अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 31 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 31

शौर्य आज दिल्लीला त्याच्या हॉस्टेलवर परतला.. हॉस्टेलवर पोहचेपर्यंत त्याला दुपार झाली.. रात्रभर विराज सोबत मस्ती केल्याने, त्याची झोप काही पूर्ण झाली नव्हती.. सामान तसच ठेवुन आहे त्याच कपड्यात तो बेडवर सरळ आडवा झाला.. पडल्या पडल्या त्याला झोपही सहज लागली.

वृषभ, टॉनी आणि राज नेहमी प्रमाणे प्ले हाऊसमध्ये जायला निघाले असताना शौर्यचा दरवाजा त्यांना ओपन दिसतो..

राज : "शौर्य आला सुद्धा आणि आपल्याला एका शब्दाने त्याने सांगितलं पण नाही.."

वृषभ : "नुकताच आला असेल.. आत जाऊन बघुयात साहेब काय करत आहेत ते.."

तिघेही शौर्यच्या रूममध्ये घुसले..

शौर्य गाढ झोपेत होता.. मोबाईल चार्जिंगला लावलेला.. एकीकडे त्याची बेग तशीच पडलेली..

टॉनी : "हा झोपलाय आणि आपण मगासपासून उगाच ह्याची काळजी करत बसलोय.."


"ए शौर्य उठ बघु", राज त्याला हलवतच बोलला..

"विर झोपु दे ना यार.. प्लिजsss..", एवढं बोलुन शौर्य पुन्हा झोपला..

राज : "अजुन मुंबईतच आहे हा"

वृषभ आणि टॉनी आता शौर्यच्या कानात गुदगुल्या करत त्याला उठवु लागले.. तरी शौर्य काही उठत नव्हता. बाजूला व्हा तुम्ही मी उठवतो.. अस बोलत राजने शौर्यच्या बाजूच्या टेबलवर असलेली पाण्याची बाटली उघडून त्यातलं पाणीच शौर्यच्या तोंडावर टाकलं.. तस शौर्य उठून बसला...


शौर्य : "काय रे विsssरssss",

राज : "अजुन मुंबईतच का??"

शौर्य : "राज काय यार तु पूर्ण कपडे माझे भिजवलेस माझे... अंगावरच शर्ट झटकतच तो बोलला.."

राज : "प्रेमाने उठवत होतो तर उठला नाहीस.. मग काय करू सांग.."

टॉनी : "ते सोड.. तु आलास तरी आम्हाला भेटायला नाही येता आलं ना.. आम्ही तुला फोन लावतोय.. तुझा फोन स्विच ऑफ म्हणुन तुझी काळजी करत बसलोय.. पण तु मात्र मस्त फोन स्विच ऑफ करून झोपलायस इथे."

शौर्य : "सॉरी यार.. पण मला झोपच आवरत नव्हती.. काल झोपलोच नाही मी.. "

वृषभ : "तुझा फोन का स्विच ऑफ आहे??"

शौर्य : "चार्जिंग नाही केली. वेळच नाही भेटला.."

"काल जास्तच मज्जा केलेली दिसतेय.."टॉनी त्याला चिडवायच्या हेतुने बोलला..


"हम्मम", करत शौर्य पुन्हा डोळे बंद करत झोपयला बघत होता.

राज : "ए शौर्य उठणं.. कपडे बदल ते आधी.. आणि ती समीरा वाट बघतेय तुझी.. मगासपासून शंभर फोन तरी आलेत तिचे ह्या वृषभला.. शौर्य आलाय का..?? फोन स्विच ऑफ का येतोय अजुन??"

समीराच नाव ऐकताच शौर्य डोळ्यावरची झोप उडते..

शौर्य : "अरे हो तिला मेसेज करायला विसरलो.. अस बोलत शौर्य चार्जिंगला लावलेला मोबाईल स्विच ऑन करायला घेतो.."

टॉनी : "प्ले हाउस मध्येच भेट तिला.. फोन वर कुठे बोलत बसतोयस.."

शौर्यला सुद्धा टॉनीच बोलणं पटत.. आलोच अस बोलत शौर्य फ्रेश होण्यासाठी निघतो.. शौर्य फ्रेश होताच सगळे मिळुन प्ले हाउसमध्ये येतात.. तिथे कोणीच नसत..

शौर्य : "कुठेय समीरा..??"

राज : "येतेय पाच मिनिटात.. आत्ताच मेसेज केलाय तिला.."

वृषभ : "शौर्य खर तर आम्ही तुझ्यावर नाराज आहोत.. तुझ्यामुळे आमचा प्लॅन केन्सल झाला.. आज आम्ही मस्त पार्टी करायच ठरवलं होतं.."

शौर्य : "मग मी कुठे काय केलं.. चला करूयात पार्टी.."

"चला करूयात पार्टी",टॉनी शौर्यची एकटिंग करत त्याला चिडवच बोलला.

टॉनी : "तुला त्यासाठीच फोन केलेला रात्री.. तु कधी येणार ते माहीत नव्हतं.. पण कसल काय??"

शौर्य : "अरे हो.. काल रात्री फोन मी त्या ज्योकडेच विसरलो.. सकाळीच तिने जाता जाता आणुन दिला. तोही पूर्ण स्विच ऑफ करून आणि निघायच्या गडबडीत तो चार्जिंगला लावायचा राहून गेला."

वृषभ : "एवढ्या रात्री तु काय करत होतास रे तिच्या घरी.. ते ही तिच्या रुममध्ये.."

शौर्य : "अरे ती खुप मोठी स्टोरी आहे. रूमवर गेलो की सांगतो.."

राज : "मग एन्जॉय केलंस ना..?"

शौर्य : "तुम्हा लोकांशिवाय काय एन्जॉय करणार.." शौर्यला खर तर त्याच्या मित्रांचा बोलण्याचा उद्देश कळत नव्हता..


"हॅलो शौर्य... कसा आहेस...", समीरा पाठून येऊनच शौर्यची विचारपुस करते..

शौर्य : "मी मस्त.. तुम्ही दोघी कसे आहात??"

सीमा : "मी तर मस्तच आहे आणि समीराच बोलशील तर आता तु दिसलायस म्हणजे तीच्या चेहऱ्यावर कसलं तेज आलंय बघ.."

"सीमा तु पण ना", समीरा सीमाच्या हाताला चिमटा काढतच बोलते..

समीरा : "कधी आलास तु?? आणि फोन का स्विच ऑफ करून ठेवलेलास??"

शौर्य : "एका तासा पूर्वीच आलोय.. चार्जिंग करायला वेळच नाही मिळाला.."

वृषभ : "गाईज मग उद्या जाऊयात डीनरसाठी बाहेर...??"

समीरा : "अस काय करतायत..? त्याचे डॅड जस्ट ऑफ झालेत आणि आपण अस पार्टी वैगेरे म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही... शौर्यला विचारा त्याला चालेल का??"

वृषभ : "शौर्य तुला काही प्रॉब्लेम आहे का??"

राज शौर्यची मान पकडतच जबरदस्ती नाही अशी हलवतो..

राज : "बघ नाही बोलतोय.. त्याला काही प्रॉब्लेम नाही.."

समीरा : "तु त्याची मान सोड.. त्याला बोलु दे."

शौर्य : "मला चालेल.. माझं एवढं काही नाही.."

राज : "येहहहहह.. मग कुठे जाऊयात.."

सीमा : "एक मिनिट!! आधी रोहन आणि मनवीला विचारा.. मनवीला तस पण बर वाटत नव्हतं.."

समीरा : "मी व्हिडीओ कॉल करते तिला.. एकच मिनिट.."

समीरा लगेच मनवीला फोन लावते... समीराने मनवीला फोन लावला म्हणुन शौर्य तिथे न थांबता केरमबोर्ड जवळ चेअर घेऊन स्वतःच्या मोबाईल मध्ये काहीतरी करत बसतो..

मनवी फोन उचलताच सगळ्यांना हॅलो बोलते.

सीमा : "आता तब्येत कशी आहे तुझी??"

मनवी : "तशी आहे ठिक."

समीरा ही जास्त आढेवेढे न घेता सरळ मुद्यावर हात घालते..

समीरा : "आम्ही सगळे उद्या पार्टी करायचा विचार करतोय.. तुझं काय मत आहे त्यावर??"

राज : "एक मिनिट.. रोहन ला पण घे ना समीरा काँफेरेन्समध्ये.."

समीरा : "मनवी एकच मिनिट हा मी रोहनला पण फोन लावते.."

अस बोलत समीराने रोहनला सुद्धा फोन लावला..

रोहनने फोन उचलताच समीरा रोहनला उद्याच्या पार्टी बद्दल त्याच मत विचारते..

मनवी : "मला नाही जमणार.. डॅड उद्या बाहेर चाललाय मिटिंगसाठी आणि मला घरातुन अजिबात बाहेर पडायचं नाही असं सांगितलं.."

राज : "काय ग मनवी तु पण.. पूर्ण मुड ऑफ केलास आमचा.."

रोहन : "शौर्य आला काय??"

"हो आलाय.. हा काय..",अस बोलत समीरा केरमबोर्डजवळ बसलेल्या शौर्यजवळ जाते... शौर्यच्या खांद्यावर हात ठेवतच ती स्वतःचा मोबाईल शौर्य समोर धरते.. रोहन आणि मनवीला शौर्य दाखवते..

शौर्यला बघुन रोहन खुश होतो पण त्याच्या पेक्षा जास्त खुश मनवी होते..नकळत झालेल्या समीराच्या स्पर्शाने शौर्य तर त्या दोघांपेक्षाही जास्त खुश असतो.. तिच्या केसांतून येणाऱ्या सुगंधातून तो तिच ते दिसणार अर्धबाही रुपाकडे बघत एका वेगळ्याच दुनियेत हरवुन गेलेला.. रोहन तिथुन शौर्यला आवाज देत होता पण त्याच लक्ष मात्र समीराकडेच असत.. समीरा शौर्यच तोंड आपल्या नाजूक अश्या हाताने मोबाईलच्या दिशेने फिरवते.. तसा तो भानावर येतो..


रोहन : "अरे कधीच आवाज देतोय तुला..."

शौर्य : "सॉरी लक्ष नव्हतं माझं.. कसे आहात तुम्ही दोघ??"

रोहन : "आम्ही मस्त आणि तु??"

शौर्य : "मी पण.."

मनवी : "गाईज पार्टी आपण माझ्या घरी करूयात का?? मी बाहेर नाही पडु शकत पण तुम्ही घरी येऊ शकता माझ्या."

"आम्हाला कुठेही चालेल..", राज खुश होतच बोलला

वृषभ : "नॉट बेड आयडिया"

शौर्य : "घरी नको ना.. आपण बाहेरच करू.."

वृषभ : "ए शौर्य आता प्लिज हां तुझ्यामुळे आधीच एक प्लॅन विस्कटला.. परत आता उद्याचा नको ना विस्कटवुस."

शौर्य : "तस नाही रे.. आपण बाहेर करूयात ना.. बाहेर केली तर जास्त मज्जा येईल.."

मनवी : "मी नाही बाहेर पडु शकत घरातुन.. डॅड नाहीत तोवर मला बाहेर पडता येणार नाही. तसही माझ्या घरी पण आपण मज्जा करू शकतो.. म्हणजे मी तशी काळजी घेईल तुझी.. म्हणजे तुमच्या सगळ्यांची.."

रोहन : "ए शौर्य आता डन हा.. प्लिज.."

समीरा : "शौर्य.. प्लिज.."

"समीराने रिक्वेस्ट केली म्हणजे तर शौर्यच होच असेल..", राज शौर्यला चिडवतच बोलला..

शौर्य : "समीराने रिक्वेस्ट केली म्हणुन नाही तुम्ही सगळेच एवढं फोर्स करत आहात म्हणुन हो बोलतोय.."

"येहहहह..", सगळे एकत्रच बोलतात..

राज समीराचा मोबाईल तिच्या हातातुन घेत बाकीच्यांसोबत पार्टीतील इतर गोष्टीच डिस्कशन रोहन आणि मनवी सोबत करायला प्ले हाउस बाहेर निघुन जातो.. समीराही त्यांच्या मागुन जाऊ लागते.. तोच शौर्य तिचा हात पकडतो..


शौर्य : "तु कुठे चाललीस??"

समीरा : "ते पार्टीच डिस्कशन.."

"ती लोक करतील ना..तु बस इथेच...", समीराचा हात पकडतच तो बोलतो..


समीरालाही त्याच मन तोडून जावस वाटत नाही.. तिला सुद्धा त्याच्या बाजुला बसुन त्याच्या गप्पा ऐकत बसावं अस वाटत असत.. टेबल घेऊन केरम बोर्ड जवळच बसते..

दोघांनाही एकमेकांशी काय बोलावं ते कळत नसत..

समीरा : "आंटी आहेत का ठिक?? "

शौर्य : "हो."

पुन्हा दोघांमध्ये शांतता..

शौर्य : "अग तुझा दादा पण आलेला.."

समीरा : "दादा...??? कुठे??"

शौर्य : "डॅडच ˈफ्यूनरल् अटेंड करायला.. बोलला नाही का तुला??"

समीरा : "तु गेलासना तेव्हा पासून मी घरी फोनच नाही केला रे. पण दादा कस काय ओळखतो तुझ्या डॅडला..?"

शौर्य : "माझा मोठा भाऊ आणि तुझा दादा क्लासमेट आहेत दोघ.."

समीरा : "आणि तु हे मला आता सांगतोयस.."

शौर्य : "मला पण ते तुझ्या दादाच्या लग्नादिवशीच कळलं.. त्यानंतर आपण भेटलोच नाही ना नीट.."

"तुम्ही दोघ अजुन इथेच का?? आम्ही तुमची बाहेर वाट बघतोय..", टॉनी प्ले हाऊसच्या मेन डॉर मधुनच आवाज देत बोलला..

"आलोच..",अस बोलत समीरा आणि शौर्य बाहेर पडले.. खर तर तिथुन बाहेर पडू नये असं दोघांनाही वाटत असत...

सगळे मिळुन चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर जातात.

टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेत जो तो उद्याच्या पार्टीबद्दलच डिस्कशन करत होता.

समीराही उद्या डीनरसाठी काय मेनु ठेवावा ह्या बद्दल आपल्या मित्र मंडळींना आयडिया देत होती..शौर्य मात्र चहाचा घोट घेत समीराकडे बघण्यात हरवुन गेला होता..


'ए शौर्य तु पण काही तरी आयडिया दे न... नुसतं काय समीराकडे बघत बसलायस..", राज शौर्यला चिडवतच बोलला.. तसे सगळे शौर्यकडे बघु लागले..


सगळे आपल्याकडे असे अचानक बघु लागले म्हटल्यावर शौर्य ठचकाच लागला..

राज : "काय शौर्य तु पण.. एवढं काय घाबरतोस.. आता आम्हा सगळ्यांनाच सगळं माहिती.. तु बघु शकतोस समीराकडे.. आम्हांला काही प्रॉब्लेम नाही.. काय रे आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का??"

"अजिबात नाही..", वृषभ आणि टॉनी एकाच सुरात बोलले..

"तुला बघतोच मी", शौर्य चहाचा ग्लास तसाच टेबलवर ठेवत राजला पकडायला त्याच्या मागे पळु लागला..

"समीरा वाचव", अस बोलत राज समीराच्या भोवतीच गोल गोल फिरू लागला..

शौर्य : "तुला माझ्यापासुन कोणीच वाचवू नाही शकत.. आल्यापासून त्रास देतोयस नुसतं.."

राज : "वृषभ, टॉनी प्लिज हेल्प.."

"तु मला काही म्हणालास का??", वृषभ मुद्दामूनच राज ला बोलला..

राज : "बरोबर रे.. तु तर ह्याचा खास मित्र.. तु कसा येशील.. टॉनी तु तरी वाचव.."

"काही करायच्या आधीच तु मुलींसारखं रडु लागतोय",शौर्य एवढं बोलेपर्यंत टॉनीने शौर्यला पकडलं..


"आता ये.. आता ये..", राज शौर्यच्या पुढ्यात येऊनच त्याला चिडवत होता..

"टॉनी, सोड ना यार..", शौर्य टॉनी ला रिक्वेस्ट करतच बोलला..

"ए टॉनी नाही हा सोडायच ह्याला आणि शौर्य तुला म्हणुन सांगतो राज को पकडणा मुश्किल ही नाही नामुनकीन हे."राज तिथेच उभं राहून शौर्यला अजुन चिडवुन दाखवतो.. आणि अचानक टॉनी शौर्यला सोडतो..


शौर्य : "आता बघतो कस नामुनकीन आहे ते.."

"टॉनी.. धोकेबाज.. तु भेट रूमवर", राज टॉनीला सूनवतच तिथुन पळत हॉस्टेलच्या दिशेने गेला.. त्याच्या मागे शौर्य..

समीरा : "काय हे दोघेजण लहान झालेत.."

वृषभ : "त्यांचं जाऊ दे.. त्या दोघांचं चालुच असत.. आम्ही पण निघतो हॉस्टेलवर..उद्या इव्हीनिंगला 7PM ला भेटूच.."

समीरा आणि सीमाला बाय करत वृषभ आणि टॉनी हॉस्टेलवर यायला निघाले..

दोघेही थेट शौर्यच्या रूममध्ये आले.. शौर्यने आपल्या एका हाताने राजचे दोन्ही हात मागे पकडुन ठेवलेलं आणि दुसऱ्या हाताने गुदगुल्या करत होता..

समोर टॉनी आणि वृषभला बघुन राज त्या दोघांकडे मदत मागु लागला..

वृषभ : "शौर्य बस यार..उद्याची पार्टी त्याला पण एन्जॉय करू दे.."

शौर्य : "तु बोलतोयस म्हणुन सोडतो. जा राज जा.. जिले अपनी जिंदगी.."

राज : "किती जोरात पिरघळलास.. दुखायला लागले माझे हात.."

वृषभ : "केवढा रे नाजुक राज तु.. कस व्हायच तुझं"

"हे तु आज नवीन आणलस काय मुंबईवरून..", टॉनी टेबल खाली ठेवलेलं गिटार हातात घेतच शौर्यला विचारतो..

शौर्य : "नाही रे.. पुण्यात असताना विरने घेऊन दिला मला.."

वृषभ : "नुसतं घेऊन काय उपयोग.. वाजवायला पण यायला हवा ना.."

शौर्य : "येतो मला.."

टॉनी : "ए दाखवना मग वाजवून.."

शौर्य : "आत्ता??"

राज : "आत्ता गिटार वाजवायला पण मुहूर्त बघावा लागतो हे जर माहिती असत तर आम्ही आधी तो काढुन आणला असता.. मग तुला बोललो असतो वाजव.."

टॉनी : "नाही तर काय?? वाजव ना.."

तस नाही रे.. गिटार वाजवायला माईंड फ्रेश असावं लागतं.. आज मी खरच खुप दमलोय बट तुमच्यासाठी काही पण",

अस बोलत शौर्य गिटार हातात घेतो आणि सोबत त्याचा मोबाईल ही.. तो गाणाऱ्या गाण्याचे लिरिक्स आपल्या मोबाईल मध्ये ओपन करतो.. मोबाईल बरोबर समोर ठेवत गिटारच्या तारांची छेड काढतच तो ते वाजवायला घेतो..

"This special song dedicated to my special friend.." अस बोलत शौर्य गिटारच्या धुनसोबत... गाणंही गातो..


¶¶यारों दोस्ती बड़ी ही हसीन है
ये ना हो तो क्या फिर
बोलो ये ज़िन्दगी है

कोई तो हो राजदार
बेगरज तेरा हो यार
कोई तो हो राजदार

यारों मोहब्बत ही तो बंदगी है
ये ना हो तो क्या फिर बोलो ये ज़िन्दगी है

कोई तो दिलबर हो यार
जिसको तुझसे हो प्यार
कोई तो दिलबर हो यार

तेरी हर एक बुराई पे डांटे वो दोस्त
ग़म की हो धुप तो साया बने तेरा वो दोस्त
नाचे भी वो तेरी ख़ुशी में
अरे यारों दोस्ती बड़ी ही हसीन है
ये ना हो तो क्या फिर
बोलो ये ज़िन्दगी है
कोई तो हो राजदार
बेगरज तेरा हो यार
कोई तो हो राजदार

तन मन कर तुझपे फ़िदा महबूब वो
पलकों पे जो रखे तुझे महबूब वो
जिसकी वफ़ा तेरे लिए हो

अरे यारों दोस्ती बड़ी ही हसीन है
ये ना हो तो क्या फिर
बोलो ये ज़िन्दगी है
कोई तो दिलबर हो यार
जिसको तुझसे हो प्यार
कोई तो दिलबर हो यार¶¶

तिघेही त्याच ते गाणं अगदी मन लावून ऐकतात.. गाणं संपताच तिघेही त्याला मिठी मारतात..

"कसला भारी गिटार वाजवतो यार तु आणि आवाज तुझा तर लाजवाब.", वृषभ त्याच कौतुक करतच बोलला...

राज : "उद्या गिटार सोबत एक झलक तुझी समीरा समोर तर झालीच पाहिजे.."

शौर्य : "उद्याच उद्या बघुयात.."

★★★★★

अनिताने आज तिच्या ओळखीतल्याच जोशी गुरुजींना बोलवुन घेतलेलं..

जोशी गुरुजी : "कशी काय आमची आठवण काढलीत आज."

अनिता : "ते सुरज बद्दल तुम्हाला कळलंच असेल आणि आत्ता माझा विरसुद्धा मोठा झालाय.. वडील गेल्यावर वर्षाच्या आत लग्न करावं अशी काहीशी प्रथा असते अस आमच्या घरातली सखु मुळे मला कळली.. म्हटलं तुमच्याशी बोलुन घ्यावं त्या विषयी..

जोशी गुरुजी : "तशी प्रथा तर असते. पणमला विरची पत्रिका बघायला मिळेल का?? त्याच्या कुंडलीत ह्या वर्षीचा मुहूर्त आहे का बघायला हवा "

अनितासोबत फाईल घेऊनच बसलेली..

विरची पत्रिका देण्याच्या नादात ती चुकून शौर्यची पत्रिका जोशी गुरुजींना देते..

"पत्रिकेवर तर शौर्यच नाव लिहिलंय.."

"चुकून गेली असेल.. ही बघा ही विरची पत्रिका.."अस बोलत अनिता पुन्हा त्यांना विरची पत्रिका देते..


जोशी गुरुजी : "शौर्यची दिलीय तर त्याची पण बघुयात.."

अनिता : "जस तुम्हाला पटेल.."

तेवढ्यातच विराज तिथे येतो..

जोशी गुरुजी तसे त्याच्या ओळखीचे असतात.. त्यांना बघून तो त्यांची विचारपुस करत तिथेच बसतो.. जोशी गुरुजी शौर्यची पत्रिका बघतात..


"आयुष्य खुप साऱ्या संकटांनी भरलं आहे.. आपल्या माणसात राहण्याचं सुख ह्याच्या नशिबी खुप कमी आहे.. कधी कधी इतरांच्या बंधनांमुळे तर कधी कधी स्वनिर्णयामुळे हे घडत असावं.. बुद्धी एकदम तल्लख.. हुशार व्यक्तिमत्व.. पुढील तीन किंवा त्या पेक्षा अधिक वर्ष हे त्याचं विदेशी जाईल.."


विराज : "हे तर अजिबात शक्य नाही.. मम्माला शौर्यला US ला पाठवायचंय पण 200% शौर्य जाणार नाही आणि मम्माने ही तिचा निर्णय बदलला आहे.."

जोशी काका : "मी फक्त कुंडलीत लिहिलेलं भाकीत व्यक्त करतो आणि आतापर्यंत माझं एकही भाकीत खोट ठरलं नाही बेटा.."

विराज : "पण हे भाकीत खोटं ठरेल काका.."

जोशी काका : "ते वेळच ठरवेल.."

अनिता : "शौर्यची पत्रिका राहू दे तुम्ही विरची पत्रिका बघुन सांगा की हे वर्ष त्याच्या लग्नासाठी योग्य आहे का?? आणि तुमच्या ओळखीतल एखादं स्थळ असेल तर सुचवा.."

विराज : "अग मम्मा मला एवढ्यात नाही लग्न करायचंय ग.. तु एकदा मला विचारलं असतस तर मी तुला सांगितलं असत ना.."

अनिता : "मग पुढील तीन वर्षे तरी तुला लग्न करता येणार नाही.. तुझी ईच्छा असली तरी.."

विराज : "चालेल मला.."

ज्योशी काका : "तस पण ह्यांच्या कुंडलीत लग्नाचा योग हा तीन वर्षानंतरचाच आहे आणि ह्यांचा प्रेम विवाह हा निश्चित आहे.. "

अनिता विराजकडे बघते.. विराज अनिता पासून आपली नजर चोरून दुसरीकडे बघत होता..

अनिता : "जोशी गुरुजी... एकदा विरची पत्रिका बघुन सांगाल का.. सगळं काही ठिक आहे ना.."

जोशी काका : "स्वभाव एकदम रागीट.. खोट अजिबात सहन होत नाही.. नेहमी सत्याची बाजु घेऊन उभे राहतील.. पत्रिका तशी एकदम उत्तम.. पितृप्रेम, मातृप्रेम सोबत बंधु प्रेम ही ह्यांच्या नशिबी अगदी ठासून भरलेलं आहे.. समजुतदार पणाच्या बळावर सगळी नाती कशी जपावी हे ह्यांना चांगलं समजत.. बिझिनेस मध्ये चांगली प्रगती करेल.. पत्रिका खरच खुप छान आहे.."

ज्योशी काका आपली भविष्यवाणी सांगुन तिथुन निघुन गेले.. विराज सुद्धा आपल्या रूमवर जायला निघाला..

अनिता : "विराज.. तु खरच प्रेम विवाह करशील.."

विराजला मम्माशी काय बोलावे तेच कळत नव्हतं..

अनिता : "तुला मला नाही सांगावस वाटत मग इट्स ओके.. "

विराज : "मम्मा तस नाही ग.. तुला मी सांगणारच होतो.. पण हिंमत होत नव्हती आणि तसही ती अजुन शिकतेय.."


अनिता : "नाव काय तीच??"

विराज : "अनघा ठाकुर.. माझ्याच कॉलेजमध्ये होती..ओळख झाली मग पुढे मैत्री.. कधी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो तेच कळल नाही.. तीला शिकायची खुप आवड आहे म्हणुन पुढच शिक्षण पूर्ण करायला ती USA ला गेलीय आणि बिलिव्ह मी मम्मा मी तुला हे सांगणार होतो.. बट तु पण शौर्यच्या टेन्शन मध्ये असायचीस आणि मध्येच डॅडच पण अस झालं..."

अनिता : "तुला आवडते ना ती मग माझी काहीच हरकत नाही.. सुरज नंतर तु माझी जबाबदारी आहेस विर.. तुझी काळजी वाटते म्हणुनच मी गुरुजींना आज बोलवुन घेतलं इथे.."

विराज : "मम्मा तुला ह्या सगळ्या गोष्टी पटतात का??"

अनिता : "कश्यावर किती विश्वास ठेवावा हे आपल्यावर असत रे विर आणि मी फक्त गुरुजींना तुझ्यासाठी बोलवलेलं.. त्यांचं आणि आपलं रिलेशनशिप अगदी घरच्या सारख आहे आणि त्यांच्या ओळखीत सुद्धा एखादी चांगली मुलगी असेल.. म्हणुन मी बोलवलेलं.. पण आता तुझ्यासाठी मुलगी शोधायची काही गरज नाही मला.. "

विराज : "तु नाराज नाहीस ना माझ्यावर.."

अनिता : "अजिबात नाही.. ह्यात नाराज होण्यासारख काही आहेच नाही.. "

"लव्ह यु मम्मा..", विराजने अनिताला घट्ट मिठी मारली आणि आपल्या रूममध्ये निघाला..

★★★★★

इथे मनवी पार्टीच्या तैयारीला लागली.. थोड्याच वेळात तिची मित्र मंडळी तिच्या घरी येणार होते. ती घराबाहेरच फेऱ्या मारत होती.. सात वाजुन गेले तरी अजुन कोणीच कस नाही आलं.. असा ती विचार करत होती तोच गाडीच्या हॉर्नचा आवाज तिला ऐकु आला.. रोहन गाडी बाहेर उतरून तिला हात दाखवत होता.. पण तीच लक्ष मात्र काही तरी वेगळंच शोधण्यात होत. रोहनने गाडी बाहेर पाऊल ठेवताच बाकीची इतर मंडळी सुद्धा बाहेर आलीआणि फायनली तिला शौर्य दिसला.. त्याला बघताच एक वेगळीच सनक तिच्या डोक्यात गेली आणि ती धावतच रोहनजवळ जाऊन उभी राहिली.. सगळ्यांना हाय हॅलो करत ती आपल्या घरी घेऊन आली.. सगळेच तीच घर बघण्यात बिजी होते आणि सोबत तिने केलेलं घराचं डेकोरेशन...मनवीने मोठ्या आवाजात म्युसिक सिस्टिम ऑन केला. आता खरी पार्टी रंगात आल्याची फिलींग सर्वांना झाली..सगळे एका सोफ्यावर बसले.. तस सगळ्यांनच्या पुढ्यात ती थंडयाने भरलेले ग्लासेस घेऊन आली.. गाडीत बडबड करून सगळ्यांचे घसे तसेही कोरडे पडले होते.. सगळ्यांनी एक एक करून समोर दिसणाऱ्या ट्रे मधील ग्लास उचललं.. शौर्य ही ग्लास उचलायला गेला पण मनवीने रिकामी ट्रे आपल्या हातात पकडत दुसऱ्या हाताने ग्लास शौर्य समोर धरला.. शौर्यने ग्लास पकडला तरी मनवी मात्र ग्लास सोडत नव्हती.. ती त्याच्याकडे बघत त्याला एक स्माईल देत होती.. शौर्य रोहनकडे बघु लागला.. रोहन आणि त्यासोबतच इतर मंडळी आपलं कोल्ड्रिंक्स पिण्यात बिजी होते... शौर्यने शेवटी ग्लास सोडत आपला हात मागे घ्यायचा विचार केला तस मनवीने ग्लास सोडला आणि कोल्ड्रिंक शौर्यच्या शर्टवर सांडलं..


"मनवी काय केलंस हे..", शौर्य मनवीवर थोडं भडकलाच आणि उभं रहात तो आपलं शर्ट झटकू लागला


मनवी :"आय एम सॉरी ना शौर्य.."

रोहन : "अरे शौर्य चुकुन झालं असेल.. एक काम कर तु वॉशरूममध्ये जाऊन क्लीन करून घे.."

मनवी : "होणं.. एक काम कर इथे वॉशरुम आहे.. मी दाखवते ये तुला..", अस बोलत मनवी शौर्यला सोबत घेऊन गेली..

शौर्यला वॉशरूम दाखवत ती रोहनला आवाज देत बोलवू लागली..

रोहन : "काय झालं??"

मनवी : "मी तुझ्यासाठी शर्ट घेतलेलं म्हणजे पार्टी झाल्यावर मी तुला देणारच होते..बट तुला काही प्रॉब्लेम नसेल तर ते शर्ट शौर्यला देऊ का?? नाही म्हणजे एवढ्या थंडीत तो एवढा वेळ अंगावर ओल शर्ट कस काय घालेल ना.."

रोहनला ही मनवीच बोलणं पटत.. तो ही लगेच हो बोलतो..

मनवी धावतच आपल्या रूममध्ये जात शौर्यसाठी शर्ट घेऊन येते.. खर तर तिने ते शर्ट शौर्यसाठीच घेतलेलं असत.. फक्त तिला त्याला द्यायला बहाणा हवा असतो..

आपल्या पहिल्या प्लॅनमध्ये ती सक्सेस झालेली.. म्हणुन खुप खुश होती.. आता ती पुढच्या तैयारीला लागली..

(आता पुढे मनवीचा काय प्लॅन असेल?? त्यासाठी भेटूया पुढच्या भागात.. पण हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल