शैक्षणिक तंत्रविज्ञान एक वरदान पूर्णा गंधर्व द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शैक्षणिक तंत्रविज्ञान एक वरदान

Albert Einstein ," I never teach my pupils I only attempt to provide the conditions in which they can learn." अलबर्ट आईन्स्टाईन च्या मतें विद्यार्थ्यांना शिकवण्या पेक्षा त्यांना अध्ययनास आवश्यक स्थिती ची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे .

मागील काही महिन्यांपासून कोविड 19 नावाच्या महामारी मुळे जगाचीच परिस्थिती बदलून गेली आहे .सर्वच क्षेत्रातील साचेबंद वेळापत्रक बदलली त्यानुसार शाळा अध्ययन अध्यापनात आमुलाग्र बदल घडले .प्रचलित खडू फळा पद्धती chalk and talk मागे पडून ऑनलाईन वर्ग भरवले जाऊ लागले व्याख्यान नि चर्चा पद्धती सोबत यांत्रिक आणि तांत्रिक अनुभूतींना सुरुवात झाली.

शिक्षणशास्त्रा मध्ये virtual learning, e -learning चा प्रयोग वास्तविक पाहता अनेक दशकांपासून होतो आहे. त्याची उपयुक्तता सिद्ध असूनही तो केवळ M.phil ,Ph.d. M.ed. च्या प्रबंधां पुरताच मर्यादित राहिला परंतु महामारीच्या काळात गरज म्हणून किंवा विकल्प म्हणून स्वीकारलेली e -learning ची प्रक्रिया ग्लोबल खेड बनू पाहणाऱ्या जगातील शिक्षक व विद्यार्थ्यांना वरदानच आहे .लसीकरण ,औषधे ,प्रतिरोध क्षमता यामुळे महामारीचा प्रकोप शांत व्हावा. नियमित वर्ग भरवले जातील पण माहितीचा हा खजिना दूर लोटला जाऊ नये .शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अध्ययन व अध्यापन एकमार्गी आणि एकरेशीय न होता बहु उद्देशिय होईल. धोकादायक किंवा अशक्य असे वैज्ञानिक प्रयोग आभासी virtually अनुभवता येतील चिमुकल्या। साठी कार्टून अनिमेटेड पाठ ठेवता येतील. विविध स्टडी गेम्स त्यांना अभ्यासावर खिळवून ठेवतील.

उच्च शिक्षणासाठी केवळ रीसर्च गाईड आणि प्राध्यापक यांवर अवलंबून राहत येत नाही हे सत्य आहे तेव्हा बालपणी घातलेला गूगल सर्च चा पाया उपयोगी पडेल .यामुळे शिक्षकावर पडणार अध्यापनाचा बोजा कमी होऊन विद्यार्थी स्वयं शोधनासाठी उत्स्फूर्त होईल मागे लागून शिकवणारे आणि अभ्यासाला बसवणं इतकी भूमिका ना राहता पालक आणि शिक्षक मार्गदर्शक व नियंत्रक होतील .शिक्षक हा सुकरक , सम पाताळी वरील मित्र ,सहाध्यायी बनू शकेल

ज्ञानाचे केवळ बाह्य संक्रमण करता येत नाही .छडी लगे करून आदर्श पुरुष घडविण्याचा काळही आता गेला विद्यार्थ्यांची स्वयं प्रेरणा self -motivation हेच शिक्षणासाठी उपयुक्त आहे .

जीन प्याजे यांनी मनाच्या संरचनात्मक अंगाचा पुरस्कार केला (constructive learning ). ही रचना सतत गतिमान असते. ज्ञान हे निश्चित स्वरुपबद्ध नसते ,तर वस्तूच्या आणि घटनेच्या संबंधाने प्राप्त असा स्वानुभव असतो .साचेबंद ,जडवादी ज्ञान आणि अध्ययनापेक्षा संशोधनास प्रोत्साहन द्यावे. तरच पदवीस केवळ कागदपत्राचे मोल ना राहता ज्ञान साकार होईल मूल्यमापनापेक्षा (examination, evaluation )पेक्षा कार्यमानस( performance) प्रोत्साहन व प्राधान्य द्यावे त्यामधूनच विद्यार्थ्यांमधील आंतरिक गुणांना वाव मिळेल विविध प्रकल्प व शालेय विषयांवरील शोधकार्ये देण्यात यावीत ,जी digitally पूर्ण होऊ शकतात त्यावर काम करताना नवीन उपयुक्त माहितीचा लाभ होईल .संकल्पना आणि नवंनिर्मितीस पोषक वातावरण निर्मिती साठीची तयारी शालेय जीवनापासूनच करण्यात यावी म्हणून च पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धतीना मागे टाकून शोधन ,पृच्छा , उत्सुकता या प्रवृत्तीना बंधमोचंन करावे सृजनास मुक्तद्वार द्यावे .या स्वप्न पूर्तीसाठी e प्लॅटफॉर्म उपयुक्त आहे . अध्ययना शिवाय नृत्य गायन सादरीकरण या गुणांना social मिडिया नावाचा भव्य मंच मिळेल . पदवी व तंत्र शोध ,डॉक्टरेट साठी degital युग वरदानच आहे माहीनांमहिने वाचनालयात मध्ये बसून पायपिट करून मिळणार डेटा आता एक click वर मिळू शकतो .earning अँड learning च्या युगात हा मोठा सुवर्ण काळ आहे. e नोट्स आणि short term कोर्स चा शिक्षक आणि विद्यार्थी सर्वाना फायदा होईल

शैक्षणिक तंत्रज्ञान हे युगाची गरज आहे .खेड्यांमध्ये आणि पाड्यां मध्ये पोहोचण्यात अडचणी आहेत ज्या नियोजन करून दूर होऊ शकतात नाइलाज म्हणून झालेली ही सुरुवात शैक्षणिक क्रांतिकडे वाटचाल करणारी असावी .मिळणारा डेटा ज्ञानात कसा परिवर्तित कसा करता येईल यासाठी पालक हेच मार्गदर्शक आहेत उचित डेटा managenent आपल्या मुलांना शिकवावे

दिव्यांग आणि विशेष गरज असणाऱ्या अध्ययन कर्त्यासाठी इ learning एक वरदान आहे कोणाचें ही सहाय्य न घेता self study मोडुल्स सर्वांगिण विकास घडवून आणतात

केवळ तोट्याचा बोभाटा न करता ज्ञान प्राप्ती ,संप्रेषण , शोधन या हेतूने ऑनलाईन education ला संधी देऊन शिक्षणातील तंत्र शुद्ध अनुभूती घ्यावी मनोरंजन, प्रबोधन, उद्बोधन शिक्षणातील प्रवाहात आणावे.

©पूर्णा गंधर्व