अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 45 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 45

रोहन शौर्यकडे बघतच रहातो..

शौर्य : "रोहन प्लिज.. घेणा शप्पथ माझी.. तुझ्यासाठीच बोलतोय रे मी.. "

रोहन शौर्यच्या डोक्यावरचा हात काढतो..

शौर्य : "काय झालं??"

रोहन : "मला नाही जमणार यार.. तु का हट्टीपणा करतोयस?? प्लिज सोड ना तो टॉपिक.."

"जो आपल्या मित्रासाठी काहीच करू नाही शकत.. असला मित्र नकोय मला माझ्या लाईफमध्ये.. ", रोहनला लांब ढकलतच शौर्य हॉस्टेलमध्ये जाऊ लागला..


"शौर्य मग माझं पण ऐक..", शौर्यचा हात पकडतच रोहन त्याला थांबवतो


रोहन : "तु बिअरची बॉटल पूर्ण पिऊन दाखव मग मी माझी सगळी व्यसन बंद करेल.."

"तुला माहिती मी ते नाही करू शकत, तरी तु अस बोलतोयस..", शौर्य रोहनची कोलर पकडतच बोलला..

रोहन : "मग तुला पण माहिती ना.. नाही सोडू शकत मी ते तरी तु माझ्याशी अस वागतोयस यार.. सवय झालीय यार मला त्या सगळ्या गोष्टींची. मी ड्रग्स शिवाय नाही राहु शकत. त्रास होतो मला जर मी नाही घेतलं तर.. खर तर ती सवय नव्हतो लावणार मी.. पण मित्रच असे भेटले त्याला काय करू सांग.. तेव्हाही नव्हतो घेत रे मी.. पण त्या फैयाज ने जबरदस्ती केली यार म्हणुन मस्ती मस्तीत घेऊन बघितलं.. खुप रिलीफ वाटलं ते घेतल्यावर आणि हळूहळू रोज घेऊ लागलो.. लेक्चर सोडून तेच तर करत राहायचो मी.. रोज सवयच झाली मला ती.. पण इतकी सवय झालीय की आता नाही जमत रहायला. नाही घेतलं तर खुप त्रास होतो.."

शौर्य : "रोहन त्रास मला काल पासुन होतोय तुझ्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून.. तुला कस कळत नाही यार. का तुला कळुन आपल्या डोक्यात ही गोष्ट वळवायचीच नाही... सोडsss मी जातोय रूमवर"


रोहन : "तुझ्यासाठी मी लेक्चर सोडून आलोय आणि तु मला अस टाकुन रूमवर निघुन जातोय.. हिच तुझी मैत्री..??"

"तुला लेक्चरला बसता यावं म्हणुन मीsss", शौर्य मध्येच थांबतो..


रोहन : "म्हणुन काय??"

शौर्य : "काही नाही सोड.. खरा मित्र असतास तर समजुन घेतलंस असतस..'

शौर्य रूममध्ये जाऊन रोहनचा विचार करत असतो.. तर इथे रोहन शौर्यला फोन लावत असतो पण शौर्य त्याचा फोन काही उचलत नसतो.. तो तसाच केंटींगमध्ये त्याच्या इतर मित्र मैत्रिणींची वाट बघत बसतो.. लेक्चर संपताच सगळे केंटिंगमध्ये जमतात..


वृषभ : "तु इथे एकटाच?? शौर्य कुठेय??"

रोहन : "त्याला काम होत गेला तो निघुन.."

वृषभ : "कालचा राग गेला नाही वाटत त्याचा.."

समीरा : "काय झाल परत आता??? तुम्ही दोघ परत भांडले..??"

रोहन : "मी नाही शौर्य.. हट्टीपणाचा कळस आहे नुसता.."

मनवी : "काय झालं आत्ता??"

टॉनी : "रोहन मी सांगु काय??"

"गप्प राहतोस का जरा.", रोहन चिडतच बोलला

समीरा : "पण आत्ता झालं काय ते तरी सांग?? नाही तर थांब मीच बोलते त्याच्याशी.."

रोहन : "समीरा एवढ पण सिरीयस अस काही नाही आहे.."

मनवी : "मग तु असा अस्वस्थ का वाटत आहेस मला?? आम्हांला कळलंच पाहिजे नक्की काय झालं ते.."

रोहन : "तुम्ही लोकांनी मला नुसतं त्रास द्यायचच ठरवलंय तर करा कॉल त्याला... मी जातो इथुन घरी.."

वृषभ : "तु शांत हो ना.. काय तु बघावं तेव्हा बीपी वाढवत असतो स्वतःचा.. केलाय का त्यांनी फोन.. रोहनने मेथ्स लेक्चर अटेंड नाही केल म्हणुन शौर्य भडकला असेल.. हो ना.."

वृषभ रोहनच्या पायावर पाय मारतच बोलला

रोहन : "अ..हो.."

मनवी : "तुझी मर्जी तुला लेक्चर अटेंड नाही करायचं.. तो अस कस भडकु शकतोस..??"

राज : "ए मनवी आता तु नको ग चालु होऊस.."

वृषभ : "बघ तर.."

तोच शौर्य तिथे येतो...

टॉनी : "शौर्य तु शंभर वर्षे जगणार.. आत्ता आम्ही तुझंच नाव घेतलेलं.."

शौर्य : "तुमच्यासाठी खाऊ आणलाय म्हणजे माझ्या भावाने दिलाय पाठवुन तुम्हा सगळ्यांसाठी..."

समीरा : "शौर्य आम्ही तुझा खाऊ घेऊ पण त्या आधी तु रोहनला सॉरी बोल.."

शौर्य : "कश्याबद्दल??"

मनवी : "ह्याच नेहमीचच आहे.. गोष्टी करून न केल्यासारखा आव चेहऱ्यावर आणायचा.."

शौर्य : "एक मिनिट, हे तु तुझ्याबद्दल सांगत होतीस का आत्ता??"

मनवी : "नाहीsss.. तुझ्याच बद्दल बोलत होती मिस्टर शौर्य देशमुख.."

शौर्य : "ओहह रिअली.. मग तु तर बोलूच नकोस.. तुsss"

"शौर्य प्लिजsss तुला माहिती ना मला नाही आवडत तु तिला अस काही बोललेलं.. ", रोहन मध्येच शौर्यला तोडत बोलला


समीरा : "गाईज प्लिज किप क्वाईट.. शौर्य तु रोहनला सॉरी बोल.."

शौर्य : "अग पण कश्याबद्दल..??"

"आता ती बोलतेय एवढं तर बोलणा.. का इस्यु क्रिएट करतोयस..??", वृषभ एक डोळा मारतच शौर्यला बोलला.


शौर्य रोहनकडे बघतो..

शौर्य : "सॉरीss"

रोहन : "इट्स ओके.. बस ना चेअर घेऊन.."

शौर्य चेअर घेऊन रोहनच्या बाजुला बसतो..

समीरा : "बाय दि वे.. काय आणलंयस??"

"मुंबईला आणि काय मिळत..?? लास्ट टाईम सारखच काही तरी असेल.", शौर्य काही बोलणार तोच मनवी बोलते


"मला नाही माहीत काय आहे म्हणजे काल त्यानेच माझी बेग भरली.. तसही हे मुंबईच नाही.. तो USA ला गेलेला तिथुन घेऊन आलाय आपल्या सगळ्यांसाठी.. ज्यांना खायच ते खाऊ शकता.. जबरदस्ती नाही कुणाला.." शौर्य मनवीला खुन्नस देतच बोलला.


रोहन : "शौर्य प्लिजना"

शौर्य : "तु सारख शौर्य शौर्य काय लावलयस.?? मी उगाच आलो इथे.. सोड.. मी जातो रूमवर.."

शौर्य उठून जाणार तोच रोहन त्याचा हात पकडतच त्याला खाली बसवतो..

"आय एम सॉरी.. प्लिज.. समजुन घेत जा यार मला..",रोहनने रिक्वेस्ट करताच शौर्य खाली बसतो..


राज : "आज सगळेच असे हायपर का होत आहेत..??".

टॉनी : "बघ तर.. आधी हा रोहन.. मग थोडी समीरा पण झाली.. मग ही मनवी आणि आता हा शौर्य.."

सीमा : "आता प्लिज कोणी भांडु नका.."

सगळे मिळून विराजने पाठवलेला खाऊ खात असतात..

वृषभ : "तुझ्या भावाला व्हिडिओ कॉल लाव ना.. आम्ही सगळे त्याला थेंक्स बोलतो.. एवढं आमच्यासाठी तो USA वरून घेऊन आला त्याला थेंक्स तर बोलवंच लागेल ना."

समीरा : "ए हा गुड आयडिया.. शौर्य लाव ना फोन.."

शौर्य : "तो मिटिंग मध्ये असेल आत्ता.. मी तुम्हा सगळ्यांच थेंक्स त्याच्या पर्यंत पोहचवतो..."

रोहन : "लावुन तर बघ.. तुला काय माहित तो मिटिंग मध्ये !आहे ते.."

शौर्य : "अरे लावायला प्रॉब्लेम नाही.. ह्या टाईमला माझा फोन बघुन तो घाबरेल सुद्धा.."

राज : "ए शौर्य तुला नाही लावायचा तर राहू दे.. उगाच कारण देऊ नकोस.."

समीरा : "होणं.."

टॉनी : "किती भारी कारण देतो तु.. कुठून शिकलास..??"

शौर्य : "कारण वैगेरे नाही देत खर तेच बोलतोय"

सीमा : "ह्याला कारणच म्हणतात शौर्य.."

राज : "बघ आम्हा सगळ्यांचच म्हणणं एक आहे.. तु कारण देतोस.."

शौर्य : "मी कारण देत नाही हा पण तुम्ही एवढ फोर्स करताय तर लावतोच फोन.."

शौर्य विराजला व्हीडीओ फोन लावतो..

विराज शौर्यने सांगितल्याप्रमाणे एका प्रॉडक्ट संदर्भातल्या मिटिंगमध्येच बिजी असतो.. खिश्यातुन वायब्रेट होणारा फोन बाहेर काढुन कट करणार पण शौर्यच नाव बघुन तो थोडं टेन्शनमध्ये येतो.. कारण ह्या वेळेलाच त्याने त्याला मारामारी करताना बघितल होत.. आज शौर्यचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता. परत त्या मुलाने काही केलं तर नसेलना शौर्यला.. हा विचार करून घाबरतच शौर्यसोबत फोन वर बोलायला तो मिटिंगमधुन बाहेर आला..

विराज : "काय झालं शौर्य..?? सगळं ठिक आहे ना.."

शौर्य : "विर तु बिजी आहेस का??"

विराज : "हो म्हणजे मिटिंगमध्ये होतो.. तुझा फोन बघुन बाहेर आलोय.. म्हणजे ह्या टाईमला तुझा फोन बघुन घाबरायला झालं मला. तु ठिक आहेस ना..?? का परत काही केलंस??"

शौर्य त्याच्या मित्र मंडळींकडे बघतो..

तसे सगळे कानाला हात लावुन त्याला सॉरी बोलतात..

शौर्य : "सॉरी विर.. ते माझ्या फ्रेंड्स लोकांना तुला थेंक्स बोलायच होत म्हणुन ते मी तुला व्हिडीओ कॉल केला.."

विराज : "Are you mad?? तुला माहिती ना ह्या टाईमला मी मिटिंगमध्ये असतो ते.. एक तर महत्वाची मिटिंग चालु होती.. ती सोडुन मी आलोय.. तु नंतर फोन केला असतास तर नसत चाललं का??"

शौर्य : "ए विर प्लिज ना भडकू नकोस.. एकच मिनिट लागेल आणि ती लोक ऐकतायत तु काय बोलतोस ते.. आपल्या भावाचा अस कोण इन्सल्ट करत का.. प्लिज बोल ना त्यांच्यासोबत.."

विराज : "बर दे.. लवकर."

विराज अस बोलताच सगळे जाउन शौर्यच्या मागे उभे राहता.. विराजला एकत्रच थेंक्स म्हणतात..

विराज : "स्वीट आवडलं सगळ्यांना??"

समीरा : "हो खूप.. बट वि आर रिअली सॉरी... तुम्हाला तुमच्या मिटिंग मधुन उठून यावं लागलं.."

विराज : "इट्स ओके.. बट मी आत्ता खरच खुप बिजी आहे.. आपण नंतर बोलूयात... प्लिज.. बाय... बाय शौर्य.. मी करतो तुला फोन.."

"बायsss" सगळे एकत्रच विराजला बाय बोलतात..

सगळेच शौर्यकडे कान धरुन बघु लागतात..

शौर्य : "म्हणुन नको बोलत होतो.. पण केला नसता तर तुम्हाला कारणच वाटली असती.."

रोहन : "पण एवढ परफेक्ट कस काय सांगु शकतोस तु तुझ्या भावाबद्दल.??"

टॉनी : "बघ तर"

शौर्य : "माझा भाऊ म्हणजे माझी जान आहे रे.. तो जस माझी काळजी करतो तस मला पण त्याची काळजी असते आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये ना माझ्या विरसारखा भाऊ असायला हवा.. ज्याला तुम्ही डायरेक्ट इथुन कनेक्ट असाल.. (आपल्या हृदयावर हात ठेवतच शौर्य बोलला)..

रोहन : "लकी मॅन.."

"हे गाईज.. हा वॉच कसा आहे.."टॉनी आपल्या हातातलं घड्याळ सगळ्यांना दाखवत बोलला


रोहन : "भारी यार.. इट्स ब्रँडेड"

वृषभ : "एक दम मस्तच."

सगळेच घड्याळाची स्तुती करू लागले..

टॉनी : "शौर्यने दिलय मला.. बर्थडे गिफ्ट.. थेंक्स शौर्य मला खुप आवडल हे वॉच.. खुप म्हणजे खुपआणि शर्ट छान आहे.."

राज : "शौर्यची चॉईज भारीच असते.."

सगळी मंडळी रूममध्ये जायला निघतात..

मनवी : "गाईज चला ना प्ले-हाउसमध्ये बसूयात... थोडा वेळ.."

रोहन : "हो ना... लगेच कुठे चाललात.. लंच टाईम झाला की मग जावाना हॉस्टेलवर.. मग आम्ही पण घरी जाऊ.."

सगळेच प्ले हाऊसमध्ये बसुन कालच्या पार्टीत काढलेलं पिक्स बघुन एकमेकांवर कमेंट्स पास करत हसत असतात.. शौर्य मात्र समीराला सगळ्यांचा नकळत काही तरी इशारा करतो आणि बाहेर निघुन येतो..


समीरा : "गाईज तुम्ही कंटीन्यु करा मी आलेच.."

(समीरा शौर्यच्या पाठोपाठच प्ले-हाऊसमधून बाहेर निघते)

बाहेर येताच ती शौर्यला शोधु लागली.. शौर्य कुठे तिला दिसत नव्हता..

थोडं चालतच ती प्ले हाऊपुढे गेली.. तस शौर्य अचानक तिच्या मागुन येत तिचा हात पकडतच तिला प्ले हाउसच्या मागे घेऊन जातो..

तिला भिंतीजवळ धरत दोन्ही हात तिच्या भोवती ठेवत तिच्याकडे तो एकटक बघु लागतो...

"आत्ता पळुन नाही जाऊ शकत तु..", शौर्य भुवई उडवत समीराला हसतच बोलतो.


समीरा : "अस??"

शौर्य : "असच.."

"तसही मला आज तुझ्यापासुन पळुन जावस नाही वाटत..", आपले दोन्ही हात शौर्यच्या खांद्यावर ठेवतच ती बोलते..

(दोघेही एकमेकांकडे बघतच रहातात)

शौर्य : "नाही जमत तुझ्याशिवाय रहायला.. खुप मिस करत होतो तुला.. कधी येऊन तुला भेटतो अस झालेलं.."

समीरा : "अस नको ना वागुस शौर्य ज्यामुळे आपल्याला अस लांब रहावं लागेल.. मला पण नाही जमत तुझ्याशिवाय रहायला. तु दिसला नाहीस तर काहीच सुचत नाही.. फक्त तु सोबत असावास असच वाटत.."

शौर्य आणि समीरा फक्त एकमेकांकडे बघतच एकमेकांच्या प्रेमभऱ्या अश्या नजरेत हरवुन जातात.. कदाचित दोघांना एकमेकांकडुन काही तरी वेगळंच अपेक्षित असावं.. शौर्य थोडं आणखीन जवळ येताच समीराच्या हृदयाची धडधड थोडी जास्तच वाढू लागली.. समीरा डोळे बंद करून स्वतःला सावरत थोडी मागे सरकत उभी रहाते.. शौर्य तिचे गुलाबीसर ओठ न्याहाळत रहातो.. एका हाताने तिच्या गालावर येणारी तिच्या रेशीम केसांची बट तीच्या कानामागे टाकत आय लव्ह यु सो मच अस तिच्या कानात बोलत.. तिच्या गालावर आपले ओठ टेकवत तो तिच्या पासुन लांब होतो.. शौर्य लांब गेलाय हे जाणवताच समीरा डोळे उघडते.. आपल्या दोन्ही हातांची मिठी त्याच्या माने भोवती घट्ट करत त्याला थोडं आपल्याजवळ खेचत आणि स्वतःत्याच्या गालांवर आपले ओठ टेकवते.

शौर्य : "आपण फिरायला जाणार होतो.."

समीरा : "प्लेस डीसाईड कर.. मग जाऊयात आपण.."

शौर्य : "ओके.. आपण ह्या सेटरडेला जाऊयात??"

समीरा : "मला चालेल.."

तोच शौर्यला वृषभचा आवाज येतो..

समीरा : "तुझ्याशिवाय करमत नाही वाटत ह्याला.."

(शौर्यला त्यादिवशी घडलेला समीराच्या लिपस्टिकचा प्रसंग आठवु लागतो..)

शौर्य : "समीरा माझ्या गालावर काही लागलय का??"

समीरा : "नाही.. का रे.?"

शौर्य : "काही नाही असच.. चल जाऊयात.."

समीरा देखील मानेनेच हो बोलते..

दोघेही प्ले हाऊसच्या गेटजवळ पोहचतात.. गेटजवळ मनवी आणि रोहन एकमेकांशी काही तरी बोलत उभे असतात..

शौर्य : "बहुतेक गेले असतील ही लोक.."

समीरा : "हो मला पण तेच वाटत.."

मनवी : "तुम्ही दोघे कुठे होतात??"

समीरा : "इथेच तर होतो.. बाकीचे कुठेत??'

रोहन : "जस्ट लंच साठी गेलीत.."

शौर्य : "समीरा मी पण निघतो.. काळजी घे बाय.."

रोहनकडे न बघताच शौर्य तिथुन हॉस्टेलमध्ये जायला निघतो..

समीरा : "तु पण काळजी घे.. बाय.. बाय रोहन..बाय मनवी.."

समीरा सगळ्यांना बाय करतच तिथुन निघते..

"एकच मिनिट मनवी..", मनवीला थांबवत रोहन शौर्यजवळ जातो..

रोहन : 'तु अजुन नाराज आहेस माझ्यावर.??'

शौर्यचा हात पकडतच तो बोलतो..

शौर्य : "मी तुला बोललो ना.. जो पर्यंत तु बदलत नाहीस तो पर्यंत मी असाच रहाणार.. "

रोहन : "शौर्य आता अति होतय तुझं.. तुला का कळत नाही तुझ्या अश्या वागण्याचा त्रास होतोय मला.. "

शौर्य : "मग सिंपल गोष्ट सांगतो ती कर.."

रोहन : "तुला पण मी सिंपल गोष्ट सांगितली.. तु ती करू शकतोस का?? बघावं तेव्हा हट्टीपणा.. "

"

तु मला राग देतोयस रोहन.. तुला नाही सुधारायच मग नको सुधारुस.. आहे तसाच रहा.. जा परत त्या फैयाज सोबत जाऊन गेटवर बसुन टपोरीगिरी कर.. परत तोंड नको दाखवुस मला तु तुझं..", शौर्य रोहनच्या हातातुन आपला हात खेचतच तिथुन निघतो.


शौर्यच्या अश्या टोकाच्या बोलण्याने रोहन खुप दुखावतो.. शौर्यच्या पाठमोऱ्या आकारकडे बघत बसतो..

मनवी : "काय झालं?? निघुयात??"

रोहन : "हम्मम."

खिश्यातून गॉगल काढुन तो डोळ्यांवर लावत येणार पाणी तो मनवी समोर लपवत होता

बाईकला किक मारतच रोहन मनवीला मागे बसायला सांगतो.. मनवी बाईकवर एकटीच रोहन सोबत बोलत असते.. पण रोहनच मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नसत..


शौर्यचे शब्दच त्याला सारखे सारखे आठवत होते.. इथे शौर्यला सुद्धा वाईट वाटत होतं की तो थोड जास्तच रोहनशी वाईट वागला.. लंच टाइम होऊन गेला तरी शौर्य जेवायला काही जात नाही.. तसाच बेडवर झोपुन रोहनचा विचार करत. शौर्य जेवायला आला नाही म्हणून वृषभ, राज आणि टॉनी तिघेही त्याच्या रूममध्ये त्याला बघायला येतात..


वृषभ : "काय झालं तुला??बर नाही वाटत का??"

शौर्य : "वृषभ.. ते रोहन. तु प्लिज त्याला फोन करून बघ ना घरी पोहचला का तो.."

राज : 'परत काय झालं तुमचं..??"

शौर्य : "सांगतो मग.. आधी त्याला फोन करून बघ आणि मी सांगितलंय अस प्लिज बोलु नकोस.."

वृषभ हातात फोन घेऊन रोहनला लावतो..

वृषभ : 'उचलत नाही यार तो फोन.."

"परत एकदा ट्राय कर..",शौर्य घाबरतच बोलतो.


तोच वृषभच्या मोबाईल वर रोहनचा फोन येतो त्याला.. फोन उचलून वृषभ फोन स्पीकरवर ठेवतो..


रोहन : "फोन करत होतास..??'

वृषभ : 'ते तु घरी पोहचलास काय??"

रोहन : "हो.. पण तु अस का विचारतोयस??"

वृषभ : "का म्हणजे.. तेsss...अsss"

रोहन : "शौर्यने सांगितलं ना तुला मला फोन करून विचारायला..??₹"

शौर्य वृषभला मानेनेच नाही बोलतो..

वृषभ : "नाही रे.. मी सहज केला.."

रोहन : "मला माहिती शौर्य तु पण ऐकतोयस ते.."

शौर्य : 'रोहन सॉरी... मला नाही आवडत तुला काही बोललेलं यार.. माझ्यासाठी एक गोष्ट कर.. प्लिज.."

रोहन : "मग तु पण मी सांगतो ती गोष्ट कर."

रोहन फोन कट करून टाकतो..

टॉनी : "ए शौर्य तु सोड ना तो टॉपिक.. एकदा सवय लागली की नाही सुटत रे ती.."

शौर्य : "आपण ठरवलं ना तर काहीही करू शकतो रे.. रोहन त्याच मन स्ट्रॉंग नाही करत आहे.. त्याने ठरवलं तर तो करू शकतो.. थोडा त्रास होईल त्याला पण नंतर सुटेल ती सवय.. "

वृषभ : "माझ्या डोक्यात एक आयडिया आहे म्हणजे जमलं तर बघ.. आपण एक बिअरची बॉटल घेऊयात.. त्यातली हार्ड ड्रिंक काढून त्यात सॉफ्ट ड्रिंक भरूया आणि मग ती होती तशी व्यवस्थित पेकिंग करून रोहनकडे जाऊयात.. शौर्यला फक्त थोडी फार एकटिंग करायचीय.. ती तर तो सहज करच शकतो.. "

वृषभ त्याने केलेला प्लॅन सांगुन आपल्या भुवया उडवतच मित्रांकडे बघतो..

राज : "क्या बात हे यार.. यु आर ग्रेट वृषभ"

शौर्य : "पण रोहनला डाउट आला तर??"

टॉनी : "तु एकटिंग नीट नाही केलीस तर डाउट येईल..तु थोडी प्रॅक्टिस कर.. '

क्रमशः

(आता बघुयात... चौघांचा प्लॅन सक्सेस होतो का?? हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल..

(टीप : अतरंगीरे 43च्या भागात मी दिल्लीत बिच आहे असा उल्लेख केलेला.. पण 44च्या भागात मी क्लिअरली मेन्शन केल की ती लोक ताबुला बिच जे एका केफेच नाव आहे तिथे टॉनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला जाणार असतात.. शौर्य त्या केफेल बिच समजत असतो.. ज्यांनी 44 पार्ट नीट वाचला असेल त्यांच्या लक्षात ती गोष्ट आली असेल.. कृपया ह्या गोष्टीची नोंद घ्यावी)