अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 44 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 44

गाडीत दंगा मस्ती चालुच होता..

"ए रोहन गाडी बाजुला घे ना.. तो बघ तिथे कॅक शॉप आहे मी कॅक घेऊन येतो."0गाडीच्या विंडो मधुन कॅक शॉप दाखवतच शौर्य बोलला.

टॉनी : "ए गाईज प्लिज कॅक वैगेरे नको... आपल्याला उशीर होईल पोहचायला.. आधीच उशीर झालाय.."

"बीचवर जायला कसला आलाय उशीर.. एक काम करतो मी घेऊन येतो.. तुम्ही लोक इथेच थांबा...",शौर्य वृषभला घेऊन गाडीतुन उतरून केक आणायला दुकानात गेला..

जवळपास अर्धा तास अगदी सहज उलटुन गेला तरी वृषभ आणि शौर्यचा काही पत्ता नव्हता..

रोहन : "कॅक घ्यायला गेलेत की बनवायला..? सात वाजुन गेलेत.. तिथे पोहचायला आपल्याला अजुन दिड तास लागेलं बट.. ट्रॅफिक बघता 9 तर आरामात वाजतील.."

टॉनी : "नऊ काय दहा पण वाजतील.."

राज : "मी एक बोलु?? म्हणजे तुम्हांला पटलं तर बघा... आपण त्या बीचमध्ये नंतर गेलो तर नाही चालणार का?? आज इथेच जवळपास असल्याच डिस्कॉ प्लस रेस्टॉरंट मध्ये जाऊयात. कारण नऊ वाजता पोहचुन आपण सेलिब्रेशन कधी करणार आणि डिनर कधी..?? परत यायला खूप रात्र होईल.."

टॉनी : "मला पण आत्ता असच वाटतय.. तरी शौर्यला कॅक नको बोलत होतो..."

सगळेच गाडी बाहेर येऊन उभे राहिले..

अर्ध्या तासात अजून पंधरा मिनिटांची भर पडली.. पण अजुन दोघे काही आले नव्हते..

'गाईज सो सॉरी.. खूप रश होती तिथे.. चला आपण निघुयात..", शौर्य हातात कॅकचा बॉक्स पकडतच बोलला..

सगळे हाताची घडी घालुन त्याच्याकडे रागात बघु लागले..

वृषभ : "काय झालं चला.."

तसे सगळे वृषभकडे रागाने बघु लागले.. वृषभ आणि शौर्य एकमेकांकडे बघतच रहातात..

"कुछ तो गडबड हे दया..", वृषभ हळुच शौर्यच्या कानात बोलला.

रोहन : "वाजले किती??"

वृषभ : "तुझ्या हातातलं घड्याळ बंद पडल का??"

रोहन रागातच वृषभकडे बघु लागला.

वृषभ : "ए रोहन यार.. अस रागात नको ना बघुस.. हातात घड्याळ असुन मला कसला टाईम विचारतोयस म्हणुन बोललो मी.."

रोहन : "वृषभ आपण त्या कॅफेमध्ये 8 पर्यंत कसही करून पोहचायच अस आपलं ठरलं होतं.. "

शौर्य : "एक मिनिट आपण बीच वर जात होतो.."

राज : 'तेच तो बोलतोय.. जरा शांत बस आणि ऐक तो काय बोलतो ते.."

वृषभ : "कॅक शॉप मध्ये गर्दी होती रे.. आज खुप जणांचा बर्थडे आहे वाटत.. '

रोहन : "अरे मग पुढे दुसर दुकान भेटलं असत ना.. तुम्ही रिटर्न यायच ना गर्दी बघुन.."

शौर्य : "अरे पण आत्ता जाऊयात ना.. आत्ता काय प्रॉब्लेम आहे.. तसही बीचवर रात्रीच मज्जा येते.. नऊ वाजेपर्यंत पोहचु.."

रोहन : "ए शौर्य तु समजतोस तसला बीच नाही रे बाबा.. इट्स ताबुला बीच.. दिल्लीतल सगळ्यात फेमस केफे आहे ते.. सगळा प्लॅन तुम्ही दोघांनी खराब केलात.."

शौर्य : "सॉरी ना यार..आत्ता मला काय माहिती.. मी तर काल पासुन वेगळाच बीच समजत होतो.. आत्ता काय करूयात.."

रोहन : "आता आपण डिस्कॉला जात आहोत.. तुम्हा दोघांना काही प्रॉब्लेम..??"

वृषभ : "आज टॉनीचा डे आहे.. तो बोलेल तस.."

शौर्य : "टॉनी तुला चालेल??"

टॉनी : "आत्ता चालवुन घ्यावं लागेल.. काय ऑप्शन आहे का दुसरा??"

रोहन : "मग बसा गाडीत."

सगळेच नाराज होतच गाडीत बसले

राज : "एखादा पार्क दिसला की गाडी थांबव.. आपण तिथे कॅक कट करूयात आणि मग डिस्कॉला जाऊयात.."

राजने सांगितल्या प्रमाणे रोहनने गाडी एका पार्कजवळ थांबवली..

कॅक वर केंडल ठेवतच शौर्य वृषभकडे बघु लागला..

वृषभ : "काय झालं??"

शौर्य : "आपण माचीस बॉक्स घ्यायला विसरलो यार..कँडल कशी पेटवणार??"

"माझ्याकडे लायटर आहे.",रोहन खिश्यातुन लायटर काढतच शौर्यकडे देत बोलला..

शौर्य रोहनकडे बघतच रहातो..

रोहन : "धर.."

वृषभ : "शौर्य लवकर कर."

शौर्य रोहनने दिलेल्या लायटरने केंडल पेटवतो..

समीरा आणि मनवी मोबाईलमध्ये टॉनीच्या बर्थडेचे ते सोनेरी क्षण टिपण्यात व्यस्त असतात..

टॉनी कॅक वर ठेवलेल्या कँडलवर फुक मारतच कॅक कट करतो.. तसे सगळे त्याच्यासाठी हॅप्पी बर्थडेच सॉंग गातच टाळ्या वाजवतात.. राज कॅकचा पीस सुरीने कट करत टॉनीला भरवतो आणि उरलेला त्याच्या गालाला फासतो..

सगळे एक एक करत कॅकचा पिस कट करतच टॉनीला भरवतात आणि हाताला लागलेला कॅक त्याच्या तोंडाला फासतात..

टॉनी पण प्रत्येकाला कॅक भरवतो..

'गाईज सेल्फी.", अस बोलत समीरा थोडं पुढे जात आपला मोबाईल समोर धरते.. सगळे एक एक फनी पॉज देतच सेल्फी काढतात..

टॉनी : "गाडीत पाणी आहे का..??"

रोहन पाण्याची बॉटल काढुन टॉनीच्या हातात देतो.. टॉनी बाटलीतल्या पाण्याने तोंड धुऊन बाटलीतील सगळं पाणी संपवतो.. बाकीची मंडळी अजुनही कॅकची स्तुती करत कॅक खाण्यात बिजी असतात.. सगळ्यांचे हात कॅकने अगदी बरबटलेले असतात..

राज : "टॉनी पाणी??"

"संपल..",बाटली उलटी करून हलवतच तो सगळ्यांना दाखवतो

रोहन : "सगळं संपवलंस??"

टॉनी : "आत्ता कॅकच एवढा फसलात तुम्ही तर काय करू??"

वृषभ : "थोडं तरी ठेवायच होतंस यार.. किती सेल्फीश आहेस तु.."

राज : "आज त्याला काही बोलायच नाही हा.. त्याचा बर्थडे आहे.."

वृषभ : "झालं.. गर्लफ्रेंड बोलली टॉनीची.."

तसे सगळे राजला हसु लागतात

रोहन : "आत्ता काय करायच??"

राज सगळ्यांकडे बघत शौर्यकडे इशारा करतो.. समीरा आपल्या एका हाताने मोबाईलमध्ये घेतलेले क्लिक्स शौर्यला दाखवत असते.. शौर्य एका हाताने कॅक खात ते बघत असतो..

