Butterfly woman - 5 books and stories free download online pdf in Marathi

बटरफ्लाय वूमन - भाग ५

वैजंता आणि लैला ह्या इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया होत्या.त्यांना हव्या त्या वेळी त्या फुलपाखरासारखी पंख पसरून उडत शकत होत्या. त्यांना फुलपाखराची अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती.
हा प्रश्न जरा वादाचा होऊ शकतो. कारण यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विश्वास अंधविश्वास याचं मिश्रण आहे.ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही तो या गोष्टी खोट्या आहेत म्हणून सरळ सरळ सांगेल. लैलाने तिला समजावून सांगितले.

पोलीस इन्स्पेक्टर येणार म्हणून लैला आणि वैजंतानेज्ञ तयारी करून ठेवली होती परंतु तसे काही घडलेच नाही ते आलेच नाहीत. राहून राहून तर हेच आश्चर्य वाटते की त्या का आल्या नाहीत.
जाऊदे आपण आपली कागदपत्रे तयार केलीत ना राहू दे चल येतील तेव्हा दाखवू त्यांना. लैला निष्काळजीने म्हणाली.

त्याच रात्री अघटित घडलं. त्या दोघींना शोधत विरोधी गटातील काही फुलपाखरे आणि भुंगे त्यांचा माग काढत दोघींच्या घराजवळ आले होते. ते बघून लैला वैजंताला म्हणाली.
वैजंते तुझा तो सुट तू परीधान कर आणि आपण दोघी त्यांचा सामना करू. विलास सुद्धा येईल आपल्या मदतीला.

आता हेच करावे लागणार आहे वैजंता बोलली. बोलता बोलता तिने तो सूट परिधान केला आणि हात वर करून ती उडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यात तिला यश आले.तिने चार-पाचदा वर खाली हात हलवल्यावर ती चक्क फुलपाखरू बनली. तिच्या कपाळाला मध्ये अडकलेला खिळा खळकन बाहेर पडला. तेव्हा एकदम हायसे वाटून राहिला लैला तिला म्हणाली सुटलीस तू यातनांमधून.. तुला आता मोक्ष मिळेल.

क्षणांमध्ये लैलाने सुद्धा फुलपाखरू स्त्रीचे रूप घेतले. आणि त्या दोघी घराच्या बाहेर पडल्या. प्रथमतः काळोखा मध्ये त्यांना नीट दिसत नव्हते. परंतु नंतर नंतर त्यांना स्पष्ट दिसू लागले.
त्या दोघी वरून खाली पाहत होत्या. इतक्यात त्यांना इन्स्पेक्टर चैतन्य पवार आणि महिला पोलीस दिसल्या. या दोघी इतक्या रात्री इथे काय करतात. असे वाटून त्या दोघी खाली उतरल्या.त्या दोघी चैतन्या आणि महिला पोलीसां जवळ जाणार इतक्यात त्यांना त्यांचे बोलणे ऐकू आले.वैजंता आणि लैला ह्या इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया होत्या.त्यांना हव्या त्या वेळी त्या फुलपाखरासारखी पंख पसरून उडत शकत होत्या. त्यांना फुलपाखराची अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती.

हा प्रश्न जरा वादाचा होऊ शकतो. कारण यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विश्वास अंधविश्वास याचं मिश्रण आहे.ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही तो या गोष्टी खोट्या आहेत म्हणून सरळ सरळ सांगेल. लैलाने तिला समजावून सांगितले.

पोलीस इन्स्पेक्टर येणार म्हणून लैला आणि वैजंतानेज्ञ तयारी करून ठेवली होती परंतु तसे काही घडलेच नाही ते आलेच नाहीत. राहून राहून तर हेच आश्चर्य वाटते की त्या का आल्या नाहीत.
जाऊदे आपण आपली कागदपत्रे तयार केलीत ना राहू दे चल येतील तेव्हा दाखवू त्यांना. लैला निष्काळजीने म्हणाली.

त्याच रात्री अघटित घडलं. त्या दोघींना शोधत विरोधी गटातील काही फुलपाखरे आणि भुंगे त्यांचा माग काढत दोघींच्या घराजवळ आले होते. ते बघून लैला वैजंताला म्हणाली.
वैजंते तुझा तो सुट तू परीधान कर आणि आपण दोघी त्यांचा सामना करू. विलास सुद्धा येईल आपल्या मदतीला.

आता हेच करावे लागणार आहे वैजंता बोलली. बोलता बोलता तिने तो सूट परिधान केला आणि हात वर करून ती उडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यात तिला यश आले.तिने चार-पाचदा वर खाली हात हलवल्यावर ती चक्क फुलपाखरू बनली. तिच्या कपाळाला मध्ये अडकलेला खिळा खळकन बाहेर पडला. तेव्हा एकदम हायसे वाटून राहिला लैला तिला म्हणाली सुटलीस तू यातनांमधून.. तुला आता मोक्ष मिळेल.

क्षणांमध्ये लैलाने सुद्धा फुलपाखरू स्त्रीचे रूप घेतले. आणि त्या दोघी घराच्या बाहेर पडल्या. प्रथमतः काळोखा मध्ये त्यांना नीट दिसत नव्हते. परंतु नंतर नंतर त्यांना स्पष्ट दिसू लागले.
त्या दोघी वरून खाली पाहत होत्या. इतक्यात त्यांना इन्स्पेक्टर चैतन्या पवार आणि महिला पोलीस दिसल्या. या दोघी इतक्या रात्री इथे काय करतात. असे वाटून त्या दोघी खाली उतरल्या.त्या दोघी चैतन्या आणि महिला पोलीसां जवळ जाणार इतक्यात त्यांना त्यांचे बोलणे ऐकू आले.

आपण दोन वेळा वैजंता कडे गेलो .परंतु तिने आपल्याला खरी माहिती सांगितलेच नाही . आपण जरी विरोधी कीटक गटातली असलो आणि आपण पोलिसांची रुपे घेतली असली तरी त्याचा काय फायदा होणार नाही आपण सरळ त्यांच्यावर अटॅक करायला पाहिजे.
होय मलाही तसेच वाटते. पण आपल्याला तसे वाटत नाही ना आपल्या गटाकडून.
तीच तर गोची झालेय. इंस्पेक्टर चैतन्या पवार यांचे रूप घेतलेली. टोळधाड कीटक म्हणाली..
म्हणजे या दोघींनी आपल्याला फसवले तर .लैला वैजंताला हळूच बोलली.
या दोघी पोलीस वगैरे काही नाहीत त्या विरोधी गटातील आहेत. त्यांची आपल्यावर पाळत असावी. वैजंता म्हणाली. मग आपण त्यांना चांगलीच अद्दल घडवू चल.
वैजता तू अजिबात घाई करू नकोस .त्या दोघी अति भयंकर आहेत. त्यांच्याकडे विषारी वायू आहे. त्यांनी त्यांच्या तोंडातून जर आपल्या वर पिचकारी मारली. तर आपण इथल्या येथे विरघळून जाऊ.
मग आपण काय करायचे वैंजंताने म्हटले.
आपण प्लॅन बी वापरू या. जो नेहमीच संकटकाळी उपयोगी येतो.

मलाही तसेच वाटते .वैजंता बोलली. पण
आपण या दोघी वरती हल्ला केला तर...
नको तसे नको .त्या दोघी सावध होतील. लैला म्हणाली.
त्यापेक्षा आपण दुसरीकडे जाऊ. यांचा समाचार घ्यायला विलास पूर्णपणे सक्षम आहे. तो काहीतरी करेल त्यांचे काय करायचे ते.
मी आपल्या सहकारी भगीनी आणि बंधुंना मेसेज दिला आहे ते सुद्धा कुमक घेऊन येतील.
म्हणजे आता युद्ध अटळ आहे असं म्हणायचं का...
कदाचित तेच खरं आहे असं समजावे लागेल.
पण त्यांच्याशी लढताना सावधगिरी बाळगायला पाहिजे त्यांच्या कचाट्यात जर आपण सापडलो तर ते आपल्याला खाऊन टाकतील आपण त्याचे भक्ष्य बनू शकतो.
मग आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. वैजंता बोलली.
मलाही तसेच वाटते. लैलाने वैजंताच्या सुरात सूर मिसळला.

एकदा कां आपण विरोधी गटातील कीटकांना पराभुत केले की मग आपल्याला कोणीच शत्रू होणार नाही आपण मानव रुपात पुढचे आयुष्य जगू शकतो. लैला बोलली.

पण मला मानव रुपात राहायला कदाचित आवडणार नाही वैजंता नाखुशीनेच बोलली.
असं का बोलतेस लैलाने चमकून तिच्याकडे पाहिले.
ती असे बोलते न बोलतेस तोच तिला समोरून काजव्यांची टीम येताना दिसली.त्यांना बघून लैला म्हणाली बघ वैजंता आपल्या मदतीला सर्वजण धावून आलेले आहेत. एक प्रकारे काजव्यांच्या बटालियन चमकत आकाशात दिसू लागले होते. त्यांना बघून विरोधी गटातील कीटकांची जथ्ये त्यावर तुटून पडले. त्यांची धुमश्चक्री सुरू झाली. विरोधी गटातील कीटक अर्धेअधिक रोबोट होते. त्यामुळे ते मरता-मरता नव्हते. पुन्हा पुन्हा जिवंत होत होते. यावर उपाय म्हणून लैलाने काजव्यांना आदेश दिला .

जिथे रोबोट राणी असेल किंवा रोबोटराजा जो कोणी असेल त्याचा खातमा करा. मग हे सगळे नष्ट होतील. तशी आज्ञा मिळताच लगेच काजव्यांच्या दोन टीम आकाशात गिरकी घेत मागच्या मागे वळल्या आणि वेगवेगळ्या दिशांना गेल्या.
रोबोट कीटकांच्या हातातील मशीन गनच्या गोळ्यांचा वर्षाव चुकवत त्या दोघी लढाई करत होत्या. गिरकी घेण्यात आणि मारा चुकवण्यात त्या दोघी तज्ञ होत्या.
काजवे त्यांचे अतिनील किरणांच्या शलाकांचा मारा रोबोट कीटकांवर करीत होते.परंतु तरीही झुडीवर झुंडी रोबोट किटकांच्या येत होत्या. कितीही त्यांचा खातमा केला तरी ते नष्ट होत नव्हते. होत.कचऱ्यासारखे अगणित रोबोट यांची आकाशात गर्दी झाली होती. आकाश अगदी काळवंडून गेले होते.दोन-अडीच तास त्यांच्याशी लढा दिल्यावर हळूहळू रोबोट किटकांची संख्या कमी होऊ लागली असे वाटतानाच दुसर्‍याच क्षणी अगणित असे रोबोट पुन्हा नव्या संख्येने येत होते. एकाएकी आकाशात एका मोठ्या आकाराचे यान येऊन स्थिरावले होते. त्यातून असंख्य कोळी प्रजातीचे किट बाहेर पडू लागले.ते त्यांच्या तंतूंचे यानाला चिकटून होते परंतु त्यांच्याकडे मिसाईल्स होते. त्यांच्या सोबतीला झुरळे सुद्धा होती. त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत लैला म्हणाली या झुरळांचे इथे काही काम आहे.

आता किटकांचे दोन गट पडले त्यामुळे झुरळांना सुद्धा कुठच्या तरी गटात सामील व्हावेसे वाटले असणार आणि त्याचा परिणाम हा असा दिसतो आहे. पण झुरळांना उडता येत नाही. त्यांना भरती घेता येते.कोळी सुद्धा उडत नाहीत.
मग हे इथे काय करतात आकाशात. ती टेक्नालॉजीची कमाल आहे. अर्थात संगणकाची. वैजंता बोलली.
मिसाइल्सचा मारा जरी होत असला तरी नागरी वस्ती च्या वर एक अदृष्य असा वायूचा पडदा तयार झाला होता.जो लैला च्शया गटाने तयार केला होता. म्हणजे तिथल्या नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये त्यामुळे वरच्या दिशेला फक्त युद्ध सुरू होते. खाली त्याचा काही मागमूसही लागत नव्हता. मात्र त्या विशिष्ट थराच्या खालच्या दिशेकडून वर आकाशाकडे पाहणार्‍यांना असे वाटत होते की आकाशात विजांचा प्रचंड धुमाकूळ चालू आहे. परंतु त्याचा आवाज येत नव्हता फक्त विजांच्या चमकण्याचा प्रकाश दिसत होता.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED