच काही तिला सांगितलं नव्हतं, पुढे शैक्षणिक वाटा वेगळ्या झाल्या आणि दोघे कधी एकमेकांच्या संपर्कात ही नव्हते.. त्यामुळे कधी बोलणं पण नव्हतं झालं..पण आज अचानक दोघेही असे समोर आले होते..

संदीप - गार्गी तू?? तु या अवस्थेत??

गार्गी - हो रे ..कळलंच नाही हे सगळं अस कधी झालं.. पण तू पण नुरोसर्जन झालायेस..किती छान!!!.. मला खरच खूप छान वाटलं की माझं ओपेरेशन करताना तू सुद्धा असणार आहेस..

संदीप - हम्म.. पण मला तुला अस पाहून अजिबात चांगलं वाटत नाहीय पण असो .. तुला ठीक करायचं आहे तर हे करावच लागेल.. तू ठीक झाली की बोलू..

त्यांच बोलणं सुरू असतानाच डॉक्टरांनी संदीपला इशाऱ्याने सांगून तिला अनेस्थेशीया दिला आणि ती गुंगली.. आणि मिनिटाच्या आतच ओपरेशन सुरू झालं.. ओपेरेशन करत असताना अचानकच गार्गीच्या केस मध्ये थोडे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले.. तिच्या मेंदूच्या काही नसांवर सूज चढली होती, त्यामुळे ओपेरेशनच्या वेळेला गार्गीच्या अवस्था क्रिटिकल होत होती.. पण बऱ्याच प्रयत्नानंतर आणि डॉक्टर अनुभवी असल्यामुळे डॉक्टरांनी यशस्वी ओपरेशन केलं.. तब्बल पाच तास ओपरेशन सुरू होतं.. ओपरेशन करून डॉक्टर बाहेर आलेत.. तसे गार्गीचे बाबा, आई, आई सोबत गौरांगी आणि गार्गीचे सासु सासरे सगळे पळतच डॉक्टरकडे पोचलेत..

गा. पप्पा - कशी आहे गार्गी डॉक्टर??

डॉक्टर - ओपेरेशन तर झालंय.. जीवाचा धोका टळला आहे.. पण ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत इतर काही सांगता येणार नाही..आशा आहे की हे ओपेरेशन तिच्यासाठी नक्कीच लाभदायक असेल. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे तिला कुठल्याच गोष्टीचा किंचितही ताण येऊ द्यायला नको.. मानसिक ताण आला तर परिस्थिती पालटू शकते.. त्यामुळे तिला शक्य तितकं आनंदी ठेवायला हवं..

गा. सासू - हो डॉक्टर आम्ही घेऊ काळजी...

गा. आई - आम्ही तिला बघू शकतो का??

डॉक्टर - आता तिला खोलीमध्ये हलवण्यात येईल त्यानंतर तुम्ही तिला बघू शकाल.. मला थोडं अर्जेन्ट काम आहे तेव्हा मी नंतर बोलतो..

आणि डॉक्टर निघून गेलेत तेव्हाच मागून संदीप आला.. त्यांनी बघितलं की गार्गीची फॅमिली गार्गीसाठी तळमळत आहे.. तो त्यांना धीर देण्याच्या हेतूने त्यांच्याजवळ पोचला.. स्वतःची ओळख करून दिली आणि गार्गीची आणि त्याची कशी ओळख आहे ते ही सांगितलं.. आरामात शांततेत बसवून त्याने सगळ्यांशी बोलणं केलं.. या आजाराबद्दल, त्याच्या उपचाराबद्दल आणि त्यानंतर ती ठीक होण्याबद्दल बऱ्याच गोष्टी नीट सकारात्मक रित्या त्यानी त्यांना समजावून सांगितल्या.. त्यांच्या चेहऱ्यावरचे भीतीची भाव घालवण्याचा आणि त्यांना धीर देण्याचा तो प्रयत्न करत होता.. नंतर सगळे मोकळे पणाने त्याच्याशी बोलू लागले.. बोलता बोलता त्याला गौरवबद्दल कळलं.. "पण तो नाही म्हणून हतबल होऊ नका येईलच तो लवकर तोपर्यंत काहीही काम असल्यास तुम्ही निसंकोच मला सांगा.." अस म्हणत त्याने त्याचा वयक्तिक मोबाइल नं ही त्यांना दिला आणि "भेटू लवकारच" म्हणून निघून गेला.. संदीप मुळे सगळ्यांनाच खूप आधार वाटत होता..

संदीपशी बोलत असतानाच गार्गीला खोलीमध्ये हलवण्यात आलं.. आणि सगळ्यांनी तिला बघूनही घेतलं..

नंतर गार्गीच्या वडिलांनी गार्गीच्या आईला आणि सासूला गौरांगीसह घरी सोडलं.. गौरांगीलाही भूक लागली होती आणि ती झोपी देखील आली होती, त्यामुळे तिची चिडचिड होत होती.. आणि त्याचबरोबर ती आईकडे जायचाही हट्ट करत होती.. म्हणून तिला दोन्ही आजींनी नीट समजावून घरी आणलं जेवू घातलं आणि झोपवलं..

तब्बल 12 तासांनंतर गार्गीला शुद्ध आली.. नर्स धावतच डॉक्टरांना बोलवायला आली.. तेव्हा मुख्य डॉक्टर नव्हते म्हणून संदीप तिकडे गेला.. तिला चेक केलं.. सगळं व्यवस्थितच वाटत होतं.. तिलाही कसला त्रास जाणवत नव्हता.. तिच्यावर उपचार करणारा तिचा मित्रच आहे याचा तिला अभिमान वाटत होता.. संदीप ही मोजकेच पण मोकळेपणाने तिच्याशी बोलला.. ओपेरेशन च्या वेळी तिच्या हातात एक डायरी होती.. त्यावेळी ती संदीपने काहीवेळेस स्वतःकडे ठेऊन घेतली होती पण आता ती डायरी संदीपने तिला परत करत तिच्या उशाशी ठेवली..

ओपेरेशन होऊन दोन दिवस झाले.. तीची हालत सुधारत होती.. पण आज ती सतत दाराकडे डोळे लावून बसली होती, जणू कुणाची वाट बघत असावी.. तिच्या routine checkup साठी आलेल्या संचिपच्या ते लक्षात आलं आणि ना राहवून त्याने विचारलंच,

संदीप - कुणाची वाट बघतेय का?? कुणी येणार आहे का आज??

तिनेही थकलेल्या आवाजातच त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं..

गार्गी - हो रे, आज गौरव परत येणार होता युकेवरून, आतापर्यंत तो इथे पोचायला हवा होता ,पण अजून कसा आला नाही कळत नाहीये..

संदीप - अच्छा, अस आहे का.. येईल ग, जरा घरी जाऊन फ्रेश होऊन , जेवण वगैरे करून येईल.. तो ही प्रवासात थकला असेल ना??

गार्गी - हम्म असेलही, पण मला बघितल्या शिवाय तो घरी जाईल अस मला तरी वाटत नाहीय पण जर तू म्हणतो तस असेल तर ठीकच आहे पण माझं मन आज खूपच घाबरत आहे.. मला गौरांगीची खूप आठवण येत आहे.. तू प्लीज घरून कुणी येणार असेल तर त्यांना गौरांगीला थोडावेळासाठी मला भेटायला आणायला लावशील का??

संदीप - हो तुझा निरोप मी लगेच कळवतो.. पण प्लीज तू कसलाही ताण घेऊ नकोस तुझ्यासाठी ते घातक आहे.. आणि येईल ग गौरव काळजी नको करू..

गार्गी - ठीक आहे.. एक विनंती होती संदीप , तुला शक्य असेल तर मला खोली बदलवून मिळेल का? या खोलीत खूप अंधार आहे आणि मला खूपच अपसेट वाटतं, तू मला उजेडाची खिडक्या असलेली खोली मिळण्याबाबत थोडं बोलू शकतो का?? मी नर्स ला विचारलं होत पण त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, कदाचित त्यांना नसेल शक्य ..

त्याने थोडं चिढुनच पण आवाज सांभाळत बोलला..

संदीप - अस कसं त्या दुर्लक्ष करू शकतात पेशंट कडे.. ठीक आहे मी सांगतो, आणि उपलब्ध असल्यास आम्ही देतो अग पेशंटला हवी तशी खोली.. तू काळजी नको करू..तूझे दोन्ही निरोप देतो मी..

गार्गी - थँक्स संदीप..

त्याने एक गोड स्मित केलं आणि निघून गेला.. थोडाच वेळात गौरांगीला घेऊन तिची आजी गार्गीला भेटायला आली...
गार्गीने डोळे भरून गौरंगीला बघितलं जवळ घेतलं.. तिचा लाड केला, आजीला त्रास देऊ नको म्हणून सांगितलं.. थोडावेळ तिच्यासोबत घालवला आणि नंतर तिला खोली बदलवून मिळतेय अस सांगत एक नर्स आली.. आणि लगेच तिला स्ट्रेचरवर टाकून तिच्या खोलीकडून दुसऱ्या तिला हवी तशी असलेल्या खोलीकडे नेण्यात येत होतं, पॅसेजमधून तिला घेऊन जात असताना विरुद्ध दिशेेने आणखी एक स्ट्रेचरवर एक माणूस जात होता.. दोन्ही स्ट्रेचर एकमेकांना क्रॉस होत असताना गार्गीच्या हाताला दुसऱ्या स्ट्रेचरवरच्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श झाला.. आणि तिने दचकून त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला पण नर्स वगैरे त्यांनी लगेच तिला रागावून लेटवलं.. आणि ती व्यक्तीही पुढे निघून गेल्यामुळे दिसत नव्हती.. त्या स्पर्शाने मात्र गार्गीच्या मनाची सकाळ पासून होत असलेली चलबिचल अधिक जास्त वाढली..
------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED