निरपेक्ष प्रेम... Anonymous द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निरपेक्ष प्रेम...







पाऊस धो धो कोसळत होता.वीजांच्या लखलखाटाने काही काळापुरता उजेड पडून काळ्याकुट्ट काळोखात एक आशेची ज्योत तेवत असल्याचा भास होत होता.चारी
बाजूने ढग जमा होऊन आले होते. अंधार तर एवढा दाटला होता की कोणी समोरून डोळ्यांत बोट जरी घातले तरी जाणीव होणार नाही.पावसाच्या टपोऱ्या थेंबानी धरती अगदी हर्षोन्मलीत झाली होती.जणू ते मोत्यासमान थेंब तीच्या कायेवर बरसून आपल्या आगमनाची वार्ता देत होते. सोसाट्याच्या वाऱ्याने हाच आपला शेवटचा प्रयत्न आहे समजून या जीवसृष्टीवर उच्छाद मांडून हाहाकार माजवला होता.त्या जीवघेण्या परिस्थितीत ही उन्मळून न पडता आपले अस्तीत्व टिकवून ठेवण्याचा प्राणपणाने प्रयत्न करणाऱ्या वृक्षांच्या हिरव्यागर्द पर्णांची सळसळ त्या भयाण शांततेत ही भयप्रद वाटत होती. ढगांच्या गडगडाटाने सारा आसमंत दणाणून सोडला होता. वातावरणातील एक प्रकारचा गारवा अंगावर शहारे आणत होता.आणि आज ही मी त्या ओबडधोबड रस्त्याकडे डोळे लावून चातकासारखी त्याची वाट पाहत होते.दहा वर्ष !दहा वर्ष झाले . तो त्याचे कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत होता.आज ही तो येणार खात्री होती मला.त्याच्या एवढी वर्षे चालत आलेल्या परंपरेत तो खंड पाडेल असे कदापी शक्य नाही...पण आज निसर्गाच्या मनामध्ये काही वेगळेच होते.आमच्या मिलनात बाधा आणण्याचा त्याचा हर एक प्रयत्न सुरू होता.कदाचीत स्वतःच्या अस्तित्वा पुढे माझी माझ्या प्रिय सख्याच्या भेटीसाठी असणारी ओढ त्या निसर्गाला अगदीच नगण्य वाटत होती.


आणि तो काय!!!दूरवरून एक दुचाकी आपला तोल सांभाळत कशीतरी त्या निसर्गसृष्टीच्या चक्राचा सामना करत संथपणे माझ्याजवळ येत होती. तो आला होता! हो, तो आजही आला होता! या धुवाधार कोसळणाऱ्या वर्षासरींना, या लखलखाट करून तांडव माजवणाऱ्या विद्युलतांना ,गडगडाटी आवाज करत गरजणार्या मेघांना न जूमानता तो आला होता. माझ्यासाठी !या मधुराक्षीला भेटण्यासाठी तो आला होता...त्याने त्याचा शब्द आजतागायत पाळला होता आणी आज ही त्याला हा खवळलेला निसर्ग रोखू शकला नव्हता.या वार्‍याचा झंझावतांची ही तमा न करता माझा निलमणी ,माझा सखा, माझा प्रियतम आला होता!...अतीव हर्षाने माझे उर भरून आलं होतं...खरचं ! तो आला होता माझ्यासाठी.... आज ही तसाच होता तो ,अगदी पहिल्यांदा भेट झाली होती तसाच! रुबाबदार डौल,तरतरीत गरुडासारखे नाक,गहूवर्णीय कांती, व्यायाम करुन कमावलेली मजबूूत शरीरयष्टी,डोक्यावर काळेभोर केस जे रुंद अशा कपाळावर येऊन त्याच्या ललाटाशी हीतगूज करत होते.फिकट गूलाबी छटा असलेले गुलाब पाकळीसम अधर आणि चेहर्‍यावर तोच मला भेटण्यासाठी असणारा आतूरभाव!!!


एका मोठ्ठ्याशा झाडाच्या बुंध्याशी बाईक पार्क करून तो हळूहळू एक एक पाऊल टाकत माझ्या दिशेने येऊ लागला ...हातात मला आवडणाऱ्या सोनचाफ्याच्या फुलांचा गुच्छ आणि माझी आवडती काजूकतली,,,,तो माझ्याजवळ येऊन ऊभा राहीला...डोळ्यांत मला भेटण्याच्या ओढीसाठी असणारा प्रतिशोध संपल्याची खूण!...दोन्ही गुडघे खाली टेकवून तो जमिनीवर बसला आणि त्याच्या हातात असणारे माझ्या प्रिय गोष्टी त्याने मला सुपूर्द केल्या.माझ्याशी मन भरेपर्यंत हितगूज करून तो तसाच भरपावसात त्याच्या आवडत्या बाईकवरून डोळ्यांच्या कडा पुसत भरधाव वेगाने निघून गेला. जोरदार घोंघावणार्या सोसाट्याच्या वाऱ्याने माझ्या नील ने मला दिलेली फुले माझ्यापासून हिसकावून मातीमोल केली...शेवटी उरली ती फक्त काजूकतली... त्याच्या माझ्यावर असणाऱ्या निरपेक्ष, नितांत ,निसीम्म प्रेमाचा गोडवा हा निसर्ग नाही हिरावू शकला...नाही हिरावू शकला!!!




मिट्टी मेरी कब्र से ,उठा रहा है कोई ,
मरने के बाद भी ,याद रहा है कोई ,
कुछ पल की मोहोलत और दे दे खुदा ,
उदास मेरी कब्र से ,जा रहा है कोई...!

( शायरी रेफरन्स :गूगल )

समाप्त .


©️मनमंजिरी ❤

( प्रेम हे नेहमीच निरपेक्ष असतं.त्यामध्ये अपेक्षा, बंधन, हक्क या गोष्टी आल्या की त्यामधील गोडवा संपायला वेळ नाही लागतं.ती एक सुंदर भावना आहे व्यवहार नव्हे. )