अनोखी प्रीत ही... - १ Anonymous द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

अनोखी प्रीत ही... - १

" Sorry....हरले मी खरचं हरले आज तुझ्यासमोर...Good bye & take care " 💬 -भूविका

" okay "💬 ...नेहमीप्रमाणेच अमीशचा replay .

तीने तो msg seen करून अगदी हताश होऊन phone बाजूला ठेऊन दिला... संपले सर्व संपले ....गुडघ्यात मान खुपसून ती अविरत अश्रू गाळत होती शेवटचे 😭😭😭😭😭... पुन्हा कधीही न रडण्यासाठी...

You must think that I'm stupid
You must think that I'm a fool
You must think that I'm
New to this
But I have seen this all before...

Every time you hurt me
The less that I cry
And every time you leave me
The quicker these tears dry
And every time you walk out
The less I love you
Baby we don't stand a chance
It's sad but it's true ...

I'm way to good at goodbyes
I'm way to good at goodbyes ... (2)
No way that you will see me cry ...(2)
I'm way to good at goodbyes
I'm way to good at goodbyes ...

दूर कुठेतरी गाण्याच्या ओळी ऐकू येत होत्या.... जणू तीची व्यथा मांडत होत्या .

After four years...

" शांती आवरल का गं....पाहुणे यायची वेळ झाली... " -रविंद्रराव

"हो आवरलं...तुम्ही जास्त दगदग नका करु बसा बर इथे "- किचनमधून बाहेर येतच शांतीताई म्हणाल्या.

" अगं असं कसं... आज पहिल्यांदा मनूला पाहायला पाहुणे येतायत... काही कमी नको पडायला "

" अहो पण.... "

" ते बघ आलेच ते.... जा लवकर मनू तयार झाली का बघं बरं.... "

"हो हो... आलेच "

या या विलासराव.... येताना काही त्रास तर नाही ना झाला ....तसं भरवस्तितचं घर आहे पण नवीन व्यक्तींना सापडायला थोडं अवघड जातं "- रविंद्रराव हात जोडत म्हणाले

" नाही हो अगदी निवांत प्रवास झाला.... कसलाच त्रास नाही " विलासरावांनीही हात जोडत हसून प्रतीसाद दिला.
विलासराव, त्यांची पत्नी माया,मुलगा, मुलगी दक्षा, जावई मानस,असे सर्वजण रविंद्ररावांच्या मागे आतमध्ये आले.... रविंद्ररावांनी त्यांची बसण्याची व्यवस्था केली...आणि शांतीताईंना आवाज दिला...त्यांच्या आवाजासरशी त्या किचनमधून बाहेर आल्या आणि त्यांच्यामागे शकू पाण्याचा ट्रे घेऊन आली.... रविंद्ररावांनी त्यांची सर्वांशी ओळख करून दिली.... शांताताईंनीही सर्वांचे हसून आदरातिथ्य केले....

" तुम्ही बसा मी आलेच मनूचे आवरले का पाहून " असे म्हणत त्या मनूच्या रुमकडे जायला वळल्या. इथे हॉलमध्ये पुरुषमंडळीच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या... विषय नेहमीचेच पाऊस पाणी, राजकारण,आणि नुकताच अगदी सगळीकडे आतंक माजवणाऱ्या कोरोनाचा....मायाताई आणि दक्षाचे त्यांचे घर आणि घरातील माणसे यांच्यावर अगदी शांत आवाजात पण गहण अशी कुजबूज सुरू होती 😅😅...तेवढ्यात शांती ताई मनूला घेऊन आल्या आणि तीच्या हातात पोह्यांचा ट्रे दिला... ती हळूच आपली साडी सावरत खाली मान घालून हॉलच्या दिशेने आली....एक एक करत ती सर्वांना डिश देत होती....देऊन झाले तसे बाबांनी तीला तिथेच पाटावर बसायला सांगितले... मायाताईंनी तीची ओटी भरली आणि तिच्याकडे पाहिले...आणी त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटी smile पसरली...त्या पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसल्या...

"तुम्हाला काही मुलीला प्रश्न विचाराचे असतील तर विचारा " रवींद्रराव नम्रतेने म्हणाले.

" अहो तसे काही नाही विचारण्यासारखे...Biodata पाहिलाच आहे आम्ही "- मायाताई आणि विलासराव

" तरीही मुलाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार ...मनात शंका नको राहायला....अगदी निःसंकोचपणे विचारा"

" श्री.... "

" ......"

" अरे श्री sss" दक्षा ने हळूच त्याला कोपराने डिवचले... तेव्हा त्याने समोर पाहिले नाहीतर साहेब आपल्याच विचारत मग्न होते .

" काय ताई " तो गडबडून म्हणाला.

" अरे तुला काही विचारायचे का असे विचारतात ते "मानस दक्षाचा नवरा म्हणाला.

" नाही ते....."

" अहो निसंकोच विचारा.... ती सांगेल तुम्हाला की तुम्ही आणि मनू दोघे बाहेर जाता का म्हणजे तुम्हाला सर्वांसमोर कसेतरी वाटत असेल विचारायला तर "...." काय म्हणता विलासराव??? "-रविंद्रराव

" हो हो काही हरकत नाही..." विलासराव

" नाही नको.... तसे काही नाही बाहेर जायची आवश्यकता नाही... ते म्हणजेआपले लग्न जमले तर तुमचे आईवडील आहेत असे समजून माझ्या आईवडिलांची काळजी घ्याल ना ?? "मुलगा

" हो मी त्यांची नक्कीच काळजी घेईन "आवाज एकूण तीला एक वेगळीच हुरहुर जाणवली पण याचे नाव तर श्री आहे मग...भास असेल असे समजून तीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.

" okay मग ठिक आहे..." मुलगा

रविंद्रराव आम्ही तुम्हाला घरच्यांशी विचारविनीमय करून कळवतो काय निर्णय आहे तो ... आता निरोप घ्यावा म्हणतो ....

" हो हो काही हरकत नाही....आम्हिही जरा नातेवाईकांशी मनूशी बोलून घेतो आणि मग कळवतो काय ते "

पाहुणे गेल्यावर शांतीबाई आणि रविंद्रराव मनाच्या रुममध्ये गेले.....

" मनू ....येऊ का आत बाळा? "

" आई बाबा माझ्या रुममध्ये यायला तुम्हाला परवानगी घ्यायला हवी का? तुम्ही केव्हाही येऊ शकता "

" आता लग्नाला आली तू म्हणून आपलं....मुलं केव्हा मोठी होतात काही कळत नाही.....आणि भुर्रकन उडून जातात मग "

" असं काय ओ बाबा तुम्ही पण....मी नाही जाणार तुम्हाला सोडून कुठेच " मनू दुःखी होत म्हणाली.

" असं कसं मनू एक ना एक दिवस लग्न करुन आपल्या घरी जावे लागतं बाळा... "

" तरी पण मी नाही जाणार "😢😢

" बरं ते नंतर बघू आपण....आज आलेला मुलगा कसा वाटला मग मनू.... आवडला का तुला "रविंद्रराव

" तुम्हाला काय वाटत आई बाबा ?"

" हे बघ मला तर छान वाटला वेल सेटल्ड आहे ...दिसायला ही ठिक आहे आणि मुळात म्हणजे बोलण्यातून एक नम्रपणा जाणवला.... सुपारीच्या खंडाचही व्यसन नाही....तुला काय वाटतं शांती ??"

हो अगदी बरोबर एकूणच सर्व ठिक आहे....घरचेही अगदी मनमिळाऊ आहेत आपली मनू सुखी राहील तीथे.... तरिही बाहेरुन चौकशी करा... आपला काळजाचा तुकडा द्यायचा आहे त्यांना काही चुकायला नको.... "

" हो मी शेजारच्या रामरावांना सांगतो माहिती काढायला त्यांच्या मुलीच्या सासरच्या नात्यातले आहेत म्हणे ....पण मनू तुला काय वाटतं सांगितलं नाहीस बाळा तू.....तुला पुर्ण आयुष्य काढायचे त्यांच्या सोबत तुझा निर्णय महत्त्वाचा बेटा... "

" आई बाबा तुम्हाला पसंत असेल तर माझी काही हरकत नाही....तुम्ही माझ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करुनच निर्णय घेणार माहीत आहे मला... " ती चेहर्‍यावर हसू आणत म्हणाली. ( खरेतर तिच्या मनात खूप चलबिचल चालू होती.... आईने फोटो आणि बायोडाटा तर दिला होता पण तीने तो पाहिला नव्हता... तीची इच्छाच नव्हती...तीने ठरवल होतं आईबाबा सांगतील त्याच मुलाशी लग्न करायचं... पण आज तीला एकदम अस्वस्थ वाटत होते....आज अचानक एवढ्या वर्षांनी त्याचा आवाज ऐकल्यासारखं वाटलं तीला.... पण तो इथे कसा येईल भास झाला असेल असे तीचे मन म्हणतं होते)

********************

" काय हो कशी वाटली मग तुमची सूनबाई तुम्हाला? "विलासराव

" सूनबाई??? "मायाताई

" हो मग तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतेय तुमची पसंती बाईसाहेब.... " विलासराव मिश्किल हसत म्हणाले.

" तुमचं पण काहीतरीच असतं बाई.... आणि मला पसंत पडून काय श्री ला नको का पसंत पडायला? " त्या हसतच म्हणाल्या.

" हो हो अगदी बरोबर " मानस

" त्याच तर काय आई तीला पाहिल्या पासून साहेब हवेतच आहेत....बघं आपण काय बोलतोय लक्ष तरी आहे का त्या फोनमध्ये डोक घालून बसलाय केव्हाचा " दक्षा त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणाली.तसे सगळेजण जोरजोरात हसायला लागले त्यांच हसू ऐकूण श्री ने वर पाहिले तर सगळेजण त्यालाच पाहून हसत होते.

त्याने काय झाले म्हणून मानसला खुणावले तसे तो म्हणाला..." सालेसहाब खयालोंसे बहार आओ.....तभी तो जल्दी शादी होगी और आपके सपने सच्चाई पर उतरेंगे "😅😅😅

" काहीही काय जीजू " ☺☺तो लाजतच म्हणाला.

" काय रे पठ्ठ्या उडवयचा का मग बार "विलासराव

"बाबा तुम्ही पण....आधी त्यांच्याकडून होकार तर येउद्या "

" माझा भाऊ लाखात एक आहे नक्कीच होकार येईल बघं...मलाही वहिनीला लवकर आणायची घाई झालीय आता.

तो खिडकीतून बाहेर बघत विचार करत होता.... 'ती माझ्यासमोर होती आज ???...सत्य की आभास असेच वाटतेय अजुनही.... पण खरचं ती होती !.... अगदी पुर्वी होती तशीच !.... पण चेहर्‍यावर ते निखळ हास्य जाऊन एक धिरगंभीरतेची किनार जाणवली आज.....कारण मीच तर नाहिना ???? मी??? .... हो मीच तर आहे कारण....माझ्यामुळे लोप पावलेल ते हसू पुन्हा तुझ्या ओठांवर रुंजी घालेल.... नक्कीच.... आणि पुन्हा त्या गालावर उमलणार्या खळीच कारणही मीच असेल.... ' एकटक फोनमधील तीच्या जुन्या फोटोला पाहत तो म्हणाला....😊😊

दोन दिवसांनंतर.....

" शांती ऐकलेस का....त्यांच्याकडून होकार आला आहे "रविंद्रराव

" अगं बाई खरे काय.... आलेच मी देवापुढे साखर ठेऊन.... "शांतीताई

" हो हो मनूलाही सांग होकार आहे म्हणून....तीचा निर्णय झाला आहे ना म्हणजे त्यांनाही तसे कळवायला... शुभ कामाला उशीर नको "रविंद्रराव

" हो मी सकाळीच बोलले तिच्याशी पुन्हा एकदा तीला काही हरकत नाही "त्या देवासमोर साखर ठेवत म्हणाल्या .

" मी लगेच कळवतो मग पुढची तयारी करायला हवी लवकरचं " असे म्हणत त्यांनी कामतांना फोन केला आणि त्यांच्याकडूनही होकार असल्याचे कळवले...

" अहो सरकार ऐकलत का..... लागा तयारीला म्हंटल सुनबाईंचा होकार आहे "विलासराव फोन ठेऊन मायाताईंना म्हणाले....वरच्या खोलीत दूरवर कुठेतरी नजर लावून बसलेल्या श्री ने तो आवाज ऐकला.... 'खरचं ती तयार झाली ???....तीने मला पाहिले नाही का??? हो नाहीच कारण असते तर तीचा नकार असता... मग???.....मन मारुन की ???विसरली मला???? नाही ती विसरूच शकत नाही मला पण... कदाचीत तीने आई वडिलांवर सोडले असेल सर्व..... पण एकाअर्थी बरेच झाले पाहिले नाही ते .....नकार ??? ऐकूणच किती यातनामय वाटतय.... तिलाही झाल्या असतील का तेव्हा???हो..... पण या संधीचे मी नक्कीच सोने करेन ....मी येतोय भूवी 💕'असे म्हणत त्याने गिटारच्या तारा छेडल्या....

मुक्याने बोलले गीत ते जाहले
स्वप्न साकारले पहाटे पाहिले
नाव नात्याला काय नवे
वेगळे मांडले सोहळे तुजसाठी हो...हो....

मिळावे तुझे तुजला आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी ?
जुळूनी येती रेशीमगाठी...
आपल्या रेशीमगाठी.....हो...हो... (२)

उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले ? ....(२)

खेळ हा कालचा आज कोण जिंकले ?
हरवले कवडसे मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे जे हवे
सगळेच आणले तुजसाठी...ओ हो...

कळावे तुझे तुला मी तुझ्याचसाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी...
जुळूनी येती रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी
रेशीमगाठी.....

Stay tuned...

©️happylife😇

( प्रतीसाद जसा भेटेल तसे पुढचा भाग पोस्ट करेन...काही चुका असतील तर नक्की सांगा....)

©️ मनमंजिरी ❤