Memories to be Preserved - Part 9 books and stories free download online pdf in Marathi

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 9

साहिल ची तर गंमत निराळी एक वर्ष कामाचा अनुभव असल्या मुळे नवीन कंपनीत नवीन जॉब राहिला बंगला जायला यायला गाडी, चांगला पगार उत्तम प्रगती. काही दिवसा नंतर सुधाकर व रमा यांना ही त्याने आपल्या जवळ आणले होते. साहिल साठी मुलगी शोधण्याचे काम चालू होत. साहिल ना नू करत होता. पण मावशी आणि आई म्हणायची लग्न हे वेळेवर व्हावे. त्यामुळे............................... मावशी ने एक सुंदर अशी मुलगी शोधली. पाहण्याचा कार्यक्रम ठरला. रविवारी मुलीच्या घरी. सगळे जमले. गप्पा मारत असताना मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर जिन्यावरून खाली येतं होती आ हा, काय मस्त दिसत होती. गोरा रंग, केश तसे छोटे पण छान, थोडे काळे व थोडे तपकीर डोळे गुलाबी रंगांची साडी त्यावर शोभेलअशी लिस्टिप सारे तिच्या कड़े पाहत होते. साहिल तिचे सै दर्या डोळ्यात समावत होता. ती येऊन सोप्यावर बसली मिस्टर मधुकर काय विचारायचे ते विचारा!! देसाई म्हटले. काही नाही विचारायचे. ती मनातल्या मनात रागावली होती. काही नाही म्हणजे काय??-मुलाने साधे नाव विचारले नाही. असा कसा हा!! वर्षा तुझ काही खरं नाही.!!!! वर्ष मुलीच नाव. ती जरा बडबडी होती. चंचल, हुशार, मस्त जगणारी. साहिल चे काका म्हणाले, वर्षा तूझ्या काय इच्छा आहेत.... वर्षा त्याची वाटा पाहत होती. वर्षा..... मी लग्नाला नंतर ही जॉब करणार... मावशी...... हो, जॉब ही कर, ड्रेस ही घाल आमची कसली हरकत नाही. वर्षाला जरा मस्त वाटल. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली सगळे म्हणाले साहिल-वर्ष तुम्हाला काही बोलायच का??? पण साहिल नाही म्हटला. वर्षाला खुप राग आला. एकमेकंचि पसंती झाली. लग्नाची तारिक लवकर काढू. वर्षाचे आई वडील तिला विचारता कस वाटल. ती जरा रागात बोली ठीक आहे. पण बाबा तो मुलगा काहीच बोलला नाही आई..... अग, काही मुलांना मोठ्या समोर नाही आवडत .आणि आत्ता काय फोन।वर बोलतात, बाहेर भेटतात ते सांगाव लागत नाही .वर्षा थोडी गालात हसली, आणि लाजली सुद्दा आणि तिच्या रूम मध्ये गेली.मग काय मैत्रिणी चिडू लागल्या. ऑपीस मध्ये ही तीच चर्चा. व ती मैत्रीण आर्या भेटतात. आर्या......' अग,तिच्या खांद्याला देत मग काय?? आला होता का फोन... त्यांचा.... वर्षा..... नाही ना त्याची वाट पाहते. आणि खरं फोनची वेळ वाजते. वर्षा....... अग, आर्या!!!!!! साहिलचा फोन. आर्या.... अग, घेणा फोन.!!!!! वर्षा. ......हॉलो.......मी साहिल..... साहिल म्हणतो. बोलना.... वर्षा.... नाही फ़क़्त सा हिल...... साहिल म्हणतो. मग काय ते खुप वेळ फोनवर बोलतात . दोनी घरी लग्नाची गडबड चालू होती. आणि या सगळ्या मध्ये लग्नाचा दिवस उजाडला. जिकडे तिकडे पळापळ चालू होती. सगळे लग्न मंडपात पोचले. जेव्हा वर्षा लग्न आली तिची सुंदरता अप्रतिमा होती. जणू आकाशातून एक स्वप्न सुंदरी आली. साहिल एक टक पाहत होता. ते पाहून त्याचे मित्र त्याला चिडू लागले.... ''बहरो फुल बरसावो मेरा मेहबुभ आया है, ..''....... .... साहिल गालात हसतो. लग्नाचे सगळे विधी होतात. ते गावी येतात. देवाचे सगळे कार्यक्रम होतात. पूजा होते. मग ते पुन्हा साहिल बंगल्या वर येतात. साहिल व वर्षा यांची सुट्टी संपलेली असते. रात्रीच जेवण झाल्यावर गप्पा मरताना उदया कामावर जायचं आहे अस दोघे सांगतात. मधुकर........ बर साहिल तु जाताना वर्षाला सोडव. आणि हो,आत्ता लवकर झोपा. सगळे झोपायला जातात. वर्षा.......... उदया ची तयारी करते. आहो, तुमचे कोणते कपडे काढू??? साहिल ........ मी घेईल तु टेन्शन नको घेऊ. चल आज प्रवास खुप झाला. आणि उदया ऑपीस आराम कर. वर्षाला खुप बर वाटल. आणि ती बेड वर पडताच झोपी गेली. साहिल ने तिच्या अंगावर चादर ओढली. तिच्या डोक्यावरून खुप प्रेमाने हात फिरवला. आणि झोपी गेला. सकाळी वर्षा लवकर उठली तिचा उरकल्यावर ती देवघरात गेली. नतमस्तक होऊन. किचन मध्ये गेली शेगडी ला ही नमस्कार केला. कि लगेच फटाफट कामाला लागली दोघांचा जेवणाचा डब्बा तयार केला. चांगला मस्त नाश्ता ही तयार केला.साहिल ला उठवायला बेडरूम मध्ये गेली. तो शांत झोपला होता. ति त्याच्या जवळ गेली. झोपू दे थोडा वेळ मनाशी म्हणली. आणि परत फिरलीपण साहिल ने तीचा हात पकडला. वर्षा....... तर आपण जागे आहात!!!!साहिल..... डोळे उगडले कि तुझा सुंदर चेहरा दिसेल म्हणुन ...वर्षा लडिवाळ पणे त्याच्या केसात हात फिरवत म्हणते,, महाशय उठा!!साहिल....... थोडा वेळ झोपतो ना ग वर्षा .... नाही नाहीआत्ता उठायच.आणि बाहेर येते. रमा तिच आवरून किचन मध्ये येते पण सगळ काम आवरलं होत. वर्षा.......आहो, आई थोड्या च वेळात चहा, नाश्ता लावते बाबा च उरकल का?? रमा........ आ ग साहिल. वर्षा...... हो येतायत. सगळे डायनिंग टेबल वर येतात. वर्षा सर्वाना चहा नाश्ता देते. मधुकर.......... वर्षा तु ही बस. वर्षा.... ....हो, बाबा आलेच. वर्षा वॉशिंग मशीन ला कपडे लाऊन येते. रमा....... वर्षा अग, सगळ कस... अग ,आत्ताच्या मुली जरा.... वर्षा.... ...कस आहे आई आपण शिकलो, नोकरी करतो. म्हणजे आपली पिढ्यान पिढ्या चालत आलेली संस्कृती कशी विसरायची. आणि आपली आजी आई काय करते कशी करते हे आपण पाहतो. आणि हो काळानुसार थोडा बदल होतो. रमा मधुकरला म्हणते गुणी आहे हो माझी सून. साहिल...... चला सासू सुने च पटल म्हणजे बर झाल बाबा. यावर सगळे खुप हसतात रमा......... वर्षा तु उरक बाकी मी पाहते. .... साहिल व वर्षा संसारात चांगले रमले होते. त्याच्या लग्नाला एक वर्ष झाले होते. ती बेडरूम मधली एक छोटी आलमारी साफ करताना तिला ती पेटी दिसली ती तिला खुप आवडली. तिथे साहिल आला वर्षाच्या हातात पेटी पाहून त्याने ती परत ठेवली. ती म्हणली मी मला घेऊ साहिल जरा रागात बोलला नाही. तिला हात लाऊ नको. तिला साहिलचा राग आला. साहिल ला वाटले तिला कळाले तर तिचा गैर समज होईल. ते थोडे नाराज राहू लागले. हे रमा च्या लक्षात आले तिने कारण शोधले. वर्षा ऑपीस मधून लवकर आली होती.
बेडरूम मधे आराम करत होती. रमा तिच्या जवळ गेली. दोघी गप्पा मरतात. रमा मध्ये उठली आणि ती पेटी काढली . ती वर्षा जवळ दिली .तिने ती उघडली तिला एक सुंदर गुलाबी रंगाचे ग्रीटिंग कार्ड दिसले. happy birthday sahilअसे लिहिले होते. अजून काही वस्तु होत्या त्या ती अगदी बारकाईने पाहत होती. किती छान आहेत या वस्तु रमा ने साहिल व सई ची असणारी मैत्री सांगितली ते एकूण वर्षाच्या डोळ्यातून पाणी आले. साहिल रूम मध्ये येतो. ते पाहून..... तो सोप्यावर बसतो. ती त्याच्या जवळ जाते. आणि म्हणते,..... मला तुमचा खुप अभिमान वाटतो. मी नशीबवान आहे. ऐत्का प्रेम करणारा जोडीदार मिळाला. साहिल..... अग, तस.... वर्षा.... आहो, जो आपल्या बालपणी च्या आठवणी इतक्या प्रेमाने जपून ठेवतो तो आपल्या बायको मुलांवर किती प्रेम करेल .तुमच्या या आठवणी मी सुद्दा जपून ठेवीन .आणि आपल्या होणाऱ्या मुले ही ठेवतील असे मी तुम्हाला प्रॉमिस करते. हे ऐकून सहिला काय बोलावे सुचेना रमा मात्र वर्षाच्या डोक्यावरून हात फिरवते व रूम बाहेर जाते. साहिल वर्षाचा हात हतात घेतो. व म्हणतो, आपण असेच प्रेमाने राहू आणि तो वर्षाला मिठी मारतो. ती ही त्याच्यात सामावून जाते......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED