मन करारे प्रसन्न sunil taras द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मन करारे प्रसन्न

जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे 1700 शतकातील ओळीतल हे छोटंसं वाक्य किती अर्थ पुर्ण आहे. पण आपलं आयुष्य जातं हे समजायला पण तरी समजत नाही.
मला जो अर्थ समजला तो तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अलीकडचे जग हे computerised world किंवा संगणकीय जग आहे. आपण संगणकाच्या भाषेत समजू या. संगणकला तीन भाग असतात खालीलप्रमाणे
1) इनपुट – ज्यातून आपण data फीड करतो.
2) प्रोसेसर – म्हणजे CPU जो data प्रोसेस करतो
3) आउटपुट – जो माहितीपूर्ण information देतो ज्या मुळे योग्य निर्णय घेता येतो.
संगणकामध्ये जर data correct किंवा बरोबर फीड केला तर योग्य माहिती मिळते आणी निर्णय योग्य घेता येतो. तेच चुकीचा data फीड केला तर चुकीची माहिती मिळते आणी निर्णय चुकतात.
तसेच मनाचे आहे, मनाचेही तीन भाग असतात
1) विचार : जे आपण वाचतो, (पेपर, मॅगझीन, स्टोरी…), जे आपण पाहतो (TV, Social media), जे ऐकतो (TV, phone, Social media….) त्यातून विचार निर्माण होतात.. सायकोलॉजिस्ट म्हणतात असे साठ ते सत्तर हजार विचार माणसाच्या डोक्यात दिवसाला येतात.
2) मन : हा महत्वाचा घटक आहे, आता एवढ्या आलेल्या विचारातून माणूस काही विचार डोक्यात घेतो आणी त्याचे श्रवण करतो म्हणजे process करतो. इथे त्याला चॉईस असते कुठले विचार श्रवण करायचे योग्य विचार म्हणजेच good thoughts किंवा अयोग्य विचार म्हणजेच bad thoughts.
3) कृती : एकदा श्रवण झाले की माणूस ते कृती मध्ये अमलात आणतो. चांगल्या विचारणे कृती चांगली होते आणी आपले निर्णय योग्य ठरतात आणी आपल्याला success, यश प्राप्ती होते त्याला आपण आपलं नशीब चांगलं म्हणतो. आणी अयोग्य विचाराने श्रवण चुकीचे होते आणी निर्णय चुकतात.
जर मन प्रसन्न असेल म्हणजेच मनातील श्रवण करणारे विचार चांगले असतील त्यामुळे कृती चांगली होईल आणी सर्व सिद्धीचे म्हणजे प्राप्तीचे कारण बनेल.
आता हे चांगले विचार म्हणजे तरी काय? तर जे काही साठ ते सत्तर हजार विचार येतात त्याला फिल्टर लावायचा तो आपल्याच हातात असतो आणी कमी आणी चांगल्या विचाराचे मनामध्ये श्रवण करत राहायचे उदाहरण म्हणजे…
1) मी खूप आनंदी आहे आणी सदैव आनंदी राहणार
2) मी माझ्या प्रत्येक कर्मामध्ये सेवाभाव ठेवेल
3) माझ्यामध्ये सर्वांबद्दल चांगले भाव रुजू दे आणी आदर असू दे.
4) मी physically, mentally आणी emotionally स्थिर असू दे
5) माझी कृती ही प्रामाणिक असेल
6) मी सदैव परमेश्वराचे चिंतन करेन……….
हे असे विचार मनामध्ये श्रवण केले तर नक्कीच कृती चांगली होईल आणी त्याचा रिसल्ट हा समाधानी असेल. पण हेच मानवला उमगत नाही आणी तो नकॊ ते विचार मनात फीड करतो, ते कसे ते पाहू या..
1) एखाद्या बद्दल तिरस्कार
2) हावरट पणा म्हणजे सगळं मलाच कसं मिळवता येईल
3) तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करणे
4) महिला बाबतीत विचार केला तर माझ्या पेक्षा तिच्याकडे छान दागिने, साड्या आणी बरेच काही…
5) व्यसन….
पाहिली तर लिस्ट बरीच मोठी होईल.

तुम्ही ह्या bad thoughts/ negative thoughts/ चुकीचे विचारासाठी माणसाला खूप एनर्जी खर्च करावी लागते किंवा शक्ती वाया घालावावी लागते कारण ते सरळ नसतात. असे विचार श्रवण केले की माणसाचे कर्म किंवा कर्तव्य चुकतात आणी माणूस त्याचा दोष दुसऱ्यांना किंवा नशिबाला देतो

हे सगळं आपल्या हातात आहे हे आपल्याला उमगत नाही.कुठले विचार मनामध्ये ठेवायचे आणी कुठले काढून टाकायचे ही कला आपल्यात निर्माण झाली ना आपण जिवनात नेहमी समाधानी आणी आनंदी राहू शकतो.
तेच तुकाराम महाराजांनी ओवी मध्ये व्यक्त केलंय मन प्रसन्न ठेवलं म्हणजेच चांगले विचाराचे श्रवण केले तर सर्व सिद्धी म्हणजे यश, आनंद आणी सुख, समाधान मिळवू शकतो.

धन्यवाद!

सुनिल तरस