अनू बाबा ज्या पध्दतीने वाडयाबद्ल बोलत होते.. तिथे काही अनूचित तर नसेल ना... रितेशने मनातली शंका अनूला बोलून दाखवली... अनू ने ही थोडा काळजीत पडल्यासारखे प्रतिक्रिया दिली... माहित नाही रे दादा आधीच कसे कन्क्लूड करायचे... तसे सगळ्याचे चेहरे पडले... काही वेळातच त्यांची गाडी जुन्नर तालुक्यात आली... तिथून १० किलोमीटरवर वाडा होता.. असे रितेशने आईकडून ऐकले होते.... एका वाटसरू ला समर ने वि४ले नवले वाड्याचा हाच रस्ता आहे का? नाव ऐकताच चेहरा पांढरा पडल्यासारखा पडून तो तिथून पळून गेला... त्याच्या चेहर्यावरचे भीती चे भाव आपल्या आस्तिक नायकांनी हेरले... त्यांनाही थोडी काळजी वाटू लागली... पण गुरूप्रीत आणि समर यांनी सगळ्यांना धीर दिला... रस्ता शोधत शोधत सगळे एका मंदिराजवळ आले... तिथे एक खूप वयस्कर आजी होत्या... एवढा गोतावळा बघून आजी थोड्या पुढे आल्या.. प्रत्येकाला निरखून बघितल्यावर वि४ले... "कुठनं आला रं , अन कुठशीक जायचं हाय.. कुणाची प्वारं तुम्ही...
तेव्हा रितेशने पुढे येऊन सांगितले की मी रितेश नवले, संग्राम नवले यांचा नातु... आजीने नाव ऐकून डोळे विस्फारले... ती म्हणाली निघून जावा इथनं कायला आले इथं .... ती सोडायची नाययय।.... जावा निघून... गुरु आजी जवळ आला आणि वि४ले... आजी कोण ती जरा नीट सांगाल का.. काय आहे हे सगळं... आजीने तुम्ही त्या भानगडीत पडू नका असे सांगितले... तर तेवढ्यात समर पुढे येऊन बोलला... आजी आम्ही तर तिथे जाणार आणि एक महिना आम्ही तिथे राहणार... हे फिक्स करूनच आम्ही इथे आलोय... नका रं प्वारांनो जाऊ तिदं ती घास घेईन तुमचा आण हा तर वारस हाय याला जास्त धोका हाय.. नका र जाऊ... आजीचे न ऐकता समर पुढे जाऊ लागला तसा तिथे एक दगडावर नवले वाडा १० किमी आणि त्याचा चक्क मार्ग दाखवणारा नकाशाही कोरला होता... कारण नवले हे त्या काळातल्या आसामी पैकी एक होते... आणि त्यांनीच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पर्यंत येता यावं या सद्भावनाने हे पाऊल उचलले होते...
समर ने गाडी काढली आणि सगळ्यांना उद्देशून त्याने येण्यासाठी वि४ले... आजी अजूनही नको जाऊ म्हणून सांगत होत्या.... आजीनी देवळात जाऊन एक अंगाऱ्याची पुडी रिमाच्या हातात दिली... आणि वेळ आल्यावर वापरायला सुचवली... तसे सगळे गाडीत बसून जायला निघाले... रस्ता तर आता माहीत होताच... काही वेळातच सगळे वाड्या समोर आले... वाड्याची एका साइट ने भिंत खचली होती.. भलामोठा गेट लाल कपडा बांधून बंद केला होता... जणू काही जे आत आहे त्याला थांबवण्यासाठी.... पण कदाचित या मुलांमुळे ते बाहेर पडू शकणार होते.. तो कपडा काढण्यासाठी समर पुढे गेला.. रितेशने त्याला अडवले," सम्या जाऊदे, खूप काही तरी अजब वाटतयं... एवढे बांधून ठेवलय म्हणजे नक्कीच काय तरी खतरनाक आहे... समर म्हणाला, नाही मित्रा आता काय ते बघूनच जाऊ.. तसा समरने कपडा उघडायला सुरुवात केली... वरती 🕉️ होता जो काढून त्याने गेटला अडकवले.. आणि जसा कपडा काढयाला सुरुवात केली तसे एक मोठे वादळ सुरू होते.. जणू ती शक्ती जागी झाली आहे... थोड्या वेळाने वादळ शांत होते... कारण रिमा ने तिच्या जवळचा अंगारा सगळ्याच्या नकळत चिमूटभर फुंकलेला असतो... गेट उघडून आत आल्यावर वाड्यावर सगळ्यांची नजर जाते... वाडा तसा ३० वर्षानंतरही भक्कम असतो... दरवाजे लांबलचक आणि तेवढेच जड असतात.. त्याचाच वि४ करुन छोटेखानी दरवाजे त्यात बनवले असतात... एक साईड थोडी खचलेली असते. न जाणे तिथे काही घडले असावे... सगळे जण छोटेखानी दरवाजातून आत प्रवेश करतात.... आतमध्ये एक खूप मोठे अंगण होते... त्यात सुकलेली पडलेली झाड होती... गवत उगवून कमरेएवढे झाले होते... वाडा चारही बाजूंनी गवतात वेढला होता.... आतल दार लहान होते... ज्याला तेवढेच लहान कुलूपही होते... त्या कुलुपा भोवती खूप गवत जमा झाले होते.... गुरु ने तिथे असलेल्या एका दगडाने कुलूप उघडून काढले.... कुलुप उघडताच एक मंद झुळुक त्यांच्या जवळून गेली... आतमध्ये प्रवेश करून सगळे निरिक्षण करू लागले... भव्य मोठा दिवानखाना त्यात बरीचशी तैलचित्र नावासहीत होती.... रितेश आणि अनूचे खापर पंजोबा त्याचेंही तैलचित्र होत त्यात ते अगदी जिवंत वाटत होते.... कारण त्या चित्रावर कसलीच धूळ माती नव्हती... दिवानखान्याच्या उजवीकडे जुन्या काळातील स्वयंपाक घर होते ज्यात भली मोठी चूल होती... मग न्हानीघर आणि त्यानंतर वरती गच्चीवर जायचा रस्ता.... सगळयांनी वाडा बघून घेतला... वरतीही काही खोल्या होत्या... पण या सगळ्यांनी खालीच बस्तान मांडले... अजूनतरी कोणाला काही वाईट अनुभव आला नव्हता... एक रूम स्वच्छ करून व सोबत आणलेला सुका नाश्ता आणि मग्गी इक्डक्शन वर बनवून सगळ्यांनी थोडे खाल्ले।.... संध्याकाळ झाली काही साधन नसल्याने सगळ्यांनी मोबाईल वर चित्रपट बघण्यात वेळ घालवला... त्यातच सगळ्याना झोप लागली... काही वेळाने अंगणात कोणी असल्याचा आवाज कानी पडला... जणू कोणी दार उघडण्याचा प्रयत्न करत आहे... त्या आवाजाने सगळे जागे होतात... पण ते जे कोणी होते ते आत येऊ शकत नव्हते... कारण रिमाने अंगाऱ्याची रेघ झोपण्यापूर्वी ओढली होती.... जोरजोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज येत होता.... सगळे रात्रभर जागे राहिले आणि आपले आस्तिक नायक जपमाळ आणि मंत्र म्हण्यात व्यग्र झाले.... रात्रीचा एक प्रहर
उलटला...आवाजाची तीव्रता कमी झाली... थोडाच वेळ झाला असेल प्रत्येकाच्या समोर एक काळी सावली उभी राहिली...... ती सावली एका बाईची होती.. जी कदाचित तीच होती.. जिचा उल्लेख त्या आजीनी केला होता...
सगळ्यांचे श्वास ऐकू येऊ लागले खिडकीतून दिसणाऱ्या त्या अवदसेला बघून... तिचे तोंड हात गळून पडल्यासारखे होते जणू जळल्यासारखे .. डोळे जणू फक्त काळोख आणि त्याच्यावर जाड भुवया बघूनच काळजाचा ठोका चूकेल असे.... केस सफेद चांदीसारखे पिंजारलेले... आणि फाटलेले तोंड.. फुटलेले कपाळ त्यातून काळा द्रव बाहेर पडत होता.... हाताची नख वितभर वाढलेली... काळ्या रंगाचा जुन्या काळातील पोषाख तिच्या अंगावर होता.... .तिला बघूनच रिटा ने किंकाळी फोडली... तिने पहिल्यांदाच असे काय तरी भयंकर पाहिले असावे.... तसे आपले आस्तिक नायक देव जपमाळ करायला लागले...ती अवदसा बाहेरुन किंचाळत होती... वाड्यात येण्यासाठी तळमळत होती... तिचे भक्ष्य समोर होते.. पण अंगाऱ्यामुळे तिला प्रवेश करता येत नव्हता... तिने बाहेरून सगळ्यांवर नजर टाकली.. तिची नजर रितेश वर थोपली जणू तिला समजले की घराचा वारस तोच आहे... त्याला बघून ती चांडाळणी जोरात ओरडली... जिता सोडायची नाय म्या... मला तुझा घास पाहिजेय... तुझी म्या लय वरीस वाट बघितली हाय.... असे बोलून ती अवदसा कुत्सितपणे हसू लागली.... तिचा खिडकीच्या गजाला हात लागताच तिला झटका लागल्याप्रमाणे ती मागे सरकली... रिमा ने प्रवेश करताना गेटवर असलेल्या 🕉️ ला खिडकीत ठेवले होते... त्याच्या प्रभावामुळे ती अवदसा मागे सरकली गेली... तशी ती बोलती झाली... म्या परत येईन... स्वडणार नय कुणालाबी आणि ती तिथून निघून गेली..... थोडा वेळ असाच शांततेत गेला.... कोणालाही काय बोलावे काय करावे काहीही सुचत नव्हते... थोडा वेळ आपण पाहिले ते खरे आहे का हे समजण्यात गेला....रितेश रिमा नयन हे जागेवरून उठून समोर आले आणि प्रत्येकाला धीर द्यायचा काम करु लागले.... रात्रीचा प्रत्येक क्षण भीतीने भरलेला होता.... कोणालाही झोप येणार नव्हती.... खूप भयंकर प्रकार सगळ्यांसमोर घडला होता..... रिटा ला दरदरून घाम फुटला होता... तिला थोडा तापही आला होता... सोबत आणलेल्या औषधांमधून तापाची गोळी देऊन तिला झोपून दिले... पहाट होऊ लागली पण सुर्यकिरण तिथे येण्यास जणू तयारच नव्हती.... कोण्या शक्तीने त्यांना अडवले होते असेच भासत होते... उजेड दिसून येत होता फक्त... मनावर एक प्रकारचा दबाव जाणवून येत होता... प्रत्येक जण दुःखी होता जणू... रिटा ला हळूहळू जाग येऊ लागली... कालचा प्रसंग आठवून ती जोरजोरात रडू लागली... आणि पुढच्याच क्षणी ती जोरात भिंतीवर आदळली... तिचे केस विखुरले गेले... ती एखाद्या प्राण्यासारखी गुरगुरु लागली... सगळे अचानक झालेल्या या गोष्टीमुळे घाबरले गेले... सकाळी आवरत असताना बाहेर येण्या जाण्या मध्ये पाय लागून अंगारा पूसला गेला होता.. आणि त्यात कमजोर मनाची रिटा तिच्या जाळ्यात अडकली.... तिचे पाय आणि हात उलट्या दिशेने फिरले... ती उलट दिशेने चालू लागली आणि जोरजोरात हसू लागली..... तिने तिच्या अंगाचा काटकोन करून मधोमध थांबली आणि कर्कश आवाजात ती ओरडू लागली... "म्या आलीय घास घ्यायला जिता सोडायची नाय."... आणि तिने रितेशवर झेप घेतली.... रितेश ला काही कळायच्या आत तो खाली कोसळला.... त्या अवदसेचा हिडीस चेहरा त्याच्या अगदी जवळ होता... तिची नख त्याच्या गळ्यात रुतत होते... तो जीव तोडून ओरडत होता.... अचानक झटका लागल्यासारखे ती अवदसा किंचाळली आणि तिथून निघून गेली.... परमीत ने त्या अवदसे वर अंगाऱ्याने माखलेली रूद्राक्ष माळ फेकलेली... तिच्या फक्त स्पर्शाने तिने पळ काढला... रितेश ला श्वास घ्यायला त्रास होत होता.. तसे गुरु आणि समर पुढे आले आणि त्यांनी फस्ट ऐड ने त्याची जखम साफ केली... रितेश ला बऱ्यापैकी थकवा आलेला तो तसाच झोपी गेला... इकडे सगळे जण चिंतेत होते कि संकट वेळ बघून येत नाही... कधीही कुठूनही येतय... रिटा ची अवस्था खूप खराब होती... खूप अशक्त जाणवत होती ती.... रिमा पूर्ण वेळ तिच्या उशाला बसून होती.... तिला खाण्यासाठी आग्रह करत होती... पण रिटा काहीही खाण्याच्या अवस्थेत नव्हती... आता रिमा ने एक ही दरवाजा खिडकी सोडली नाही... प्रत्येक ठिकाणी अंगारा पसरवला आणि कोणीही बाहेर जाऊ नका असे प्रत्येकाला सांगितले... रितेश आता बराच नीट झाला होता... त्याला अचानक त्या दिवशी भेटलेल्या आजी आठवल्या आणि तसे त्याने बोलूनही दाखवले की एकदा आजींना भेटायला हवे... त्यांना या वाड्याची बरीच माहिती असावी... तसा समर पुढे येऊन म्हणाला तुला आता कुठे बर वाटतय ... तू कुठेही जायचे नाही आहेस... मी गुरु परमीत रिमा आम्ही जातो... तुमच्या सोबत अनू नयन आणि बाकी थांबतील.... तसा रितेशने होकार दिला आणि ते सगळे वाड्यात थांबले...
इकडे समर गुरु आजीला शोधत होते... आजी अगदी गाभाऱ्यात बसल्या होत्या... रिमा परमीत दोघांचे आपोआप हात जूळले गेले... आत एक प्रसन्न काळूबाई मातेची मूर्ती होती... अगदी नखशिखांत नटलेली... समर गुरु फक्त ते रुप पाहत होते... आजीला चाहूल लागली तशी आजीने मागे वळून पाहिले.. आणि त्यांना म्हणाली मला माहिती होते.. तुम्ही मला शोधत येणार...
समर गुरु रिमा परमीत आजीला शोधत आजीकडे येतात.... आजी त्यांना बघून बोलते तुम्ही इथे येणार मला माहिती होते.... तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे याची सुध्दा मला कल्पना आहे.... आजी त्या सगळ्यांना मंदिरात बसायला सांगते... तिथे कमालीचे प्रसन्न वातावरण असते... ४ ही जण कालचा थकवा विसरून जातात... आजी घडलेली गोष्ट सांगयला सुरुवात करते.... प्वारांनो ऐका ३० वरिसा आदोगरची गोस्ट हाय.... तवा बायकास्नी लय वंगाळ वागवत असत.... अन त्यात नवऱ्याने टाकलेली अन् नवरा नसलेली आयतच खायला मिळाल्यासारखे असायची... मग एकदा असच झालत एक बाई दुसऱ्या गावातून आपले मूल घेऊन आलती... नवऱ्याने वाऱ्यावर स्वाडली व्हती तिला.. मंग तिच्यावर ,संग्राम पाटलांच्या थोरल्या पोराची म्हणजी ठकाजी नवलेची वंगाळ नजर पडली... तो लय पाताळयंत्री माणूस व्हता.. बाई दिसली का बावळटावाणी तिला त्ररास दयाचा .. त्यात हि एकलीच म्हणल्यावर त्याला बरच व्हत... तिने बी त्याचा लय इरोध क्याला.. पर एकली बाई कव्हर इरोध करायची.. एकदा तो तिच्या घरामंधी थेट घुसला अन तिला बोलला... "ए बये कव्हर अस वागणार हायेस... म्या बायकोला स्वाडली तुझ्यासाठी त्वा कायला एवढा ई४ करती... तस तिने जळक लाकूड उचलून त्याच्यावर वार केला... त्याचे अर्ध त्वांड जळाले व्हतं... तो तसाच वरडत पळाला अन् ही ईथे ढसाढसा रडू लागली... तिने आता ईद ऱ्यायाचं नाय अस ठरवल आणि काही दिवसांनी कापड आवराया घेतली... प्वाराला उचलले अन् दार ल्वाटून निघाली.. वझवझ पायवाट धरून ती कडकडन निघाली..अन् मधीच घात झाला... तो राक्षस आला तिद अन् त्यानं तिला केसान वढून जंगलाच्या दिशेनं फेकली.. त्याच ते जळक त्वांड त्यानं तिच्या जवळ न्यालं ते बघून तिचा थरकाप उडाला.. रातच्या येळेला त्यो आणिकच भयाण वाटत व्हता... तिचं प्वारं त्यानं लय जोरात फेकून दिलं त्याचा तिदंच जीव गेला... बयेने एकच हंबरडा फोडला.. अन् तिची वाचाच गेली... त्या समद्या गोष्टीचा एक पुरावा म्हणजी म्या स्वताः हाय.. म्या तवा काय बी करु नाय शकले... अजूनपतूर मला वाईट वाटतया.. मग पुढं त्या नराधमाने त्या प्वारीला लय मारले अन् तिची आब्रू लुटून तिला तिदंच जंगलात पेटवून दिली... मला सूचचनां काय करावं म्या तसच त्वांड दाबून रडरडत घरी आले... पुढं काही दिसांनी ठकाजी ला वंगाळ सपान पडाया लागली... पार सकाळच्या पहारी त्याला घाम फुटाया झाला... ज्या बाईस्नी त्यानं मारल व्हतं तीच बया त्याच्या उरावर बसून त्याला मारायची धमकी द्यायची... आता ठकाजी पार वंगाळ झालता.. त्याला नुसतेच भास व्हयाचं... हळूहळू त्याचं डोस्कं फार कामातनं ग्यालं.. अन् त्यो पण देवाघरी निघून गेला... त्या वक्ताला तिदं ती ठाकली अन् तिनं मोठ्यानं म्हणली तुझ्या सगळ्या वारसदारसानी म्या असच मारणार अन् परितेकाचा म्या घास घेणार... मंग त्या नंतर ठकाजी चे प्वारं म्यालं... वाड्याचा पडका भाग हाय का तिदून त्याला भूईवर आपटला तिनं... ठकाजी च्या कारभारनीला काय तो परकार समजला अन् तिने घाईनं सयाजी अन् त्याची बायको यमुना अन् तिच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्याच राती तिदून दूर धाडलंं...... नंतर ला ठकाजी च्या कारभारणीला बी तिनं मारलं... आता तिकड सयाजी ला मुलगा झाला... पण निर्मला ताईंनी म्हणजी ठकाजी च्या कारभारनीनं त्यासनी रक्षाकवच दिलतं... म्हणूनच ती बया त्याच्या पतूर पोहचली न्हायं... हळूहळू इद वाड्याच्या जवळपास प्रेतं गवसू लागली... जणू तिला जे हवे ते मागण्यासाठी तिनं हैदोस घातला व्हता.. मंग ऐका सकाळच्या वक्ताला एक सिध्द पुरुष आलतं... प्रभाकर गुरुजी व्हत त्याचं नाव... लय परसन्न चेहऱ्याचे व्हत ते... मंग त्यांनी तिदं मंतर करून तिला त्या लाल कपड्यानं डांबून ठूलं... जे कालच्या दिसाला तुम्ह्या काढलं... आता ती त्या प्वाराला स्वडायची न्हाय.... तुम्ही इद येऊन लय मोठी चूक केलीया...
तेवढ्यात गुरु आजीजवळ वि४तो... आजी प्रभाकर गुरुजी या क्षणी आम्हाला भेटू शकतील का? तुम्ही सांगू शकाल ते कुठे आहेत... या क्षणी आम्हाला त्यांची गरज आहे... आजी ने सांगितले की बाळा त्यै तर कवाच देवाघरी गेलेत.. पर त्यांचा आसरम (आश्रम) तिदच हाय. वर त्या सामनीच्या डोंगरावर... तिदं क्वाण हाय कि नाय ते माहिती नाय बाबा... काळजी घ्या रं प्वारांनो... येते म्या... आजी गेली त्या दिशेने सगळे बराच वेळ पाहत होते... आणि डोंगर चढायच्या वि४तच मंदिरातून आई काळूबाईला नमन करून बाहेर पडले...
परमीत रिमा देवाचे स्मरण करत जपमाळ करत असतात... ती बया आत यायला ओरडत असते... पण त्या दोघांच्या जपमाळेपुढे तिची शक्ती कमी पडते.. रिमा गणपती स्तोत्र आणि हनुमान चालीसा बोलत असते.. ते ही खड्या आवाजात...
|| श्री गणपती स्तोत्र |
== श्री गणपतिस्तोत्रम् ===== ।। श्री गणेशायनमः ।।।।नारद उवाच ।। ====प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।1।।
प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।। 2।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।। 3।।
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।। 4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दिकरं प्रभो।। 5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्।। 6।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्। संवत्सरेण सिध्दिं च लभते नात्र संशयः।। 7।।
अष्टभ्यो ब्राम्हाणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः।। 8।।
इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्।।
हनुमान चालीसा
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।। .............
आणि परमीत इक ओंकार नाम म्हणत असतो..
इक ओंकार सतनाम करता पुरखनिर्मोह निर्वैर
अकाल मूरतअजूनी सभमगुरु परसाद जप
आड़ सच जुगाड़ सच........
रितेश आणि रिटा आता खूपच चांगल्या अवस्थेत असतात... थोडा वेळ शांत राहून परमीत आणि रिमा त्या अवदसे कडे बघतात... ती दात ओठ खात असते... दोघांच्या मंत्र उच्चारणामुळे तिथे एक रक्षाकवच बनलेले असते.... तिला कुठूनतरी संकेत मिळतो आणि तत्काळ ती तिथून निघून जाते...
इकडे गुरु समर डोंगर चढू लागतात... त्यांच्या सोबत नयन आणि सारंग येतात.. कारण रिमा आणि परमीत ची जास्त गरज वाड्यावर असते... डोंगर चढण्यास दुपार होते... पण वर पोहचूनही पदरी निराशा येते... कारण आश्रम वगैरे असे काहीही त्यांच्या दिसण्यात येत नाही... आणि तिथे ती प्रकट होते... ते जळालेले भयानक रुप पाहून ४घे खूप घाबरतात... पूर्ण अंग खिळल्यासारखं होत... काही वेळाने खूप जोरात वारा घोंगावत येतो... ती अवदसा जोरात हसू लागते... हे चौघे तिच्या समोर फक्त उभे असतात.... त्यातले ३ जण देवाला मानत नसतात.. आणि गुरु ला अचानक ती सामोरी आल्याने काही सुचत नसत...
इकडे वाड्यावर खूप वेळ झाला हे कोणी आले नाही म्हणून सगळे चिंतेत असतात... रिमा परमीत ला तिकडे जाण्यासाठी सांगते.. आणि स्वतः होम मांडायची तयारी करते.... परमीत सोबत रुद्राक्ष अन् पांढऱ्या स्पटिकांची माळ घेतो... डोंगरा जवळ येताच वर धोका असल्याचे त्याच्या लक्षात येते.... तो आजीनी सांगितल्याप्रमाणे प्रभाकर गुरुजींच्या शोधात जातो... डोंगराच्या उजव्या दिशेने एक सत्पुरुष त्याला जप करत असलेले दिसतात... तसाच परमीत त्यांच्या जवळ येऊन नतमस्तक झाला... त्या सत्पुरुषाने आपले डोळे उघडून परमीत कडे पाहिले.... तो खूप कष्टात आहे हे त्यांनी त्याच्या कडे पाहून जाणले असावं... त्यांनी परमीत जवळ येऊन त्याला दोन्ही हाताने उचलून उभे केले... त्यांनी स्पर्श करताच परमीत ला खूपच शांत आणि सकारात्मक अशी जाणीव झाली.... त्याने त्यांच्यासोबत झालेल्या घटना क्रमाने त्या सत्पुरुषाला सांगितले... आणि आता त्याच्या मित्रांवर आलेले संकट दूर करण्याची विनंती केली... आणि तो जोरजोरात रडू लागला... ते महाराज म्हणजे साक्षात देवाने पाठवलेला दूत होता... त्यांच्या डोळ्यात एक चमक होती... चेहऱ्यावर तेज होते... एक वेगळीच प्रसन्नता त्यांच्या सान्निध्यात होती... त्यांनी परमीत ला सोबत चलण्यास सांगितले.... ते दोघेही डोंगरावर आले... जिथे हे ४घे त्या अवदसे सोबत लढत होते... महाराजांच्या आगमनाने तिला अस्वस्थ होऊ लागले... तिने समर आणि नयनला जखमी केले असते.. ती सारंग कडे जात असते तेव्हाच महाराज तिथे येतात... महाराज तिला बजावतात सोड या पोरांना यांनी काय बिघडवले तुझे... तुला ज्यांनी त्रास दिलाय ते कधीच विलीन झाले आहेत... तु का स्वतःला त्रास करून घेते आहेस.... तेव्हा ती म्हणाली यांच्या थोरल्या लोकास्नी माझ्या पोराचा जीव घेतला... त्यानं काय ईस्कटलं व्हत यांचे मी बी स्वडणार नाय कुणालाबी... अस म्हणून ती पुढे जाऊ लागली... तेव्हाच महाराजांनी तिला थांबवून तिच्या डोक्यावर हात ठेवला... ती किंचाळत होती..काही वेळातच तिची राख झाली...
इकडे वाड्यावर रक्षाकवच असल्याने सगळे सुरक्षीत असतात.. आणि रिटा रितेश दोघांच्याही जखमा आणि अशक्तपणा भरून निघतात... रिमा ला कळून चुकते की परमीत त्याच्या कामात यशस्वी झालाय... रिमा वाड्यातून बाहेर पडून बघते तर सगळीकडे उल्हासीत वातावरण असते... मळभ दूर झालेला असतो.।...
धन्यवाद
प्रिया
😘