बटरफ्लाय वूमन - भाग १ Chandrakant Pawar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बटरफ्लाय वूमन - भाग १

वैजंता टीव्हीसमोर शेकोटी घेत बसली होती. तिच्या घरात खूपच थंडी लागत होती.टीव्हीतल्या ज्वाले वरती ती तिचे हात शेकवत होती ..पाहणाऱ्याला हे दृश्य खुपच विचित्र वाटले असते. परंतु तेवढी उब तिच्या हातांना पुरेशी होती.टीव्हीमधील शेकोटीच्या ज्वाला तिच्या हाताला चटके देत होत्या. तिच्या शरीराला सुद्धा टीव्ही मधल्या शेकोटीची ऊब लागत होती. तिच्या अंगातली थंडी निघून गेल्यावर ती तिथून उठली. ती टीव्हीपासून बाजूला होते न होते तोच अचानक टीव्ही मधल्या ज्वाला तिच्या अंगाला चटके देऊ लागल्या. ती हलकेच हसली.तिने टिव्ही बंद केला.तिने मनोमन जाणले होते टीव्ही मधली ज्वाला तिला भस्म करायला बघत होती. मात्र तो तिला भास वाटला. म्हणून शंका येऊन ती पुन्हा टीव्ही ठेवलेल्या शोकेसच्याजवळ गेली. टीव्हीच्या वर बाहेरच्या बाजूला शोकेस'चा काही भाग तिला जळलेला दिसला. म्हणजे मगाशी टीव्ही मधून खरोखरच ज्वाला बाहेर आली होती तर... हे कसं शक्य आहे ती गोंधळली. पण हे आपल्या बाबतीत घडू शकते हे मात्र खरं असे तिने ठरवले होते.

मात्र तिने बंद केलेल्या टीव्ही तुन एक लहानसे फुलपाखरू उडत बाहेर पडले आणि तिच्या पर्समध्ये जाऊन लपले. वैजंताला हे माहित नव्हते. तिच्या नकळत ते घडले होते. थोड्यावेळाने काहीतरी आठवूण तिने पर्समध्ये हात घातला.तेव्हा तिच्या हाताला ते फुलपाखरू लागले. तिने ते बाहेर काढले. व्यवस्थित निरखून पाहिले...
तिला ते फुलपाखरू निर्जिव वाटले. तीने पुन्हा एक दोनदा ते फुलपाखरू उलटून पालटून पाहिले.

प्लास्टिकचे फुलपाखरू कोणी ठेवले माझ्या या पर्समध्ये .ती स्वतःशीच पुटपुटली.तिच्या पर्समधले ते फुलपाखरू प्लास्टिकचे असावे असे तिला वाटले.तिने ते केसांना लावून पाहिले तिला वाटले तो केसांना लावायचा चाप असावा. परंतू ते तिच्या केसांना लागू शकले नाही. तिने ते फुलपाखरू दूर भिरकावून दिले. दूर येऊन ते पडले . त्या फुलपाखराने प्लास्टिकचे रूप घेतले होते . थोड्यावेळाने वैजंताचा त्याचा डोळा चुकवून ते तिथून उडाले .गॅलरीतून बाहेर गेले . ते हेरगिरी करण्यासाठी आलेले फुलपाखरू होते. हे वैजंताला माहीत नव्हते.

वैजंताने कपाटातला तिच्या आजीने दिलेला पातळ असलेला स्वेटर काढला. अंगावर चढवला. त्यावर तिने लाल पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला. आतमध्ये तिने तिचा स्वेटर घातला आहे हे कोणालाही कळणार नव्हते.

खांद्याला पर्स लटकावून वैजंता मॉल मध्ये कामाला निघाली. तिने तिच्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं की तू तयार रहा. मी माझी स्कूटर घेऊन तिकडे येते.
हॅलो लैला...
काय गं वैजंता...
अग काही नाही ...मी तयार होऊन निघालेय इकडून कामाला. तू पण तयार रहा. नाहीतर उशीर करशील. माझं हे राहिले ते राहिले ....करीत..
नाही नाही माझी सगळी तयारी झालेली आहे.
अग मी तयारीतच आहे तुझी वाट बघतेय. तू ये वैंजता लवकर.
बरंबर वेळेवर निघते मी .तु पण वेळेवर निघ.वैजंताने फोन बंद केला आणि ती स्कूटर चालू करून निघाली. दरवाजा व्यवस्थित लॉक झाला की नाही याची तीने खात्री केली. लॅच की व्यवस्थित फिरवून पाहिले.
हल्ली खूप घरफोड्या होतात म्हणून तिने दरवाजा व्यवस्थित बंद केला आहे याची खात्री केली

सिग्नल ओलांडून लैलाच्या घराजवळ आल्यावर तिने लैलाला मिस कॉल दिला . लैला लगेच बाहेर पडली आणि तिच्या मागे स्कूटर वर बसली .दोघी निघाल्या माॅलच्या दिशेने. आज थंडी खूप पडली नाही लैलाने वैंजंताला म्हटले.
होय ना अचानक वाढली ना थंडी एका दिवसात...
मी तर रात्री एकावर एक दोन चादरी घेऊन झोपले.
त्यांचे स्कूटरवरून बोलणं चालू होतं. त्यांचे कामाचे ठिकाण कधी आले त्यांना कळलच नाही. मॉल च्या मागच्या दिशेला जाऊन वैजंताने तिची स्कूटर पार्क केली.

मॉलमध्ये दिवसभर काम करून वैजंता रात्री घरी परतत होती लैला सोबत. लैलाचे घर जवळ आले तेव्हा लैला तिला म्हणाली. अगं वैजंता जरा चल ना माझ्या घरी...
कशाला येऊ मी तुझ्या घरी. वैंजताने तिला प्रश्न केला.
अगं चल खूप दिवस झाले. आलीस नाही. जरा चहा घे .मग निघ कॉफी घे हवी तर...
बरं ठीक आहे येते मी तुझ्यासोबत. वैजंताने लैलाच्या घराजवळ गाडी थांबवली. त्या दोघी लैलाच्या घरी आल्या. लैलाच्या घरात त्या दोघी आल्यावर एकदम आठवण झाल्यासारखे करीत लैला वैजंताला म्हणाली अग सकाळी ना कमाल झाली.
काय झाले सकाळी वैजताने म्हटले.
अग मी ना सकाळी टीव्ही बघत बसले होते इतक्यात टीव्ही मध्ये आगीचा सीन आला. मी तो बघत होते. इतक्यात टीव्ही मधून दोन-तीन आगीच्या ज्वाला माझ्या दिशेने आल्या मी भयंकर घाबरली . मला वाटला तो भास असावा पण मी पाहिले तर माझ्या अंगावरचा ड्रेस जळला होता.हे तू काय सांगतेस लैला ....वैजंता किंचाळली.

हे मी खरंच बोलतेय. आज सकाळी ही घटना माझ्या घरात घडली माझ्यासोबत .लैला म्हणाली.
म्हणजे हे तुझ्या बाबतीत सुद्धा घडले तर .वैजंता विचार करीत म्हणाली.
माझ्याबाबतीत म्हणजे आणखीन कुणाच्या बाबतीत घडलय कां? शंकेखोर चेहरा करीत लैला तिच्याकडे पहात बोलली.
हो ना सकाळी माझ्या बाबतीत सुद्धा असेच घडले थोडेफार...
म्हणजे तू ती आहेस तर ...आवंढा गिळीत लैला म्हणाली.
तू हे काय बोललीस. तू ती आहेस.
म्हणजे मी कोण आहे. वैजंताने लैलाकडे संशयाने पाहिले.
काही नाही... काही नाही ... सहजच ग. असं बोलत लैलाने तिच्याकडे बघायचे टाळले.
बोलता बोलता वैजंता लैलाच्या घरी असलेल्या कोळसा पेटवलेल्या शेगडी जवळ पोचली. तशी ती एकदम दचकून मागे पळाली.

घाबरू नकोस वैजंता ही आग आपल्याला काहीच करणार नाही. लैला तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलली.
ही आग म्हणजे...
म्हणजे ही आग खरी आहे ,नैसर्गिक आहे.पण आभासी दुनियेतली म्हणजे टीव्ही मधली आग हीच आपलं जास्त नुकसान करू शकते.
तू काय बोलतेस .मला कळत नाही .काही कळेल असे बोल. वैजंता तिला गदागदा हलवत बोलली.
वैजंता तू आणि मी आपण दोघी गेल्या जन्माच्या वेळच्या फुलपाखरांच्या अवतारा मधल्या स्रिया आहोत.
काय म्हणतेस तु हे...
तुला काही आठवत नाही काय गं पूर्वजन्माचे.
तुला आठवते वैजंताने. तिला विचारले
तुलाही आठवेल वैजंता... तुलाही आठवेल... ती अस्पष्ट बोलली.वैजंता तुला एक विचारू काय.

विचार ना वैजंता हसत बोलली...
आता यात हसण्यासारखं काय आहे .वैजंताला लैलाने हटकले.
तसं नाही ग सहज हसले.
तू तुझ्या आजीने दिलेला स्वेटर कधी घातला आहेस कां...?
हो घातला आहे अनेकदा आणि आताही मी माझ्या ड्रेस च्या आत तोच स्वेटर घातलेला आहे.
काय सांगतेस .लैला आनंदाने उचंबळून बोलली.
का? काय झाले ?काय आहे एवढे त्या स्वेटर मध्ये इतके की तुला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
अगं वैजंता तो स्वेटर नाही .तो फुलपाखरू सूट आहे.
म्हणजे फुलपाखराचा अंगरखा... वैजंता आश्चर्यचकित होत म्हणाली.

बरोबर बोललीस तू... लैला तिच्या जवळ येत म्हणाली.
तू तो सूट बारकाईने निरखूण पाहिलास कधी...
कां काय त्यात एवढं बारकाईने पाहण्यासारखं.
अगं वेडे तो सूट म्हणजे फुलपाखराच्या अवतारात शिरण्याचे द्वार आहे.तो सूट जर तू अंगात घातलास तर तुला या मानवी जगात कुणा पासून धोका नाही. तुझं आपोआप संरक्षण होईल. इतकेच नाही... तर तुला हवेत फुलपाखरासारखं उडता सुद्धा येईल....