अनोखी प्रित ही...- २ Anonymous द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

अनोखी प्रित ही...- २




भाग 1 पासून पुढे....

Life feels like a daydream
and I just wish that I could wake up
I just wish that I could wake up....

My mind whispers in the nighttime
Voices always keeping me up
Telling me that I should give up ...

Cause lately , I have been the backseat
To my own life
Trying to take control
But I don't know how , to....

I don't wanna be sad forever
I don't wanna be no more
I don't wanna wake up and wonder
What the hell am I doing this for ?....

I don't wanna be medicated
I don't wanna go through that war
I don't wanna be sad
I don't wanna be sad anymore ....

I don't know what words to say and
I don't wanna go through that war
I don't wanna be sad
I don't wanna be sad anymore ....


' मला त्याचा विचार करायचा नाही....एवढ्यादिवसानंतर आत्ता आठवण झाली का त्याला माझी????..... की पुन्हा माझ्या feelings सोबत खेळायचे त्याला???.....का मला स्वतःतच गुंतवून ठेवतोय तो....स्वतःचेही बनवत नाही आणि दुसर्याचेही होऊ देत नाही..... का???? का??? का आलायस पुन्हा तु माझ्या आयुष्यात ??.... की मला सुख लाभू नये असं वाटतं तुला??....एवढ्या छानप्रकारे चाली खेळलास की मला तुझा खरा चेहरा कळलाच नाही रे ....खरा???? स्वतःला वाटेल तसे वागला एकदाही माझा विचार नाही आला का तूला??? आणि मी मात्र गुंतत गेले....नक्की कसायस रे तू.?...तू असा वागला असशील अजूनही मन मानत नाही रे????..... अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घेणारा ,माझ्याबाबतीत possessive असणारा की स्वतःचा वेळ जात नव्हता म्हणून एका खेळण्यासारखा माझा वापर करणारा, माझ्या मनाचा विचार न करता ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्याच मुद्दामहून करणारा तू खरा.....कळलाच नाहीस रे तू मला.... ना कायमचा येतोय ना ही मला तूला विसरू देतोयस ......काय सिद्ध करायचे तुला सांग ना..... सांग ना.... का आलास पुन्हा मला त्रास द्यायला??? .....पण नाही आता नाही मी अजीबात तुझ्या बोलण्याला फसणार नाही....जेवढ्या जवळ होतास ना तु माझ्या तेवढाच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुझा तिरस्कार करतेय.....यावेळी तुझे कोणतेच हेतू मी साध्य नाही होऊ देणार.... तुला वाटायचे ना तुझ्याशिवाय मी काहिच करु शकत नाही....पण मी ते खोटे ठरवून दाखवेल.....माझे आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे जगेल.... आणि ते ही आनंदाने....तुला पुन्हा माझ्या आयुष्यात जागा नाही.....कधीच नाही.....विश्वास तोडलास तू माझा..... मला अजून दुःखी व्हायचे नाही.....मी अजून तुझा विचार करून स्वतःला त्रास करुन घेणार नाही..... हा मी बदलेन स्वतःला.... स्वतःसाठी नक्कीच!!! ' मनू स्वतःशीच बोलत होती.....मंद आवाजात playlist मध्ये song सुरू होते..... दूर कुठेतरी कोषात नजर लावून आज झालेल्या घटनांची उजळणी करत त्यावर काहीतरी मत मांडत होती.... जणू स्वतःचाच स्वतःशी चाललेला संवाद...... स्वगत.... "का आला असेल त्याचा massage एवढ्या वर्षांनी???.....त्याला समजले तर नसेल ना माझे लग्न ठरलेले ???.....पण का??? आताच का??? मी शिकले होते ना त्याच्याशिवाय जगणे.....काय म्हणाला तो ??... आणि त्याचा status..... ohhhh God काय सांगायचे आहे त्याला???.... झुळुकेसारखा येतो आणि जातो..... नेहमीच....न उलघडलेल्या कोड्यासारखा आहेस तू .....का असा आहेस तू ????"



थोड्यावेळापूर्वी....

सकाळी शांत वातावरणात गॅलरीमध्ये ऊभी राहून मनू झाडांना पाणी घालत गाणे गुणगुणगुणत होती....' किती छान असतात ना ही झाडे काही न बोलता सर्वांना मदत करत असतात .....निरपेक्ष..... कसली अपेक्षाच नाही..... जे आपल्याजवळ आहे ते सर्वांना देत राहायचं.....कशाचा गर्व नाही की ego नाही....नेहमी देण्याची भावना..... पण तरिही माणसाची हाव काही सुटत नाही....ज्या झाडांनी आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व दिले तरी हव्यासापोटी ते त्यांना जिवंतपणी मारायलाही मागे पुढे पाहत नाहीत.... हो जिवंतच!.....बोलता येत नसले तरी त्यांनाही भावना असतातच ना....इजा पोहचल्यावर ते ही मूकपणे अश्रू गाळतच असतील की.... त्यांनाही वाटत नसेल का एवढी सढळ हाताने मदत करुनही ते ही कसलीच अपेक्षा न ठेवता हे लोक आपला बळी घेतात.... काय म्हणून आम्ही एवढे चांगले आहे.... की अहंकारच्या ,हव्यासाच्या डोळ्यांवरील आंधळ्या पट्टीसमोर यांना आमचे मुक अश्रूही दिसत नाहीत...... माणसांचेही असेच असते ना.....व्यक्ती जर कसलीच अपेक्षा न करता मदत करत असेल.... आपली काळजी घेत असेल तर लोक समजून घेण्याऐवजी त्या व्यक्तीच जगणं मुश्किल करतात.....एवढं की त्या व्यक्तिला स्वतःच्या चांगुलपणावरही शंका यावी.....बोट दिले तर हात पकडण्याची सवय आहे या लोकांना.....येतील ताळ्यावर पण वेळ निघून जायला आणि शहाणपण यायला काही अर्थ आहे का? "

" मनू sss "

" हां.... आई आलेच " आईची हाक ऐकताच मनू विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली....पाणी घालण्याच्या झारा तिथेच कुंडीशेजारी ठेऊन ती आतमध्ये आली आणि आरशासमोर जाऊन उभी राहत कमरेपर्यंत रुळणार्या मोकळ्या केसांना एक वेढा देऊन वर टांगून क्लिप मध्ये अडकवले....आरशावर नजर स्थिर करत स्वतःचीच प्रतिकृती न्याहाळत तीने एक सुस्कारा सोडला.... ही मी आहे??? स्वतःलाच प्रश्न विचारला जणू तीने.... ही अशी..... हळूच गालावर एक हात फिरवत... खळी??? ...त्याच्यासोबतच गेली....खोल गेलेले डोळे आठवणीत तळमळताना जागलेल्या रात्रीचा पुरावा... आणि हसू तर??....त्याच्या आठवणींनी कधी हसूच नाही दिले निखळ असे....वीचार झटकतचं ती आईकडे किचनमध्ये गेली....

" आई sss" पाठिमागून मिठी मारत तीच्या खांद्यावर हनुवटी टेकवून तिने आईला आवाज दिला.

" काय गं बछड्या ...आज अगदी लाडात आलीयेस"आईने उपमा परतत असताना एका हाताने तीच्या केसांवर मायेने हात फिरवला.

"अंहह" ती शांत डोळे मिटून म्हणाली.

" आता सांगतेस का काय ते... माझा उपमा करपेल बघं खालून "आई मुद्दामहून दटावतच म्हणाली.


" मला साजूक तुपातला ड्रायफ्रुट्स घालून शिरा कर ना....." ती लाडात येत म्हणाली.


" तरीच... तरीच एवढी लाडात आलीये.... उपमा नाही आवडत ना बाईसाहेबांना "

" काय ग आई "ती एवढुसा चेहरा करून म्हणाली.

" आईला बनवते काय" असं म्हणून त्या हातात तसेच उलतणे घेऊन तीच्या मागे धावल्या....तर मनू दरवाजातून तोंड वेंगाडुन खट्याळ हसुन वरती पळाली.... आणी धावत जाऊन बेडवर पसरली...." आहहह किती मिस करतं होते मी माझं हे हसणं.....आज आईशी किती दिवसांनी मनमोकळी बोलले.... किती छान वाटलं.....मी उगाच त्याच्या आठवणींत रडून माझे अनमोल असे क्षण वाया घालवले......आपल्या जवळ असणार्या माणसांची कदर करायची सोडून आपला एखाद्या रिमोट कंट्रोलरप्रमाणे वापर करणार्या व्यक्तिंच्या आठवणींत वाया घालवतो.....खरचं किती वेड्यासारखे वागतो ना??....But no...अजून नाही now the time of live my life as per my opinion.... लोकांच्या मनाप्रमाणे नाही " शेजारीच टेबलवर असलेल्या फोनवर msg pop झाला....आता केवळ कोणाला आठवण झाली या गरीब मासूम बालकाची.... बालकाची???😄😂 हसतच तीने आपला हात लांबवत टेबलावरील फोन आपल्याकडे ओढून घेतला...screen unlock करुन पाहिले तर screen वर.....

' अमीश ??? ' अविश्वासाने तीने दोन तीन वेळा फोन चालू बंद करून पाहिला. ' तोच आहे.....massage??? .....का केला असेल massage त्याने एवढ्या दिवसांनी???' अस्वस्थपणे तीने massage seen केला....

" नाहीच बोलणार का माझ्याशी ? " 💬 हा एवढे मोठे वाक्य पण बोलतो😳😳मनूची reaction .... का आलाय हा पुन्हा???आताच तर मी ठरवलं होतं तुझ्या अडचणींतून मोकळ होऊन एक नवीन आयुष्य जगायचं आणि पुन्हा तेच.....whatsapp बंद करून तीने शांतपणे डोळे झाकले आणि मागे भिंतीला डोके टेकवले....5 min...10min आणि पुन्हा एकदा हातामधील फोनवर massage pop up झाला.... हृदय जोरात धडधडायला लागलं....हातांना घाम आला होता.... पुन्हा तोच????..... तीने थरथरत्या हाताने फोन चालू केला.....

आठवणींच्या पावसाने आज ,
अवकाळीच धडक दिली
मी राहिले माझी पुन्हा ,
पापण्यांची कवाडे खुली झाली
भिजली माझी कविता अन् ,
अक्षरे हवेतच विरली
संपले माझे शब्द मात्र ,
व्यथा अधुरीच राहिली...!

( स्वरचित )

कोणत्यातरी काव्यवेली म्हणून YouTube channel चे notifications आले होते ( हे justअसेच लिहीलेय YouTube channel वगैरे तसे काही नाही बरं readers 😄😄).... तीने एक दीर्घ उसासा सोडला.... ' किती मिळतेजुळते आहे ना माझ्या आताच्या परिस्थितीशी जणूकाही माझ्या भावनाच मांडल्यात.....just now.... तीने तो स्टेटस what's app ला अपलोड केला.....आणि what's app scroll करु लागली....status समोर एक व्हाईट कलर डॉट पाहून तीने स्टेटस side open केली तर त्याचा स्टेटस..... आज एवढ्या दिवसांनी?? .... पाहू की नको???..... नकोच!.... नाही पाहते... काय करू????... पाहतेच पाहत नाही तोपर्यंतच हुरहूर लागून राहील.... 'असे म्हणत तीने त्याच्या status वर press केले...

श्रावणी वर्षासरींनी ,
धरा पावसात न्हाली
वाट अधुर्या धाग्यांची ,
अतूट मिलनात ओवीली ।।

( स्वरचित )

काय सांगायचे आहे याला???......असा स्टेट्स???



वर्तमानकाळ.....


' भूवि येवढी रागवलीयेस का गं ??....massage ,status पाहून 5 तास झाले पण अजून replay दिला नाहीस एवढा नकोसा झालोय का मी???😢😢 ....आपण जे दुसऱ्यांना देतो तेच परत आपल्याला मिळते....माझीच चुक आहे मी जे पेरले तेच उगवणार....एवढी कठोर नको वागूस गं माहित आहे मी चुकलो....पण एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला...चुक सुधारायची एक संधी तरी दे...प्लीज माझ्यासोबत मी केलेलाच व्यवहार नको गं करू😥😥😥..... plz फकत एकदा माफ कर....पुन्हा कधीच तुझ्या डोळ्यांतून पाणी येऊ देणार नाही शब्द आहे माझा.... पण प्लिज एकदा....' 😭😭😭😭😭 अविरत अश्रू गाळत तो phone gallary मधील तीच्या फोटोवर हात फिरवत होता....'नाहि मी रडणार नाही तुला आवडत नाही ना मी रडलेलं ....बघं मी डोळे पण पुसले🤗🤗....मी पुन्हा तुला जिंकून घेईल भूवी आणि ते ही कायमचं!!





7 दिवसांनंतर......





" शांती ये शांती " रविंद्रराव मनूच्या आईला हाक देत हॉलमध्ये आले.....

" हा आले " शांतीताई

" हं बोला आता काय झालं... का बोलावत होतात " त्या पदराला ओले हात पुसतच किचनमधून बाहेर आल्या...

" अगं मनू... "

" काय बाबा माझं नाव काढलंत ?"रविंद्ररावांच वाक्य पूर्ण होईपर्यंतच मनू तीथे आली...

" बरं झालं तूच आलीस.... शांती अगं कामत म्हणत होते आता होकार आहे दोनिकडून तर साखरपुडा करून घेऊया मगं.... "

" हो मलाही तसेच वाटतेय...आपण संध्याकाळी जोशी काकांकडे जाऊन मुहूर्त वगैरे पाहून घेऊ... "

" अगं ते म्हणतं होते त्यांनी त्यांच्या तुकडे पाहिले.... येत्या चार दिवसांत नाहितर दीड महिन्यानी मुहूर्त आहे म्हणे....दीड महिने खूप उशीरा वाटतयं आम्हाला सुनबाईंना लवकर घरी आणायची घाई झालीय म्हणाले... तर चार दिवसांचा मुहूर्त करायचा का fix ....म्हणजे जसे सर्वांना adjust होईल तसे करुया..." असे म्हणाले... मी घरी विचारविनिमय करुन कळवतो म्हंटलं " काय वाटतयं तुम्हाला? "

" एवढ्या लवकर... म्हणजे बाबा... "

"अहो मला तरी बरोबर वाटतेय... म्हणजे पाहा ना लग्न ठरलेय आणि जास्त वेळ रखडण्यात अर्थ नाही....साखरपुडा करून घेऊ.... आणि मगं लग्न नंतर आरामात करू तुम्हाला काय वाटत? " शांतीताई

" विलासराव पण असेच म्हणत होते...मलाही हेच ठिक वाटतेय.... मनू तुला काही अडचण आहे का बाळा साखरपुडा लवकर करायला आपण लग्न आरामात करू बाळा.... आई म्हणतेय ते बरोबर आहे.... रखडत ठेवण्यात काही अर्थ नाही... "

" हो पण लग्न लवकर नाही करायचं....मला तुमच्यासोबत Time स्पेन्ड करायचा आहे " मनू एवढंस तोंड करून म्हणाली....


" बरं....तुझ्या मनासारखं करू मगं तर झालं "रविंद्रराव हसून म्हणाले

" हा"

" बरं विलासराव म्हणतं होते आता लग्न ठरलेयच तर तू आणि मुलगा एकदोनवेळा भेटा....पाहायला आलेल्या दिवशी पण समोरासमोर बोलला नाहीत....आवडीनिवडी कळतील ..ते म्हणालेत जावईबापूंना तसे......"....

"हाच वेळ असतो एकमेकांना समजून घेण्याचा .....तर उद्या 11 वाजता ईथे जवळच clients meeting आहे तर भेटा मग तुम्ही.....घरीच घ्यायला येतो म्हणत होते.... पण म्हंटलं त्यांच office च काम आहे उगाच धावपळ नको आणि इथे जवळच sunshine cafe का काही तीथे आहे तु जातेच एरवी म्हणून मग मनू येईल तीथे म्हणालो....जाशील ना बाळा उद्या? "

" हं.... हो " मनू अवघडूनच म्हणाली.



Tomorrow 11 : 00 Am
Sunshine cafe

एक मुलगा पाठमोरा chair वर बसलेला.... मनू चालत तीथे गेली आणि तीने समोर पाहिले आणि...

" तूsss?? "

©️मनमंजिरी ❤


Stay tuned...

( काही typing mistake असतील तर समजून घ्या....तुमचा प्रतिसाद जसा भेटेल तेवढ्या लवकर पुढचा भाग पोस्ट करेन...काय होईल पुढे समजले तर सांगा मलापण readers...specially silent readers 😅)