Bhagwan Shrikrushn - 1 books and stories free download online pdf in Marathi

भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-१

भगवान श्रीकृष्ण अवघ्या सृष्टीचा सच्चा मित्र होता.
तो सर्वांचा मित्र होता. स्त्री-पुरुषांचा, लहान मोठ्यांचा, झाडांचा, जनावरांचा ,पशु, पक्षांचा ,आणि निसर्गाचा मित्र होता . तो पर्यावरणाचा महामित्र होता... जन्म आणि मृत्यूचा सुद्धा तो मित्र होता. तो पांडवांचा जसा मित्र होता तसा कौरवांचा सुद्धा मित्र होता .कौरवां मधील सहदेव कृष्णाचा जवळचा मित्र होता आणि दुसरा होता महाभारतातील युद्धात जिवंत राहिलेला शेवटचा कौरव ...युयूत्सूचा सुद्धा तो मित्र होता.

तो राधेचा मित्र होता. तो द्रोपदीचा मित्र होता. तो रुक्मिणीचा मित्र होता. सत्यभामेचा मित्र होता. सत्यभामा आणि रुक्मिणी या त्यांच्या पत्नी होत्या. सत्यभामा ही त्याची लग्नाची पत्नी होती .तर रुक्मिणी ही त्याची प्रियकर पत्नी होती. तिला त्याने भर मंडपातून पळवून आणले होते. म्हणजेच रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचे प्रेम स्वयंवर अर्थात प्रेमविवाह होता... रुक्मिणी ही त्याची पहिली पत्नी होती .सत्यभामा ही त्याची दुसरी पत्नी होती...

श्रीकृष्णाला गायीगुरे खूप आवडत. तो गायीचे रक्षण करणारा गुराखी होता. गोप म्हणजेच गुराखी..तो सवंगड्यांच्या मध्ये खेळायचा. गायींचा सांभाळ करायचा. त्यांचे रक्षण करायचा त्यामुळेच त्याचं नाव गोविंद असे पडले होते.

श्रीकृष्णाने केशी राक्षसाला मारले होते . त्याला मारल्यामुळे श्रीकृष्णाचे नाव केशव पडले होते. राक्षसाचे शवात रूपांतर करणारा तो केशव. केशी हा राक्षसी वृत्तीचा होता..हाच केशी राक्षस म्हणजे कंसाचा एक भाऊ होता.

कृष्णाने त्याच्या नात्यातल्या अनेक दुष्ट लोकांची हत्या केल्यामुळे कृष्णाला महाभारताच्या रणांगणाच्या वेळी अर्जुनासमोर जी नातेगोते मंडळी उभी होती. त्यांच्या खोट्या कृत्याबद्दल माहित होतं . नातेवाईक कसे फसवतात आणि सत्तेसाठी कसे स्वार्थी होतात. हे त्यांनी स्वतःला अनुभवले होते .त्यामुळे तो रणांगणावर महाभारत युद्धात अर्जुनाला म्हणाला. ही नातीगोती खोटी आहेत आणि नाती गोती असणारी माणसे आहेत. जी अधर्माच्या बाजूने उभी आहेत. त्यामुळे अर्जुना तू हातात तुझे गांडीव धनुष्य घे. आणि आदरणीय परंतु वाईट वृत्तीच्या लोकांचा नाश कर. असा उपदेश करायला श्रीकृष्णाला खूपच सुलभ सोपे गेले होते. याचे कारण म्हणजे
श्रीकृष्णाला स्वतःला तसा अनुभव होता. त्यामध्ये मग कंस मामा असेल, पुतना मावशी असेल . अशी जवळचीच लोकं त्याला मारण्यासाठी, ठार करण्यासाठी टपली होती‌. त्याच्या आई-वडिलांना त्या लोकांनी बंदीवासात टाकलं होतं . कृष्णाला खोट्या नात्याबद्दल राग होता .त्याला खोट्याचं खरं रूप माहीत होतं

भगवान श्रीकृष्णाला तीन मित्र होते. एक होता अर्जुन.
दुसरा होता सुदामा . तिसरा होता पेंद्या. पेंद्या हा जो मित्र होता .तो श्रीकृष्णाला दूध दह्याची चोरी करण्यास मदत करायचा . कुणी म्हणतं कि पेंद्या हा श्रीकृष्णाचा काल्पनिक बालमित्र होता.गोपिकांच्या मडक्यातील दूध घेण्यास पेंद्या श्री कृष्णा बरोबर असायचा .तो मथुरेत राहणारा होता. अर्जुन हा हस्तिनापूरला राहत होता. सुदामा मथुरेच्या बाजूच्या गावात राहायचा. हे तिन्ही मित्र गरीब होते. अर्जुन जरी राजपुत्र असला तरी तो वनवासामध्ये होता. जंगलात राहणारा होता. तो निर्धन होता. सुदामा सुद्धा निर्धन होता आणि पेंद्या सुद्धा निर्धन होता.

श्रीकृष्णाचा भाऊ बलराम श्रीकृष्णाचा सख्खा भाऊ नव्हता. परंतु ते दोघं सख्ख्या भावां प्रमाणे राहत होते. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचं शस्त्र हे सुदर्शन चक्र होतं त्या प्रकारे बलरामाचे शस्त्र शेती नांगरण्याचा नांगर होता. शेती करण्याचा नांगर खांद्यावर टाकून बलराम ते शस्त्र मिरवायचा. शेतीच्या नांगराला जो फाळ असतो. तो लोखंडाचा असतो . तो टोकदार, धारदार असतो. त्यामुळेच तर जमीन उकरली जाते. म्हणजेच बलरामाला आणि श्रीकृष्णाला सुद्धा शेतीमध्ये स्वारस्य होते. श्रीकृष्णाला गाईगुरे ,बैल अशी जनावरे सांभाळण्यात व त्यांचे रक्षण करण्यात रुची होती. पशुधनावर श्रीकृष्णाचे खूपच प्रेम होते .ते दोघेही शेतकरी होते. शेतकरी आणि दुभत्या जनावरांचे पालन पोषण करणारे... गुराखी...

अर्जुन कृष्णाचा परम मित्र होता . अर्जुन श्रीकृष्णाच्या बहिणीचा म्हणजे सुभद्रेचा पती होता. श्रीकृष्णाच्या अर्जुन या मित्राचा जन्म झाला. तेव्हा कृष्णाला इंद्राने अर्जुनाची जन्मबातमी सांगितली. एवढे वयामधील अंतर त्या दोघांमध्ये होते. म्हणजे कृष्ण अर्जुनापेक्षा खूपच वयाने मोठा होता.ज्यावेळी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून धरला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गोकुळ वासियांना सांगितले. इंद्राची पूजा करायची नाही. गोवर्धन पर्वताची पूजा करायची... त्यामुळे अपमान सहन न झाल्यामुळे. वरूण म्हणजेच पर्जन्याच्या सहाय्याने इंद्राने गोवर्धन पर्वतावर खूप पाऊस पाडला होता .पूर आणला. गोकुळ वासियांची अनेक घरे पाण्याखाली गेली. जणू प्रलयच आला असे त्या वेळी सर्वांना वाटले. तरी श्रीकृष्ण इंद्राला शरण गेला नाही. त्यामुळे इंद्राचे गर्वाचे घर खाली आले. त्यानंतर श्रीकृष्णाने दर वर्षी इंद्राच्या ऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करायचं जाहीर केले. अखेर शरण येऊन देवांचा राजा इंद्र श्रीकृष्णाला भेटायला आला होता. त्यामुळे अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा श्रीकृष्ण गोकुळ वासीय इंद्राची पूजा करायची परंतु श्रीकृष्णाने त्याला सांगितले की खरा देव हा इंद्र नाहीतर निसर्ग आहे.

अर्जुन हा इंद्रपुत्र होता... म्हणजेच अर्जुनाच्या जन्माच्या वेळी कृष्ण सोळा सतरा वर्षाचा असणार... आणि एवढ्या वयाचे अंतर श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या मध्ये होते म्हणूनच म्हणतात की मैत्रीला वयाचे अंतर नसते.
कृष्ण आणि बलराम जसजसे मोठे होत गेले .तसतसे त्यांच्या खोड्या वाढल्या. त्यांचा अतरंगीपणा वाढला. ते दोघे अधिकच खोडकर झाले होते. त्यातल्या त्यात कृष्ण हा अधिकच व्रात्य होता. त्याचा व्रात्यपणा कमी व्हावा म्हणून यशोदा मातेने श्रीकृष्णाला उखळाने बांधले. ते उखळ गोठ्यातल्या गायीच्या दाव्याने बांधले. उखळ कमरेला, पोटाला बांधलेल्या अवस्थेत असताना लहान कृष्ण जिकडेतिकडे हुंदडत होता. त्यांच्या अंगणात दोन अर्जुन वृक्ष नावाची झाडे होती. त्या दोन झाडांच्या मध्ये तो अडकून पडला. त्यावेळी श्रीकृष्णाने स्वतःच्या सार्‍या शक्तीनिशी जोर लावून उखळ पोटाला बांधलेल्या अवस्थेत खेचले. त्याच्या त्या खेचण्याच्या शक्तीने ते दोन्ही वृक्ष मोडले. ते बघून यशोदेच्या काळजात चर्र झालं. नशीब श्रीकृष्णाला काही झाले नव्हते. तो सुखरूप होता. ते बघून यशोदेने त्याच्या पोटावर बांधलेले उखळ सोडले. उखळ गायीच्या दाव्याने पोटाला बांधल्यामुळे कृष्णाला ' दामोदर ' हे नाव मिळाले. त्यावेळी श्रीकृष्ण हा पाच वर्षाचा होता... याचाच अर्थ श्रीकृष्णाकडे कल्पक युक्ती होती आणि शक्ती होती.

श्रीकृष्ण सात वर्षाचा झाल्यानंतर आणि बलराम सुद्धा सात वर्षांचा झाल्यानंतर परंपरेप्रमाणे दोघेही गुराख्याच्या वेशात जंगलांमध्ये गुरे चारायला घेऊन जात होते.
सकाळी उठून त्याच्या सवंगड्यांसह ते गुरे चारायला घेऊन जात होते आणि संध्याकाळी पुन्हा घरी येत होते .दुपारचे भोजन म्हणजे न्याहरी ते सोबतच घेऊन जायचे. त्यावेळी अनेक सवंगडी यांचे दुपारचे घरचे जेवण आणत नसत .ते उपाशी राहत असत .कारण ते गरीब होते .त्यामुळे कृष्णाने याच्यावर एक कल्पना लढवली . तो सर्व गुराख्यांना एकत्र करून प्रत्येकाने आलेली न्याहरी सर्वांना समान करून वाटायचा .त्याचेच पुढे नाव पडले की कृष्णकाला . जी बाळ गोपाळ मंडळी सर्वांचे जेवण एकत्र करून खायचे त्याचेच नाव पडले कृष्णकाला...
काला करणे म्हणजे एकत्र करणे... असा त्याचा अर्थ आहे. त्या घटनेपासूनच त्याचे गुराखी सवंगडी कृष्णाला प्रमुख मानायला लागले. मग रिकामा वेळ निघून जावा. म्हणून ते सर्व सवंगडी बलराम ,श्रीकृष्ण बांबूची बासरी बनवून वाजवत... त्या बासरीवादनात कृष्णाने कौशल्य व प्राविण्य मिळवले. बासरी वादन ना मध्ये श्रीकृष्ण खूपच तरबेज झाला.कृष्णाच्या बासरीचे सूर इतके संगीतमय होते की चरणाऱ्या गाईगुरांचे भान हरपून ते कृष्णाची बासरी ऐकत. त्या बासरीच्या सूराने गवत खाऊन झाल्यावर गाईगुरे श्रीकृष्ण आणि त्यांच्या गोपाळांच्या जवळ येत होते .त्यामुळे त्यांना संध्याकाळी घरी न्यायला श्रीकृष्ण आणि गुराख्यांना बरे पडत होतं. गुरे चरून झाल्यावर त्यांना एकत्र करून गोकुळात गोठ्याकडे नेण्यासाठी श्रीकृष्ण बलराम आणि गुराख्यांना गुरांच्या मागे धावावे लागत नव्हते .श्रीकृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांनी बासरी वाजवताच ती गुरे संगीताच्या श्रवणाने आपोआप गोकुळवाडीकडे चालू लागत... श्रीकृष्णाच्या बासरी वादना मध्ये मुक्या प्राण्यांना सुद्धा आकृष्ट करणारी जागृत संमोहन शक्ती होती.

श्रीकृष्णाचं वय आठ वर्ष झाल्यानंतर श्रीकृष्ण बलराम आणि त्याचे सवंगडी लोकांच्या घरात शिरून शिंक्यावरचे दूध, दही, लोणी पळवू लागले आणि त्याची दहीहंडी फोडून खाऊ लागले... मग अनेक खोडकर कल्पना श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी करू लागले. मथुरेला जाणाऱ्या गोपींचे आणि यमुनेवर पाण्यासाठी जाणाऱ्या गवळणींणच्या घागरी, मडके बेचकीच्या साह्याने अथवा गोफणीच्या दगडाच्या साह्याने फोडू लागले... यामध्ये त्यांचे खूपचं नुकसान होत असे. परंतु श्रीकृष्णाचे पालक नंद हा गोपींचा प्रमुख असल्यामुळे श्रीकृष्णाची तक्रार कोणीही नंद किंवा यशोदेकडे करीत नसत. जर कोणी तक्रार केली तर मग त्याला श्री कृष्ण आणि त्याची गोपाळ मंडळी फारच त्रास देत. त्याची भरपूर खोडी काढत. श्री कृष्ण बलराम बाळ गोपाळ मंडळींचा खट्याळपणा, खोडकरपणा दिवसेंदिवस वाढत होता. मात्र श्रीकृष्णावर गोकुळवासी खूपच प्रेम करत होते. त्यामुळे त्याच्या अनेक गोष्टींकडे ते कानाडोळा करीत...

बालकृष्णाच्या बालपणीच्या गोष्टी आणि तरुण्याच्या कथा आधुनिक काळामध्ये अमेरिका ,ऑस्ट्रेलिया, इंग्लंडपर्यंत कृष्ण उपासना करणारे भक्तीने गातात... खरं म्हणजे व्यास ऋषींनी महाभारतामध्ये कृष्णाची विविध माहिती दिलेली आहे. महाभारत ग्रंथाचं खरे नाव म्हणजे 'जय 'त्या ग्रंथामध्ये श्रीकृष्णाची पांडवांचा सोबत भेट झाली. त्यानंतर मग महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा पराक्रम वाचायला मिळतो...
श्री

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED