जुळून येती रेशीमगाठी - भाग 3 Sheetal Raghav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळून येती रेशीमगाठी - भाग 3

रुद्राक्ष एकटक मावळत्या सूर्याकडे पाहत समुद्रकिनारी उभा होता. किती वेळ तो तसाच उभा असेल कोणास ठाऊक !अचानक बॉल लागल्या ने त्याची तंद्री तुडते .

"सॉरी" ...... दादा चुकून बॉल लागला . जास्त जोरात नाही ना लागलं .... खरंच सॉरी

रुद्राक्ष बॉल उचलत हसत "नाही लागल मला " हा घे बॉल आणि सावकाश खेळा , लागेल नाही तर .

"हो "... तो मुलगा हसत बोलतो आणि बॉल घेऊन पाळायला लागतो .

रुद्राक्ष त्या मुलाकडे पाहत असतो . सहज त्याच लक्ष्य समोर गेलं तर एक मुलगी वाळूचा किल्ला बनवत होती . थोडी ओळखीची वाटली म्हणून रुद्राक्ष थोडा पुढे जाऊन निरखून पाहतो आणि तो एकटक पाहतचं राहतो .ती ओवी होती . वाळूमध्ये किल्ला बनवत असते . वाऱ्यामुळे केस चेहऱ्यावर येणारे केस उलड्या हाताने सारखे सारखे मागे करत होती. एकदम मन लावून किल्ला बनवत होती .

"ह...हा.. पिल्लू" , हा बघ तुझा किल्ला झाला तयार". ती छोट्या मुलीला बोलते .

ऍक्च्युली एक छोटी मुलगी वाळूत किल्ला बनवत होती . कितीतरी वेळ किल्ला बनवत असते पण नाही जमत असत तिला . तिची आई तीला बस कर आता म्हणून कितीतरी वेळ समजावत असते पण ती नाही ऐकत . ओवी हे सर्व पाहत असते तिला वाईट वाटत म्हणून ओवी तिला किल्ला बनवायला मदत करत असते .

"वाव किती छान आहे" , ये.....ये.. दीदी खूप मस्त आहे . ती मुलगी आनंदानी उड्या मारत मारत बोलत असते

"दीदी तू खूप छान आहेस मला.... मला तू खूप आवडली" ....असं बोलत ती ओवीच्या गळ्यात पडते . ओवीसुद्धा तिला जवळ घेते.

" तू पण खूप गोड आहेस मला सुद्धा तू खूप आवडली ....ओवी तिला गुदगुल्या करत बोलली . तशी ती मुलगी हसायला लागली तिच्या बरोबर ओवी सुद्धा हसायला लागली.

रुद्राक्ष तिच्या अवखळ हसण्यामध्ये कधीचा हरवून गेला होता . एकदम मनमोकळ्याने हसत होती .

रुद्राक्षच्या बंद डोळ्यासामोरे तिचा तो हसरा चेहरा होता आणि आपसूक त्याच्या ओठाची कडा रूंदावली गेली . फोनच्या रिंगने त्याची तंत्री तुटली . "हे काय होतय मला ,आपण असा कसा विचार करू शकतो " तो स्वतःशी बोलत आपले सर्व विचार बाजूला करत फोन रेसिव्हड करतो .


*******

" हॅलो सावी मी निघाली आहे ग तू निघ लवकर ,बस स्टॉपला भेट आणि उशीर नको करू .

"हो..... हो मी पण निघाली आहे ". बस स्टॉपवर भेटू .

थोड्या वेळाने दोघि बसस्टोप वर पोचतात . बस मध्ये खूपच गर्दी होती. बसायला तर जागाच नव्हती . दोघी उभ्याच होत्या . बस जशी थोडी पुढे गेली तशी त्या दोघीच्या मागे उभा असलेला माणूस मुदामून त्यांना धक्का दयायला लागला . खूपच गर्दी होती म्हणून त्या काहीच बोलू शकत नव्हत्या त्यामुळे तो माणूस अतीच करायला लागला . आता दोघीच पण डोक फिरलं .

ओ.. मिस्टर जरा नीट उभे राहा ना . सावी त्या माणसाला रागातच बोलली .

ओ ... मॅडम मी नीटचं उभा आहे . आता बसच खड्यातुन जाते त्याला मी काय करू आणि त्यात एव्हडी गर्दी जरा धक्का लागणारच ना .

ओईय ..आम्ही पण उभ्याचं आहोत त्या पण नीट. आता ओवी पण त्याला बोलली .

तुम्हा दोघीना काय वाटत मी मुदामून धक्का देतोय एवढाच प्रॉब्लेम होतो ना तर बसमध्ये चढायचं नाही कळल काय . तो माणूस आवाज चढऊन बोलायला लागला .

सावीच्या आता डोक्यातचं गेला "याच्या तर आता अति शहाणा समजतोच काय आता बघ मी काय करते . असं बोलत ती आपल्या बेगेतून सेफ्टटी पिन काढते . पिन ओपन करून ती हातात धरून राहते . तो माणूस पुन्हा धक्का देणार त्याच वेळी सावी जोरात त्याला पिन टोचते .

"आ... आ....... ए काय टोचलं तू "

वो.... ते माझं वॉच लागलं असेल ते काय आहे ना आता गर्दीच एवढी आहे तर्रर्र लागल असेल ... सावीने पण त्याच्याच भाषेत उत्तर दिल . दोघीहि बस मधून खाली उतरल्या आणि जोरजोरात हसायला लागल्या .


********

मिस ओवी काँग्रेस तु दिलेलं प्रेझेंनटेंशन सराना खूप आवडल . तुझ या प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे त्यासाठी तुला हेड ऑफिसला जावं लागेल .

काय ? सर हेड ऑफिसला का पण ! हेड ऑफिस म्हणल की तिथे रुद्राक्ष असणार ...असं तिच्या मनात आलं म्हणून तिने विचारलं

मिस ओवी या प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या ब्रँच मधून एम्प्लॉयीची निवड झाली आहे आणि हा प्रोजेक्ट स्वतः रुद्राक्ष सर पाहणार आहे. त्यामुळे तुला हा प्रोजेक्ट होई पर्यंत हेड ऑफिसमध्ये जाव लागेल . अजून काही आहे का !

'नाही... काही नाही ' . ती लहान चेहरा करत बोलली .


हॅलो ma'am " . ओवी रिसेप्शनिस्टला बोलली .

तू ...ss आय मिन तुम्ही इथे ... ओवी आज पासून हेड ऑफिसला आली होती . ती रिसेप्शनिस्ट ओवीला पाहून जरा गोधळली . गेल्या वेळीच विसरली नव्हती बिचारी .

हो . एक्च्युली मी प्रोजेक्टसाठी इथे आली आहे आणि तुम्ही मला तू बोललीच तरी चालेल .ओवी हसत बोलली.

ओ .. ओके , तू पण मला एकेरीच बोल. चल मी तुला सर्व प्रोजेक्ट मेंबर आहेत तिथे घेऊन जाते .

'ओके ' . ओवी तिच्यासोबत चालू लागली .

हॅलो एव्हरीवन........ , so.. फस्ट ऑफ काँग्रॅजुलेशन तुमचं सर्वांचं या प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे . हा प्रोजेक्ट थोडा वेगळा आहे का ते कळेलच .या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमची आयडिया.... तुमची स्किल वापरायची आहे . प्रोजेक्ट कसा करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे . आता हा प्रोजेक्ट वेगळा का तर या प्रोजेक्ट मध्ये वर्षाला जेवढा प्रॉफिट होईल त्यात काही पर्सेंट तुम्हाला दिला जाईल . या प्रोजेक्टच बाबत फायनल डिसीजण आकाश घेईल . त्यामुळे रिपोर्ट्सच आणि काही प्रॉब्लेम असेल तर आकाशला सांगायचं . सो कोणाला काही बोलायचं आहे का ? रुद्राक्षने असं बोलत सर्वानवर नजर टाकली .

"नो सर " सर्वानी एकसाथ बोलले .

गुड . ऑल द बेस्ट ऑल ऑफ यु .

रुद्राक्ष आणि आकाश केबिनमध्ये बसले होते . अरे हा अमेय फोन का नाही उचलत आहे .

अरे कामात असेल तो . नंतर करू त्याला फोन ,तू बोल ऑफिस नंतर कुठे जायचं बोलत होताच . आकाश ,अमेय आणि रुद्राक्ष बेस्ट फ्रेंड होते . आकाश पण बिसनेसमॅन आहे तर अमेय डॉक्टर होता . आकाशच आणि रुद्राक्ष हा प्रोजेक्ट पार्टनरशिप मध्ये करणार होते . त्यामुळे आकाश रुद्राक्षच्या ऑफिस मध्ये येणार होता हा प्रोजेक्ट होईपर्यंत .

प्रोजेक्ट सुरु झाला होता सर्वजण खूप मेहनत करत होते . सर्वजण एकमेकात चांगलेच मिसळले होते . खरच सर्वजण एक टीम होऊन काम करत होते . रुद्राक्षच आणि ओवीच जास्त भेट आणि बोलणं होत नव्हतं . जे काही प्रोजेक्ट बाबत बोलणं असेल ते आकाश बरोबर होयच .


हे काय आहे असा प्रोजेक्ट करणार आहेत काय तुम्ही .... किती चुका आहेत यात इतके दिवस काय करताय तुम्ही ... काही पण करा ....मला प्रोजेक्टची डू डेट संपायच्या आत प्रोजेक्ट पूर्ण पाहिजे कसं ते तूम्ही पहा . रुद्राक्ष आज खूप रागात होता. प्रोजेक्ट त्याला पाहिजे तसा नव्हता दिसत त्यात चुका पण होत्या त्यामुळे आज तो सर्वानवर ओरडत होता त्यात आकाशला पण बोलनी खावी लागली . रुद्राक्ष कामाच्या बाबतीत खूप स्टिक होता त्यात त्याला सर्व परफेक्ट लागत .

एवढा वेळ ओरडा खाल्या वर सर्वांचा चेहरा एवढुसा झाला होता.

"काय यार एवढा चांगला तर प्रोजेक्ट गेला आहे अजून किती चांगला पाहिजे सराना ". ग्रुपमधून एक जण बोलला

त्याच काहीना काही तरी बोलण चालू होत . "मी काय बोलते ओवी मध्येच बोलली .

जे झालं ते झालं . त्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायच याचा विचार करूया का !" सर मुदामून तर नाही ओरडणार . आपली काही तर चूक असणारचं ना ... आता पर्यंत आपण हा कंपनीचा प्रोजेक्ट म्हणून काम केल. आता हा कंपनीचा नाही तर आपला म्हणून करूया . आपण लहान असताना ज्या क्रिएटिव्हिटी करायचो ना तेच करायचं . त्याच्यात जो आनंद मिळवायचो तोच पुन्हा मिळउया . काय बोलतात.... . ती सर्वानकडे पाहत बोलली .

सर्वजण तिलाच पाहत होते . काय झालं मी काही चुकीच बोलली का ?

नाही . तू एकदम कॅरेक्ट बोलली आहेस यार . आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. त्याच्या ग्रुप मधील सायली बोलली.

सो.. पुन्हा एकदा लहान पण आठऊया . ओवी हसत हात पुढे करत बोलली . सर्वजण तिच्या हातावर हात देत बोलतात .

हे सर्व आकाश आणि रुद्राक्ष पाहत असतात . शी इस डिफरँड....आकाश असं बोलताच रुद्राक्ष त्याच्याकडे पाहतो . वाहिनी सोडून दुसऱ्या मुलीची तारीफ सांगायला पाहिजे वहिनीला ....

अरे.... मी असंच बोललो तिला कायपण सांगू नको... आमचं लग्न बाकी आहे रे अजून ....

सर्वेच ओवीच्या बोलण्याने पॉसिटीव्ह झाले होते पुन्हा नव्या जोशाने काम करायला लागले होते . आकाश पण त्यांना पूर्ण साथ देत होता . रुद्राक्ष डायरेक्टली नाही तरी इनडायरेक्टली लक्ष्य होत .

"हॅलो " हा मावशी बोल ना .

कुठे आहेत तुम्ही दोघी ? प्रणालीची आई आली आहे घरी . प्रणालीची वाट पाहत आहेत तुम्ही लवकर या घरी .

काय .. प्रणाली माझ्यासोबत कुठे मी तर ...

अग असं काय बोलतेच प्रणालीचीआई मला बोलल्या कि प्रणाली तुला भेटायला आली होती घरी . घरात नाही तर मला वाढल कॉफेत असाल .आता ओवीला सर्व समजलं .

हो... हो माझ्या बरोबर आहे प्रणाली आम्ही कॉफेतच आहोत . येतो आम्ही घरी काकूला घरीच थांबव . ओवी लिफ्ट मध्ये जात बोलली . इकडे अब्राम आणि रुद्राक्ष तिच्याकडे विचित्रपणे पाहायला लागले . ते दोघे आधीच लिफ्टमध्ये होते . ओवी फोनवर होती त्यामुळे तीच लक्ष्यचं नव्हतं .

दुसऱ्या क्षणाला ओवीने कोणालातरी कॉल केला . समोरची व्यक्ती बोलायच्या आधी ओवी बोलायला लागली .

ओय... कुठे आहेस तू ....वाव ...ओ ... लव्हबर्डस माझ्या नावाने तिकीट फाडून पिक्चर झाला असेल ना पाहून तर आताच्या आता माझ्या घरी जा . तुमच्या आईसाहेब माझ्या घरी आल्या आहेत .

काय ....ss पलीकडून जोरात ओरडण्याचा आवाज आला तसा ओवीने फोन कानापासून दूर केला आणि पुन्हा कानाला लावला. आता काय करू यार .. प्लीज काय तरी कर ना .

मला नको सांगू ... मी नव्हतं सांगितलं होत माझ्या नावाने पिक्चर पाहायला जा ...एक मिनिट थाब जरा तू . आधी तू कॉफेत जा लवकरात लवकर ... मी पाहते तो पर्यंत काही तरी . एव्हडं बोलून ओवीने फोन कट केला .

तेव्हड्यात तिचा फोन वाजला " हॅलो हा गं बोल ना बर, अग ऐकना तू घराजवळ आहेच ना एक काम करना माझ्या घरी जाना प्रणालीच्या आई घरी असेल त्यांना प्रणाली ये पर्यंत थांबव .

" काय ग पण काय झालं ते तरी सांग ना . ओवी सर्व सांगते तिला . मी आताच सुटली आहे ऑफिसमध्ये घरी येईपर्यंत उशीर होईल. हसू नको तू यार ... त्या लव्हबर्डसला तर पाहतेच मी ...

देवा काय नमुने भेटले आहेत मला एक.. एक. याना मीच मिळते का बकरा .. ओवी वरती पाहत बोलली.

रुद्राक्षला हसू येत होत.



********

"साहेब " हा घ्या ना गजरा खूप छान आहे . एक छोटी मुलगी रुद्राक्षला बोलते .


रुद्राक्ष पॉकेट मधून पैसे काडून तिला देत गजरा घेतो .

"साहेब सुटे नाही आहेत . सुटे दयाना ,

' असूदेत ते तुझ्याकडे आणि लवकर घरी जा .

"हो " .. अस बोलत ती तीतून निघाली .

"अब्राम " डजबिन मध्ये टाकून दे . रुद्राक्ष गजरा अब्रामकडे देत बोलला

" बॉस " तुम्ही गजरा घेतला मग टाकून का देत आहात .

" मला फक्त त्या मुलीला नाराज नाही करायचं होत , I don't like this .

ओके बॉस ...अब्राम पुढे काहीच नाही बोलला .

दीदी गजरा घेणार का? तुझे केस खूप मोठे आहेत तू माळ गजरा छान दिसेल . ओवी पण तिथेच फोनवर बोलत उभी होती .

"गजरा नको ग मला पण हि सोनचाफाची पाहिजे देशील मला!

दीदी अंग पण हि चार -पाचचंच आहेत , बाकी संपली सर्वी .

चालेले मला तेव्हडी दे तू . हे घे तुला . ओवी सोनचाफ्याचे फुल तिच्या हातात देत बोलली .

मला कशाला दीदी .... अग घे तुझ्या केसात खूप छान दिसेल आणि एक सांगू हा सोनसाफा सुकला तरी त्याचा सुगंध नाही सोडत . तसच तू पण तुझ्या चेहऱयावरच हसू नको सोडूस कधी पण . कळलं .... ओवी तिच्या चेहऱयावर हात फिरवत बोलली.ओवीने हातातली फुलांचा सुगंध घेतला आणि आपल्या वेणीत घातली . तेव्हड्यात तिचा फोन वाजला . घाईघाईतच ती चालायला लागली त्यामुळे वेणीतील फ़ुलं खाली पडली .

रुद्राक्ष नजरेआड होईपर्यंत ओवीकडे पाहत होता . त्याची नजर जमीनीवर पडलेल्या फुलांनवर गेली आणि आपसूक त्याची पावले पण .

*******