जानू - 10 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जानू - 10


अभय ची अवस्था पाहून आकाश ला खूप वाईट वाटत..तो त्याला समजावतो की आपण जानू ला शोधू..मी तुला मदत करेन. अभय थोडा शांत होतो ..परत दोघे घरी जातात.. अभय आता पहिल्यासारखा राहत नसतो ..खूप शांत आणि उदास होऊन गेलेला असतो ..एक दिवस तो आणि मिहिर कट्ट्यावर बसले असतात..की अभय ला आठवते की मिहिर आणि जानू चे बाबा आधीच एकमेकांस ओळखत होते ..त्यामुळे मिहिर च्या बाबा न कडे जानू च्या बाबांचा नंबर असेल..तो खूप खुश होतो..अभय चा असा एकदम बदललेला चेहरा पाहून मिहिर ही खुश होतो ..तो अभय ला विचारतो काय झालं ?

अभय : मिहिर माझं एक काम करशील ?

मिहिर : हो ,दादा सांग ना .

अभय: तुझ्या पापांच्या मोबाईल मधून प्रधान काकांचा नंबर घेऊन येशील?

मिहिर: तरीच म्हटलं दादा लगेच खुश कसा झाला?

अभय: मिहू,आणशील ना नंबर?

मिहिर: हो आणेन पणं ?

अभय: पणं काय आता ?

मिहिर: मला चॉकलेट देयला पाहिजे .

अभय: हो रे बाबा देतो चॉकलेट ..पणं नंबर तेवढा घेऊन ये ..पणं तुझ्या पाप्पा ना सांगू नकोस .

मिहिर घरी जातो ..आणि पप्पा ना मला game खेळायचा आहे मोबाईल द्या म्हणतो ..बऱ्याच वेळाने त्याला मोबाईल मिळतो व तो पळत जाऊन प्रधान काकांचा नंबर वहीत लिहून घेतो ..आणि लगेच मोबाईल पप्पा ना नेऊन देतो .

दुसऱ्या दिवशी मिहिर अभय ला प्रधान काकांचा नंबर देतो .अभय खूप खुश होतो..आणि मिहिर ला चॉकलेट घेण्यासाठी पैसे देतो .. व आकाश कडे जातो .

आकाश : काय साहेब आज चेहऱ्यावर नाराजी नाही ..खुश दिसताय ?

अभय लाजतो ..

अभय: तुझं आपल काही तरच ..आक्षा.

आकाश : अरे सांग ना काय झालं ?

अभय:जानू चा नंबर मिळाला आहे..

आकाश : जानू कडे मोबाईल आहे ?

अभय: अरे तिच्या बाबांचा नंबर रे.

आकाश : अरे वा ..छान प्रगती आहे साहेबाची.

अभय: गप रे किती चिडवत आहेस आता.

आकाश : बर..काय करायचं सांग ?

अभय: तू माझ्या घरी चल ..मी माझ्या बाबांच्या मोबाईल वरून फोन करतो ..तू फक्त लक्ष ठेव.

आकाश : म्हणजे मी चौकीदार होय तुझा ?

अभय: काय लेका ? मित्र आहेस म्हणून मदत मागितली तर ..

आकाश: अरे चेष्टा केली तुझी ..चल जावू

अभय आणि आकाश दोघे अभय च घर गाठतात .. व अभय बाबांचा मोबाईल घेतो .. व दोघे कट्ट्यावर जातात .आकाश लक्ष ठेवत असतो ..आणि अभय प्रधान काकांचा नंबर लावतो .

जानू ला ही अचानक कळत की बाबा नची बदली झाली आहे आणि आपल्याला आता हे शहर सोडून जावं लागणार आहे. .तिला खूप वाईट वाटत ..काय करावं ते कळतच नाही..तिला जावू वाटतच नव्हते ..पणं बाबा ना काय सांगणार ? आणि ती राहणार तर कोणाजवळ? चाळीतले सर्वजण आपलेच वाटत असले तरी आता आपण इथे नाही राहू शकत ..या विचाराने ती खूप दुखी झाली होती ..तिला इथ आल्या पासून चे सारे प्रसंग आठवू लागले होते ..आपण कधी या चाळीत ला ..एक भाग बनून गेली हे तिचं तिला आठवत नव्हत...पणं सार सोडून जायचं ? आपली सखी ..एव्हाना १० वी नंतर सखी च लग्न झालेलं असत त्यामुळे ती आता दुसऱ्या शहरात राहत असते पणं माहेरी आली की ती जानू ला भेटल्या शिवाय जात नसे.

किती आठवणी आहेत इथे आपल्या ..का या बाबांची नोकरी अशी आहे ..आपण का जायचं? किती चांगले फ्रेंड्स आहेत आपले इथे ..आणि अभय ..? शी यारं आपण का त्याच्या सोबत इतकं वाईट वागलो ..किती चांगला मित्र होता तो आपला ..पणं आता आपण इथून जाणार ..साधं त्याच्या सोबत बोलू ही नाही शकणार ..आपण उगाच आज वर त्याच्या वर रागवत होतो ..त्याला सॉरी बोलायला हवं ..आपल्याला चाळीची किती सवय जडली आहे ..खूप व्याकुळ झाली होती जानू ..

तिने मिहिर ला बोलावलं ..अभय आत्याच्या गावी गेला आहे कळल्यावर ती ही खूप उदास झाली आता अभय शी न बोलताच जावं लागणार. तिचा पाय निघता निघत नव्हता.. सार डोळ्यात साठवून ती निघाली ..नवीन शहर नवीन लोकं.. सार काही नवं नवं ..पणं इथे येऊन जानू खूपच हिरमुसली होती ..तिला खूप आठवण यायची चाळीची..अभय ची .. अभय शी एकदा बोलावं अस तिला वाटायचं ..उगाच एक अपराधी भावना मनात निर्माण झाली होती स्वतः च्या वागण्याची.अभय शी वाईट वागल्याचा पशताप होत होता तिला पणं वेळ निघून गेली होती आता तर ती अभय ची माफी ही मागू शकत नव्हती...चाळीच्या आठवणी तिच्या मनातून जात नव्हत्या .

अभय प्रधान काकांचा नंबर लावतो ..पणं रिंग वाजण्या आधीच फोन कट करतो ...

आकाश त्याला विचारतो," ..काय झालं ..?"

तर तो म्हणतो ..," फोन तर लावत आहे पणं बोलणार काय ?"

आकाश त्याला सांगतो ," जानू असली तर बोल नाही तर ठेव न बोलतच."

तो परत एकदा नंबर लावतो ...रिंग वाजत असते आणि एकड अभय च हृदय जोर जोराने धडकत असत ...आनंद दुःख .भीती...साऱ्याच भावना मनात निर्माण झाल्या होत्या..जानू नी फोन उचलावा असा तो मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत असतो ..आणि पलीकडून फोन उचलला जातो ..फोन प्रधान काका उचलतात," .. हॅलो .. हॅलो "

आवाज ऐकुन अभय ला घाम फुटला ...त्याने लगेच फोन कट केला..किती तर वेळ तो तसाच बसून राहिला..

आकाश नी विचारल," काय झालं ? "

" काकांनी फोन उचलला रे .." अभय.

आकाश ला अभय च हसू येत ..तो हसतो ..आणि अभय ला त्याचा राग येतो ..मग आकाश शांत होतो .

उद्या परत फोन करू अस ठरवून दोघे घरी जातात .अभय कडे नंबर असल्यामुळे त्याला वाटत असत आपण कधी ना कधी जानू शी बोलू.आता तो दररोज फोन करू लागला ..दर वेळी फोन काका उचलत..कधी तर जानू चुकून फोन उचलत असे आणि तिचा आवाज ऐकुन अभय आनंदाने वेडा होई..नंतर नंतर प्रधान काका ..फोन वर ओरडू लागले ..बोलायचं नसत तर फोन कशाला करता..? पण अभय ला त्यांच्या ओरडण्याच काही वाटत नाही जानू चा आवाज ऐकायला मिळाला की बस ..पणं काही दिवसातच त्याच्या आनंदात विरजण पडत आणि काकांचा फोन लागण बंद होत ..तेव्हा त्याला मिहिर सांगतो की त्यांचा फोन खराब झाला आहे आणि नवीन नंबर त्यांच्या बाबान कडे नाही ..पुन्हा अभय पहिल्यासारखा उदास होऊन जातो .आता कॉलेज सुरू होत त्याचं पणं त्याचं मन कुठेच लागत नाही ..घरा बाहेर आल की त्याचं लक्ष नकळत जानू च्या घराकडे जात असे आणि तो रोज स्वतः ला समजावत असे की आता ती नाही तिथे..पणं सवयच ती ..सुटता सुटेना आणि याचाच त्रास अभय ला खूप होवू लागला ..त्याचं हसन खूप कमी झालं.त्याचा सारा उत्साह मावळला होता.

क्रमशः