राजकुमार ध्रुवल - भाग १ vidya,s world द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजकुमार ध्रुवल - भाग १

राजा सूर्यभान दयाळू व न्यायप्रिय राजा होता.राजाची राणी चंद्रप्रभा ही सदगुणी होती...राजा ला एक पुत्र होता आर्यविर..आर्याविर ही वडीलांसारखाच ..दयाळू व न्याय प्रिय होता..सर्व गुणान मध्ये निपुण होता.. आर्य विर आता मोठा झाला होता.. राजाचा सेनापती.. रंदन..त्याची एक कन्या होती.. वशिका.. वशिका ..दिसायला सुंदर होती पणं तिला गरिबांची चीड येत असे..ती त्यांना तुच्छ लेखत असे..तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता.. आर्य वीर सोबत लग्न करण्याची व राणी होण्याचं स्वप्नं होत तिचं..आणि सेनापतींची ची ईच्छा होती की वशिका राणी बनावी..सेनापती व वशीका राजा समोर खूपच चांगले वागत असत त्यामुळे राजा सूर्यभान ला वशिका आपल्या आर्य वीर साठी योग्य आहे असे वाटू लागले होते ..राजा ने सेनापतीला वशिका सोबत आर्य वीर च लग्न लावून देण्याचे वचन दिले होते ..त्यामुळे सेनापती व वशिका दोघे ही खुप खुश होते..आणि आर्य वीर ला मात्र या गोष्टीची काहीच माहिती नव्हती.. त्याला वाशिका ची वागणूक इतरा न कडून समजली होती ..पणं ती राजवाड्यात राहिली आहे त्यामुळे तिचा स्वभाव असा आहे असे आर्य वीर ला वाटले होते.

एके दिवशी वशिका आपल्या एका दासिवर खूप ओरडत होती..राजकुमार आर्य वीर तिच्या दालना समोरून जात होता..की त्याला वाशीका चा आवाज ऐकू आला..त्याने आत जावून पाहिले तर एका दासीवर वशिका ओरडत होती..त्या दासीने आपले तोंड पदराने झाकले होते त्यामुळे तिचा चेहरा दिसू शकत नव्हता..दासीने चुकून वशिका च्या सुंदर ड्रेस वर पाणी सांडले होते..ती दासी शांत उभी राहून वशिका च बोलणं ऐकून घेत होती.. माफ करा राजकुमारी मी मुद्दाम नाही केलं..मी आज च इथे आली आहे माझी आई तुमच्या कडे काम करते आज ती आजारी आहे म्हणून मी आले आहे ..मला इथलं काही माहीत नाही ..पुन्हा चूक होणार नाही अस ती वशिका ला विनवत होती..राजकुमार त्या दिशेने आला..पणं तो त्या दासीचा आवाज ऐकुन स्थब्ध झाला होता..किती गोड आवाज आहे ..तो आतुरतेने तिचं बोलणं ऐकत होता.. वशिका ने आर्य वीर ला पाहिलं व ती त्या दासिवर ओरडणं सोडून तिला जा म्हणून सांगते..दासी पळतच बाहेर जाते.. आर्य वीर ही तिच्या मागे जातो..त्याला तिचा चेहरा पाहायचा असतो.. दासी बागेच्या दिशेने जाते ..तिथे जावून ती रडत असते ..की आर्य वीर मागून येतो ..ती त्याला पाहून शांत होते..आर्य वीर तिला ती कोण आहे विचारतो..तेव्हा ती सांगते की ती त्याच्या सैन्यात काम करणाऱ्या एका सैनिकाची मुलगी आहे व तिची आई राजवाड्यात दासी आहे .. आई आजारी असल्या मुळे ती आज आली होती..आर्य वीर ला तिचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होते ..तिचा आवाज इतका गोड आणि सुंदर आहे तर ती कशी आहे असा तो विचार करत असतो..तो तिचं नाव विचारतो तेव्हा ती देविका सांगते..त्या नंतर मात्र तो तिला चेहऱ्यावर चा बुरखा दूर करायला सांगते..ती नकार देते पणं तो राजकुमार असतो आणि त्याची आज्ञा असते म्हंटल्यावर देविका आपला चेहरा राजकुमाराला दाखवते..राजकुमार आर्य वीर तर तिला पाहूनच तिच्या प्रेमात पडतो ..इतकी सुंदर असते देविका..लांब केस ..गोरी पान..कानात छोटेसे झूमके ..गळ्यात एक काळी दोरी व त्यात एक छोटासा निळा खडा..एकदम साधे कपडे पणं त्यात ही ती अप्रतिम सुंदर दिसत होती..राजकुमार तिला अस एक टक पाहत आहे हे पाहून देविका नकळत हसते आणि लाजते ही ..आर्य वीर तर तिच्या हसण्याने अजुनच घायाळ होतो..


राजकुमार आर्य वीर .. देविका ला पाहूनच तिच्या प्रेमात पडतो..देविका लाजून तिथून निघून जाते आणि आर्य वीर पुन्हा राजवाड्यात निघून जातो.

दुसऱ्या दिवशी आर्य वीर राज्यात फेर फटका मारायला घोड्यावरून निघतो...रस्त्यात भेटणाऱ्या आपल्या प्रजेला काही त्रास आहे का याची तो विचारपूस करतो..आपली प्रजा सुखी आणि समाधानी आहे हे पाहून तो ही खुश होतो.बरेच फिरून झाल्यावर तो परत आपल्या राज वाड्याकडे जायला निघतो..की दुरून त्याला एक सुंदर स.. गाणं ऐकू येत..तो त्या दिशेने जातो समोर एक छोटंसं महादेवाचं मंदिर असत..तिथे लोक पूजा व आरती करत असतात...आणि राजकुमार आर्य वीर जेव्हा त्या गाण म्हणणाऱ्या मुलीला पाहतो तेव्हा तो लगेच ओळखतो ..ती देविका असते..तिचाच मधुर आवाज आर्य वीर ला मंदिरा कडे खेचून आणतो ..सर्व जण राजकुमार आलेला पाहतात व त्याला मंदिरात जायला वाट मोकळी करून देतात..प्रत्येक जण आश्चर्य चकित होतो राजकुमार ला पाहून ..देविका त्याला आरती देते ..तो तिला पाहून हसतो ..देविका पुन्हा सुंदर स लाजते..देविका महादेवाची भक्त असते..ती दर रोज त्या मंदिरात पूजेला येत असते व महादेवाची आरती गात असते.आर्य वीर ला देविका खूपच आवडते..तो ही आता दर रोज मंदिरात येऊ लागतो..राजकुमार मंदिरात येऊ लागल्या मुळे ..मंदिरात बरीच वर्दळ चालू होते.. मंदिरं दर रोज सुशोभित करण्यात येऊ लागले...आर्य वीर ही मना पासून महादेवाची पूजा करीत असे.. व ..देविका ची आरती आवर्जून ऐकत असे..तो असा दर रोज आपल्या प्रजा जनान मध्ये येऊ लागल्या मुळे ..सर्व जण आर्य वीर ला..आपल मानू लागले..तो प्रजेची निष्ठेने विचारपूस करी..त्यांना काही मदत लागली की करे..त्यामुळे आर्य वीर प्रजे मध्ये लोकप्रिय झाला..राजा ला ही जेव्हा आर्य वीर च कौतुक कानी ऐकू येऊ लागलं तेव्हा तो ही खुश झाला व आता योग्य वेळ आली आहे ..आर्य वीर च्या लग्नाची व त्याच्या हाती राज पाट सोपवण्याची असे राजाने ठरवले...राजाने आर्य वीर ला बोलावून वशिका व त्याच्या लग्नाची बातमी त्याला दिली व लग्ना नंतर तो या राज्याचा नवीन राजा म्हणून काम पाहिलं हे ही सांगितलं ..परंतु ..आर्य वीर ने वशिका सोबत लग्न करायला नकार दिला..राजा ने त्याला कारण विचारले तेव्हा त्याने देविका सोबत लग्न करण्याची इच्छा दर्शवली..पणं देविका एका सैनिकाची मुलगी आहे हे कळलं तेव्हा राजा ने आर्य वीर ला लग्न करण्याची परवानगी दिली नाही.. वशि का .. ला जेव्हा कळाल की आर्य वीर ला एका सैनिकाच्या मुली सोबत लग्न करायचं आहे त्यामुळे त्याने वशिका ला नकार दिला आहे ..तेव्हा ती रागाने लालबुंद झाली..सेनापतीने तिला राजा अस होवू देणार नाही व तिचं च लग्न आर्य वीर सोबत होईल म्हणून समजावले..परंतु राजा ही पुत्र हट्टा पुढे नमला व त्याने देविका व आर्य वीर च लग्न लावून दिलं..जेव्हा राजा ने देविका ला पाहिले तेव्हा राजकुमारा ची निवड योग्य असल्याची त्याला खात्री पटली.. वशिका तर रागात वेडी झाली होती..आणि त्यात देविका तिच्या हुन ही सुंदर आहे व आता ती या राज्याची राणी झाली हे पाहून तर ती खूपच भयानक झाली होती..देविका ला मारून आर्य वीर सोबत लग्न करायचं या साठी ती आता देविका ला मारण्याची संधी शोधू लागली...


क्रमशः