रोहन बाईकला किक मारतच वृषभकडे बघतो.. वृषभ पाठी काय तरी बघत असतो..
रोहन : "काय झालं?? बस ना.."
वृषभ : "रोहन ते.. तु मला बाईक चालवायला देशील???"
रोहन : "घे ना मग... एवढं घाबरत का विचारतोस..??"
"एकच मिनिट हा फोन आलाय..", अस बोलत वृषभ राजचा फोन उचलतो..
राज : "अरे वृषभ सगळा प्लॅन फिस्कटला.. तो शौर्य खालीच येत नाही.."
वृषभ : "काय!! पण का??"
राज : "बर वाटत नाहीय बोलतोय.. "
वृषभ : "थांब मी करतो..त्याला कॉल.. अस कस नाही येणार बोलतो तो.."
(वृषभ राजचा फोन कट करत शौर्यला लावतो.. शौर्यच्या फोनची रिंग होत असते)
वृषभ : "ए शौर्य मला तुझी मदत हवीय रे."
शौर्य : "काय झालं??"
वृषभ : "मला ना थाडी केश हवी होती.. मी इव्हीनींगला माझ्या पप्पांकडुन घेऊन तुला परत देईल.."
शौर्य : "किती हवेत?? मी गुगल पे ने ट्रान्सफर करतो तुला.."
वृषभ : "नाही नको म्हणजे ते ते मी कार्ड नाही आणलंय रे तुच घेऊन येणं खाली.. खाली म्हणजे मी कॉलेजच्या पुढे गार्डन आहे ना तिथे आहे.. तिथे घेऊन ये कारण मी पुन्हा हॉस्टेलवर येईपर्यंत बॅंक बंद होईल रे.."
शौर्य : "तु राजला वर्ती पाठव मी त्याच्याकडे देतो.. मला बर नाही वाटत आहे थोडं.. डोकं गरगरतय माझं.."
वृषभ : "तुला नाही यायच तर सांग पण कारण नको देऊस हा.."
शौर्य : "अरे खरच.."
वृषभ : "सोड मग.. मी रोहनकडुन घेतो.. तुला समीराने बोलवलं असत तर बरोबर आला असतास.. ते ही पळत.. पण माझ्या...."
"बस बस.. लेक्चर नको देऊस. कुठे येऊ..??", मध्येच वृषभला थांबवत शौर्य त्याला विचारतो..
वृषभ : "ते कॉलेजच्या पुढे गार्डन आहे ना तिथे तुझी वाट बघतोय आणि प्लिज जरा लवकर ये हा.."
शौर्य : "हम्मम"
वृषभ फोन ठेवुन खुश होतो..
रोहन : "वृषभ काय झालं?? कोणासोबत एवढ फोन वर बोलतोयस.."
वृषभ : "अरे पप्पांचा फोन होता माझ्या.. त्यांचं काम करायला मी बॅंकेत जातोय ना"
रोहन : "एक मिनिट.. तुझ मॉलमध्ये काम होत ना.."
वृषभ : "अस बोललो का मी..??"
रोहन : "तु बरा आहेस ना?? सकाळ सकाळी घेतलीयस का??",
वृषभ : "अरे म्हणजे मॉलच्या बाजुला जी बॅंक आहे ना तिथे काम आहे माझं.. तु नीट ऐकलं नसशील माझं बोलण.."
रोहन वृषभच्या बोलण्याचा विचार करू लागतो..
वृषभ : "चल लवकर.. अस बघतच बसणार काय मला?? बाईक कर चालु.."
रोहन : "तुला बाईक चालवायची आहे ना?"
वृषभ : "अरे हो विसरलोच मी.."
वृषभ बाईकला किक मारतच गाडी चालु करतो आणि रोहनला मागे बसायला सांगतो..
वृषभ गाडी कॉलेजच्या पुढे असणाऱ्या गार्डन पर्यंत नेतो.. आणि थांबवतो..
रोहन : "काय झालं?? गाडी का थांबवली??"
वृषभ : "अरे रोहन यार मी पॉकेट तर रूम वरच विसरलो.."
रोहन : "हा मग??"
वृषभ : "मग काय?? पैसे नको का??"
रोहन : "माझ्याकडे आहेत.. मी देतो तुला.."
वृषभ : "अरे पण मला केश डिपॉझिट करायचीय ना... अकाउंट नंबर एका पेपर वर लिहिलेला तो पेपर आणि पैसे त्या पर्स मध्ये आहे.. थांब मी शौर्यला फोन करून बोलवुन घेतो. तो रूमवरच आहे ना. नाही तर एक काम कर तु जा.. तस पण तुला उशीर होतोय ना.."
"एवढा पण उशीर नाही होत आहे.. थांबतो मी.."त्या निमीत्ताने तरी शौर्य दिसेल अस विचार करून रोहन बोलतो
वृषभ : "माझ्यामुळे तुला उगीच उशीर नको ना.. पुन्हा तो शौर्य तुला दिसणार.. मग तु..."
रोहन : "आता थांबतो बोललोय ना.." रोहन वृषभला धमकवतच बोलतो.
"भडकु नको ना यार.. तुला थांबायच असेल तर थांब..", वृषभ त्याला थोडं घाबरतच बोलतो..
रोहन बाईकवरून उतरून मोबाईलमध्ये काही तरी करत रहातो.. वृषभ बाईकवर बसुनच शौर्यला फोन लावतो..
वृषभ : "कुठेस??"
शौर्य : "जस्ट निघालोय.."
वृषभ : "काय यार.. तुला पहिल्यांदाच काही तरी काम सांगितलंय त्यात पण तु उशीर करतोयस.. ह्यापुढे तुलाना एकही काम सांगणार नाही मी"
शौर्य : "वृषभ एक तर अजिबात बर नाही वाटत आहे.. तरी मी तुझ्यासाठी कस बस येतोय नी तु अस बोलतोयस.."
वृषभ : "बर बर.. लवकर ये.."
वृषभ आणि रोहन दोघेही शौर्यची वाट बघु लागले..
तोच वृषभला बाईकला असलेल्या मिरर मधुन शौर्य येतोय हे दिसत..
वृषभ : "ए रोहन बस बाईकवर.. येईलच तो मग लगेच निघुयात.."
रोहन वृषभच्या परत मागे येऊन बसतो..
शौर्य वृषभला शोधत हळुहळु चालतच पुढे जाऊ लागतो..
वृषभ : "ए शौर्य मी इथेय.. मागे बघ.."
वृषभचा आवाज ऐकताच शौर्य मागे वळुन बघतो.. तस त्याला रोहन दिसतो आणि त्यासोबत त्याच्या पुढे बसलेला वृषभसुद्धा..
शौर्य रोहनला बघुन आपली नजर लपवतो.. खिश्यातून पैसे काढत तो वृषभकडे देतो..
शौर्य : "मोजुन बघ बरोबर आहेत का..??"
वृषभ : "आता तु दिलंस मग बरोबरच असतील आणि अस तुझ्या पुढ्यात मोजुन मला आपल्या दोस्तीवर अविश्वास नाही दाखवायचा..""
शौर्य : "तरी पण मोज कारण मी मोजले नाहीत.. माझ्याकडे जेवढे होते तेवढे दिलेत.. "
रोहन खर तर त्याच्याकडे बघुन आपली नजर फिरवणार असतो पण तोच त्याच लक्ष शौर्यच्या हाताला असलेल्या पट्टीकडे जाते.. ती पट्टी बघताच रोहन शौर्यला निरखुन बघु लागतो.. शौर्यचे डोळे आणि नाक लालबुंद झालेलं..
रोहन फक्त शौर्यकडे बघतच रहातो कारण त्याने शौर्यला अस कधी बघितलं नव्हतं.."
वृषभ : "तुझे डोळे वैगरे लाल का झालेत??"
शौर्य : "असच.. तु जाऊन ये बॅंकेत नाहीतर बॅंक बंद होईल.."
"हम्म चालेल.. पण शौर्य यार थेंक्स हा..",अस बोलत वृषभ शौर्यच्या हातावर जाणुन बुजून जोरात मारतो..
शौर्य : "आहह वृषभ लागलंय ना यार तिथे.. हाथ दुखतोय",
"काय तु पण नाजुक आहेस यार किती हळु मारलेल मी.. फक्त असच तर केलेलं ", अस बोलत वृषभ परत त्याला मारतो..
"वाहह मम्मा.. वृषभ खरच खुप दुखतोय यार.. काय वेडेपणा करतोयस..",शौर्य कळवळतच त्याला बोलतो
"ए वृषभ तुला कळत नाही का त्याच्या हातावर लागलंय ते.. कश्याला सारख सारख त्याच हातावर मारतोयस त्याच्या??", रोहन अस बोलताच शौर्य त्याच्याकडे बघु लागतो. रोहनकडे बघतच शौर्य वृषभकडे बघतो.. वृषभ रोहनच्या नकळत आपली कॉलर उडवत शौर्यला इशाऱ्यानेच रोहनकडे बघ बोलतो..
"काय झालंय तुझ्या हाताला.. बघु इथे..", अस बोलत रोहन गाडीवरून उतरून शौर्यचा हात पकडत बघु लागतो..
"तुझे डोळे वैगेरे लाल का झालेत असे?? रडत होतास का तु??", एका मागुन एक असे खूप सारे प्रश्न तो शौर्यला करतो.. शौर्य फक्त रोहनकडे बघतच रहातो..
"शौर्य मी तुझ्याशी बोलतोय... एकटा बोलायला वेडा नाही आहे मी.. प्लिज काही तरी बोल.", रोहन जोरातच त्याच्यावर ओरडतो तस तो भानावर येतो..
"तु माझ्याशी बोलतोयस ह्यावर विश्वासच बसत नाही ना यार.. आधी पूर्ण खात्री तर होऊ दे तु माझ्याशीच बोलतोयस ह्याची..",शौर्य अस बोलताच रोहन सुद्धा त्याच्याकडे बघत रहातो आणि त्याला मिठी मारतो..
रोहन : "तुला माहितीना शौर्य मला मनवीला कोणी काही बोललेलं नाही आवडत.. तरी तु का अस वागलास माझ्याशी.. तुझ्याशी न बोलता नाही जमत मला रहायला.. यु आर माय बेस्ट फ्रेंड.. प्लिज पुन्हा अस नको वागुस प्लिज.. माझ्यासाठी प्लिज.. मला तुला नाही गमवायचय रे"
"आय एम सॉरी.. परत नाही बोलणार अस", शौर्य रोहनने मारलेली मिठी थोडी घट्ट करतच बोलला..
रोहन : "तुला ताप आलाय का?? अंग किती गरम लागतंय तुझं.. "
बाईकवर बसलेला वृषभ सुद्धा शौर्यला हात लावून बघतो.. तर खरच त्याच अंग गरम लागत असत..
वृषभ : "चल डॉक्टरकडे जाऊयात.."
दोघेही शौर्यला घेऊन डॉक्टरकडे जातात.. डॉक्टर औषध लिहुन देतात.. ती वेळेवर घ्यायला सांगतात..
रोहन : "अरे वृषभ तुझं बॅंकेतल काम राहीलच.. बॅंक पण बंद झाली असेल आता"
"बंद झाली तर होऊ देत.. तस पण माझं बॅंकेत काही कामच नव्हतं.. ते तुम्ही दोघ पुन्हा एकत्र यावं म्हणुन आम्ही सगळ्यांनी मिळुन काल पासुन प्लॅन केलेला आणि हे धर तुझे पैसे.. "अस बोलत वृषभ शौर्यच्या हातात त्याने दिलेले पैसे परत देतो. रोहन आणि शौर्य दोघेही वृषभकडे बघतच रहातात..
वृषभ : "आणि शौर्य खर तर मी तुला थेंक्स बोलायला हवं यार.. एवढा आजारी असुन पण तु माझ्यासाठी खाली आलास.."
शौर्य : "बस काय.. तुझ्यासारख्या मित्रामुळे मला हा मित्र परत भेटला.. तुमच्या साठी काही पम"
अस बोलत शौर्य वृषभ आणि रोहनला मिठी मारतो..
शौर्य : "माझ्या मुंबई गँगचा आहे रे...
रोहन : "तिथे पण तुझे मित्र आहेत ना??",
शौर्य : "खुप.. तुमच्यासारखेच"
रोहन : "पण तुझ्या हाताला काय झालं??"
वृषभ : "ते तुझी जुनी मित्रमंडळी त्रास देत होती ह्याला.. तेव्हा थोडी मारामारी झाली आणि त्या फैयाजने बियर ची बॉटल ह्याच्या हातावर फोडली.."
रोहन : "त्या फैयाज ला तर ना.. शौर्य तु चल माझ्यासोबत कॉलेजला.."
वृषभ : "नाही ना येऊ शकत.. सस्पेंड केलंय ह्याला.. डायरेक्ट पर्वा येईल तो कॉलेजला.."
रोहन : "ह्याला का सस्पेंड केलं पण??"
शौर्य रोहनला सगळा प्रकार सांगु लागला..
रोहन : "तु नाही जाऊ शकत पण मी जाऊ शकतो ना आणि वृषभ शौर्य माझ्याशी बोलत नव्हता पण तु तर बोलत होतास ना माझ्याशी.. मला एकदा सांगितलं असतस तर त्या फैयाजकडे तर आज सकाळीच बघितलच असत आणि सोबत त्या प्रिंसिपलला पण.. अस कस ह्याला सस्पेंड करू शकतो तो??"
शौर्य : "ए रोहन मला परत तो पहिलावाला रोहन तुझ्यात बघायचा नाही हा आणि फैयाजच बोलशील तर त्याच काय करायचं ते मी ठरवलय.. पण हे अस मारामारी करून नाही.. फक्त उद्याचा दिवस जाऊ दे मग बघच मी काय करतो ते.. "
रोहन : "काय करणार आहेस तु???"
शौर्य दोघांनाही त्याने तैयार केलेला प्लॅन सांगु लागु लागतो..
★★★★★
इथे प्ले हाऊसमध्ये बाकीची मंडळी ह्या तिघांची वाट बघत थांबली असतात..
राज : "हम लोग के ग्रुप के दो अनमोल रतन.. एक शौर्य ओर एक रोहन और तो और अपना वृषभ भी उनके संग... उनकीं राह देख देख के में हो गया तंग।"
राज अस बोलताच सगळे त्याच्याकडे बघु लागतात..
राज : "ते काय आहे ना भूक लागकी की सुचत मला अस.. आवडलं ना तुम्हांला.."
सीमा : "हो ना खूप.."
"थेंक्स", राज खुश होतच बोलतो..
सीमा : "पण परत अस वेड्यासारखं काही बोलत जाऊ नकोस.. नाही तर लोक आम्हाला पण वेड बोलतील कारण आम्ही तुझ्यासोबत असतो ना.."
टॉनी तोंडावर हात ठेवतच हसतो..
"ह्याला खुप हसायला येतंय..", अस बोलत राज टोनीच्या डोक्यावर मारतो..
समीरा : "गाईज प्लिज थोडं शांत रहा ना.."
सगळे शांत बसतात..
टॉनी : "तुला काय वाटत?? पॅचअप झालं असेल काय त्या दोघांच??"
राज : "शौर्य तर रोहनशी बोलतच होता.. प्रश्न रोहनचा आहे.. आणि रोहनचा राग शौर्य आणि वृषभ मिळुन गायब करतील.. अस मला तरी वाटत.. समीरा तुला काय वाटत ग?."
समीरा : "जर रोहन आणि शौर्यची मैत्री खरी असेल ना तर कोणीही तोडायचा प्रयत्न केला तरी नाही तोडु शकणार.."
मनवी : "मला काय वाटत माहिती.. मी आता घरी जावं.. कारण रोहन आता येईल अस मला तरी वाटत नाही..", तेवढ्यात राजला प्ले हाऊसच्या डॉरजवळ वृषभ दिसतो
राज : "देखो... देखो वो आ गया...",राज गाण्याचे सूर पकडतच बोलतो
तसे सगळे उभं रहातच मागे वळुन बघतात..
राज : "पर ये तो अकेला ही आ गया... रोहन आणि शौर्य कुठेय?? ती दोघ तर दिसतच नाहीत.."
तोच रोहन आणि शौर्य एकमेकांच्या गळ्यात हात घालतच प्लेहाऊस मध्ये एन्ट्री करतात.
तसे सगळेच येहहह म्हणुन ओरडतात..
रोहन : "गाईज थेंक्स टु ऑल ऑफ यु.. खर तर तुम्हां लोकांमुळे आम्ही एकत्र आलोय"
समीरा : "तुम्ही दोघ अशी एकत्र छान वाटतात.. प्लिज परत भांडु नका..."
राज : "आता आपण जेवायला जाऊयात??? मला भुक लागलीय यार.."
रोहन : "मी पण निघतो मनवी तु आत्ता तरी येतेस??"
मनवी : "हो.."
रोहन : "चल मग आणि शौर्य जेवुन झाल्यावर औषध घे.. बाय.."
रोहन शौर्यला मिठी मारतच तिथुन निघतो.. सोबत बाकीची मंडळीसुद्धा..
शौर्य समीराकडे एकटक बघत असतो..
समीरा : "तुला बर नाही वाटत का??"
शौर्य : "काल पासून थोडा ताप आहे.."
समीरा लगेच शौर्यच्या कपाळावर हात लावुन बघते
समीरा : "अरे हो.. ताप आहे तुला आणि हात दुखतोय का अजुन??"
शौर्य मानेनेच नाही बोलतो..
समीरा : "तु आधी जेवुन घे.. भूक पण लागली असेल ना तुला??"
शौर्य मानेनेच हो बोलतो..
समीरा : "तुला औषध पण घ्यायच असेल ना??"
शौर्य पुन्हा मानेनेच हो बोलतो..
समीरा : "तु नुसती मान का हलवतोयस??"
शौर्य : "अग सीमा तु परत आलीस?? समीरा येतच होती.. "
समीरा लगेच सीमाकडे बघू लागते.. पण सीमा तिथे नसते.. तेवढ्यात शौर्य तिच्या गालावर आपले ओठ टेकवत तिला किस करतो...
तस समीरा शौर्यकडे बघते.. शौर्य आपली एक भुवई उडवतच तिला चिडवु लागतो..
समीरा लाजतच त्याला लांब ढकलते आणि तिथुन पळ काढते आणि बाहेर जाताच आपल्या हातावर आपले ओठ टेकवत शौर्यला फ्लेकीस देते.. शौर्य ते कॅच करतच डोळे मिटून आपल्या हृदयाजवळ नेतो..
डोळे उघडून बघतो तर समोर वृषभ..
वृषभ : "काय चाललंय तुझं??"
वृषभच्या मागे बघतो तर समीरा लांबुनच त्याला ठेंगा दाखवत चिडवतच तिथुन जात असते..
"तुला नाही कळणार", अस बोलत शौर्य आपल्या केसांवरून हात फिरवतच वृषभच्या गळ्यात हात टाकतो आणि त्याला तिथुन नेतो..
क्रमशः
(पुढे काय काय?? त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)
©भावना विनेश भुतल