अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 33 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 33

"शौर्य तु माझा फोन का उचलत नाहीस..", मनवी एकटीच स्वतःशी बोलत होती..


"तु बघच मी आता काय करते ते..", अस बोलत स्वतःच्या रूम मधील सामान ती अस्तव्यस्त करू लागली..


★★★★★


खूप दिवसांनी शौर्य आज लेक्चर अटेंड करणार होता. नेहमीप्रमाणे सगळेच कॉलेजच्या गेटजवळ एकमेकांची वाट बघत थांबले होते..


समीरा : "काय रे रोहन.. मनवी कुठेय??"


रोहन : "काय माहीत नाही ग.. फोन पण उचलत नाही.. मे बी येणार नसेल.."


मनवी येणार नाही म्हटलं की शौर्यला थोडं बर वाटत..


सगळेच क्लासरूममध्ये जाऊन बसले.. लेक्चर चालु व्हायला अजून पंधरा मिनिटं तरी शिल्लक होती..


शौर्य : "समीरा मला नॉटबुक दे ना तुझी.."


समीरा : "कोणती??"


शौर्य : "मी मुंबईला गेल्यानंतर ज्या लेक्चरचे नोट्स सरांनी दिलेत त्याची.."


वृषभ : "सगळेच लेक्चर झालेत आणि नोट्स लिहीत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकल बुक्स आणि प्रोजेक्ट जे सबमिट करायचेत ते कर आधी.."


समीरा : "हो ना.. मेथ्सची प्रॅक्टिकल बुक हवी तर घे.. बिकोज ती सबमिट करायचीय.. मंडेला.."


शौर्य : "तुम्ही लोक मला आज सांगतायत.."


समीरा : "मला वाटलं तुला माहीत असेल म्हणजे वृषभ वैगेरे तुझ्या सोबत असतात त्यांनी सांगितलं असेल तुला.."


वृषभ : "मला अस वाटलं की तू सांगितलं असशील त्याला.."


रोहन : "कश्याला एवढं टेन्शन घेतोस.. काही होत नाही आणि तस पण आठवडा आहे.. आरामात करशील.."


शौर्य : "हम्मम्म"


सर वर्गात येतात.. तसे सगळे शांत बसुन लेक्चरमध्ये लक्ष देतात..


लेक्चर संपताच सगळे केंटिंगमध्ये जायला निघतात..


शौर्य : "गाईज तुम्ही जावा मी लायब्ररीत जातोय.. मला बुक्स पण रिन्यू करून घ्यायचीय आणि बुक्स पण कम्प्लिट करायचीय.."


रोहन : "ए शौर्य यार.. बुक्स नंतर कर ना कम्प्लिट.. काय तु पण.. "


वृषभ : "हो ना.. लायब्ररीत जाऊन ये.. आम्ही वाट बघतोय केंटिंगमध्ये"


शौर्य : "मला नाही जमणार यार प्लिज.."


राज : "समीरा... सांग ना त्याला.."


टॉनी : "हो ना समीरा सांग ना त्याला.."


शौर्य : "ए तुम्ही लोक सारख तिला काय माझी कंप्लॅन्ट करताय.. "


राज : "आम्ही बोललेलं तुला ऐकायला येत का..??"


शौर्य : "राज तुला तर ना मला चिडवायला कारणच हवं असत.."


समीरा : "मी एक बोलु का, तु रूमवर जाऊन सुद्धा बुक्स कम्प्लिट करू शकतोस.. नंतर प्ले हाउसमध्ये येऊ नकोस हवं तर..."


शौर्य : "मी येतो लायब्ररीत जाऊन.. तुम्ही केंटिंगमध्ये जाऊन बसा.."


रोहन : "तु नंतर पण जाऊ शकतोस ना लायब्ररीत.."


"हो ना आता भूक लागलीय यार.. चल आधी केंटींगमध्ये..", टॉनी आणि राज शौर्यच्या खांद्यावर हात टाकतच त्याला कॅंटिंगमध्ये घेऊन गेले..


सगळे नेहमीप्रमाणे आपल्या जागेवर जाऊन बसले.. वृषभ आणि टॉनी सगळ्यांसाठी सॅंडविच आणायला गेले असतात..


रोहन मनवीला फोन लावत असतो..


राज : "मगासपासून कोणाला रे फोन लावत बसलायस??"


रोहन : "अजुन कोणाला मनवीला.."


सीमा : "अरे हा.. का आली नाही ती आज???"


रोहन : "फोनच उचलत नाही ग.. काही कळतच नाही.."


सीमा : "थांब मी लावून बघते.."


सीमा स्वतःचा फोन मधुन मनवीला फोन लावु लागली..


राज : "तु वेडी आहे का?? ती त्याचा फोन उचलत नाही तर तुझा का उचलेल.."


समीरा : "हो ना.."


सीमा राज ला काही बोलणार तोच मनवीने तिचा फोन उचलला..


"हॅलो मनवी... कशी आहेस..??"


मनवी : "मी आहे बरी.. मला काय झालं??"


सीमा : "मग तु कॉलेजमध्ये का आली नाहीस.."


रोहन : "सीमा मला दे ना.."


सीमा : "एक मिनिट!!! रोहनला तुझ्याशी बोलायचंय.."


अस बोलत सीमा ने रोहनला फोन दिला..


रोहन : "हॅलो मनु तु माझा फोन का नाही उचलत..??"


मनवी : "मला नाही बोलावसं वाटत तुझ्याशी.. बाय..."


मनवी पुढे काही न बोलता सरळ फोन कट करते.. मनवीने अस बोलताच रोहनचा चेहरा पडतो..


"हिला काय झालंय आता..",असा तो विचार करू लागतो..


राज : "काय झालं??"


रोहनच राजच्या बोलण्याकडे लक्षच नसत..


राज : "अरे झालं तरी काय?? अस तोंड का पाडुन बसलायस??"


"मी आलोच", अस बोलत रोहन स्वतःच हेल्मेट घेऊन तिथुन निघाला..


टॉनी आणि वृषभ सगळ्यांसाठी सॅंडवीच घेऊन तिथे आले...


वृषभ : "गाईज सॅंडवीच..."


टॉनी : "रोहन??"


समीरा : "तो गेला.. मला वाटत मनवी काही तरी बोलली असावी.."


सीमा : "मनवीने माझा फोन उचलला.. त्याचा का नाही उचलत आहे ती..??"


वृषभ : "काय झालं??"


राज त्याला झालेला प्रकार सांगतो..


वृषभ : "काही तरी झालं असेल रे दोघांच.. सोड आपल्याला काय?? दोघे भांडुन परत एकत्र होतील.."


शौर्यला पुन्हा कालचा प्रसंग आठवु लागला आणि त्यात हरवुन गेला..


राज : "ए शौर्य तुझा पण उपवास आहे का?? नाही म्हणजे पुढे ठेवलेलं सॅंडवीच तु खात नाहिस म्हणुन विचारलं.."


शौर्य : "ते मनवी.. "


समीरा : "ती तशीच आहे रे.. Ignore her.."


वृषभ : "हो ना. तु नको टेन्शन घेऊस मी बोलतोय ना ते दोघे भांडतील आणि पुन्हा एकत्र येतील.."


शौर्य : "समीरा ऐकना.. मला तुझ्याशी काही तरी महत्वाच बोलायचय.. "


समीरा : "हा बोलणं.. "


शौर्य : "थोडं पर्सनल आहे म्हणजे इथे नाही बोलु शकत. एक काम करतो मी लायब्ररीत जाऊन येतो आधी.. तु प्ले हाउसमध्ये येशील ना जेवुन झाल्यावर तेव्हा भेटुन बोलूयात.. नाही तर फोन वर बोलूयात.. चालेल??"


समीरा : "ओके.."


उगाच समीरामध्ये आणि माझ्यात गैरसमज नको असा विचार करून शौर्य समीराला मनवी बद्दल सांगायच ठरवतो..


इथे मनवीची वडील देखील मिटिंग आटोपुन घरी आलेले.. ते घरी येताच मनवीला आवाज देत तिच्या रूममध्ये गेले... मनवी ही काय रूमची हालत बनवुन ठेवली आहेस तू आणि ही औषध जशीच्या तशी..? तु मला प्रॉमिज केलेलस तु औषध वेळेवर घेशील म्हणुन.. तु औषध का नाही घेतलंस.".


मनवी : "डॅड तो माझ्याशी भांडुन गेला.. मला फसवलं त्याने."


मनवी तिच्या डॅडला रडतच मिठी मारू लागली


डॅड : "कोणी रोहनने??"


मनवी : "शौर्यने डॅड.. मी त्याला सोडणार नाही.. He will pay for its.. "


डॅड : "मनु तु काय बोलतेस?? तुझं रोहनवर प्रेम आहे.."


"मला शौर्य आवडतो डॅड.. मी तुला आधीही सांगितलंय ह्या बद्दल.. I want Shaury...",बाजुलाच असलेला फ्लॉवर प्लॉट ती जोरातच जमिनीवर आदळत म्हणाली..


डॅड : "तु शांत हो आणि औषध घे. आपण शौर्यला बोलवूया इथे ठिक आहे.."


मनवी : "डॅड तो माझे काल पासुन फोनच उचलत नाही आहे.. ना मी केलेल्या मेसेजेसना रिप्लाय देत आहे.."


डॅड : "मी बोलतो त्याच्याशी.. तु औषध घे."


मनवीला औषध देत तिचा डॅड तिच्या रूममधुन बाहेर पडतो.. गळ्यातील टाय ते थोडी लूज करतच हातात फोन घेत डॉक्टरांना लावतात.. डॉक्टरांचा फोन नेमका लागत नसतो.


रोहन : "अंकल मनवी..??"


समोर रोहनला बघताच ते फोन ठेवुन देतात.


डॅड : "अरे रोहन बेटा ये... बस.."


रोहन समोर कस रिऍक्ट व्हावं त्यांना कळत नव्हतं..


रोहन : "अंकल मी मनवीला भेटु शकतो का?? ती माझा फोन उचलत नाही.. प्लिज अंकल.."


डॅड : "तु बस मी तिला बोलावतो.."


मनवीला बोलवायला ते तिच्या रूममध्ये जाणार तोच मनवी खाली येते..


रोहन तिला बघतच सोफ्यावरचा उठुन बसतो..


रोहन : "मनवी काय झालं?? तु माझा फोन का नाही उचलत.."


मनवी : "मला तु नाही आवडत रोहन.. I Hate You आणि प्लिज सारख सारख अस माझ्या मागे ये जा नको करत बसुस.. तुझ्या बद्दल जे मी ऐकलं ना ते मला आधी कळलं असत तर कदाचित मी तुला हो बोललेच नसती.."


रोहन : "काय ऐकलस माझ्याबद्दल..?? मला पण कळु दे.. आणि उद्या तुला कोणीही काहीही सांगेल तु ते ऐकून मला सोडून जाशील..?"


मनवी : "डॅड प्लिज ह्याला जायला सांग.."


डॅड : "अग पण त्याच ऐकुन तर घे.."


मनवी : "मला कोणाचच काहीही ऐकायचं काही.."


रोहन : "मनवी मी नाही ग तुझ्याशिवाय राहु शकत..प्लिज अस नको ना वागुस.."


मनवी रोहनच काहीही ऐकुन न घेता सरळ रूममध्ये जाऊ लागली..


"मनु प्लिज ना.. मला सांग तरी तुला कोण काय बोललं ते.. मनवी...", रोहन तिला आवाज देत होता पण मनवीने जरा सुद्धा मागे वळुन पाहिले नाही ती सरळ आपल्या रूममध्ये निघुन गेली..


मनवीचे डॅड रोहनच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत रहायला सांगतात..


रोहन : "अंकल तिचा काही तरी गैरसमज झालाय.. मी काहीही केलेलं नाही.."


डॅड : "तिचा राग शांत झाला की बोलेलं ती तुझ्याशी.."


रोहन रडतच तिथुन निघतो... बाईकला किक मारत सुसाट वेगात ती पळवतो.. डोक्यात मनवी सोबत घालवलेले क्षण त्याला दिसत असतात... त्याला काय करावं सुचत नसत..


शौर्यसोबत बोलायची इच्छा त्याच्या मनात होते.. तो बाईक एकीकडे पार्क करतो.. आणि शौर्यला फोन लावतो..


शौर्य : "हा रोहन बोल.."


(शौर्य लायब्ररीत असल्यामुळे अगदी हळु आवाजात बोलतो)


"शौर्य मला जगावस नाही वाटत यार.", रोहन रडतच शौर्यला बोलतो..


"अस का बोलतोयस?? काय झालं?? कोण काही बोलल का तुला??",फोन वर बोलताना आता मात्र शौर्यचा आवाज वाढला असतो.


"शहहहहह..",लायब्ररीत बसलेले सगळे त्याला शांत बसायला सांगतात


सगळ्यांना सॉरी.. बोलत शौर्य लगेच तिथुन बाहेर पडतो..


रोहन : "मनवीने माझ्याशी असलेलं रिलेशनशिप संपवलं यार.. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय.. तुला माहिती ना.. ती माझ्या आयुष्यात नसेल तर मी वेडा होईल रे.. मला नाही कळत मी काय करू.. शौर्य मी काहीच नाही केलंय रे.. ती का अस वागतेय माझ्याशी.."


शौर्य : "तु आधी शांत हो बघु.. नक्की काय झालं ते सांगशील मला.."


रोहन घडलेला सगळा प्रकार शौर्यला सांगतो..


रोहन : "शौर्य मला शेवटच्या क्षणी तुझ्याशी बोलावसं वाटलं म्हणुन तुला फोन केला.."


रोहनच अस बोलणं ऐकुन शौर्य घाबरून जातो..


"ए रोहन प्लिज हा.. नको तो वेडेपणा काही करायचा नाही हा.. मी मनवीशी बोलतो.. तिला तुला फोन करायला लावतो.. फक्त पाच मिनिटं दे मला.."


रोहन : "नाही करणार ती.. ती का अशी वागतेय यार माझ्याशी.."


शौर्य : "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि मला प्रॉमिज कर तु काहीही करणार नाहीस.."


रोहन : "सॉरी शौर्य मी तुला असलं प्रॉमिज नाही करू शकत जे माझ्याकडुन पूर्ण होईल असं मला वाटत नाही.."


शौर्य : "बर बाबा.. तु मला पाच मिनिटं तर दे.. मनवीला मी समाजवतो.. ती करेल तुला कॉल.."


रोहन : "मी वाट बघतोय.."


शौर्यने फोन कट करत मनवीला केला.. शौर्यच नाव आपल्या मोबाईल स्क्रिनवर बघुन मनवी खुश झाली..


मनवी : "तुझ्याच फोनची वाट बघत होती शौर्य मी.. मला माहित होतं तु फोन करणार ते.."


शौर्य : "का अस वागतेस ग तु..?? तो रोहन जीव देईल तिथे.. प्लिज त्याला फोन कर.. प्लिज.. तु माझा राग ताच्यावर का काढतेस.. तो वेड्यासारख प्रेम करतोय ग तुझ्यावर..त्याच्या प्रेमाची जरा सुद्धा कदर नाही का ग तुला.."


मनवी : "नाही.."


शौर्य : "मनवी अस नको बोलुस ग.. तो खरच त्याच्या जीवाच काही बर वाईट करून घेईल.. प्लिज त्याला एकदा कॉल कर.."


मनवी : "ठिक आहे.. तु बोलतोस तर.. मी त्याला कॉल करेल पण माझ्या दोन अटी आहेत त्या तुला मान्य असतील तर ठिक नाही तर जाऊ दे.. "


शौर्य : "काय अट आहे तुझी.."


मनवी : "काल जे घडलं ते तु कुणालाही सांगणार नाहीस. इव्हन समीराला सुद्धा.."


शौर्यला त्या क्षणाला काय करावं ते सुचत नसत..


शौर्य : "तु बोलशील तस.. नाही सांगत मी कुणाला.. पण प्लिज त्याला कॉल कर.."


मनवी : "समीराची शप्पथ घेऊन सांग की तू कोणाला सांगणार नाही...."


शौर्य : "समीराची शप्पथ मी नाही सांगत कुणाला. प्लिज आता तरी त्याला कॉल कर."


मनवी : "आणि दुसरी अट तर ऐक.."


शौर्य : "मनवी मी तुझ्या पाया पडतो तु त्याला कॉल कर.. तु बोलशील ते सगळं मला मान्य आहे.. प्लिज.. रोहनला कॉल कर आधी."


मनवी : "ओके"


मनवीचा फोन कट करून शौर्य खालीच बसतो.. मनवी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेल ह्यावर त्याच्या विश्वासच बसत नसतो.. तो तिथेच जिन्यावर बसुन रोहनचा विचार करत त्याच्या फोनची वाट बघत बसतो.. जवळपास एक दिड तासाने त्याला रोहनचा फोन येतो..


"

शौर्य खुप खुप थेंक्स.. तु मनवीला झालेला गैरसमज दूर केलास.. आय लव्ह यु यार..", रोहनला अस खुश बघुन शौर्यला बर वाटत..


शौर्य : "रोहन परत अस वेड्यासारखं करू नकोस रे.. किती घाबरून गेलो यार मी.. तुला काय झालं असत मग.."


रोहन : "मी मनवी शिवाय नाही जगू शकतरे शौर्य.. आणि आज तु नसतास तर कदाचित मी.."


"

पुढे काही बोलु नकोस यार.. बस तु खुश रहा..",शौर्य मध्येच रोहनला तोडत बोलला..


शौर्य फोन ठेवुन लायब्ररीत जाणार पण लायब्ररी बंद झाली होती.. तो तसाच आपल्या रूमवर आला.. त्याला न राहवून रोहनची काळजी वाटत होती.. तोच पुन्हा त्याचा फोन वाजला..


मनवीचा फोन होता..


शौर्यने उचलून फोन सरळ कानाला लावला..


मनवी : "तु बोललास त्या प्रमाणे मी केलं.. आता मी बोलेल त्या प्रेमाणे तु करायचं.."


शौर्य : "मनवी मी तुला आधीच बोललोय की मी नाही सांगणार कोणाला.."


मनवी : "ते तु करशील हे मला माहिती पण मी त्याबद्दल बोलतच नाही आहे..मी दुसऱ्या अटी बद्दल बोलते"


शौर्य : "काय आहे तुझी दुसरी अट??"


मनवी : "वेळ आल्यावर सांगेल.. तो पर्यंत एन्जॉय कर.."


शौर्य पुरता आता मनवीच्या जाळ्यात अडकत चाललेला.. त्याच डोकं काही काम करत नव्हतं..


जेवणासाठीची बेल सुद्धा वाजली तरीही त्याच लक्ष नव्हतं.. नेहमीप्रमाणे वृषभ, राज आणि टॉनी त्याच्या रूममध्ये आले..


शौर्य बेडवर झोपुन एक टक सीलिंगवर फिरणाऱ्या फॅनकडे बघत बसला होता..


वृषभ : "ए शौर्य जेवायला चल..."


शौर्यच लक्षच नसत..


राज : "ए शौर्य.."


(राज जोरात ओरडतो तस शौर्य उठून बसतो)


शौर्य : "तुम्ही लोक कधी आलात???"


"तु डोळे उघडे ठेवुन झोपलेलास तेव्हा", राज हसतच बोलतो


वृषभ : "काही प्रॉब्लेम आहे का शौर्य??"


शौर्य : "नाही यार.. ते मी विचार करत होतो.."


वृषभ : "नक्की"


शौर्य : "हो नक्की..."


टॉनी : "मग चल जेवायला जाऊयात.."


सगळे जेवुन झाल्यावर प्ले हाउसला जातात.. समीरा प्ले हाऊस बाहेरच शौर्यची वाट बघत असते.. सगळे आत निघतात.. समीरा आणि शौर्य तिथेच एका पायरीवर बसतात..


समीरा : काय सांगणार होतास तु..?


शौर्य : "समीरा.. ते म..."


(शौर्यला मनवी आणि त्याच्या मध्ये झालेल बोलणं आठवत.. तो शांत बसतो..)


समीरा : "काय झालं?? काल पार्टी पासुन बघतेय तुला..नुसतं शांत शांत आहेस.. काही प्रॉब्लेम आहे का शौर्य..."


शौर्यला समीराला काय सांगाव ते कळत नसत..


(आता पुढे काय..? त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)


क्रमशः


©भावना विनेश भुतल