Game of Love. - 3 books and stories free download online pdf in Marathi

गेम ऑफ लव - 3

गेम ऑफ लव.
भाग 3


राजवीर खाली जाताच रश्मी हताशपणे ...त्या तिथेच बसून राहते ...आणि रूम मध्ये नजर फिरवताच तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागते ...का...? का...? असे प्रश्न स्वतःला विचारत राहते आणि पुन्हा डोळ्यातील अश्रू पुसून ..

काहीतरी . विचार करतच... आंघोळीसाठी जाते... स्वतःचे थोडं आवरून ....कपाटातील एक साडी घालून... तयार होत...ती आता ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला पाहू लागते ....डोळे रडल्या मुळे सुजून लाल झालेले असतात ...कालपासून काहीच न खाल्ल्यामुळे तिच्या चेहऱ्याची रया गेलेली असते .

.".पण आता नाही ..!"..असं म्हणत ती पुन्हा स्वतःच्या डोळ्यात काजळ घालून.... तिथे असलेला परफ्युम लावत असताना....
बेडरूमचा दरवाजा चा आवाज होतो... ब्रेकफास्ट घेऊन राज आलेला असतो ...ती आरशासमोर बसलेली त्याच्या येण्याने पटकन उठून त्याच्याकडे पाहू लागते....

तिने आज पिवळ्या कलरची साडी नेसलेली असते ...आधीच हळदीचे तिचे पिवळे अंग..... तिचा चुडा ...कपाळावरील छोटीशी टिकली.... खोल गहिरे डोळ्यात आत्ताच घातलेले काजळ.... असं तिला पाहून... राज पूर्णपणे तिच्या सौंदर्यात हरवून गेलेला असतो ...त्याची अशी अधीर प्रेमळ नजर पाहतच ती लाजेने नजर झुकवते... व वळून आरशात पाहू लागते... राजवीर तिला अलगदच हाताने स्वतः कडे वळवतो.... त्याच्याकडे पाहताच.... तिचे काजळ लावलेले डोळे पाहून....


"यु कातिलाना नजर से देखा ना करो
पहले ही होश खो बैठे हैं
अब हमारे मरने का इंतजार ना करो।"


आता ती स्वतःहून त्याची नजर चोरत ....

".काय आहे ब्रेकफास्ट?" असं विचारते
राजला तिच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटते...पण तसे तिला न दाखवता...
." इडली आहेत आवडते ना तुला !" असं म्हणून टेबलवरील ब्रेकफास्ट तिला उघडून दाखवतो..
. आणलेली कॉफी हॉट मग मधून कपमध्ये ओततं तिला serveकरत असतो ..ती काहीच खात नाही हे पाहून...
पुन्हा त्यातील इडली चटणी तिच्या सोबत खाताना ....
"बघ काहीच मिक्स केलं नाही !"असं म्हणत कॉफी पिऊ लागतो ...
.आता तिच्या मनाची थोडी खात्री होते ... व ती ब्रेकफास्ट करायला सुरु करते ...
राजवीर खुशीने तिच्याकडे पाहून ....
"देर आये पर दुरुस्त आये "
"खा काहीतरी... काल पासुन उपाशी आहेस..!".
ती काहीच बोलत नाही ...पण तिची नजर मात्र फार काही बोलत असते... त्या विचारातच.... तिच्या ओठांना थोडा इडलीचा तुकडा लागतो.... राजवीर तिच्या ओठांजवळ हात घेऊन जात असताना ...ती बसल्या जागीच मागे झुकते ...राज हलके तिच्या ओठांना स्वतःच्या बोटांनी साफ करत ...एक आश्वासक नजरेने स्माईल देतो...
ती सुद्धा उगाच त्याच्या स्माईलला ..प्रत्युत्तर करत हलकेच हसते...
ती आता अगदी शांतपणे ब्रेकफास्ट करत असते ...ब्रेकफास्ट झाल्या नंतर ....राजवीर काचेच्या मग मधील पाणी तिला ग्लासमध्ये ओतून बाकीचे टेबल वरील आवरत असतो ...ती आता राजवीर कडे पाहत असते ....राजवीर टेबलावर आवरण्यात बिझी असतो... तो पाठमोरा उभा आहे ...असं लक्षात येताच... रश्मी तितक्याच तत्परतेने त्याच्या मागे येऊन तो पाण्याचा ग्लास जार(jaar) त्याच्या डोक्यात घालण्याच्या इराद्याने जोरात ... डोक्यात घालायचा प्रयत्न करते.... राजवीर ला ड्रेसिंग टेबल वरील आरशात तिची हालचाल दिसते....तर जोरात तो जार त्याच्या डोक्यात घालत असताना ..तो तत्परतेने..तो..वार....हातानेच वाचवतो या झटापटीत त्याच्या कानाच्या बाजूला लागतं आणि तो काचेचा जार फुटून राजच्या हाताला लागतो ...त्यातील पाणी सगळे त्याच्या डोक्यावर पडलेली असते....तिच्या अशा अनपेक्षित वागण्यामुळे तो गोंधळतो.... हे सगळं पाहताना... ती झटकन बेडरूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना ....तो...तिला पकडतो.... ती त्याला ढकलून देत.... बाहेर पळायचा प्रयत्न करताना.... राज भिंतीवर आदळतो ....ती पटापट पायर्‍या उतरून फार्महाउस च्या हॉलमध्ये येते....राजवीर स्वतःचे डोकं तिथे धरून बसतो.... डोक्यात कळ आलेली असते... त्याच्या हाताला काच लागल्यामुळे हातातून रक्त येत असत....पण...तोही तितकाच गडबडीने खाली हॉल कडे जाऊ लागतो.... मेन डोअर मधून ती कधीच बाहेर पडलेली असते.... राजवीर तितक्याच आवेगाने तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो.... ते फार्महाउस पूर्णपणे एका जंगलात असते ...रस्ता दिसेल तिकडे ती पळत असते ....आणि राजवीर स्वतःला सावरत बेभानपणे तिच्या मागे पळत असतो... तिच्या अशा वागण्याने आणि त्याला लागल्यामुळे...
. त्याचं डोकं थोडसं सटकलेलं असतं ....ती गेली त्या दिशेने तो पळायचा प्रयत्न करतो ..ती पुढे ...तो मागे ...ती पुढे.. तो मागे....
ती मागे वळून बघत बघत पुढे पळत असते....ती ही जीव तोडून पळत असते..... राजवीर पण तितक्याच जोरात पळत जाऊन शेवटी तिला जोरात हिसका देऊन स्वतःजवळ ओढतो....व..घट्ट पकडतो...
तो चिडलेला असतो त्याच्या डोळ्यात प्रचंड राग असतो... ती तरीही त्याच्या हाताला हिसका देण्याचा प्रयत्न करत असते ....

तितक्यात अशा अवस्थेत तिला उचलून घेत फार्म हाऊस च्या दिशेने घेऊन येतो तिला धाप लागल्यामुळे.... पळाल्यामुळे खूप घाम आलेला असतो.... तिचा..श्वास जोरात सुरू असतो...."सोड मला...!".
"सोड मला ....."
"जाऊदे..."
"मला ...सोड.."
सोड मला ....असे ओरडत असते ...पण तो आवाज कोणाला ऐकू जात नाही ...कारण त्या जंगलात कोणीही नसत....ती सुटण्याचा खूप प्रयत्न करत असताना ...तिला बेडरूम मध्ये घेऊन येत बेड वरती पाडता
.... ती पळण्याचा पुन्हा प्रयत्न करताना ...
"सोड मला .."
."सोड मला ..".राजवीर."..अशी पुन्हा ओरडू लागते...

आता राजवीर स्वतःची -मुठा आवळतच तिच्या तोंडातून निघणारा आवाज बंद करण्यासाठी....
रागाच्या भरात काय करतो याचं त्याला भान नसतं.... तिच्या ओठांच्या जवळ जात....तिचा... आवाज स्वतःच्या ओठाने बंद करतो ...आणि तितक्याच वेगाने किस करत असतो.... त्याच्या अशा वागण्याने....ती दचकते ....तिला हे सगळे अगदी अनपेक्षित असत.... राजवीर असं काय करेल ..अस तिला वाटलेलं नसतं...तिचा श्वास कोंडत असतो ...तिला लागलेली धाप लक्षात घेऊन ....तो पुन्हा थोडासा लांब होत...

आणखीन काही करायचा प्रयत्न करशील तर... मी फक्त ओठांवर थांबणार नाही....Hope you understand what I mean...!

त्याच्या वागण्यावर ती चिडलेली असते...
त्याचा असा अवतार बघून ...ती प्रचंड घाबरलेली असते.... त्याचा हात तर चांगलाच रक्ताळलेला असतो... कानातून पण हलकेच रक्त यायला लागतं...
स्वतःच्या हाता कडे बघत रक्त पुसतच ....
"तुला काय वाटलं ...तु अशी साडी नेसून तयार झालीत..... का तयार झाली ...!
कळाले नाही मला...!


"यू हुस्न के जाल में युही फस गये थे हम।
बस ..अब ...होश में आये हैं...।

खुदको तबाह करने की कोशिश ना कर...
जान की बाज़ी लगा कर..
जान की ...हिफाज़त करेंगे हम।"


तिच्या जवळून उठूनच फर्स्ट एड बॉक्स कपाटातून बाहेर काढून स्वतःचे जखम पुसत असतो ..काना जवळील जखम ..क्लिन करत असताना....रश्मी खाली उतरायचा प्रयत्न करताना....
... ती..मगाशी... तशीच बाहेर गेल्यामुळे तिच्या तळपायला लागलेलं असतं... तिच्या जवळ बेडवर बसून ...तो तिच्या पायाला हात लावतो ...ती पाय मागे घेते ....तो तितक्याच अलगद ....तिच्या पायाला पकडून काळजीपूर्वक ...तिचे पाय स्वच्छ करू लागतो... आणि मलम लावतो...
व मागच्या साईटला जाऊन ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये

असलेले पैंजण काढून तिच्या पायात घालू लागता... ती पुन्हा पाय मागे घेते... तिच्याकडे पाहतच..
" फक्त याची कमतरता आहे...!"
"आता छान दिसतेस.!"..असं सांगतो...

पुन्हा तिच्या जवळ तसाच बराच वेळ बसून राहतो... पण

तेवढ्यात त्याला एक फोन येतो....
फोन वरती.."हा ठीक आहे!" असं म्हणत... तिच्या रूम मधून बाहेर पडताना..
" काळजी घे आणि तितक्यात तिच्या ओठांवर हात फिरवत असताना पुन्हा नाही ना असा प्रयत्न करणार ...
बरोबर ना !अशी...प्रेमळ..धमकी...!
त्याच्या नजरेत बरेच भाव असतात ..
त्याला काय म्हणायचे ते ती बरोबर ओळखते
तो रूमच्या बाहेर जाताना पुन्हा मागे वळून.... हसूनच


"आज प्यार के इबादत ने....
फिर तुम्हे छूने... को मजबूर कर दिया....।"


रूमच्या बाहेर येताच बाहेरून कडी लावून दुसऱ्या बेडरुममध्ये येत ....तिथे असलेल्या पेन किलर खाताना पुन्हा एकदा तो फोन लावतो ..." हा मी पोहोचतोय तू ये !"असं एका सहकार्‍याला फोन करून....सांगतो...
व स्वतःचे आवरून एका अर्जंट डिल साठी ...बाहेर पडतो बराच वेळ झाला तरी राजवीर मीटिंग मधून येत नाही....
रश्मि पुन्हा एकदा आणखीनच हाता श ...होते... आपला बाहेर पडण्याचा प्रयत्न फसला ....आपली सुटका कधी होणार नाही का ??या विचाराने तिला रडायला येत असतं...

आता संध्याकाळ झालेली असते... दुपारी... खाला...(घरकामवाली मावशी...) तिला जेवण घेऊन आलेली असते पण तिने काहीच खाल्लेले नसतं ....

खाली फार्म हाऊसच्या हॉलमध्ये राजवीर ला भेटायला त्याचा एक मित्र रणजित येतो....
खालाजी... त्याला हॉलमध्येच बसायला सांगतात ....त्याला पाणी देऊन .."..राजवीर ला यायला वेळ होणार आहे..!".. असं सांगता.... रणजीत हा राजवीर चा जुना मित्र आहे.... त्यामुळे खाला... त्याला ओळखत असते....
तो...कायम फार्म हाऊस वरती राजवीर शी बिजनेस डील करायला येत असतो....

बराच वेळ रंजित राजवीर ची वाट पाहत असतो...

थोड्यावेळातच.... खाला.... रश्मी साठी वरती काहीतरी खायला घेऊन जाताना ...रणजीत त्यांना पाहतो ...
.रश्मी मोठ्याने ओरडतच ...
"नको आहे मला जेवण ....!"...आणि पाण्याचा ग्लास पाडलेला... खाली आवाज येतो...
तरी खाला तिथेच ...ते ताट....ठेवून किचन मध्ये ...येतात....

रंजीत ला ....
राजच्या ...फार्महाऊसमध्ये ....एका मुलीचा आवाज ऐकून थोडं आश्चर्य वाटतं.... बाहेर पावसाचा वातावरण सुरू झालेला असतं ....त्यामुळे बाहेर वाळणारे....कपडे काढण्यासाठी खाला बाहेर जाता ना पाहून ....

रंजीत हळूच वरती जाऊन रश्मीच्या बेडरुमच्या दरवाजाची कडी उघडून ....आत जात असताना .....रश्मी ला वाटते राज आला असेल ....म्हणून ती पुन्हा डोळे पुसत बेडवर बसलेली असते ...
रंजीत... बेडरूम मध्ये येतो ...रश्मी त्याला पाहून ....आश्चर्याने "तू कोण !"
रंजीत तिच्याजवळ जाऊन तिला वेगळ्याच नजरेने पाहत....

"हूस्न ये मलिका...! ये सवाल तो हमे करना चाहिये ।"

त्याची नियत चांगली नाही ...हे तिला ओळखायला वेळ लागत नाही....
तिचा गव्हाळ रंग ...हरणी सारखे डोळे... तिने घातलेला पिवळ्या... साडीत ....तिचे दिसणारे गोरे पाय व..पैंजन.......आणि कमनीय बांधा ....त्याला....क्षणात तिच्याकडे आकर्षित करतो..... तिच्याजवळ जातच...
" मी रणजीत !"असं जड आवाजात सांगताना....
"मी राजवीरचा मित्र...!"
तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं.... तिला असं रूम मध्ये पाहून

"अच्छा म्हणजे मागील दोन दिवस म्हणूनच राज वीर ला वेळ नव्हता ..माझ्यासाठी....!"

आता तो तिला फारच वेगळ्या ....किळसवाणी नजरेने पाहत असतो.... रश्मी मागे मागे सरकत जाते ....
तो तसाच पुढे पुढे सरकत....

" जे राज साठी तेच माझ्यासाठी सुद्धा!" असं
म्हणतानाच ...रश्मी च्या काळजाचा ठोका चुकतो .....आज.... पहिल्यांदा खूप दिवसातून....ती... इतकी घाबरले असते ...
तरी त्याला सगळा जीव एकवटून....
"राज कुठे आहे ...?"असं विचारता...

राज..अरे..वा! असे म्हणून...
तो हसायला लागतो ...."मी आहे ना राज कशाला पाहिजे ....!"
तिचे हात पाय थरथरायला लागलेले असतात.... राज... राज.... राजविर ...ती....म्हणून ओरडत असते ....तिचा आवाज ऐकून खाली ...

खाला पळतच बेडरुमच्या दरवाज्याजवळ येऊन "रणजीत दार उघड.... असं म्हणत उघडण्यासाठी विनवणी... करत असता.... रणजीत ....दार उघडत नाही ....खाला... जोरात बाहेरून ओरडत असते "राजबाबू येईल ..."
."रंजीत बाहेर ये!"
मुळात रंजीत असं काही करेल याची तिला अजिबात कल्पना नसते...
बेडरूम च्या आत मध्ये रंजीत पुन्हा एकदा रश्मी ला पाहून हसायला लागतो ...."मी आहे ना ...!"
"राज कशाला पाहिजे.!"
.. रणजीत तिच्या जवळ येताच ती रंजीत च्या... जोरात कानाखाली मारते...
तो तितकाच निश्चल..." चलो इसी बहाने छू.. तो .लिया...हमे...!
तिच्या हाताला पकडणार ...
तेच ती खिडकी उघडून....
पुन्हा राज.... राजवीर...
वाचव...मला...

. "तुला माहित नाही तू काय करतोयस राजवीर मारून टाकेल... तुला....!" असं म्हटलं... तरी ...त्याला काहीच फरक पडत नाही....
ती.. पुन्हा ओरडत असते....
तिला बेड वरती पाडतच....
नको ....नको.... म्हणत असताना..
तो तिला कानाखाली मारतो....
तितक्याच आवेगाने त्याला ढकलून देत ..
.ती बेड वरून खाली उतरत दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न करते ...आणि रंजीत तितक्याच झटापटी ने ओढून.... तिला बेड वरती पाडतो....

#######################
@लेखिकेच्या परवानगीशिवाय लेखन कुठेही वापरू नये अन्यथा कारवाई केली जाईल लेखकाचे सर्व हक्क सुरक्षित

आता इथून पुढील कथा पुढील भागात.....

राजवीर नक्की वाचवेल का... रश्मीला.... रंजीत च्या तावडीतून...
का त्याचा हा प्लॅन असेल नेमकं काय????
काय वाटते..तुम्हाला...🙂

राजवीर कोण??? रश्मी राजवीर ला ओळखते?? कधीपासून .??
हे सर्व जाणून घेण्यासाठी...

पुढील कथेसाठी मला फॉलो करत राहा नुसते फॉलो करू नका तर समीक्षाही लिहा....
क्रमशः....


@स्वाती पवार (अभिप्राय)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED