रक्षक प्रियांका कुटे द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रक्षक

रक्षक भाग १

नमस्कार मित्रांनो,

आज घेऊन आलीय एक नवीन भयकथा...

कथेच्या नावाप्रमाणेच कथेचा सार आहे...

कथेतील सगळी पात्र काल्पनिक आहेत... त्याचा कुठल्याही सत्य घटनेशी काही संबंध नाही.. असल्यास निव्वळ योगायोग समजावा...

पावसाने जोर धरलेला अख्खा रस्ता जणू झोडपून काढला होता.. फूटभर अंतरावर पण दिसत नव्हते.... अशा मध्ये एक सुंदर तरूण मुलगी जीव मुठीत घेऊन धावत होती....तिचा जणू कोणी पाठलाग करत होते... तिला धाप ही लागली होती.... त्रासाने घेरी येऊन ती तिथेच कोलमडली.. ते जे कोणी मागे होते ते तिथून माघारी पळत सुटले... तिचा जीव वाचला पण ती शुध्दीवर नव्हती....

तिचे डोळे जड झालेले खूप वेळाने शुद्ध आल्याने तिला अशक्त वाटत होते.... तिच्या समोर एक आजी बसलेल्या ज्या ती उठल्याचे बघून तिच्या जवळ तिची वि४पूस करायला आल्या... तिला काही कळत नव्हते आपण वाचलो कसे इथे कस आलो... तिला बोलता ही येत नव्हते.. तिने इशारा करून पाणी मागीतले... थोडे पाणी प्यायल्याने तिला हुशारी आली आणि ती आजींना वि४ती झाली..

तरुणी: आजीइइ मी .. इइथेए ककशीइ तुम्हीइ ककोण !

आजी : अग , माझ्या नातवाला तू तिकडं पडलेली आढळली मग त्यो घेऊन आलाय तुला... पण तू कुठची अन् तिथे काय करत होती...

तरुणी : माझझ्या मागेए ... तिला जास्त बोलता येत नाही.. ती परत बेशुद्ध होते..

. आजी तिच्या तोंडावर पाणी शिंपडते पण ती काही उठत नाही... मग नातवाची वाट बघू या वि४ने घरातील जे१ व इतर काम आवरून घेते...बराच वेळ तरूणी बेशुद्ध असते.. आजी तिच्या नातवाला फोन करून येताना डॉक्टरना घेऊन यायला सांगते... आजीला ही काही खायची इच्छा होत नाही... पोरीचे हाल बघून तिला ही गलबलून येते... संध्याकाळच्या प्रहरी नातवाच्या गाडीचा आवाज आजीला येतो तशी ती अंगणात येते... तो उतरताच आजी त्याला सांगायला सुरवात करते आणि डॉक्टर नाय आल्याबद्दल त्याला वि४ते... आजीचा नातु म्हणजे आपल्या कथेचा नायक... आधी त्याच्या बद्दल थोडी माहिती घेऊ.. मग कथा पुढे नेऊ...

गिरीश एक साधा सरळ आणि आपल्या आजीला जीवापाड जपणारा तरुण.. आई वडील खूप लहानपणी वारल्याने त्याला फक्त आजीच माहिती होती.. तो एक दोन वर्षाचा असेल तेव्हा एका चार चाकीच्या अपघातात त्याचे आई वडील वारले होते... आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, गिरीश ला बघून तो मारेकरी का पळाला असावा.. तर याचे एक रहस्य आहे ते आपण आता जाणून घेऊ..
गिरीश जेव्हा गिरीश २ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आई वडील वारले आणि त्या वेळी एक सैतान जागा झाला.. ज्याचा पत्ता न आजीला लागला न तिथे उपस्थित लोकांना.. हे त्याचे दुर्दैव की सैतानाचे नशीब की १०० वर्षानी येणाऱ्या आमावस्येला सैतान जागा होतो आणि एका निष्पाप जीवाला आपल्या ताब्यात घेतो... आणि गिरीश चे आई बाबा वारले तेव्हा आमावस्या होती जी १०० वर्षानी एकदा येते.. आणि गिरीश लहान असल्याने त्या सैतानाने त्याला पछाडले... जसा गिरीश मोठा होऊ लागला सैतानाची ताकद वाढत जाते... गिरीश ला या गोष्टी ची कल्पना नसते.. फक्त त्याला तेवढा वेळ काय झाले हे लक्षात राहत नाही.. त्या रात्री जेव्हा ती तरुणी पळत होती व नंतर शुद्ध हरपून पडली तेव्हा तिच्या मागे येणाऱ्या इसमाला गिरीश चे भयानक रुप दिसले आणि तो उलट्या पावलांनी पळून जातो... खाली पडलेल्या तरूणी कडे भक्ष म्हणून सैतान पाहतो.. पण तिचा निरागस चेहरा बघून तो तिला उचलून गिरीश च्या घराबाहेर ठेवतो...

आजीच्या प्रश्नांना वैतागून गिरीश तिला शांत बसायला सांगतो आणि म्हणतो.. आजे अग येतात की डॉक्टर वाइच दम धर ..

डॉक्टर ना बघून आजीचा जीव भांड्यात पडतो... सोबत एक नर्स असते जी तरुणीच्या जखमा साफ करते आणि औषध लावून त्यावर पट्टी लावते... डॉक्टर चेकअप करून तिच्या ठोक्याचा अंदाज घेतात... ती अजूनही अशक्त असते.. अजून ७ ८ दिवस तिला रोज चेकअप ची गरज लागेल असे डॉक्टर सांगतात ... गिरीश ही होकार देतो आणि त्यांची सोय आपल्या वाड्याच्या गेस्ट हाऊस मध्ये करतो...

डॉक्टर आणि नर्स तरुणीला तपासून आणि औषधे देऊन आपल्या रूममध्ये जातात... रात्र व्हायला आली असते... तसे गिरीश च्या रुममधून आवाज येऊ लागतात... नर्स ची रुम त्याच्या रूमच्या समोर असते... तिला जरा स्पष्टच ऐकू येते सगळे... ती थोडी वाकून बाहेर बघते... तसा तिचा काळजाचा ठोका चूकतो... एक भयानक चेहरा तिला दिसतो आणि त्या चेहऱ्याचे कपडे ही ती लगेच ओळखते.. कारण गिरीश अजून पूर्ण सैतान झालेला नसतो... तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही... ती पूर्ण वेळ त्याच वि४त असते... ती घाबरून डोळे मिटून घेते.. तिला सतत तेच चित्र दिसत असते... तिला परत उठून बघण्याची हिम्मत होत नाही..

इकडे गिरीश पूर्ण सैतान झालेला असतो... जळालेले शरीर , पांढरी बुबुळे, मोठे सुळे आणि भयंकर असा आवाज त्याच्या तोंडातून येत होता.. तेवढ्यात त्याला दोन माणसांच्या बोलण्याचा आवाज येतो... ते दोघे दारुच्या नशेत जात असतात... त्यांना कसलीच शुद्ध नसते... अचानक गिरीश त्या दोघांच्या समोर जातो आणि त्यांना काही कळायच्या आत त्यांच्या अंगावर झेप घेतो... ते दोघे जीव तोडून ओरडत असतात.. पण शेवटी त्यांच्या हालचाली थांबतात आणि गिरीशरूपी सैतान त्यांच कच्चे मांस खाण्यात मग्न होतो... काही वेळाने तो तिथेच बेशुध्द पडतो..

पहाटेच्या किरणांनी गिरीश ला जाग येते तेव्हा तो त्याच्या रूममध्ये बिछान्याखाली पडलेला असतो.. हाताला रक्त लागलेले असते... त्याला काही कळत नाही.. तो उठतो आणि नेहमीची काम उरकून नाश्ता करण्यासाठी येतो... आजी , मला नाश्ता दे भूक लागली आहे.. असे आजीला आवाज देऊन तो टेबलवर बसतो.. डॉक्टर आणि नर्स ही तरुणीचे चेकअप करण्यासाठी तिथे येतात.. ती अजूनही बेशुध्द अवस्थेत असते.. सलाईन मधून औषधे देऊन मलम लावून ते तिथून निघतात.. आजी त्यांना नाश्ता करण्यासाठी बोलावते... नर्स कालच्या प्रकारामुळे घाबरलेली असते... तिचा असा अवतार बघून आजी तिला वि४ते., पोरी, काय ग पूर्ण पांढरी पडली आहेस, काय झालं ग.. बोल की... यावर ती बर नसल्याचे सांगून निघून जाते... डॉक्टर आणि गिरीश ला ही थोडे नवल वाटते...

आजी नर्स ला तिच्या रूममध्ये नाश्ता पाठवते.. इकडे दिवसभराच्या कामात गिरीश सकाळची गोष्ट विसरून जातो...


गिरीश त्याच्या कामात असताना अचानक त्याला रक्ताळलेले हात आठवतात... रात्री नेमके काय झाले असावे याचा तो.वि४ करत असतो... या.आधीही याच गोष्टी बद्दल त्याला प्रश्न पडत असतात... दर रात्री काय होत असते ... कसे हात रक्ताळतात आपले...
खर तर जेव्हा सैतान गिरीश मध्ये जागा होतो, तेव्हा गिरीश चे अस्तित्व राहत नाही... त्यामुळे त्याला या गोष्टीची काही ही माहिती नसते.. आणि सकाळ होण्या आधी त्याला घरी सोडवून तो तिथून जात असतो...

त्यामुळे गिरीश ला याबद्दल काही माहिती नसते... गिरीश चे डोके सुन्न होते.. तो एक स्ट्रांग कॉफी मागवतो.. गिरीश चे स्वतःचे ऑफिस असते जिथे तो वेगवेगळ्या प्रकारचे वेब डिझाईनींग करत असतो... त्यातच त्याला कल्पना सुचते.. आणि तो गुगल पेज ओपन करतो जिथे सर्च बॉक्स मध्ये तो त्याच्या हाताल्या लागलेल्या रक्ता बद्दल टाकतो.. असे का होत असावे ... पण त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही... तो पुन्हा हताश होतो... घरी जायला निघतो...

घरी डॉक्टर नर्स त्या तरुणीची काळजी घेतच असतात... नर्स जरा घाबरून असते... गिरीश नसल्यामुळे थोडी शांत असते... आजी डॉक्टर ना वि४ते... का वो डॉक्टर कधी यायची ही शुध्दीवर.. पोटात दाना नाय ४ दिस झाले.. बघा की वो काय ते...
डॉक्टर : अहो आजी तिला औषध गोळ्या सगळे वेळेवर दिल आहे.. १ -२ दिवसात शुध्दीवर आली पाहिजे.. नाय तर मी काही करू शकत नाही... तिला खूप लागले आहे.. अवस्था खूप दिन आहे तिची... डोक्यावर खूप जोरात प्रहार झालाय... त्यामुळे तिला बर व्हायला वेळ लागतोय.... आम्ही आमचे प्रयत्न करतोय...

तेवढ्यात गिरीश तिथे येतो... नर्स त्याला बघून घाबरते... कोणाच्या ही नजरेला ते सुटत नाही... आजी तिला वि४ते काय झाले पोरी, अशी का घाबरलीस... ती काही नाही असे म्हणून निघून जाते... रात्र झाल्यावर ती खिडकीपाशी थांबते... तिला भिती वाटत असताना ती तिथे थांबते आणि लपून गिरीश ला बघते.. गिरीश च्या रुममधून आवाज येऊ लागतात तशी ती घाबरते... या वेळेस तो पूर्ण सैतान झालेला असतो... त्याची ती अवस्था बघून नर्स च्या तोंडून किंकाळी बाहेर पडते.. आपसूकच सैतानाचे लक्ष तिच्याकडे जाते... आणि तो तिच्या दिशेने जाऊ लागतो... ती खिडकीची झडप बंद करण्याचा प्रयत्न करत असते पण अटकल्यासारखी ती वरतीच राहते.. तो अगदी काही अंतरावर असतो... घामाने डबडबलेली नर्स पूर्ण ताकद लावत असते... अचानक तो समोर येताच झडप जोरात बंद झाली... तिला थोडे शांत वाटले.. पण क्षणभरच ... पुढच्या क्षणी त्याचा हात ती झडप तोडून आत आला आणि तिला खेचून बाहेर काढले.. वीतभर अंतरावर सैतानाला पाहून तिची वाचा गेली.. ओरडणेही तिला जमणार नव्हते... त्याने आपला जबडा तिच्या मानेजवळ नेला... आणि तिचा श्वास तिथेच थांबला... तिचे मांस तसेच तो खात बसला.. खिडकी तुटण्याच्या आवाजाने डॉक्टर ची झोप चाळवली होती.. तो उठून खिडकीपाशी आला.. त्याची रूम वाड्याच्या मुख्य दारासमोर म्हणजे गिरीश च्या रुमपासून लांब होती... त्याला अंधारात काही नीटसे दिसले नाही... तो रुममधून बाहेर पडला... रात्रीची वेळ असल्याने तो थोडा घाबरत होता...

इकडे सैतान कच्चे मांस खाण्यात मग्न होता.. तोडांचा च्या$$$ब च्या$$$$ब आवाज करून तो खात होता.... तो आवाज डॉक्टर पर्यंत आला.. तो त्या दिशेने पुढे जात घाबरून पावले टाकतो.... तिथला नजारा पाहून हा जागच्या जागी थरथरायला लागतो... त्याला नर्सचा मेलेल तोंड दिसते...आणि त्याच्या समोर बसलेला तो सैतान दिसतो...


डॉक्टर ते सारे पाहून जमिनीत पाय रोवल्यासारख उभा राहतो.... जणू पुढच्या हालचालीसाठी त्याची इंद्रिय त्याला साथ देत नसतात... सैतानाला माणूस जवळ असल्याची जाणीव होते... तो उठून सगळीकडे शोधतो... डॉक्टरच्या लक्षात येते तो कदाचित आपल्याला शोधत आहे... तो जवळ येतो तसा डॉक्टर घाबरून जातो... छोट्याश्या गल्लीत तो उभा असतो.... त्याला पळण्याची पण जागा नसते... तो पुढे आला तर सैतानाच्या तावडीत सापडणार... म्हणून तो गप्प उभा असतो... सैतान तिथेच घुटमळत असतो... अचानक मागे जाताना एक दरवाजा डॉक्टर ला दिसतो... त्याला उघडण्याचा प्रयत्न तो करतो.. जाम असल्याने तो उघडत नसतो..

इकडे तरूणी शुध्दीवर येत असते.. तिला सगळे चित्रपटासारखे दिसू लागले... तिला शेवटचा प्रसंग आठवला.. तिच्या मागे लागलेला गुंड आणि तिला आलेली घेरी... ती पटकन डोळे उघडून आजुबाजुला बघू लागली... आनोळखी जागा आणि काजळीसारखा गडद काळोख.. उगीच एखादा मिनमिनता लाल दिवा काळोखात वाट काढण्यासाठी लावला होता... तिला उठणे जमत नव्हते... ती तशीच पडून राहिली... डोकं ही प्रचंड दुखत होते.... तिच्या पापण्याही जड वाटत होत्या... ती तशीच पहुडली... तिला आता भूतकाळ आठवू लागला...

महाविद्यालयीन शिक्षण घेत असणारी आपली तरूणी विभा नाव तिचे... खूप हुशार आणि लाघवी... तिचे आई वडील आणि ती असे त्यांचे कुटुंब होते.... सगळे काही सुरळीत होते.. बाबा बँकेत तर आई गृहिणी होती.... दरम्यान एक गुंड प्रव्रुतीचा मुलगा तिच्या आयुष्यात आला... तो सतत तिच्या मागे राहयाचा... तिला सगळ्याचा त्रास होत होता... तिने कम्पलेंट ही केली.. पण बड्या बापाचा म्हणून तो सूटून जायचा... गोष्ट इतकी पुढे गेली की तिच्या आईवडिलांना प्राण गमवावे लागले... आणि त्याच रात्री विभा आपले प्राण वाचवण्यासाठी त्या सुनसान रस्त्यावर धावत होती... एका आवाजाने तिची विचारांची तंद्री तुटली... तो आवाज धावताना काही तरी पडल्याचा होता.. तिला उठवत नव्हते.. पण ऐकू सगळे येत होते...

इकडे डॉक्टर दरवाजा उघडण्याचा प्रयत्नात असफल होतो.. आणि सैतानाची नजर त्याच्या वर पडते... तसा सैतान त्याच्या जवळ जायला बघतो... तसा डॉक्टर तिथून पळ काढतो.. पळताना त्याच्या जवळचा पिंप जोरात आदळतो... त्याला काय करावे सुचत नाही.. मग तिथून थोड्या अंतरावर एक उघडे घर असते.. कदाचित ते धान्याचे कोठार असावे.. कारण सगळीकडे पोती ठेवलेली असतात.. तिथे येताच सैतान जोरात ओरडू लागतो... त्याला आतमध्ये जायला काहीतरी रोखत असते... जाड मिठाच्या पुड्या आणि लसणाच्या माळा तिथे ठेवलेल्या ज्याच्या उग्र वासाने त्याला पुढे जाणे शक्य होत नाही... डॉक्टर हे सगळे आतून पाहत असतो... त्याच्या भयंकर आवाजाने तो पूर्ण सुन्न होतो... पहाट होत येते.. सैतान तिथून निघून गिरीश च्या रूममध्ये येतो... आणि सकाळच्या वेळेस डॉक्टर चहूकडे नजर फिरवून तिथून बाहेर पडतो...

गिरीश सकाळी उठतो पुन्हा रक्ताळलेले हात पाहून तो चिंतेत पडतो... नर्स चा मरणाची खबर फक्त डॉक्टर ला असते.. हळूहळू वाड्यात समजते... की नर्स वाड्यावर नाहीये... ती निघून गेली असावी अतिरिक्त सेवेसाठी असे डॉक्टर सांगतो... गिरीश ऑफिस साठी निघत असतो तेवढ्यात डॉक्टर बोलतो.. ताई शुध्दीवर आल्यात... एवढे दिवस सलाईन वर असल्याने विभा ची तब्येत खालावली होती... पण त्यातही तिचे रूप सुंदर दिसत होते... गिरीश तिला निरखून पाहत होता... तेवढ्यात आजीचा आवाज आला... आजीने तिच्या साठी सूप केलेले.. डॉक्टर ने नकार देऊन पण आजी तिला सूप भरवत होत्या... तिची हालत बघवत नव्हती... मग डॉक्टर ने फक्त ३ ४ चमचे द्यायला सांगितले... मग आजीने तिला तिच्या बद्द्ल वि४याला सुरुवात केली... सूप प्यायल्याने आणि योग्य ट्रिटमेंट मुळे विभाला चांगलीच हुशारी आलेली... तिने आपला सगळे तिथे असणाऱ्या प्रत्येकाला सांगितले.... आणि तिचे आता या जगात कोणी नाही या भावनेने तिला भरून आले... आजीने तिला धीर देत शांत केले... तशी ती आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपली....

डॉक्टर सांगतात त्यांना आराम करू द्या त्यांना गरज आहे... तेव्हा गिरीश डॉक्टरला दुसऱ्या नर्स बद्दल वि४तो.. तेव्हा डॉक्टर घाबरून कालचा प्रसंग आठवून बोलतो... नको मी एकटा करेन सगळं... गिरीश त्याच्या कडे चमत्कारिक नजरेने बघतो आणि आपल्या कामासाठी निघतो..


आज खुप साऱ्या ऑर्डर्स असल्याने गिरीश चा पूर्ण दिवस कामात जातो... तेव्हाच गिरीश चा परममित्र आणि भोळा सांब दिनेश तिथे येतो... गिरीश ला कामात बघून दिनेश त्याला चिडवण्याच्या हेतूने म्हणतो की, आम्ही एवढ्या लांबून आलोय, कोणाचं लक्षच नाहीये आमच्या कडे... आवाज ओळखीचा आल्याने गिरीश पटकन हातातले काम सोडून बाहेर येतो... अरे दिन्या.... अशी आरोळी ठोकून त्याला आलिंगन देतो... दिनेश एक पॅरासिकोलॉजिस्ट असतो जो बाहेर देशात असणाऱ्या कान्फरन्स मध्ये सहभागी होत असतो... त्याला बाधित लोकांचे हावभाव लगेच समजून येत असतात... तो गिरीश ला बघून लगेच समजून जातो.. तो तसे त्याला वि४तोही... गिरीश ला ही वाटते आपली समस्या दिनू समोर मांडली तर तो नक्की मदत करेन... पण आल्या आल्या त्याला त्रास देणे गिरीश ला योग्य वाटलं नाही... दिनेश खूप वर्षानंतर आला होता.. त्यामुळे तो २ ३ महिने थांबणार होता... त्यानेही विषय न तानता गिरीश ला उद्या भेटू असे सांगत निघून गेला....


गिरीश घरी येऊन आधी विभाच्या रूममध्ये जातो... तिला खुश आणि चांगल्या परिस्थितीत पाहून खुलून जातो... त्याला ती आवडू लागली असते... विभा ही प्रसन्न चेहऱ्याने बरी असल्याचे खूनेने त्याला सांगते... डॉक्टर आता जाण्याची मुभा मागतो आणि चेकअप ला येत जाईन असे सांगतो... त्यालाही तिथून सुटका करून घ्यायची असते... गिरीश पण त्याला ठिक आहे असे सांगून जायला सांगतो... आजी आता विभा सोबत तिच्या रूममध्ये थांबते... आणि गिरीश आपल्या रूममध्ये निघून जातो... रात्र होते १२ च्या ठोक्याला सैतान जागा होतो... विभा आणि आजी गाढ झोपेत असतात.. सैतान रस्त्याला लागतो... रस्ते सुनसान असतात... गिरीश अजून पूर्ण सैतान झालेला नसतो... समोरच्या एका खिडकीत एक तरुण पाणी पिण्यासाठी उठतो.. आणि बाहेरचा नजारा पाहून त्याच्या हातातला ग्लास खाली पडतो.. अंगावरचे कपडे तो ओळखतो आणि ढसाढसा रडू लागतो... हे आपल्या मित्रासोबत काय झाले या वि४ने तो सुन्न होतो.. तो तरुण म्हणजे दिनू असतो... रात्री शिकार करून गिरीश पुन्हा वाड्यावर येतो आणि झोपी जातो... सकाळी उठून पुन्हा ते रक्ताळलेले हात पाहून तो घाबरून अंघोळीला जातो... तेव्हाच दिनू त्याच्या घराजवळून जात असतो... आणि रक्ताळलेले पाणी पाहून घाबरून जातो... तो लगेच गिरीश ला भेटायचे ठरवतो...

दिनू गिरीश च्या वाड्याच्या मुख्य दरवाजातून त्याला हाक मारतो... गिरीश अंघोळीला गेला असल्याने आजी बाहेर येते... दिनू लहानाचा मोठा आजीसमोरच झाल्याने आजी त्याला लगेच ओळखते..


आजी : आरं दिन्या , कसा काय वाट चुकलास लेका अन् कवा आलास रं.. कसा हाईस ..


दिनेश : अग आजे , मला घरात तर येऊदे .. इथूनच वि४नार आहेस का सगळं...


आजी : आरं बाळा ये की, बघ बोलण्याच्या नादात ध्यान नाय राहिले.. ये असा वाईच चहा अन् खायला आणते तुला...


दिनेश : आजे, गिरीश कुठाय ग.. दिसत नाही तो...


आजी : न्हायला गेलाय प्वारा येईल इतक्यात.. दम जरा म्या आले..


आजीचे वाक्य ऐकून दिनू पुन्हा सुन्न झाला... तो तसाच उठून गिरीश च्या रूममध्ये गेला.. आणि त्याने दार बंद करून घेतले... गिरीश न्हाणीघरातून बाहेर आला.. तसा सर्वत्र अंधार पाहून क्षणभर दचकला... दिनूने सैतानाला हुलकावणी देण्यासाठी हे सारं केलेले.. कदाचित तो काही ठरवून आला असावा... त्याने गिरीश चा मुखवटा चढवला आणि सैतान जागे होण्याची वाट पाहू लागला... मित्राचा त्रास वाचवण्यासाठी तो स्वतःच्या जीवावर उदार झाला होता... सैतानाला वाटले खरच रात्र झाली आहे... तो जागा होऊ लागला.. मोठमोठ्या किंकाळ्या फोडू लागला... तो बाहेर पडणार इतक्यात कशाला तरी झटका लागून तो मागे पडतो.. ती दिनू ने आखलेली अंगाऱ्या ची रेघ आणि अभिमंत्रित धागा असतो... सैतान जोरात किंचाळू लागतो... दिनू दिव्याचं बटण दाबतो.. अचानक झालेल्या उजेडाने सैतान घाबरतो.. आपल्या समोर गिरीश ला पाहून तो चक्रावून जातो आणि भयंकर डरकाळ्या फोडू लागतो... दिनू घाबरलेला असतो पण तस तो दाखवत नाही.. आणि सैतानाला बोलतो की .. आज मी तुझ्या पासून वेगळा झालोय.. तुझ्या त्रासातून सुटलो मी... हुशशश मी स्वतंत्र झालो...

सैतान : हे शक्य नाही.. पहिली गोष्ट मी तुझ्यात आहे हे तुला कळले कस.. माझा तुझ्यातला वास हा कायमस्वरूपी आहे... मी शतक पूर्ण केल्याशिवाय जात नसतो.. आणि जर वेगळे व्हायचे असेल तर उद्याच्या अमावास्येला होता येईल कारण उद्या तू २५ वर्षाचा होशील... आज ते शक्य नाही...

दिनू : पण तू माझ्या शरिरात आला कसा.. तुला कोणी परवानगी दिली महामूर्खा...

सैतान : हिहिहि इ मी सैतान आहे मला परवानगी ची गरज नाही.. दर १०० वर्षांनी मी जिवंत होत असतो.. एका निष्पाप जीवामध्ये मी स्थान मिळवतो.. तुझे आई बाबा वारले तेव्हा तू सुध्दा स्मशानात होतास.. आणि तेव्हाच मी तुझ्या मध्ये सामावलो... तो कायमचाच... पण हे अशक्य कसे शक्य झाले.. कारण जोपर्यंत माझ शेकडो वर्ष जुने प्रेत बाहेर काढून कोणी अग्नी देत नाही.. तोपर्यंत मला मुक्ती नाही...


दिनू : तुझे प्रेत?? कुठे आहे तुझे प्रेत.. मातीमोल झाले असेल ते आतापर्यंत..


सैतान : नाही मी ते जपून ठेवलय.. खूप सांभाळून स्मशानभूमीत एका बर्फाच्या लादीत ते मातीमोल होणे केवळ अशक्य...


दिनू : बर मग आता काय करणार आहेस... आता परत माझ्या मध्ये जाणं जमणार आहे का तुला..


याचे आतले बोलणे बाहेर उभे जयेश आणि रितेश ऐकतात ज्यांनी आधीच आजीला विभाकडे थांबयाला सांगितले असते... त्या सैतानाचे बोलणे ऐकून ते थेट स्मशानभूमी गाठतात.. स्मशान अख्खं पालथ घालून पण त्यांना बर्फाची लादी सापडत नाही...


इकडे सैतान गिरीश चा मुखवटा चढवलेल्या दिनू कडे येऊ लागतो.. दिनू ने देवाचा सहारा घेतला असल्याने तो निश्चित असतो... तो देवाचे नाव घेऊन तिथे उभा असतो.. जसा सैतान त्याच्या जवळ येतो.. तो मागे फेकला जातो... एकदम लाईट ऑन होतात.. आणि ते सगळे पाहून सैतान जोरजोरात ओरडू लागतो... सगळीकडे देवाचे फोटो लावलेले असतात..

इकडे स्मशानात एक तिरीप सुर्य देवते कडून एके ठिकाणी पडते.. आणि सफेद बर्फ चमकू लागतो... जयेश आणि रितेश त्या ठिकाणी जाऊन तो बर्फ फोडतात.. आणि त्यातील देहाला शास्त्राप्रमाणे अग्नी देतात.. जयेश एक भटजी असतो.. तर रितेश हा दिनूचा सहकारी असतो.. इकडे अग्नी मिळताच सैतान जळू लागतो आणि गिरीश लहानपणापासून अडकलेल्या भयंकर सैतानापासून मुक्त होतो...

थोडे मागे जाऊ...


दिनू गिरीश ला सैतानी रूपात बघतो आणि रडू लागतो... तेव्हाच तो रितेशला फोन करतो.. त्याला सगळ उलगडून सांगतो... तेव्हा रितेश त्याला या गोष्टी समजावतो.. तेव्हा दिनू ही आपल्या मित्रासाठी सगळे करायला तयार होतो.. आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अशी भेट देण्याची जणू तो प्रणच करतो... आणि जयेश ला ही सगळे समजावून आपल्या योजनेत सामील करतो...


तर अशारितीने गिरीश सैतान मुक्त होतो.. आणि त्याला आपल्या सोबत काय चुकीचे होत होते याची जाण होते.. आणि दिनूचे आभार मानून त्याच्या गळ्यात पडून तो ढसाढसा रडू लागतो... गिरीश चा वाढदिवस थाटात साजरा होतो आणि गिरीश आणि विभाचा साखरपुडा ही होतो...


धन्यवाद

प्रिया

😘

कथा कशी वाटली नक्की कळवा...