अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 41 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 41


विराज शौर्यच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही.."विर प्लिज ना", शौर्य त्याला घट्ट मिठी मारतच बोलतो..

विराज : "शौर्य सोड मला आणि घरी चल.. थंडी खुप वाजतेय इथे."

शौर्य : "विर प्लिज मला जाऊ दे दिल्लीला.. मला माझ्या मित्रांशि वाय इथे नाही करमत रे.."

विराज : "आणि आमच्या शिवाय??"

शौर्य : "तुम्ही लोक घरी असता तरी काय?? आज कुठे तु अकरा वाजता माझ्या रूममध्ये आलास. नाही तर सेटरडे किंवा सँडे शिवाय तु काय आणि मम्मा काय मला दोघेही दिसत नाही.. सेटरडे सुद्धा इथे तिथे मिटिंगसाठीच असतो तुमचा.. इतर दिवशी कामावरून घरी आलात तरी तो लॅपटॉप आणि तुम्ही.. मला बोअर होत यार "

विराज : "ते काहीही असलं तरी तु इथेच रहायच.."विराज उठुन तिथुन जाऊ लागला.. पण शौर्यने त्याचा हात पकडत त्याला पुन्हा त्याच्याजवळ खेचत बसवलं..

विराज : "शौर्य काय असं लहानमुलांसारखं करतोयस. चल बघु घरी.. कालपासुन उपाशी आहेस तु.. भुक नाही लागली का??"

"नाही लागली.. मला दिल्लीला जायचय म्हणजे जायचंय.. विर.. प्लिज.. प्लिज.. प्लिज",शौर्य विरच्या माने भोवती आपल्या हाताची मिठी घट्ट करत बोलला..

"शौर्य सोड', अस बोलत विराज त्याने गळ्याभोवती मारलेली मिठी सोडवत तिथून उठतो..

विराज आपलं काही ऐकत नाही हे बघुन शौर्य नाराज होऊन तोंड पाडुन बसतो..

"उद्या एकदा मम्माशी बोलुन बघतो ती काय बोलते ते", अस बोलत विराज शौर्यकडे हसतच बघत तिथुन जाऊ लागतो. एक आनंदाची लहर शौर्यच्या चेहऱ्यावर येते...

"येहहह..", असं मोठ्याने ओरडत शौर्य धावतच विराजजवळ जात त्या च्या गळ्या भोवती पाठून आपल्या हाताचा विळखा घालतो आणि त्याच्या पाठीवर लटकतो..शौर्यला खुश झालेलं पाहून विराज त्याला आपल्या पाठीवर उचलून घेतच घराच्या दिशेने जाऊ लागतो.

"आय लव्ह यु विर", शौर्य विराजच्या गालावर किस घेतच त्याला बोलतो..

विराज : "लहानपणी पण तुला असच उचलुन घ्यायचो आठवतय.."

शौर्य विरच्या पाठीवरचा उतरतो..

विराज : "काय झालं??"

शौर्य विराजकडे बघत राहतो..

¶¶तेरे काँधे पे बैठ के दुनिया ये देखी है,
तेरी हर राह को राह अपनी बनाई है,
तेरे अल्फ़ाज़ों से मेरे हौसले बुलंद हुवे
तेरे इस प्यार को मैंने ज़िन्दगी बनाई है,
साथ तेरा हर बात तेरी वह किस्से मुस्कुराने के,
साथ तेरा हर बात तेरी वह किस्से मुस्कुराने के,
बस प्यार तेरा सच्चा सब रिश्ते हैं दिखावे के,
मेरा भाई तू मेरी जान है,
मेरा भाई तू मेरी शान है¶¶

शौर्य घुडग्यावर बसुन दोन्ही हात लांब करतच विराजसमोर गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करतो..

शौर्य आपल्यासाठी अस गाणं गातोय हे बघुन विराजला थोडं भरून येत.. पण शौर्य समोर तो तस दाखवत नाही..

विराज : "उठ आता आणि चल घरी... मस्का पोलिश बस झाली.. हो बोललोयना मी.."

"इथुन गातोय यार..", शौर्य आपल्या हृदयावर हात ठेवत विराजला ..

"जगात सगळ्यात लकी मी मला समजतो विर.. कारण तुझ्यासारखा भाऊ माझ्या आयुष्यात आहे.."

विराज : "बस बस.. चल घरी.."

विराज आणि शौर्य दोघेही घरी येतात.. शौर्यच्या रुम मध्ये जेवणाच ताट तसच असत...

विराज : "तु बस मी जेवण गरम करून आणतो.."

शौर्य : "तु का जातोस.. कुणाला तरी सांग ना.."

विराज : शौर्य दीड वाजलाय??कोण जाग असेल आता.. तु थांब मी आलोचअस बोलत विराज ते ताट घेऊन जेवण गरम करून घेऊन येतो..विराज जेवण गरम करून घेऊन येताच आपल्या हातात एक घास धरतच तो शौर्य समोर धरतो..

शौर्य : "विर एक बोलु??"

विराज : "आधी जेव आणि मग बोल.."

शौर्य : "प्लिज.."

विराज : "बर बोल.."

¶¶रूठना नहीं मुझसे सेह नहीं पाउँगा,
झूठ कहा बोहत सच कह नहीं पाउँगा,
गलतियां बोहत हुयी मुझसे माफ़ करना तू मुझे,
आखिर भाई हूँ तेरा दूरी सह नहीं पाउँगा,
आखिर भाई हूँ तेरा दूरी सह नहीं पाउँगा
मेरा भाई तू मेरी जान है,मेरा भाई तू मेरी शान है,
मेरा भाई तू, मेरा भाई तू¶¶

शौर्य रडतच विराजला घट्ट मिठी मारतो..

"विर पुन्हा अस नाही होणार माझ्याकडुन.. माझ्यामुळे तुला आणि मम्माला खूप त्रास झाला.. आय एम सॉरी विर.."

विराज : "एक बोलु शौर्य.. तु दिल्लीला जावं ते ही मित्रांसाठी हे मला खरच नाही पटत.. पण तु अस नाराज होऊन बसलेलं मला नाही आवडणार.. पण आपल्या हृदयात एवढी पण जागा करून नको ठेवुस कुणासाठी.. की त्यांना सोडून रहाणं हे तुझ्या हृदयाला मान्यच नाही होणार.. कदाचित एक वेळ अशी सुद्धा येऊ शकते की ते तुला सोडून देतील.. त्यासाठी हे हृदय थोडं स्ट्रॉंग बनव कारण काल पासुन बघतोय तु किती त्रास करून घेतोस स्वतःला.."

शौर्य : "विर माझे मित्र मला कधी सोडुन जाऊच नाही शकत.. आणि गेले तरी मी त्यांना मनवेल.."

विराज : "ते तर तु सहज करू शकतोस... पण आधी जेवुन घे..

"शौर्यच जेवुन होताच दोघेही शौर्यच्या रूममध्ये झोपुन जातात..रात्री उशिरा झोपल्यामुळे शौर्यला सकाळी उशिरा जाग येते.. विराज त्याच्या बाजुला नसतो.. तो तसाच डोळे चोळत त्याच्या रूमच्या गेलरीत येतो.. विराजनेहमी प्रमाणे फोनवर बोलतोय हे बघुन शौर्यच्या जीवात जीव येतो..शौर्य उठलाय हे बघताच विराज फोन ठेवून देतो..विराज : "गुड मॉर्निंग..'

शौर्य : "मला वाटलं काल तु मला खोट प्रॉमिज करून कामावर पळालास.."

विराज : "ब्रो आज शनिवार आहे.."

शौर्य : "म्हणजे आज तुला सुट्टी..?? मग मॉमला पण सुट्टी असेल ना?? चल ना विर आपण मॉमला विचारुन येऊयात.."

विराज : "तुला एवढी काय घाई आहे?? आधी फ्रेश होऊन तर ये.. मम्मा ब्रेकफास्टला खाली येईल तेव्हा विचारतो.."

शौर्य : "मी ब्रूनोला घेऊन बाहेर जातोय.. मी येईपर्यंत तु तिला विचार.. ओके??"

"ओके बाबा..", एवढं बोलून विराज स्वतःच्या रूममध्ये निघुन गेला..

शौर्य थोडं फ्रेश होऊन ब्रूनोला घेऊन घराबाहेर पडला..नेहमीप्रमाणे शौर्य ब्रूनोला घेऊन पार्कमध्ये जातो.. ब्रुनो सुद्धा इथे तिथे पळत शौर्यसोबत मस्ती करत असतो.. तोच शौर्यच लक्ष ज्योसलीनकडे जात. पार्कच्या एका कठड्यावर बसुन कोणत्यातरी विचारात ती हरवुन गेलेली.. शौर्य तिच्या समोर जाऊन उभं रहातो.. तरी तिला त्याची शुद्धी नसते..

"ए ज्यो..कुठे हरवलीस तु??", तिच्या नजरेसमोरून हात फिरवत शौर्य तिला लागलेली तंद्री दूर करत बोलला..

ज्योसलीन वर तोंड करून बघते..

तस शौर्य तिच्या चेहऱ्याकडे बघतच रहातो.. डोळ्यांखाली काळे वर्तुळ जणु ती खुप दिवस नीट झोपली नाही हे सांगत होते..

"ए ज्यो काय झालं?? सगळं ठिक आहे ना.."ज्योसलीन : "तु कधी आलास??"

शौर्य : "कालच.. पण तुला काय झालं..??"

ज्योसलीन शांतच बसते..

शौर्य : "आता सांगशील काय झालं ते?? आणि आज कॉलेजला सुट्टी आहे??"

"शौर्य तु बरोबर बोललेलास.. रॉबिन कधी नाही सुधारणार... मी का नाही ऐकलं तुझं.", एवढं बोलून ज्योसलीन दोन्ही हात डोळ्यांवर ठेवुन रडु लागली

"काय केलं त्याने??", शौर्य जोरातच ज्योसलीनवर ओरडतो.

ज्योसलीन : "मी खर प्रेम करतेय रे त्याच्यावर.. पण त्याच प्रेम कधी नव्हतंच माझ्यावर.. माझा फक्त वापर करून घेतला त्याने आणि आत्ता काम झालं तस मला टाळतोय तो.. मला नाही जगता येत त्याच्याशिवाय.."

शौर्य : "ज्यो तुला अक्कल आहे?? प्रत्येक नात्याला एक वेळ आणि लिमिट नुसार बेलेन्स करायच असते.. पण तु वेळे आधीच लिमिट क्रॉस केलीस ते ही त्या रॉबिन सारख्या मुलासासाठी.. "

ज्योसलीन : "त्याच्या प्रेमात आंधळी झालीय रे ..मी काय करत होती ना ते कळतच नव्हतं मला.. त्याच्याशिवाय जगायला पण नाही जमत मला.. त्याच प्रत्येक चुकीच पाऊल पण मला बरोबरच वाटतय शौर्य.. इव्हन आता सुद्धा तो अस वागतोय तरी माझं त्याच्यावरच प्रेम तेवढंच आहे.. जरा पण कमी नाही झालं..फक्त राग स्वतःचा येतो की एवढं होऊन सुद्धा तो मनातुन जात नाही.."

"तु माझ्याबरोबर चल.. त्याच काय करायच ते मी बघतो..", अस बोलत शौर्य तिथुन रागाने उठला.. तस ज्योसलीने त्याचा हात पकडत त्याला थांबवलं..

ज्योसलीन : "नकोना शौर्य.. तु कॉलेजमध्ये जाऊन त्याला सगळ्यांच्या पुढ्यात मारलेल मला नाही आवडणार."शौर्य : "ठिक आहे आरतीच ताट घेऊन जातो त्याच्यासाठी.. मग तर चल .."

ज्योसलीन : "शौर्य प्लिज"

शौर्य : "काय प्लिज ज्यो..एवढं तो वाईट वागतोय तुझ्याशी तु एवढी शांत कशी काय बसु शकतेस?? ते काही नाही तु माझ्यासोबत कॉलेजमध्ये येतेस ते ही आत्ताच्या आत्ता.."

ज्योसलीन : "त्याला माझं तोंड बघायची इच्छा नाही.. मी नाही येणार कॉलेजला.. आणि तु पण नको जाऊस..प्लिज.."

शौर्य : "तुला नाही यायच तर ठिक आहे.. पण मी तर जाणार.."

ज्योसलीन : "शौर्य तु का इस्यु क्रिएट करतोयस..??"

शौर्य : "अजुन दुसरी कोणी ज्योसलीन तैयार नको व्हायला म्हणुन मी इस्यू क्रिएट करतोय.."

ज्योसलीन शौर्यच्या डोळ्यांतील राग बघतच रहाते..

ज्योसलीन : "तुला माझी शप्पथ आहे तु त्याला काही करणार नाही.."

शौर्य तिच्याकडे रागात बघतच ब्रूनोला उचलून घेत तिथुन सरळ घरी निघुन जातो.. इथे विराज अनिताची वाट बघत डायनींग टेबलवर बसलेला असतो..थोड्याच वेळात अनिता तिथे आली..

अनिता : "गुड मॉर्निंग विर.. !"

विराज : "गुड मॉर्निंग..!"

अनिता : "शौर्य??"

विराज : "तो ते ब्रूनोला घेऊन बाहेर गेलाय.."

पुन्हा दोघेही शांत.. अनिता नेहमी प्रमाणे लॅपटॉपमध्ये काही तरी करत बसली होती. विराजला अनिताशी काय बोलावं ते कळत नव्हतं..

विराज : "मम्मा ते... थोडं बोलायच होत.."

"हम्म बोल ना..", अनिता कॉफीचा घोट घेत..एक नजर विराजकडे फिरवतच बोलली.

विराज : "मला अस वाटत की, शौर्यने दिल्लीला जावं.. पण बघ तुला पटलं तर.."

अनिता कप खाली ठेवत विराजकडे बघतच रहाते..

विराज : "म्हणजे त्याच नुकसान होतय ग.. दोन महिनेच राहिलेत ना एक्झामला.. आय नॉ तो वागला ते चुकीच होतच.. पण तो मुलगा त्याला त्रास देत होता.. आता स्वतःच्या बचावासाठी तो मारामारी करत होता..

अनिता लॅपटॉप मध्ये शौर्यच बॅंक अकाउंट डिटेल्स ओपन करून लॅपटॉप विराज पुढे ठेवते..

विराज : "हे काय आहे??"

अनिता : "शौर्यच बॅंक अकाउंट डिटेल्स.. कामाच्या गडबडीत मला कधी लक्ष द्यायला नाही मिळाले.. एकदा बघच तु.. ह्या चार पाच महिन्यात जवळपास दीड लाख दोन लाख सहज त्याने संपवलेत.."

विराज : "व्हॉट!!"(विराज लॅपटॉप आपल्याकडे घेत बघु लागतो)

अनिता : "काहींची डिटेल्स आहेत पण ATM मधुन काढलेले पैसे तो काय करतो हे नाही सांगु शकत आपण .."

विराज : "शौर्य काही मिसयुज करेल अस मला मनापासुन तरी नाही वाटत. तरी मी त्याला विचारतो त्याबाबत.. पण मला अस अस वाटत कि तु त्याला दिल्लीला जायची परमिशन द्यावी.."

अनिता : "माझा शौर्यवर जरा सुद्धा विश्वास राहिलेला नाही.. आणि मला मनापासुन अस वाटत की शौर्यच्या बाबतीतले डिसीजन तु घ्यावेस.. कारण माझ्यापेक्षा तु त्याला चांगलं ओळखतोस..

विराज : "अग पण मम्मा.."

अनिता : "विराज माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो तुझी आणि तुझ्या शब्दाची किती रिस्पेक्ट करतो हे मी बघितलंय.. त्याच्यासाठी तु सगळं काही आहेस अस मला तरी वाटत आणि तो तुझ्या शब्दाबाहेर नाही असही मला वाटत.. तु त्याच्याबद्दल योग्य तेच निर्णय घेशीलच ह्याची खात्री आहे मला.."

"माझी कॉनकॉल मिटिंग आहे.", मी येतेच अस बोलत अनिता आपला लॅपटॉप घेत तिथुन उठुन सरळ आत निघुन गेली..

विराज डायनींग टेबलवरच डोक्यावर हात ठेवुन विचार करत बसला..

शौर्य ब्रूनोला घेऊन येतो.. विराज सोबत काहीही न बोलता सरळ आपल्या रूममध्ये निघुन जातो..थोड्याच वेळात तैयार होऊन सोबत हेल्मेट घेतच तो घराबाहेर पडु लागतो..

विराज : "शौर्य कुठे चाललास?"

शौर्य : "एक खूप जुना मित्र आहे.. खूप महिने झाले त्याला नीट भेटलोच नाही त्यालाच भेटुन येतो.."

शौर्य बाईकला किक मारतच आपल्या कॉलेजच्या दिशेने जातो.. कॉलेजच आय डी कार्ड त्याच्याजवळ असल्याने.. वॉचमनला आय डी दाखवतच तो सरळ कॉलेजमध्ये घुसतो..त्याचे जुने मित्र मंडळींना तो दिसताच सगळे त्याला हाय हॅलो करायला त्याच्या जवळ येतात.. पण त्याची नजर तर कुणाला तरी शोधत असते..

"एकच मिनिटात आलो मी", अस बोलत शौर्य तिथुन निघाला..खर तर तो रॉबिनच्या शोधात होता आणि त्याला चांगलंच माहीत असत की तो ह्या वेळेला कुठे असेल ते.. रॉबिन नेहमीच्या जागेवर मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो..शौर्य जाऊन त्याच्या समोर उभा रहातो.. शौर्यला बघुन रॉबिन सोबतच त्याच्या सगळ्याच मित्रांना आश्चर्य वाटत..

शौर्य : "रॉबिन मला तुझ्यासोबत बोलायचंय थोडं.. तेही पर्सनल "

रॉबिन : "जे काही बोलायच ते इथे सगळ्यांच्या पुढ्यात बोल.."

शौर्य : "रॉबिन मी रिक्वेस्ट करतोय प्लिज.."

रॉबिन : "मी पण तुला रिक्वेस्टच करतोय प्लिज.."

"मला ह्याच्यासोबत इथे एकट्यात बोलायच आहे.. तरीही कोणाला इथे थांबायचय त्यांनी खुशाल थांबावे.. त्यांना इथुन खाली कस पाठवायच ते मला चांगलंच माहिती..",शौर्य सगळ्यांकडे रागाने बघत आपल्या हातातील कडा मागे घेतच बोलला

"ए रॉबिन हम लोग को मारा मारी नही करना हम लोग हे नीचे..", रॉबिनचे सगळे मित्र त्याला एकट्याला टाकुन तिथुन निघुन जातात..

शौर्य : "ज्योसलीन सोबत अस का वागलास तु??"

रॉबिन : "OMG तिने वकील पाठवला तर.. तिच्याशी कस वागायचं हे मी ठरवेल तु नाही शिकवायच मला.."

शौर्य : "जर प्रेम नव्हतं तुझं तिच्यावर तर कश्याला तिच्यासोबत खोटी प्रेमाची नाटकी केलीस रॉबिन.. तरी आधीच बोलत होतो तिला.. तुझ्यावर विश्वास ठेवुन ती चुक करते पण नाही ना ऐकली.. कारण तुझं खोटं प्रेम ती खर समजुन जगत होती.. आणि अजूनही जगतेय.. एकदा बघ काय हालत केलीय तिने स्वतःची.. तुला काय त्याच एक सोडुन गेली तर दुसरी मुलगी तुझ्यासाठी तैयार असेल.. पण तिच्यासाठी तस नाही ना.."

रॉबिन : "तुझं झालं असेल तर जाऊ शकतोस."

"तुला तर एक सोडुन दोन बहिणी आहेत ना रॉबिन.. दोघींना चांगलं ओळखतो मी रॉबिन.. आपण सेम स्कुलला होतो..तुला तर माहीतच असेल.. एक तर माझ्या फेसबुकला एड पण आहे.. तिला पटवायला जास्त वेळ पण नाही लागणार मला.. तुला तर माहिती मुली अश्या पटतात मला.",हाताची टिचकी वाजवतच शौर्य बोलला

"साल्या माझ्या बहिणीबद्दल जास्त बोललास ना तर तुला इथेच उभं चिरीन..",शौर्यचा गळा धरतच तो त्याला बोलला..

"ए हट..", शौर्य त्याला जोरात लांब ढकलतच बोलला.

"स्वतःच्या बहिणीबद्दल बोललं तर एवढा राग.. दुसऱ्यांच्या बहिणीच्या किंवा दुसऱ्यांच्या मुलींच्या अंगासोबत मस्ती करून त्यांना सोडून देताना कुठे जातो रे हा तुझा राग.. तु मला काय उभ चिरणार.. मी तुला इथेच..", आपल्या हाताची मुठ करत रॉबिन समोर धरतच शब्द अर्धवट ठेवत तो थांबला..

"ज्यो ने वचन घेतलय तुला काही करायच नाही ह्याच..नाही तर तुला अस वाटत तुझ्याशी मी एवढ्या शांत भाषेत बोलेल.."

रॉबिन डोक्यावर हात ठेवत खालीच बसतो..

शौर्य : "आयुष्य खुप मोठं आहे.. अजुनही वेळ नाही गेलीय.. सुधर रॉबिन... आता फक्त तु तिला लांब केलंस.. पण अजुनही असाच वागलास तर ती स्वतःला आपल्या सगळ्यांपासून लांब करेल.. मग रडत बसु नकोस.. कारण ती जेवढं तुझ्यावर प्रेम करते ना तेवढं प्रेम ते ही तुझा सारख्या मुलावर करणार तुला तुझ्या उभ्या आयुष्यात कोणी दुसर मिळणार नाही.. हे मी कोऱ्या कागदावर लिहुन देतो तुला.. तुला सुधारलेला बघायला मला आवडेल.. बघ जमलं तर.."

शौर्य नेहमी प्रमाणे आपल्या केसांवरून हात फिरवत रॉबिन वरून आपली नजर हटवतच तिथुन निघाला..

रॉबिन तिथेच डोक्यावर हात लावत त्याने केलेल्या चुकांचा विचार करू लागला.. शौर्यच बोलणं कदाचित त्याने जास्तच मनावर घेतलं होतं..

शौर्य घरी येऊन सरळ आपल्या रूममध्ये जातो.. रोहन त्याला सारख सारख फोन करत असतो..अरे कधीच फोन करतोयस तुला... शौर्य फोन उचलताच रोहन बोलतो..

शौर्य : "बाईक चालवत होतो..फोनकडे लक्षच नव्हतं.."

रोहन : "कधी येतोय इथे..?? तुझ्याशिवाय नाही करमत यार.. लेक्चरमध्ये पण बसावस नाही वाटत.."

शौर्य : "मी पण मिस करतोय तुम्हां सगळ्यांना.."

रोहन : "येतोस कधी??"

शौर्य : "नाही माहीत.. विर ने परमिशन दिलीय.. मम्मा बघु काय बोलते.. बाकी तुम्ही सगळे आहात ना ठिक??"

रोहन : "अजुन पर्यंत तरी ठीकच आहोत.. पण तु लवकर ये.."शौर्य : "हम्म. मी करतो तुला फोन."

रोहन : "हम्म बाय."रोहनचा फोन कट करत शौर्य विराजच्या रूममध्ये शिरतो..

नेहमी प्रमाणे विराज लॅपटॉपमध्ये काम करण्यात गुंतला असतो..शौर्य त्याच्या बाजुला जाऊन बसतो..

विराज : "कोणत्या मित्राला एवढं घाई घाईत भेटायला गेलेलास?? ते ही नाश्ता वैगेरे न करता.."

शौर्य : "ते कॉलेजमध्ये म्हणजे लास्ट टाईम पण न भेटताच गेलो ना मी.. मग सगळ्या मित्रांना.. भेटुन आलो.. ते सोड ना विर.. मम्माला विचारलस तु??"

विराज : "हम्मम.."

शौर्य : "काय बोलली..??"

विराज : "मला डिसीजन घ्यायला सांगितलाय.."

शौर्य : "तु तर रेडी आहेस ना मला दिल्लीला पाठवायला.."

विराज : "हां म्हणजे माझ्या काही तरी अटी आहेत.. त्या तुला मान्य असतील तर तु जाऊ शकतोस दिल्लीला"

शौर्य : "ए विर बस काय.. मी आता लहान आहे का??"

विराज : "तुला मान्य असेल तर बोल नाही तर रहा इथेच.."

शौर्य : "काय झालं?? तु अस भडकतोस का?? सकाळी तर नीट होतास.."

विराज : "दिल्लीत एवढे पैसे कुठे खर्च केले तु.. जवळपास दीड दोन लाख."

शौर्य : "ते मी समीराला गोल्ड ब्रेसलेट घेतलेलं तेच जवळपास एक लाखाच्या आस पास होत आणि इतर खर्च पण असतात ना विर.."

विराज : "आता फक्त माझे नियम ऐकायचे.. ते जर मान्य असतील तर हो बोलायच आणि जरी मान्य नसेल तर इथेच रहायच.. तर नियम नंबर एक असा आहे की तु तुझं क्रेडिट कार्ड इथेच ठेवुन जायच.. डेबिट कार्ड फक्त तु सोबत न्यायच..जेव्हा पैसे हवे असतील तेव्हा तु मला फोन करून सांगायच.. की ह्या कारणासाठी पैसे हवेत. मी पाठवत जाईल.. मान्य??


शौर्य : "ओके मान्य."

विराज : "नियम नंबर 2) रात्रीच पार्टी वैगेरे करणं एकदम म्हणजे एकदम बंद.. मान्य??"

शौर्य : "विर यार महिन्यातुन एकदाच कुठे आम्ही पार्टी करतो.. त्यात पण तु नको तो नियम लावतोस"

"तुला जर ही अट मान्य नसेल तर तु तुझ्या रूममध्ये जाऊ शकतोस..", विराज थोडं रागातच बोलतो.

शौर्य : "भडकु नकोस ना.. ठिक आहे.. नाही करत पार्टी"

विराज : "नियम नंबर 3) जर लेक्चरला बसणार नसशील तर गप्प हॉस्टेलमध्येच रहाययच.. बाहेर गार्डन किंवा ग्राउंडवर बसायला जायच नाही.."

शौर्य : "ओके.."विराज : "नियम नंबर 4) रोज रात्री ठीक नऊ किंवा साडे नऊच्या आस पास मी तुला व्हिडीओ कॉल करेल तेव्हा मला तु तुझ्या रूममध्येच दिसला पाहिजेस.. मान्य??"

शौर्य : "हम्म मान्य.."

विराज : "आणि पाचवा सगळ्यात महत्वाच.."

शौर्य : "तु मला हॉस्टेलवर पाठवतोस की सासरी.. किती ते नियम.. बस झालेना.."

विराज : "पाचवा तर नियम तुझ्यासाठी तर म्हत्वाचाच आहे. कॉलेजमध्ये जाऊन मारामारी करायची नाही.."

शौर्य : "नाही करत..आता बस.. अजुन एकही नियम नको.. मी कधी जाऊ दिल्लीला ते सांग.."

विराज : "उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे.."

"थेंक्स ब्रो..", शौर्य खुश होत विराजला मिठी मारतो..तोच ज्योसलीन शौर्यला शोधत विराजच्या रूममध्ये येते..

विराज : "ज्यो तु ??"

ज्योसलीन : "माझं शौर्यकडे थोडं काम होत "

शौर्य : "काय झालं??"

ज्योसलीन : "थेंक्स.. तुझ्यामुळे रॉबिन परत माझ्याशी नीट बोलु लागला.."

"माझ्या बोलण्याचा एवढा त्यावर प्रकाश पडणार अस मला माहित असत तर आधीच पाडला असता..", शौर्य स्वतःच्या मनातच बोलतो.

विराज : "तु कॉलेजमध्ये रॉबिनला भेटायला गेलेलास..??"

शौर्य : "नाहीss म्हणजे होss.. त्याच्यासोबत इतर मित्रांना पण गेलेलो.. ते ज्योसोबत त्याच थोडं भांडण झालेलं ना.. मग त्याला थोडं प्रेमाने समजवायला गेलेलो.."

विराज : "प्रेमाने?? ते हि रॉबिनला??"

शौर्य : "तु ज्यो ला विचार हवं तर.. हो ना ज्यो..??"

ज्योसलीन : "हो.. शौर्य तो खाली तुला भेटायला आलाय.. प्लिज त्याला एकदा भेटशील.."

शौर्य : "रॉबिन मला भेटायला आलाय??"

ज्योसलीन : "प्लिज एकदा त्याला भेट.. माझ्यासाठी.."विराज शौर्यकडे बघतच राहतो..

शौर्य : "विर जाऊ भेटायला..??""एक मिनिट थांब मी पण येतो.. तु परत काही तरी करून आला असशील हे नक्की.",अस बोलत विराज सुद्धा शौर्यसोबत रॉबिनला भेटायला खाली निघाला..

(आता पुढे काय?? त्यासाठी प्रतिक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)क्रमशः©भावना विनेश भुतल