सगळे हसतच राजला ओके बोलतात..

"ए शौर्य आम्हांला पण दाखवणं", अस बोलत राज आपला हात शौर्यच्या खांद्यावर ठेवत त्याला मागे घेतो... तसे कॅकची बोट शौर्यच्या शर्ट उमटतात..

शौर्य शर्टवर नजर फिरवत राजकडे बघतो..

शौर्य : "राज यार.. तु शर्ट खराब केलंस.. तु मुद्दामुन केलंस ना..?? खर सांग.."

"नाही यार.. अस मी मुद्दामुन करेल का.. किती छान शर्ट आहे तुझं. फक्त इथेच तर लागलंय.. दे मी पुसुन देतो..", राज दुसरा हात पण शौर्यच्या शर्टला पुसू लागतो.

"राज स्टोप दिस", शौर्य राजने शर्टला लावलेले कॅकचे डाग बघतच त्याला बोलतो

" राज तु थांबच आत्ता..", अस बोलत शौर्य राजला मारायला जाऊ लागतो..

शौर्य भडकलाय हे बघताच..

"वृषभ वाचव", अस बोलत राज तिथुन पळु लागला..

शौर्य : "आत्ता पळतोयस कुठे.. ?? थांब."

शौर्य रागातच त्याच्या मागे जाऊ लागतो..

"ए शौर्य चुकुन झालं सोडना", अस बोलत वृषभमध्ये येऊन दोन्ही हाताने शौर्यला अडवतच दोघांच्यामध्ये येत बोलला.. तसे वृषभच्या दोन्ही हाताचे निशाण शौर्यच्या शर्टवर उठतात..

शौर्य आपल्या शर्टकडे बघतच वृषभकडे बघतो..

"वृषभ यार तु पण.", शौर्य रडवा चेहरा करतच वृषभला बोलला..

वृषभ : "सॉरीsss ते राजला वाचवायच्या नादात लागलं चुकुन.."

"काय यार किती खराब केलंस त्याच शर्ट..", पाठून रोहन येऊन शौर्यच्या शर्टला हात पुसत त्याला बोलतो

शौर्य : "रोहन... तु तरी.."

रोहन : "अरे मी तर क्लिन करतोय ते.."

शौर्य : "तु तुझ्या कॅकचे हात माझ्या शर्टाला पुसुन शर्ट क्लीन करणार..?? तुम्ही लोकांनी पुर्ण माझं शर्ट खराब केलात यार.. तुम्हां तिघांना मी बघतोच आत्ता पण राज तुला सगळ्यात आधी बघतो तु थांबच.."

राज : "थांबलोच तर आहे.. पण येताना ते तुझे हात जर तुझ्या शर्टला पुसून ये.."

शौर्य : "हात तर मी पुसणार.. पण माझ्या नाही तर तुम्हा तिघांच्या शर्टला."

टॉनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढुन सगळं शुट करत होता..

तिघेही शौर्यपासुन स्वतःला वाचवु लागले.. रोहनच्या गाडी भोवती गोल गोल फिरू लागले..

राज : "शौर्य सॉरी ना.."

वृषभ : "हो ना. किती भडकतोस तु.. टॉनी तु तरी समजव.. "

टॉनी : "शौर्य खुप चुकीच वागले यार ही लोक तुझ्यासोबत.. सगळ्यात जास्त तर हा वृषभ.. त्याला तर सोडुच नकोस तु.. त्याचाच प्लॅन होता हा"

वृषभ : "तु समजवतोयस की भडकवतोयस??"

"त्याला प्रेमाने समजवतच भडकवतोय रे.. अस काय करतोस..", टॉनी हसतच बोलला

रोहन : "शौर्य बस ना यार.. उशीर होईल डिस्कॉला जायला.. "

शौर्य : "होऊ दे. I don't care.."

राज : "टॉनीचा विचार कर.. त्याची काय चूक आहे. बिचाऱ्याचा बर्थडे आहे.."

तिघेही शौर्यला रिक्वेस्ट करत होती.. पण शौर्य मात्र ऐकत नव्हता कोणाच..

मनवी : "गाईज बस ना.. निघुयात इथुन.. उशीर होतोय"

पण सगळेच मस्तीच्या मुडमध्ये होते.. कोणीही काहीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हते..

राज : "समीरा समजवना ग ह्याला.."

समीरा : "शौर्य नको ना भडकूस.. मस्ती करत आहेत ना ते..", समीरा शौर्यचा हात पकडतच बोलली

शौर्य : "अशी??"

राज : "आत्ता दोन दिवस तु भेटला नाहीस. मग ते प्रेम थोडं जास्तच वाहत होत आमचं.. हो ना गाईज.."

वृषभ : "हो न.."

रोहन : "नंतर डिस्कॉ मध्ये गेल्यावर चेंज करना.. तस बेगेत एखादं शर्ट असेलना ते घालना मग आणि हे शर्ट गाडीतच ठेव.. मी तुला ड्रायक्लीन करून देतो.. मग तर झालं.."

शौर्य : "किती त्रास देता यार तुम्ही मला.."

रोहन : "आत्ता तु आम्हा सगळ्यांचा लाडका म्हटलं तर तुलाच त्रास देणार ना.."

सीमा : "आता आमचे पण हात खराब झालेत आम्ही पण पुसले तर चालेल का?? "

शौर्य : "हो आता माझं शर्ट सार्वजनिकच आहे या पुसा.."

समीरा आणि सीमा सुद्धा शौर्यच्या शर्टला हात पुसते..

मनवी : "रोहन मी पुसले तर चालेल??"

राज : "रोहनला काय विचारतेस मला विचार.. तसही माझ्यामुळे तुला ही संधी मिळाली पुस बिनधास्त.."

"पुस ना.. तसही शर्ट खराब झालंय त्याच.. गाईज बसा गाडीत लवकर.. डिस्कोमध्ये तरी वेळेवर पोहचूयात..", रोहन अस बोलतच गाडीमध्ये जाऊन बसतो..

मनवीसुद्धा शौर्यजवळ येऊन शौर्यच्या शर्टाला हात फासुन एक अश्लील हसु शौर्यला दाखवतच गाडीत जाऊन बसते.. शौर्यला खर तर तिचा राग येत असतो.. पण रोहनकडे बघून तो काही न बोलताच गाडीत जाऊन बसतो..

सीमा : "लास्ट टाईम शौर्यमुळे दि रॉयलमध्ये एन्जॉय करायलाच नाही मिळालं.."

मनवी : "आणि आज बीचमध्ये.."

शौर्य : 'एक मिनिट.. ह्या राज ने मला ड्रिंक पाजलेली.. त्यामुळे सगळ झालेलं.."

राज : "आज परत मग.."

शौर्य : "अजिबात नाही हा."

समीरा : "तुम्ही लोक अस जबरदस्ती कस काय त्याला ड्रिंक पाजू शकता..?"

राज : 'आम्ही एकच पॅक पाजलेला.. तुझा शौर्यच अजून एक अजून एक करत बसलेला..हो ना टॉनी??"

टॉनी : "हो..म्हणजे एकाच पॅकमध्ये त्याला चढलेली.. म्हणुन तो तस करत होता.."

रोहन : "गाईज तुम्ही इथेच उतरा.. मी गाडी पार्क करून येतो.."

शौर्य सोडुन सगळी मंडळी गाडीतुन उतरली..

शौर्य बेग खोलत त्यातुन एक शर्ट काढुन घालु लागला..

रोहन : "नाईस शर्ट.."

शौर्य : "थेंक्स.."

बाकीची मंडळी दोघांची वाट बघत तिथेच उभी असतात..

रोहन सगळ्यांना घेऊन आत डिस्कॉमध्ये गेला..

समीरा : "आज जरा रश वाटतेय ना??"

रोहन : "सँडे आहे ना... सँडेला अशीच रश असते.. बट तुम्ही एन्जॉय करा.. "

रोहन अस बोलताच सगळे म्युसिकच्या तालावर डिस्कॉ लाईटीत नाचायला जाऊन लागले..

रोहन डीजे वाल्याजवळ जातच गाणं चँज करायला सांगतो.. तस त्याने रोहनच्या फर्माईश प्रमाणे गाणं लावलं..

¶¶अरे लड़की beautiful कर गयी चुल (चुल, चुल)
अरे लड़की beautiful कर गयी चुल (चुल, चुल) yeah

देख तेरा रंग सांवला हुआ बावला
लड़की नहीं है तू है गरम मामला
बोलती बंद मेरी, कहूं क्या भला
कुछ भी कहा नहीं जाए

नाचे तू दिल्ली, हिले है London
मटक, मटक जैसे Raveena Tandon
क्या नाचे तू दिल्ली, हिले है London
मटक, मटक जैसे Raveena Tandon
आग लगाने आई है बन ठन
गोली चल गयी धायं
नखरे विलायती, ego मैं रहती
नखरे विलायती, ego मैं रहती
टशन दिखाती full

अरे लड़की beautiful कर गयी चुल (चुल, चुल)
अरे लड़की beautiful कर गयी चुल (चुल, चुल) yeah¶¶

सगळे अगदी बेधुंद होऊन नाचत असतात..

समीरा आणि शौर्य दोघेही एकमेकांच्या स्टेप्स फॉलो करतच नाचत असतात.. नाचताना होणार एकमेकांचा स्पर्श दोघांनाही हवा हवासा वाटत असतो.. एका नंतर एक डिस्कॉ गाणी वाजतच रहातात.. सगळे अगदी बेधुंद होऊन नाचत असतात.. रोहन दमतो तस तो तिथुन बाहेर पडतो.. हातात बिअरने भरलेला ग्लास घेत बाजुला जाऊन बसतो..

शौर्यसुद्धा तिथुन रोहनच्या बाजुला जाऊन बसतो..

रोहन : "काय झालं?? तु पण दमलास??"

शौर्य रोहनचा हात हातात घेतच त्याच हातावरच टी शर्टवर करतच त्याच्या हातावर काही दिसत का बघतो..

रोहन : "काय झालं?? अस काय बघतोस??"

शौर्य : "तुला अजुन कसली कसली व्यसन आहेत ते बघतो.. बिअर वैगेरे ठिक आहे यार पण तु स्मॉक सुद्धा करतोस.."

रोहन मान खाली घालुन शांतच बसतो..

शौर्य : "रोहन तु ड्रग्स पण घेतोस ?? "

रोहन काहीच बोलत नाही.. हातात घेतलेल्या ग्लासाकडे बघत बसतो..

"इथे बघ माझ्याकडे. मी तुझ्याशी बोलतोय.", अस बोलत शौर्य त्याच्या हातातलं ग्लास आपल्या हातात घेतो..

तोच वृषभ, राज आणि टॉनी पण त्या दोघांजवळ येतात..

राज : "ह्ये शौर्य आर यु सिरीयस??"

टॉनी : "आम्ही चक्क तुला बिअरने भरलेला ग्लास हातात घेताना बघत आहोत.."

राज : "पण आमच्या आवडीची बिअर तु कशी काय पिऊ शकतोस??"

राज टॉनीला टाळी देत हसतच शौर्यला बोलतो

"रोहन मला माझ्या प्रश्नाच उत्तर हवंय.", शौर्य दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रोहनकडे बघत त्याला विचारतो.

रोहन : "ते कधी तरी."

शौर्य : "ए रोहन प्लिज नको ना अस काही करुस.. प्लिज थांबव हे सगळं.."

रोहन : "हम्म बघु..'

वृषभ : 'काय बघु?? काय चाललंय तुम्हा दोघांच...??"

शौर्य : "ह्या रोहन ने नको त्या संगतीत राहुन नको त्या सवयी लावुन घेतल्यात यार.. स्मॉक पण करतो हा.. ड्रग्स पण घेतो.. हे बघ हात बघ ह्याचा.."

वृषभ : "ए रोहन काय आहे हे..??"

टॉनी : "रोहन हे बिअर वैगेरे ठिक आहे यार.. बट स्मॉक आणि ड्रग्स वैगेरे.."

शौर्य : "रोहन मला प्रॉमिज कर तु ह्या पुढे स्मॉक वैगेरे करणार नाहीस आणि ड्रग्स वैगेरे तर अजिबातच घेणार नाहीस."

रोहन शौर्यच्या बोलण्यावर काहीच रिएक्शन देत नाही.. त्याच्या हातातुन बिअरचा ग्लास घेतच एका घोटात सगळी बिअर तो संपवुन टाकतो..

शौर्य : "रोहन मी तुझ्याशी बोलतोय यार.. ही गोष्ट तु माझ्यासाठी करूच शकतोस ना.."

"एक बिअरची बॉटल दे..", समोर असलेल्या वेटरला ऑर्डर देतच रोहन बोलला

वेटरने बॉटल देताच रोहन ती बॉटल शौर्य समोर ठेवतो..

रोहन : "माझ्यासाठी एक गोष्ट करशील??"

शौर्य : "तु स्मॉकींग आणि ड्रग्स घ्यायच बंद करणार असशील तर तु बोलशील ते मी करेल.. फक्त तु बोल.."

बाकीचे तिघे रोहनच वागणं बघतच रहातात..

"संपव ही बॉटल..",अस बोलत बिअरची बॉटल शौर्यच्या हातात देतो.

शौर्य : "रोहन तुला माहिती मला हे सगळं नाही आवडत यार.. तु हे सोडुन दुसर काहीही बोल मी करेल तुझ्यासाठी.."

रोहन : "माझं पण तसच झालंय शौर्य.. मला तु ते सोडुन काहीही सांग मी करेल तुझ्यासाठी..."

शौर्य : "बस काय रोहन.. तु एक पण गोष्ट माझ्यासाठी करू नाही शकत काय??"

रोहन : "मी कुठे नाही बोलतोय.. तु हे कर मी ते करेल.. "

शौर्य शांतच बसतो..

रोहन : "काय झालं?? नाही ना जमत... जस तुला नाही ना जमत तसच माझं आहे यार.. प्लिज समजुन घे.. मला नाही जमणार.."

"एक सादी गोष्ट तु ऐकत नाहीस माझी.. मला लाज वाटते तुला माझा मित्र बोलायची..",रोहनला मागे ढकलतच शौर्य बोलला..

राज : "शौर्य प्लिज.. शांत हो.."

टॉनी : "मला अस वाटतंय आपण जेवुन निघुयात इथुन.."

मनवी : "तुम्हा लोकांचं काय चालू आहे??"

शौर्य रोहनकडे बघतो..

रोहन मनवीच्या नकळत एक बोट आपल्या ओठांवर ठेवत इशाऱ्यानेच शौर्यला शांत रहा म्हणुन रिक्वेस्ट करतो.

"ते आपण आत्ता जेवायला जाणार ना तर त्याचा मेनु डिस्कस करत होतो.. दहा वाजत आलेत ना. पुन्हा उशीर होईल..",रोहनची बाजु सावरतच वृषभ बोलला

मनवी : "हो जेवेपर्यंत अकरा वाजतील. मी समीरा आणि सीमाला बोलवते आपण जेवुन निघुयात.."

सगळे डिस्कॉला बाय बाय करत डिनर करायला खाली जातात..

मेनुकार्ड टॉनीकडे सोपवतच सगळे त्याच्याकडे बघु लागतात..

टॉनी : "तुम्ही अस माझ्याकडे नका बघु.. पार्टी माझ्याकडुन आहे.. तुम्ही ऑर्डर करा.. तुम्हांला जे खायच ते.."

रोहन : "टॉनी तु ऑर्डर कर मी आलोच.."

शौर्य : "आत्ता तु कुठे चाललायस??"

रोहन : "आलोच..",रोहन तिथुन उठुन गाडीत टॉनीसाठी घेतलेलं गिफ्ट घेऊन येतो

आम्हां सगळ्यांकडून तुला हे बर्थडे गिफ्ट..

मनवी : "ए टॉनी गिफ्ट उघडुन बघना तुला आवडतय का ते.."

टॉनी : "तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने दिलय मग आवडेलच ना.."

वृषभ : "तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तरी बघु देत गिफ्ट आवडल्यावर कसे असतात ते.. काय रोहन बरोबर ना..."

रोहन : "हो न.."

टॉनी सगळ्यांच्या पुढ्यात गिफ्ट उघडु लागला...

"वॉव.. वायरलेस इयरबड्स..", टॉनी एकदम खुश होतच बोलला..

टॉनी : "नक्कीच राज ने सुचवलं असणार.."

"आत्ता गर्लफ्रेंडलाच माहित असत ना..आपल्या बॉयफ्रेंडला काय आवडत ते.. काय राज??" शौर्य अस बोलताच वृषभ त्याला टाळी देतच हसतो..

राज : "समीरा बघ ना ग तुझ्या शौर्यला.."

"ए टॉनी बघ ना तुझ्या गर्लफ्रेंडला..", शौर्य पण राजला चिडवतच बोलला

सगळे राजची मस्ती करत हसतात..

मज्जा मस्ती करत डिनर संपवतात आणि पुन्हा हॉस्टेलवर जायला निघतात..

मनवीच घर आधी येत असल्याने रोहन तिला ड्रॉप करत गाडी हॉस्टेलच्या दिशेने नेतो..

शौर्य गाडीत रोहनच्याच बाजुला बसलेला असती.. तो एक टक रोहनकडे बघत असतो.. रोहन त्याच्यापासुन आपली नजर चोरून खिडकी बाहेर बघत असतो..

बाकीची मंडळी मागे पार्टीतल्या गप्पा गोष्टी करत असतात..

रोहन : "तुझ शर्ट गाडीत ठेव.. उद्या कॉलेजला येता येता.. ड्रायक्लिन करायला देतो.."

शौर्य : "नाही नको.. राहू दे.. तुम्हा सगळ्यांची आठवण म्हणुन मी तो तसाच जपुन ठेवेल.."

हॉस्टेल येताच सगळे रोहनच्या गाडीतुन उतरू लागतात.. रोहनला बाय करतच हॉस्टेलमध्ये जातात..

शौर्यसुद्धा जायला निघतो.. तोच रोहन शौर्यला आवाज देतो.. त्याच्या गाडीत शौर्य त्याची बेग विसरून आला असतो..

"थेंक्स.", त्याच्या हातातुन आपली बेग घेतच शौर्य बोलतो आणि तिथुन जायला निघतो..

रोहन : "शौर्यss ऐक ना.."

शौर्य : "हम्म बोल.."

रोहन : "नको ना रागवूस माझ्यावर.. तु अस नाराज झालेला नाही आवडत यार मला.. डोकं काम नाही करत माझं.."

शौर्य : "मग ड्रग्स आणि सिगारेट प्लिज सोडुन दे.."

रोहन : "बघु.."

शौर्य : "रोहन सुरुवातीला त्रास होईल यार.. मग होईल सगळं ठिक. प्लिज ना रोहन.."

"शौर्य मी तुला मगाशी सिंपल उदाहरण दिल ना.. जस तु घेऊ नाही शकत तस मी नाही सोडू शकत यार. मला नाही कंट्रोल होत.. प्लिज आणि तु अस माझ्याशी अस नाराज राहिलास तर मी ती गोष्ट जरा जास्तच करतो.." एवढं बोलुन रोहन गाडीत जाऊन बसतो आणि शौर्यकडे न बघताच तिथुन निघून जातो..

शौर्य फक्त त्याच्या गाडीकडे बघत रहातो..

"ए शौर्य चल.", वृषभने आवाज देताच तो भानावर येतो..

सगळे राजच्या मदतीने हॉस्टेलमध्ये घुसतात..

शौर्य रूमवर येताच त्याने टॉनीसाठी घेतलेलं गिफ्ट बेगेतुन काढत त्याच्या रूममध्ये जातो..

शौर्य : "टॉनी सॉरी यार.. माझ्यामुळे तुझा मुड ऑफ झाला.."

टॉनी : "इट्स ओके यार.. आपण नंतर जाऊयात बिचमध्ये.. आणि हे काय??"

शौर्य : "तुझं गिफ्ट.. मला कळत नव्हतं तुला काय घेऊ ते.. बघ आवडतंय का??"

टॉनी : "अरे काय तु पण.. गिफ्ट वैगरे घेत बसलास.. "

शौर्य : "बस काय तुझा बर्थडे आणि अस खाली हात येऊ काय मी.."

"थेंक्स यार.."शौर्यला मिठी मारतच टॉनी बोलला

टॉनीला गिफ्ट देऊन शौर्य रूममध्ये येऊन झोपुन जातो.. खर तर रोहनच्या विचाराने त्याला झोप लागत नसते पण प्रवासाने आणि आदल्या दिवशीच्या जागरणाने तो दमुन गेलेला असतो.. विचारांच्या तंद्रीत तो कधी झोपतो ते त्याच त्यालाच कळत नाही..

★★★★★

दुसऱ्या दिवशी सगळे नेहमीप्रमाणे कॉलेजला आले..

नेहमीप्रमाणे रोहन येऊन शौर्यच्या बाजुला येऊन बसला..

गुड मॉर्निंग ! रोहन शौर्यच्या बाजुला बसतच बोलतो..

शौर्य : "हम्मम.."

शौर्य बुक्समध्ये काही तरी वाचण्यात बिजी आहे असं शौर्यला दाखवतो

रोहन : "आज फुटबॉल खेळूयात..? लेक्चर झाल्यावर??"

शौर्य : "नाही नको.. मी हा एक लेक्चर अटेंड करून हॉस्टेलवर जातोय.."

रोहन : "काsss??"

शौर्य काहीच बोलत नाही

"बोल ना??",रोहन शौर्यचा हात पकडतच बोलतो

तोच अकाउंटचे सर येतात आणि प्रेसेंटी घेऊन लेक्चरला सुरुवात करतात.. शौर्य मन लावुन लेक्चर अटेंड करतो.. रोहनच मात्र लेक्चरमध्ये लक्ष लागत नसत.. कधी लेक्चर संपतय अस त्याला झालं असं आणि फायनली अकाउंटच लेक्चर संपत.. शौर्य बुक बेगेत भरून बेंचवरून उठुन जाऊ लागला..

रोहन : "तु का चाललास??"

शौर्य काहीही न बोलता क्लासरूम बाहेर पडला..

रोहन : "हा का लेक्चरला बसत नाही.."

वृषभ : "अस काय करतोस.. मेथ्स लेक्चर आहे.. त्याला बसायला देणार आहेत का सर??"

रोहन : "मी पण आज नाही बसत.."

रोहन आपली बेग उचलतच शौर्यच्या मागून बाहेर पडला..

रोहन शौर्यला आवाज देतच त्याच्या मागे आला..

रोहन : "शौर्य प्लिज ना.."

शौर्य : "तु लेक्चर का नाही अटेंड करत आहेस??"

रोहन : "असच.. तु नीट बोलत नाहीस माझ्याशी.. मग माझं मन नाही लागत लेक्चरला.."

शौर्य : "तु जो पर्यंत नको ती व्यसन सोडत नाहीस तो पर्यंत मी असच वागणार तुझ्यासोबत.."

रोहन : "ठिक आहे मी नाही करत. बस.. "

"शप्पथ घेऊन सांग माझी.", रोहनचा हात घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवतच शौर्य बोलला..

रोहन शौर्यकडे बघतच रहातो..

शौर्य : "बोल ना आत्ता.."

क्रमशः

(रोहन सोडेल त्याला लागलेली व्यसन..?? कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा.. भेटूया पुढील भागात)

©भावना विनेश भुतल