अपराधी मैत्रीचा Suraj Kamble द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराधी मैत्रीचा

नुकताच 12 वी science चा निकाल लागला होता,काय करावं,engeeneering करायचं होतं पण त्यासाठी एक परिक्षा देणं गरजेचं होतं,ती काही सूरज म्हणजे मीच,दिली नव्हती,मग आता एक वर्ष गॅप द्यायची का,???की दुसरं शिक्षण घ्यायचा असा मनात घोळ चालू होता,शिक्षक होण्याची आस,आणि इच्छा खूप लहानपणापासून होती,ती अजून काही पूर्ण झाली नाही,पण त्या वर्षी मी डी. एड.प्रवेश घेतला...
नुकतंच कॉलेज सुरू झालं,मी आपला नियमितपणे कॉलेजमध्ये जाऊ लागलो,तसा आतापर्यंत मुलींचा संपर्क, आणि 12 वी पर्यंत मुलींसोबत मैत्री हे तर खूप दूर झालं, पण साधं बोलणंही माझ्याकडून होत नव्हतं,आता होत नव्हतं म्हणण्यापेक्षा तसा योग कधी आला नाही,आपलंच विश्व,आपलाच अभ्यास ,आपण बरं अस एकला चलो रे,आतापर्यंत चाललं होतं.......
पण डी. एड. ला आल्यावर नेहमी मुलींचा संपर्क येणार,तसं ते शिक्षण च आहे,पण मी मुद्दाम मुलींच्या मैत्रीपासून दूरच राहायचो,आता कारण तर मलाही माहिती नव्हतं... अशी एक दोन महिने आरामात गेली,नियमितपणे कॉलेज, आणि आपला अभ्यास असंच सुरू होतं... शेवटी मात्र आता मुलींसोबत बोलावंच लागलं,त्यांच्या सोबत सराव पाठ घेणे,टाचण काढताना मदत घेणे,शैक्षणिक साहित्य बनवताना मदत घेण्यासाठी मुलींसोबत माझा संपर्क हा वाढत गेला....
शेवटी न राहवून,दिसायला सावळा रंग,टपोरे डोळे,कमरेपर्यंत लांब केस,बेधडक बोलणारी,अभ्यासात हुशार,आणि सर्वांना सारखी समजणारी एक मुलगी,संचिंता,या मुलीशी माझी मैत्री होऊ लागली...
नियमित बोलणे,कॉलेजमध्ये सोबत येणे,कधी मग मैत्री दिवस आला का एकमेकांना frndship रिबन बांधून देने,कधी चाय टपरीवर चाय प्यायला जाणे,कधी कधी संचिता च्या घरी जाणें,
तसं संचिता च्या घरचं वातावरण कडक नसल्यामुळे घरी गप्पा मारणे,कधी जेवण करूनच वापस येणे,आई बाबा असल्यास त्यांच्याशी तासनतास बोलत बसणे, या सर्व गोष्टी सुरळीतपणे चालू होत्या...मग कधी एकाच डेस्कवर बसून कॉलेज ची lecture करणे,कधी एकमेकांच्या सुखदुःख वाटून घेणे,एवढंच नाही तर मी गावाला गेलो असता,किव्हा मला बर नसता,सर ला सुरज नी पहिलेच हे शैक्षणिक साहित्य वर्गात आणून ठेवलं असं सांगून सरांना खोटं बोलणे,अशी आमची दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती....
आमच्या दोघांच्या मैत्रीत कधी आमचे सोबतचे मित्र मागे पडले आम्हालाच माहिती नाही,कुठे पण सुरज असला की संचिता असायला पाहिजे एवढं चांगलं नातं तयार झालं होतं...ज्याला आजच्या भाषेत स्ट्रॉंग बॉंडिंग आमच्यात तयार झाली होती,...डी. एड.च पहिलं वर्ष आता संपलं होतं, दोघांनाही चांगले मार्क्स मिळाले होतें,दुसऱ्या वर्षाला ही चांगले मार्क्स मिळणार असं मनात ठरवलं होतं, आणि तसा अभ्यास आणि कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये डान्स,नाटिका,पथनाट्य,भाषण स्पर्धा,या सर्व स्पर्धामध्ये आमचा दोघांचा ही सहभाग नियमित असायचा,असं म्हणता येईल,तिची मैत्री माझ्याशिवाय अर्धवट होती,आणि माझी मैत्री तिच्या,म्हणजे संचिताच्या मैत्रीशिवाय अर्धवट...
डी. एड.दुसरं वर्ष हे आता अर्धं झालं होतं,मला संचिताशिवाय करमत नव्हतं,एकदिवस जरी दिसली नाही तर मन बैचेन व्हायचं,जीव कासावीस करायचा,in short i am in love with संचिता,होय मला तिच्या जवळीकतेने, तिच्या रूपाने नाही तर तिच्या स्वभावावर,तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर,प्रेम झालं होतं,होय मी संचिता च्या आयुष्यात पहिली मैत्रीण झालेल्या ,आणि माझ्याचकडून मैत्रीतून प्रेम झालेल्या व्यक्तीवर माझा जीव अटकला होता,मी संचिताच्या प्रेमात पडलो होतो....
आता प्रेम तर झालं,पण सांगणार कसं ही मनात भीती होती,कारण आपली ही आयुष्यात पहिल्यांदाच बनलेली मैत्रीण होती,आणि जर मी प्रेम झालं,किव्हा प्रेमाची कबुली संचिताला दिली तर मैत्री तुटून जाईन,या भीतीने मी तिला काही सांगत नव्हतो,किव्हा माझी भीती मला मैत्री तुटेल या कारणाने हे सांगावं असं काही करू देत नव्हतं...
पण किती दिवस हे लपवून ठेवणार होतो,किव्हा संचिता ही मला चांगल्या प्रकारे ओळखत होती,म्हणून तिला ही माहिती झालं होतं की सुरज ला आपल्यावर प्रेम झालं आहें, कारण मी तिच्या आवडीची सॉंग ऐकायचो,तिला नेहमी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत टेक्स्ट massege करत असायचो, त्यामुळे तिला माहिती पडलंच की सुरज आपल्या प्रेमात पडलाय म्हणून....
पण माझी काही हिम्मत होत नव्हती संचिता जवळ म्हणून दाखवायची,अशी अजून एक दोन महिने चालली गेली,पण आता काही केल्या मनात ठेवण अवघड जात होतं,एकदाच बोलूनच द्यायचं हे ठरवलं,पण समोरासमोर बोलू शकत नव्हतो,कारण मैत्री राहील,नाही राहील ही शास्वती खूप कमी होती,शेवटी एक दिवस massege वर संचिताला मनात जे होतं ते सांगून टाकलं,indirectly मी तिला माझ्या प्रेमाचा प्रस्ताव,propose तिला या मोबाईल च्या माध्यमातून केला,आणि तिला हे ही म्हटलं की उत्तर हे उदयाला दे,किव्हा विचार करून दे,जर हो असेल तर मी आयुष्यात राहील,नाही तर तुला जे वाटेल ते तू निर्णय घे,कारण मी मैत्रीच्या समोर गेलेलो आहे,....
दुसऱ्या सकाळी संचिता चा msg आला,आणि म्हणाली सुरज मला रात्रभर काही केल्या झोप आली नाही,मी तर झोपलोच नव्हतो,मी तिच्या उत्तराची वाट पाहत बसलो होतो,शेवटी msg चा उत्तर आलं,त्यात ती म्हणाली,सूरज तू ही माझा खूप जवळचा मित्र आहे,आणि आयुष्यात पहिल्यादा कुणी एवढा जवळ आलेला आहे,पण या प्रेमाच्या मागे न लागता पूर्ण आपण मैत्रीत जगलं तर आवडेल नाही का???
म्हणजे तू मला आवडत नाही असं नाही तू आवडतो पण एक चांगला,जवळचा,जिवाभावाचा मित्र म्हणून,ज्याला मी कधीही गमावून बसविण्याची तयारी ठेवू शकत नाही,तू मला मित्र म्हणूनच हवा आहेस,तू माझ्यावर प्रेम करतोस हे मला माहितीच होत,पण मी तू सांगशीन यासाठी चूप बसली होती,आज तू प्रेमाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला,मला वाईट वाटलं नाही,आणि मी हो ही म्हणलं असतं पण आपण केलेल्या त्या मैत्रीचं काय????
तुझ्यासोबत आयुष्य घालविणारी प्रत्येक व्यक्तीच नशीबवान असेल,पण तुझासारखा मित्र मिळणं यासाठी खूप मोठं भाग्य लागतं, त्यामुळे या प्रेमाच्या विषयात न पडता,आपण पुन्हा एकदा मित्र म्हणूनच राहू,मी हे विसरून जाईन की कधी तू मला प्रेमाचा प्रस्ताव घातला होता,किव्हा तुझं माझ्यावर प्रेम आहे,
ती सारखे msg करत होती,आणि माझ्या डोळ्यातून मात्र आसवं निघत होती, कारण मी पहिल्या प्रेमात हरलो होतो,मैत्रीच्या विषयांत जरी जिंकलो असलो तरी मात्र,प्रेमाच्या विषयांत पूर्णतः हरलो होतो.....
त्याचं वेळेस एक massage माझ्या वाचनात आला होता,की जखम झाल्यावर तिच्यावर मलम लावल्यास ती लवकर बरी होईल,पण जखम भरली आहे,मग तिच्यावर मलम लावण्यात काय फायदा????पुन्हा एक की तुटलेला काच जसा जुळतं नाही,तसंच एखाद्याच मन तुटलं की लवकर जुळत नसतं, तस माझं झालं होतं,तरी संचिता न मैत्री टिकवायची,आपण मित्र राहायचं हे जरी म्हटलं असेल तरी माझं मन प्रेम करणं सोडणार नव्हतं,म्हणून मी मैत्रीत जगाव असं काही मला आता वाटत नव्हतो...
मी मैत्रीच्या नजरेत आता गुन्हेगार झालो होतो,म्हणून मी आता तिच्याकडे नजरेला नजर भिडवू शकत नव्हतो,किव्हा मी आता बोलणंही बंद केलं होतं,कारण माझं मन,प्रेम शिवाय कोणतंच नात नसावं असंच सांगत होत...अशी दोन तीन महिने गेली असणार,तिलाही माझ्या न बोलण्याचं दुःख होत,आणि संचाली पण तिच्या निर्णयावर ठाम होती,की सुरज फक्त मित्रच पाहिजे,असच काहीतरी थोडं थोडं आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं,पण तेच जसा पूर्वी मैत्रीत आपलेपणा होता,तो कधी दिसत नव्हता,काम असलं तेव्हाच बोलायचं आणि मग नाही,....
पण अजूनही कुणी एकमेकांचा द्वेष करत नव्हते,किव्हा कुणाला काही त्या विषयी वाटत नव्हतं...पण म्हणतात न प्रत्येक love स्टोरी मध्ये एक व्हिलन असतो इथेही तेच झालं,त्या येणाऱ्या व्हिलन ने,मला संचिता विषयी खूप काही वेगळं सांगून माझं मन कलुषित केलं,खूप वाईट गोष्टी माझ्यासमोर म्हणवून दाखविल्या,ज्या मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो,त्या त्या व्यक्तीने सांगितल्या,मला पूर्णतः भरवून दिलं, आणि मी त्याच रागाच्या भरात,कुणाचा विचार न करता,संचिता ला खूप काही बोलून बसलो,पण संचिता ने एकही प्रत्युत्तर दिलं नाही,सर्व ऐकून घेऊन, ती मात्र कायमची बंद झाली,म्हणजे तिने तिच्या आयुष्यात, एक मित्र म्हणून येण्याचे दरवाजे पूर्ण बंद केले,ते कायमसाठी...नंतर काही दिवसांनी माहिती झाले की संचिता वर तो व्यक्ती ही प्रेम करत होता,त्याला नकार दिल्याने त्याचा बदला,आणि त्याला मी प्रेम करतो हे माहिती असल्याने असाच बदला माझ्याकडून घेतला.... तब्बल 8 वर्ष अधिक झाले पण माझी ती मैत्रीण कधी पुन्हा चांगली मैत्रीण म्हणून वापस आली नाही,मी केलेल्या चुकीसाठी खूप दा प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न केला,तो यशस्वी देखील झाला पण जी माझी मैत्री संचिता शी होती,ती मात्र कधी परत भेटू शकली नाही...मी मात्र तिच्या नजरेत कायमचा मैत्रीचा अपराधी म्हणूनच राहिलो,एवढं मात्र खरं आहे.........
तिला मात्र हेच सांगायचं राहील की तू मला एक मैत्रीण म्हणूनच पाहिजे होती,न कळत मी प्रेमात पडलो आणि मी तुला कायमचा गमावून बसलो,पण तिच्या नसण्याने परत मैत्रीच्या वाटा या कधी खुलल्या नाही,आणि संचिताची जागा मी अजूनही कुणाला देऊ शकलो नाही....म्हणून आजच्या मित्र मैत्रिणींना एकच विनंती आहे की एकच नात निभवा,तेच जास्त टिकत,ते म्हणजे मैत्रीचं नातं....