राजकुमार ध्रुवल - भाग 2 vidya,s world द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजकुमार ध्रुवल - भाग 2

देविका च सर्वत्र होणार कौतुक ऐकुन वशिका चा खूपच जळ फाट होत असतो ..शेवटी ती चिडून देविका ला मारायचं ठरवते.
देविका ला फुलांची फार आवड..दर रोज ती महादेवाची पूजा करीत असे..त्यासाठी ती स्वतः राजवड्या समोर असलेल्या बागेतून फुले आणत असे..आज ही ती फुले आणायला गेली असताना .. वशिका पुरुष वेष धारण करून लांबून तिच्या वर बाणाने वार करते बान देविका ला लागणारच असतो की ती खाली वाक ते.. व बान तिच्या दंडाला घासून जातो ..ती मोठ्याने ओरडते..तिचा आवाज ऐकुन सैनिक व आर्य वीर धावत बागेत येतात.. तर देविका बेशुद्ध पडलेली असते..सैनिक बागेत शोध घेऊ लागतात..पणं त्यांना कोणी सापडत नाही.. वशिका केव्हाच तिथून पळत जाऊन आपल्या दालनात पोहचते.. व ती ही वेष बदलून बागेत पोहचते..तिला वाटत..देविका मेली असेल..पणं फक्त तिच्या हाताला लागलेल पाहून ती जास्तच रागीट होते..आर्य वीर देविका ला आपल्या दालनात घेऊन जातो वैद्याला बोलावून तिच्या वर उपचार होतात..जास्त लागलेलं नसत पणं ती घाबरून बेशुद्ध झालेली असते.. ती शुद्धीवर येते..तेव्हा आर्य वीर तिला कोणी बान मारला हे विचारतो पणं तिने पाहिलेलं च नसत..त्यामुळे ती सांगू शकत नाही..हे पाहून वशिका खुश होते..आर्य वीर देविका ची खूप काळजी घेतो..थोड्याच दिवसात देविका ठीक होते...आर्य वीर देविका वर खूप प्रेम करत होता.. तिला आता तो बागेत ही एक टी..जावू देत नसे..तिच्या भोवती पहारा ठेवला होता..देविका ला तो फार जपत होता..त्याने आपले गुप्तचर देविका ला बान कोणी मारला हे शोधण्या साठी नेमलेले असतात पणं काहीच पत्ता लागत नाही.. वशिका ची कोंडी होत होती.. परंतु तिने देविका ला मारण्या साठी पुन्हा कट रचला ..आर्य वीर व देविका झोपलेले असताना ..ती देविका वर तलवारीने वार करायचा प्रयत्न करते पणं आर्य वीर जागा च असतो त्याने झोपण्याच फक्त नाटक केलं होतं .. तो त्या वारा पासून देविका ला वाचवतो व आपली तलवार काढून वशिका सोबत लढू लागतो.. वशि का ने पुरुष वेष धारण केलेला असतो व चेहरा झाकलेला असतो त्यामुळे वार करणार कोण आहे हे आर्य वीर ला कळत नाही.. पण वशिका पेक्षा ही आर्य वीर तलवार बाजी मध्ये निपुण होता..तो तिच्या गळ्यावर तलवार ठेवतो व तिच्या चेहऱ्यावर वरच कापड दूर करतो .. वशिका ला पाहून देविका व आर्य वीर दोघांनी ही धक्का बसतो..आर्य वीर तिला हे सर्व का केलं विचारतो तेव्हा आपल्याला या राज्याची राणी होन्याची इच्छा असताना देविका मध्ये आली..आणि आता मी तिला संपवणार अस म्हणून ती पुन्हा देविका वर वार करायला जाते आर्य वीर तो वार आपल्या तलवारीने झेलतो व सैनिक बोलावून... वशिका ला कारागृहात ठेवतो..सेनापती राजा व आर्य वीर ,देविका ची माफी मागण्या च नाटक करतो व आपल्याला वाषिका च्या मनात चाललेल्या कटा बद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगतो..राजा व आर्य वीर मुलीच्या गुन्ह्याची शिक्षा वडीलाला द्यायची नाही..म्हणून त्याला सेनापती पदावरुन दूर करीत नाहीत.
आर्य वीर आणि देविका खूपच खूष असतात..त्यांच गृहस्थ जीवन फार चांगलं चाललं होत..सेनापती ही थोडे दिवस शांत राहायचं ठरवतो..पणं त्याच्या मनात आपली मुलगी कारागृह मध्ये आहे याची आग लागलेली असते.
देविका एका सुंदर मुलाला जन्म देते..राज वाड्यात सर्वत्र आनंद पसरला होता..प्रजा ही आपल्या लाडक्या राजाच्या खुशीने खुश होती...मोठ्या थाटात ..छोट्या राजकुमाराचे नाव ध्रुवल ठेवलं जातं...
राजकुमार ध्रुवल खूपच सुंदर होता.. गोरा... गोबऱ्या गाला चा ..हळू हळू तो मोठा होवू लागला..राजवाड्यात सर्वत्र धावू लागला..राजा राणी सर्व जण त्याच्या बाल लीला पाहून खूपच खुश होते.. छोटा राजकुमार आता आठ वर्षाचा झाला होता..ध्रुवल खूपच हुशार होता..तो सतत सर्वांना प्रश्न विचारत असे..सर्व जण त्याची उत्तरे देता देता थकत असे..देविका त्याला महादेवाच्या मंदिरात घेऊन जात असे..तिथे तो ही देविका बरोबर आपल्या बोबड्या बोलीत महादेवाची आरती गात असे..सर्व जण ऐकुन खूपच खुश होते..पणं सेनापती मात्र आतून तळमळत होता..आपल्या मुलीला कराग्रहात टाकलं आणि इथे आर्य वीर आणि देविका आपल्या मुलाचं कौतुक करत बसले आहेत याचा त्याला खूप राग येऊ लागला..आपण जसे आपल्या मुलीच्या विरहात तडफडत आहोत तसचं राजा व राणी ही झुरले पाहिजेत या विचारांनी तो राजकुमाराला मारायचं ठरव तो ..पणं राजकुमार मरायला हवा व त्याचा अाळ आपल्यावर येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागणार अस तो ठरवतो..सेनापतीच्या ओळखीचा एक मांत्रिक असतो त्याच्या कडे खूप विषारी साप असतात..सेनापती मांत्रिका कडे जातो व त्याला आपली अडचण सांगतो .. मांत्री क..त्याला सापाच एक छोटं पिल्लू देतो..हे छोटा साप कशाला मोठा द्या अस तो मात्रिका ला बोलतो तेव्हा मांत्रिक त्याला सांगतो सापच पिल्लू जरी असल तरी ते खूप विषारी आहे ..तुझं काम होईल तू जा घेऊन ..सेनापती त्याला बऱ्याच सोन्याच्या मोहरा देतो व ते पिल्लू घेऊन राजवाड्यात जातो..रात्रीच्या वेळी सर्व झोपले असताना सेनापती ध्रुवल च्या दालनातून ते सापच पिल्लू आत सोडतो..ध्रुवल गाढ झोपेत असतो ..सेनापती खुश होतो की आता राजकुमार ध्रुवल मरण पावणार म्हणून...तो ही निश्चित पने जावून झोपी जातो..सकाळी राजवाड्यात सर्वत्र शोक कळा पसरली असेल असा तो विचार करतो..पणं नाही सकाळी जेव्हा तो उठून पाहतो तर राजवाड्यात सर्व व्यवस्थित असत..राजकुमार ध्रुवल ही राजवाड्याच्या बागेत देविका व दासिन सोबत खेळत असतो..सेनापती पूर्ण राजवाड्यात ते सापा च पिल्लू शोधतो पणं ते त्याला कुठेच सापडत नाही.

क्रमशः