Butterfly woman - 3 books and stories free download online pdf in Marathi

बटरफ्लाय वूमन - भाग ३

सकाळी ती त्या सूटची गोष्ट विसरूनच गेली होती. भराभर कामे आटोपून वैजंता कामाला जायला निघाली. तिने दरवाजा उघडला आणि दरवाजा समोर एक महिला इन्स्पेक्टरला बघून ती चक्रावून गेली.
मी इन्स्पेक्टर चैतन्या पवार.. ती महिला इन्स्पेक्टर बोलली. तुम्ही वैजंता चांदे.

होय मीच वैजंता चांदे...
आत येऊ कां? इन्स्पेक्टर चैतन्या बोलली.
हो हो यांना आतमध्ये तीने चैतन्या इन्स्पेक्टरला रूम मध्ये घेतले. आतमध्ये शिरल्यावर चैतन्या इंस्पेक्टरने तिची खोली नीटपणे न्याहाळली. तिची नजर त्या सूट कडे वळली. मात्र इन्स्पेक्टर चैतन्या एका खुर्चीत बसली.महिला इन्स्पेक्टर सोबत आणखीन एक महिला पोलीस होती. त्या दोघींना वैजंताने पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर चैतन्या इन्स्पेक्टर बोलली.

वैजंता चांदे.... मी तुझ्याकडे एका चौकशीसाठी आलेय. मला दोन तीन प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. हातातली काठी दुसऱ्या हातावर आपटीत ती म्हणाली.
होय विचारांना ...असे म्हणून वैजंता इन्स्पेक्टर चैतन्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. परंतु महिला पोलीस कडे बघत वैंजता बोलली.
तुम्हीसुद्धा बसा ना त्या खुर्चीत...
नाही नको. मी नाही बसत. मी उभीच बरी आहे. चैतन्या इन्स्पेक्टर कडे बघत ती महिला पोलीस म्हणाली.

बरं ठीक आहे .विचारा प्रश्न ?वैजंता मानसिक तयारीने म्हणाली...
तुम्ही या इथे किती वर्षे राहत आहात....
मला आठवत नाही. पण मी तरुण झाल्यापासून येथेच राहते. त्यासरशी उभी असलेली महिला पोलीस फसकन हसली.
तुमच्याकडे या रूमची कागदपत्रे असतीलच ना.
हि रूम माझ्या आजीची आहे...
ठीक आहे. म्हणजे वारसाहक्काने तुम्हाला मिळालेली ही रूम आहे असेच म्हणायला हरकत नाही.
होय ते तसेच आहे. वैंजता ठाम बोलली...
काय चहा कॉफी घेता कां मॅडम. वैंजताने इन्स्पेक्टर चैतन्याला विचारले.
नको काहीच नको.
तुम्ही घेता कां चहा कॉफी वैंजताने उभ्या असलेल्या महिला पोलीस कडे पहात विचारले.
नाही मी सुद्धा घेणार नाही.

इन्स्पेक्टर चैतन्या मॅडम तुम्हाला एक सांगू का
ठीक आहे काय सांगतेस.
तुम्ही मला अहोजावो नका करू. माझा एकेरी उल्लेख केलात तरी चालेल. वैजंता तिला म्हणाली...
अरे व्वा हे तर फारच चांगले झालं इन्स्पेक्टर चैतन्या पवार हसत हसत म्हणाली.

बरं मला एक सांग तुझे लग्न झालेय वैजंताकडे रोखठोक पहात इन्स्पेक्टर चैतन्या म्हणाली.

हे सुद्धा मला आठवत नाही .वैंजंता बोलली.
हे बघ वैजंता तु अशी उडवाउडवीची उत्तरे देऊ नकोस नाहीतर तुला पोलिसी खाक्या दाखवावा लागेल इन्स्पेक्टर चैतन्या रागाने म्हणाली.

नाही मॅडम मला खरंच माहित नाही माझं लग्न झालेय की नाही ते .मी स्वतःच्या बाबतीत कनफ्यूज आहे. मला खरंच काही आठवत नाही.

तेव्हा हाताने डोक्याकडे निर्देश करत उभी असलेली महिला पोलिस इन्स्पेक्टर चैतन्याला मानेने खुणावत म्हणाली. ही थोडी वेडी दिसते.परंतु तिच्या कडे कानाडोळा करीत इन्स्पेक्टर चैतन्या म्हणाली .
बरं ठीक आहे आठवले म्हणजे सांग.
आता निघतो आम्ही. इन्स्पेक्टर चैतन्या खुर्चीतून उठून उभी राहीली. दरवाजा उघडून झटकन घराच्या बाहेर पडली. महिला पोलीस वेंधळ्या सारखी तिच्या कडे बघत राहिली.घराबाहेर आल्यावर महिला पोलीसाने इन्स्पेक्टर चैतन्या मॅडमला विचारले.
मॅडम तुम्ही चौकशी अशीच कां सोडून दिली मधेच.
मध्येच नाही सोडली चौकशी पुन्हा यायचं आहे आपल्याला.
पण मग तिच्या उत्तरावर तुम्ही समाधानी आहेत कां.

म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. चैतन्या म्हणाली.
म्हणजे महिला पोलिसाने चैतन्याकडे चमकून पाहिले.
कळेल तुला ,चल गाडीत बस दोघी पोलिसांच्या गाडीत बसल्या. त्यांची व्हॅन पोलीस स्टेशनकडे निघाली. त्या दोघी निघून गेल्यावर वैजंताने दरवाजा बंद केला. वैंजताने कामाला जाण्याचा म्हणजेच नोकरीला जाण्याचा विचार बदलला आणि तिथेच मटकन खाली बसली खुर्चीत. हे पोलिसांचे झंझट काय आहे तिला कळेना.

दुसऱ्या दिवशी पुन्हा महिला पोलीस आणि इन्स्पेक्टर चैतन्या पवार तिच्या घरी आली. त्यांना बघून वैजंताच्या कपाळावर आठी पसरली. तिने नाखुशीनेच त्यांचे स्वागत केले. इन्स्पेक्टर चैतन्याने तिच्या कपाळावरची नाराजी हेरली. घाबरू नकोस तुला त्रास द्यायला आलो नाही.थोडीशी चौकशी बाकी राहिली होती ती पूर्ण करायला आलो आहे असं चैतन्या बोलली. बरं मग सुरू करू कां चौकशीला...
करा सुरू तुमचेच राज्य आहे तुसडया स्वरात वैजंता बोलली. त्यांची चौकशी सुरू होणार होती इतक्यात वजन त्याच्या घरासमोर लैला आली ती सरळ आत मध्ये शिरली. लैलाला आत मध्ये आल्यावर बघितल्यावर वैजंताला जरा बरे वाटले.
ही कोण आहे चैतन्याने विचारले.
माझी मैत्रीण लैला.
च्यायला.... महिला पोलीस मधेच पचकली. त्यासरशी तिच्याकडे रागाने इन्स्पेक्टर चैतन्याने पाहिले. तेव्हा ती महिला पोलीस खूपच वरमली.
हे काय आहे ही कसली चौकशी चालू आहे वैजंता. लैला ने म्हटले.

मला सुद्धा कळत नाही यांना काय हवे आहे.
जे लोक त्यांची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवतात त्यांची चौकशी आम्ही करतो कारण मागच्या वेळी आम्ही इथे जेव्हा आलो होतो तेव्हा वैजंता म्हणाली की मी ते कधीपासून राहते मला माहित नाही तिचं लग्न झाले की तिला माहीत नाही हे काय चाललंय. त्यासाठी आम्ही पुन्हा इकडे आलो आहोत. महिला पोलीस म्हणाली.
तुम्ही तुमची माहिती आमच्यापासून लपून ठेवाल तर मॅडम तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारतील नशीब तुमच्या समजा की तुमच्या घरी येऊन आम्ही चौकशी करत आहोत तर तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलावून घेऊन पोलीस खात्याप्रमाणे तुमची चौकशी करता येते हे लक्षात ठेवा. इन्स्पेक्टर चैतन्याने दमबाजी स्वरात म्हटले.

हे बघा इन्स्पेक्टर चैतन्य मॅडम तुम्ही आम्हाला दमबाजी करून घाबरवू शकत नाही. लैला बोलली.
तुला समजले का आम्ही इथे कशाला आलो आहे ते कां तू चोंबडेपणा करतेस.
मला समजले आहे मॅडम तुम्ही कशासाठी इथे आला आहात.
बरं सांग मग माहिती तू सांग तिच्याबद्दल.
मॅडम तिला खरच माहित नाही.
बर मग तू सांग तुझ्याबद्दल इन्स्पेक्टर चैतन्याने लैला कडे मोर्चा वळवला.
मला सुद्धा माहित नाही माझ्या बद्दल फारसे. लैलाने खांदे उडवत म्हटले.
हे बघा तुम्ही दोघी जर पोलिसांच्या पासून काही लपवत असाल तर पोलिस तुम्हाला ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही.तुम्ही आमच्या पोलीस हद्दीत राहता म्हणून वरून ऑर्डर आलेली आहे की तुमची चौकशी करावी.
मी काय म्हणते इन्स्पेक्टर मॅडम.तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा आम्ही तुम्हाला आमची सगळी माहिती देऊ.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED