Game of Love. - 4 books and stories free download online pdf in Marathi

गेम ऑफ लव - 4

गेम ऑफ लव
भाग चार


पूर्वार्ध....
राजवीर ने ....रश्मीला तिच्या लग्नातून तिला किडनॅप केले आहे.... तिला... जिथे आणलंय त्या एका जंगलातल्या फार्महाऊसमधून रश्मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते.... पण राज वीर समोर तिचा ..तो...प्रयत्न निष्फळ ठरतो...

तसेच एके दिवशी राज....बिजनेस निमित्ताने डीलिंग साठी बाहेर गेलेला असताना .....त्याचा मित्र रंजीत फार्महाउस वरती येतो ...व....रश्मीशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो ...

*****
आता पुढे.....

रंजीत तिला कानाखाली मारतो....
पण रश्मी तितक्याच आवेगाने त्याला ढकलून देत ..
.ती बेड वरून खाली उतरत दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न करते ...आणि रंजीत तितक्याच झटापटी ने ओढून....

तीला...बेडवर पाडून ..रंजित तिच्या ..जवळ... जात असताना रश्मि ... पटकन बेडच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरते ...

बेडरूमच्या बाहेर खालाजी....सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते... तिची अवस्था नेमकं काय आणि कसे करू... असा विचार करत असतानाच ... ती बाहेरून..बेडरूमचे दार ...वाजवत असते ....बोलत असते.... तिथून आत.. गडबडीने किचनमध्ये जाते... आणि राज ला फोन लावायचा प्रयत्न करत असते ...पण बाहेर पडणारा पाऊस आणि चमकणार्या वीजा... त्यामुळे फोन out of reach ....लागत असतो.... दोन-तीन वेळा फोन केला तरी ....फोन लागत नाही.... ती पळत पुन्हा बेडरुमच्या दरवाज्याजवळ येते... जोरात दरवाजा वाजवत असते.......सोड ...!
.तिला सोड !....खाला असे बाहेरून ओरडत असते.... त्या वेळी बाहेर पोर्चमध्ये राजच्या.... गाडीचा येण्यासाठी आवाज येतो ....
पुन्हा ती खाली पळत ये....ते मेन दारा जवळ जाताच... गाडी पार्क करत असणारा राज ला पाहुन...". राजबाबा... रश्मी को बचाओ .... रश्मी को बचाव ..
.रंजीत.... रंजीत .... असं अर्धवट सांगताना ...राजला समजतं.... राज...पळत....वरती ... पायऱ्या वरून ...बेडरुमच्या दरवाज्याजवळ जोरात पळत येतो..... आतून रश्मीच्या ओरडण्याचा आवाज येत असतो.... आणि रंजीत च्या हसण्याचा आवाजावरून... त्याचा संताप आणखीन वाढतो..... खालूनच रंजीत.... र श्मी बेबी को.... असे म्हणत खालाजी... ओरडत असते ....
राज जोरात दरवाजा धकलत असतो ....पण दरवाजा काही केल्या पटकन उघडत नाही....

आत मध्ये... रंजीत रश्मीला दरवाजाजवळच जाताच......ओढतो...व...जोरात धरून एका कोपऱ्यात रश्मीला दाबून धरतो....
राज दोन चार धक्के देता रूमचा दरवाजा उघडतो .... आणि समोर..बेडरूम मध्ये रंजीत.... एका कोपऱ्यात रश्मीला दाबून धरलेला पाहतो..... रश्मी चे पकडले हात.... त्यामुळे ती....घाबरलेली असते ....तिला अशा अवस्थेत पाहून राजची चांगली सटकते .....व मागूनच रंजीत च्या कॉलरला पकडत रंजीत ..!. रंजीत...!.. असे... ओरडतच त्याला जोरात मागे ओढून सरळ दोन तोंडावर फाईट मारतो....

त्या अचानक हल्ल्यामुळे रंजीत थोडासा रश्मी पासून लांब होतो...मगाशी रंजीत ने रश्मीला कानाखाली मारल्यामुळे... तिच्या ओठातून रक्त येत असतं.... राज वीर... पळतच तिच्या जवळ जातो ...आणि तिची साडी ठीक करू लागतो ...

पुन्हा तितक्याच तावातावाने राजवीर ....रंजीत ला लाथ घालत असतो.... पुन्हा आणखीन त्याच्यावरती त्याला कॉलर ला पकडून उठवतच तोंडावर मारता.... रंजीत तो..वार... हाताने अडवून
"इस दो कौडी के लडकी के लिये अपने दोस्त को...भूल... गया।"

असं रंजीत म्हणता... रणजीत चा हात मागे... पकडून राज हाता मधल्या हाडावरती हाड तूटेपर्यंत वार करतो...." हाच हात... रश्मी वर उठला होता .!".. असं रागा रागाने त्याच्याकडे बघत म्हणत असतो....

रंजित ला....राज... पुन्हा एकदा हाताने तोंडावर मारून खाली पाडून ...पुन्हा लाथा मारायला लागतो.... पोटात एक चांगलीच लाथ.. घालतं... त्याला कॉलर पकडत तो तसाच फरपटत बेडरूमच्या बाहेर आणतो... तेवढ्यात राजवीर चे सहकारी वर आलेले असतात ....ते रंजीत ला मारण्यासाठी पुढे येत असतानाच.... राज त्यांना हातानेच इशारा करून ...मी पाहून घेतो ...असं डोळ्याने खुणावतो.... त्याच्या डोळ्यातला राग आणि संताप बघून ते सहकारी सुद्धा मागे सरकतात... रंजीत च्या दोन्ही कॉलर पकडून त्याला सरळ उभा करून ."..ती जान आहे माझी....!"...मी..लग्न...करणार...आहे..तिच्याशी.!
...ती..बायको..आहे...माझी...!
समजलं तुला...! तिच्याशी असं वागायची... हिम्मत कशी झाली....!
" ठीक नाही केलं.स.!"..
" तू ठीक नाही केलं.स..!".
असे..ओरडत....तावातावाने....
राज कोणत्याही गोष्टीचा विचार न करता रंजीत ला बेदम मारत असतो ....
त्याच्या नाका तोंडातून रक्त यायला लागलेला असते... त्याला तशाच.... अवस्थेत उठवून .. स्वतःचा चेहरा त्याच्या जवळ नेत ...
" उसकी.... तरफ उठने वाली... हर एक नजर .....हर एक हात.... हर एक इन्सान.... बर्दास्त नही है मुझे....!" अस.... बोटाने त्याला वॉर्न करत असतानाच.... धमकी देऊन दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या मागच्या साईडला कमरेला...असलेली गन... बाहेर काढून त्याच्या छातीत दोन तीन गोळ्या झाडतो ....आणि लाथ मारतच....
"गाढून टाका या जंगलात ...या जनावराला !" असं सहकाऱ्यांना सांगताना
" रात्री कुत्र्याला सुद्धा वास नाही लागला पाहिजे... त्याचा ...!"

"साला...मेला... दोन...तीन....गोळ्यातच ...!.".

"नाहीतर चांगला तडपवणार... होतो..!"

त्याचे सहकारी सुद्धा त्याच्या हुकुमाचे ताबेदार असल्यामुळे.... त्याला खेचतच बाहेर घेऊन जातात ...

.राज हे सगळं झाल्यानंतर तिथेच खाली असणाऱ्या बेसिन ला ....स्वतःचे हात धुतो... आणि चेहऱ्यावर पाणी मारून.... तेथील नॅपकिन ला पुसत असताना .....खालाजी.... जवळ येऊन....." जावो बेटा रश्मीको...संभाल लेना!". असं म्हणता...पुन्हा वरती रश्मीच्या रूम मध्ये जातो...

रश्मी अजूनही त्याच कोपऱ्यात खाली बसलेले असते ....तिच्या अंगात अजूनही थरथर...असते ...हात पाय लटपटत असतात.... डोळ्यात एक वेगळीच भीती असते ...राजवीर तिच्या जवळ बसत ....तिला स्वतःच्या जवळ घेतो...." रश्मी घाबरू नकोस "

"मी आलोय ना..!"

"मी आलोय ना...!"
असे तिला समजावण्याचा प्रयत्न करता.... तिला कशाचेच भान नसते....तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं.... तिची अवस्था पाहून...त्याला.... आणखीनच रंजीत चा राग येऊ लागतो....

तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला... धीर देतच उठून तिला बेड वर बसवण्यासाठी नेत असताना.... रश्मी भानावर येते.... आणि पटकन राजला ....जोरात ढकलून देते...
"तुझ्यामुळे ..झाले ...हे सगळं...!"
"तुझ्यामुळे ....!:
"तू... तू... जबाबदार आहेस ...!."
तिने दिलेल्या धक्क्याला सावरत ....राजवीर स्वतःची मूठ ... समोरच्या भिंतीवर जोराचा आपटतो ....

आणि पुन्हा तिला सावरण्यासाठी तिच्याजवळ जात असताना

...... ती स्वतःला रंजीत चा जिथे ...जिथे स्पर्श केला आहे...
त्या हातावर... चेहऱ्यावर... हाताने पुसत असते...

राजवीर ला तिची ..अवस्था....बघवत नसते.... राज... तिला जवळ जाऊन मिठीत घेतो .....तिच्यावर अतिप्रसंग होता... होता... वाचला.... होता... मी जर वेळेत आलो नसतो.... तर ....या विचाराने ....त्याच्या डोळ्यात दोन क्षण आणखीन भीती ....आणि राग येऊ लागतो.... आणि त्यात.. तिची अशी हालत बघून पुन्हा .... त्याच्या डोळ्यात पाणी जमा... झालेल....असतं ....

रश्मी पुन्हा भानावर येताच... त्याला लांब ढकलून देते .

...तिला सारखा सारखा रणजीत ....चा... किळसवाणा..स्पर्श.. स्वतःच्या चेहऱ्यावर ...हातांवर ....फिरलेला... तिला ...आठवत असतो....
ती तशाच अवस्थेत ....आत बाथरूम मध्ये जाते... व शाॅवर... ऑन ...करून पाण्याखाली ....पुन्हा जिथे जिथे ... रंजित चा घाणेरडा स्पर्श झाला त्या हाताला.... त्या चेहऱ्याला.... पाण्याखाली हाताने...रागा..रागाने.... स्वच्छ करायचा प्रयत्न करत असते.... ती आत...गेली तरी.... तिने बाथरूमचा दरवाजा बंद केलेला नसतो.... पण ... बाथरूम मधून येणारा पाण्याचा आवाजामुळे राजवीर च्या मनात मात्र वेगळेच विचार येतात... तो तसाच बाथरूम मध्ये जाता .....
ती साडी वरच ... शॉवर चे.. पाणी घेत असते..... हे सगळं करत .... तिला असे .. पाहून राज. पाहतो की .....तिची साडी ...तिचे केस.... चिंब भिजलेले असतात. .. तिला कशाचंही भान नसतं ....तिला असं बेभान पाहून ...राज.... प्रचंड घाबरतो..... राज.... तिथे...जाऊन शॉवर बंद करतो.... व तिला बाहेर आणताना .....ती जोरात ओरडते....
"तु बाहेर जा....!"
"जा... बाहेर ...!"
तिच्या त्या ओरडण्यात... प्रचंड राग असतो... संताप असतो ....दुःख असत....

पण तो... आता... तिला काहीच न म्हणता ....तसाच तिने सांगितल्याप्रमाणे बेडरूमच्या बाहेर खाली जातो..... तिची अवस्था काहीच समजून घेण्यासारखी नसते....

पटकन... खाला ला तिला सावरण्यासाठी वरती पाठवतो.... खाला वरती येऊन ....तिला टॉवेल वगैरे देऊन कपाटातील गाऊन देत ....तिथे कपडे बदलायला तिला मदत करते..... ती त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडत असते.....

खाला तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते....
.... तिच्या पाठीवर हात फिरवत तिला ....आधार देण्याचा प्रयत्न करत असते ...."रश्मी बेटा ..!"
"मत रोना ...बेटी मत रोना "
"अल्लाह पे भरोसा रख .. बच्चा..!"
". सब अच्छा हो जायेगा.....!"

राजवीर...खाली हॉलमध्ये सोफ्यावर बसून ...स्वतःच्या केसांवरून हात फिरवत.... झालेल्या घटनांचा विचार करताना.... स्वतःचाच संताप येतो..... व स्वतःच्या हाताची मुठ समोरच्या टेबलवर पुन्हा एकदा ...रागाने मारत...... इतका मूर्ख कसा आहे मी.....!
" तिला एकटीला सोडून मी गेलो कसा ??"या विचाराने त्याचा संताप .. होतो...
..ऍटलिस्ट बॉडीगार्ड मी ठेवून जायला पाहिजे होतं.... असा विचार करतच ....त्याला स्वतःची चूक आठवत .... स्वतःवर आणखीन जास्त राग येतो.... या संतापामुळे रागामुळे त्याचा श्वास जोरात चालत असतो..... पुन्हा ...सर्व विचार करत....स्वतः..भोवती.. घडत घडलेल्या सर्व घटनांना मी जबाबदार आहे ...असा ..पुन्हा..विचार करू लागतो....

वरती खाला.... तिला समजावत असते.... रश्मी थोडीशी शांत झाल्यानंतर.....आता त्या.. स्वतःची शपथ देत ...."बेटा तुझे मेरी कसम "
"थोडासा तो खा लेना !"असं म्हणून तिला आणखीन खाण्यासाठी.... काहीतरी घेऊन येण्यासाठी... खाली किचनमध्ये येताच....
राज वीर...तिला एकटे सोडायचे नाही ....म्हणून गडबडीने तिच्या रूम मध्ये जातो ....
व ... राज तिच्या जवळ न जाता समोर असलेल्या खुर्चीवर जाऊन बसतो...

राजवीर ला आता... तिचे डोळे पूर्णपणे निस्तेज वाटत असतात... चेहरा सूकलेला असतो ....तो तिला जवळ घेण्याच्या हेतूने.... आधार देण्याच्या हेतूने..... जवळ जात असतानाच..... रश्मी तितक्याच जोरात
" हात लावू नकोस !"

.... " मला हात लावू नको....!"
त्यावेळी तिचे डोळे पाण्याने डबडबले असतात.... तो स्वतःचे हात मागे घेत...
.. ओके.. ओके.... Relax...Don't worry....!असे म्हणत
मागे सरकू लागतो ....आणि पुन्हा खुर्चीत बसतो..... ती त्याच्याकडे बोट दाखवतच..... "कशाला ...ही नाटक करतो....स....!"

तिच्या या बोलण्यावर... राजवीर.... निशब्द पणे हातानेच... नाही... नाही....म्हणत मानेनेच नाही नाही... असं करत स्वतःची मुठा आवळत डोळे बंद करून .... स्वतः राग...व्यक्त करतो... आणि

पुन्हा तितक्याच ...तिला घट्ट मिठी मारत
.". मी प्रेम करतो ...तुझ्यावर .!"... तिच्याकडे बोट दाखवतच..

.." तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ना त्या... नालायक रंजीतने ... मारून टाकले मी त्याला...

मारून टाकले.... तुझ्यासाठी....!"
" तुझ्यासाठी काय पण करू शकतो....मी...! "
"तू वाईट वाटून घेऊ नकोस....!"
तू श्वास .. आहेस माझा....!
"माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!".

हे सगळे इतके पोट....तिडकीने आणि काळजीने म्हणत असतो...पण....
ती त्याचा हात झिकारतच....

"पण मी नाही.... तुझ्यावर प्रेम करत...!"
नाही....!
"नाही करत मी प्रेम...? तुझ्यावर.....!"

बाहेर जोरात पाऊस पडत असतो... विजा चमकत असतात.... आधीच फार्म हाऊस जंगलात असल्यामुळे .. ... बाहेर वारे... वादळ... जोरात सुटलेला असते.... खिडक्या बंद असल्या तरी त्या आवाजातली भयानकता त्या रूममध्ये जाणवत असते....

ती... त्याच्यापासून दूर जात बेडवर जाऊन बसते .....आणि तो समोर खुर्चीवर..शांत.. बसतो....

तेवढ्यात खाला.... तिच्यासाठी खाण्यासाठी जेवण घेऊन येते.... आणि सोबत दूध ... घेऊन येत असते....

रश्मीचा अंगात अजिबात त्राण नसतो ..तिला खूप अशक्तपणा जाणवत असतो ....पण तिला..इथे.... थांबायचं नसल्यामुळे ती जेवणाला नकार देते.. ..राज...तिला खा म्हणून मागे लागत असतो... "थोडं खाऊन घे!" असं सांगताना... ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते..

खाला....राजवीर ला डोळ्यांनीच राजबाबू तुम्ही खाली जा... असं सांगून.... ती स्वतः रश्मीला जेवण भरवायला सुरू करते.... आणि तिला पुन्हा एकदा स्वतःची शपथ घालून..." मेरी कसम है ...तुझे बेटा थोडासा खाले..".. असं म्हणून थोडासा तरी खायला लावते..

थोड्यावेळाने... खाली... राज जरी जेवण करत असला तरी आज जेवणात त्याचे... अजिबात लक्ष नसतं...
घडलेल्या प्रकारामुळे ....तो प्रचंड टेन्शन मधे असतो.... तरी खाला... त्याला आग्रहाने जेवण करायला भाग पाडतात.....

पुन्हा स्वतःचे कपडे चेंज करून ....राज जेव्हा रूम मध्ये येतो तेव्हा रश्मी अंगावर घेऊन झोपलेली त्याला दिसते.. पण झोपलेली नसते.... तिला थंडी वाजत असते ....तिचे दात वाजत असतात..... तिच्या जवळ जाऊन तिला डोक्याला हात लावून पाहतो तर.... तिला ताप.... आलेला असतो.... आणि तापाचा ग्लानीतच.... ती बडबडत असते... तिला अशी बडबड... पाहून राज दुसऱ्या रूम मधून ...पटकन इंजेक्शन घेऊन येतो .... इंजेक्शन तयार करून...
तिच्या हाताला इंजेक्शन देत असताना.... ब्लॅंकेट काढता.... ती पटकन जागे होते.... ती त्याच्याकडे घाबरूनच बघत .
".काय आहे ....!
कसले इंजेक्शन देतो.. मला ...!"अशी थरथरतच.. बोलू लागते....
ती.... घाबरलेलं पाहून... राज तिला शांत व्हायला सांगत असतो ...तिच्या डोळ्यात बघूनच ...."घाबरू नकोस तुझी तब्येत ठीक नाहीये ..!"

"मी.....कुठलेही.... ड्रग्ज देत नाही....!"

असं सांगत असतानाही..... तिचा त्याच्यावर विश्वास नसतो व ती इंजेक्शन घ्यायला नकार देता... राज तिच्यावर थोडीशी जबरदस्ती करतच.... तिला ते इंजेक्शन देतोच ....

*********************
आता इथून पुढील कथा पुढील भागात....

पुढील कथेसाठी मला फॉलो करत राहा...
नुसते फॉलो करू नका तर समीक्षाही लिहा....!

आणि कथा कशी वाटत आहे हे मला जरूर सांगा...!

क्रमशः....

@स्वाती पवार (अभिप्राय)


इतर रसदार पर्याय