जानू कॉफी शॉप मध्ये पोहचली व समीर ला शोधू लागली तिचं हृदय खूप जोर जोराने धडकत होत जस काही आता बाहेरच येईल..पाय ही थरथरत होते..समीर ने ही जानू आल्याचं पाहिलं व तो तिच्या कडे गेला .. व.. चल तिकडे बसू म्हणून तिला एका टेबलाच्या दिशेने ईशारा केला..जानू ही त्याचा पाठीमागे चालू लागली व ते एका टेबलावर बसले ..समीर ने कॉफी ची ऑर्डर दिली .काय बोलावं ते दोघांना ही सुचत नव्हते ..दोघे ही गप्पच बसून होते ..थोड्या वेळाने समीर नेच बोलायला सुरवात केली.
समीर :उशीर केलास यायला.
जानू: हो,कॉलेज सुटल्यावर आले ना .
पुन्हा दोघे शांत ..समीर जानू कडे पाहत होता आणि जानू इकडे तिकडे पाहत होती ..तेवढयात कॉफी आली..मग काय दोघे ही कॉफी पिवू लागले .जानू च्या लक्षात आले की फ्रेन्ड शिप ब्यांड द्यायचं आहे .
जानू : समीर ,तू फ्रेन्ड शिप ब्यांड आणालास ?
समीर : अरे हो मी विसरलोच होतो .
आणि त्याने खिशात हात घातला व ब्याड बाहेर काढलं..तो पर्यंत जानू ने ही बॅग उघडली व तिने ही फ्रेन्ड शिप ब्यांड समोर ठेवलं .. तस दोघे ही हसू लागले ..कारण दोघांनी ही एकसारखाच ब्यां ड.. आणल होत ..जानू तर किती वेळ चॉईस करत बसली होती आणि शेवटी दोघे ही सेम च घेवून आले ..होते ..दोघांनी ही ते एक मेकाच्या हातावर बांधलं व कधी च काढायचं नाही अस ठरवल.
समीर : तुला ,काही तर सांगू का ?
जानू : हा ,सांग ना असा विचारत का आहेस ?
समीर : तू अस कोणाशी ही मोकळे पणाने बोलत जावू नकोस..मला माहित आहे तुझ्या मनात काही नसत पणं समोर चा आपल्या बद्दल काय विचार करतो हे आपल्याला कुठे माहित असत ? आणि आपल्या अशा मोकळे पणाने बोलण्याने समोरच्या चा गैरसमज होतो.
जानू ला समजलं होत समीर भास्कर बद्दल बोलत आहे .
जानू : अरे , त स काही नाही.भास्कर बोलतो माझ्या सोबत पणं ते फक्त स्टडी बद्दल ..इतर आम्ही कधीच आज वर दुसऱ्या विषयावर बोललो नाही.
खर तर समीर भास्कर बद्दलच बोलत होता पणं त्याला ते त स. दर्श वायच नव्हते..
समीर : मी भास्कर बद्दल नाही बोलत ..कोणी ही असले तरी..अस मोकळे पणाने बोलत नको जावू .फ्रेन्ड म्हणून सांगत आहे ..समजत असेल तर समज नाही तर राहू दे.
जानू ने पाहिलं समीर थोडा रागात दिसत होता ..तिला थोड आश्चर्य वाटलं..पणं तो रागावला म्हणून ती शांत बसली. व त्याला पटेल अस बोलली.
जानू : ok , मी नाही बोलणार अस कोणाशी ..ठीक आहे ?
समीर : मी सांगतो म्हणून अस बोलू नको..तुला पटत असेल तर कर .
जानू : हो ..पटलं.
जानू अस बोलतच समीरच्या चेहऱ्यावर एक smile आली .जानू ला वाटलं बर झाल बाबा एकदाचा हसला तरी ..किती रागावतो हा तर.
वेळ होत होता जानू ला ही जावं स वाटत नव्हते आणि समीर ला ही ..अजून थोडा वेळ बसाव आणि बोलावं असच वाटू लागलं होत दोघांना ..जानू ला आता पर्यंत वाटणारी भीती तर कुठच्या कुठे पळून गेली होती .आणि समीर वर थोडा विश्वास बसला होता.
समीर: वाटतच नाही ना पहिल्यांदा भेटलो आहे .
जानू : हो ,मला ही पणं आता मी जाते ..कॉलेज केव्हाच सुटलं आहे आई वाट पाहत असेल.
समीर : फक्त थोडा वेळ थांब ना .
जानू : नको ,कॉफी ही संपली आणि उशीर झाला आहे .
समीर : ok ,चल .
दोघे ही कॉफी शॉप मधून बाहेर येत होते की समीर च लक्ष शेजारी असणाऱ्या फुल झाडावर गेल..त्याने जानू ला थांबवलं व फुला न जवळ थांब एक फोटो काढतो म्हणून तिचा एक फोटो काढला..जानू नको बोलत होती पण असू दे आपल्या फ्रेन्ड शिप ची आठवण म्हणून त्याने काढलाच.
दोघे ही घरी गेले.जानू ला तर आज खूप आनंद झाला होता ..समीर बद्दल आदर ही वाटू लागला होता ..किती चांगला आहे ना तो ? पहिल्यांदा भेटून ही अस वाटलच नाही की आपण पहिल्यांदा भेटतो आहे ..किती जुनी ओळख असल्या सारखं वाटतं होत ..आणि अजून थोडा वेळ थांबाव वाटत होत पण काय करणार वेळ नव्हता ना .
समीर ही खुश होता .त्याने घरी गेल्यावर जानू ला मॅसेज केला.जानू त्याचाच विचार करत बसली होती.समीर चा मॅसेज पाहून हलकीशी smile तिच्या चेहऱ्यावर आली आणि एक सेकंद ही ना घालवता तिने लगेच त्याला रिप्लाय दिला.
समीर : हॅलो.
जानू : हा ,बोल ना .
समीर : काय मोबाईल घेऊन च बसली होतीस का इतक्या फास्ट रिप्लाय ?
जानू च्या लक्षात आले आपण खूपच गडबड केली .
जानू : नाही ..मी मोबाईल वेळ पाहायला घेतला होता आणि तेवढयात तुझा मॅसेज आला.
समीर : ओह ,मला वाटलं माझी वाट पाहत होतीस की काय ?
जानू : नाही , तस काही नाही.
समीर : तुला भेटून आज खूप छान वाटलं.
जानू : हो मला ही.
समीर : वाटत च नव्हत की पहिल्यांदा भेटत आहे तुला.
जानू : हो ,मला ही तसच वाटलं.
समीर : परत कधी भेटायचं ?
जानू : काय ?
समीर : अग परत कधी भेटायचं आपण ?
जानू : अरे ,आजच तर भेटलो ना आपण आणि तू लगेच पुढचं विचारतो ?
समीर : का ? तुला भेटायचं नाही का ?
जानू : ( चिडला वाटत हा पुन्हा) अरे नाही ..भेटू पुन्हा कधी तरी .
समीर : खरंच ?
जानू : हो .
समीर : थँक्यु यू.
जानू : अरे फ्रेन्ड स आहे ना आपण ..मग no sorry no thank u
समीर: ok बरं ,मॅडम .
जानू : bye ,बोलू नंतर
समीर : ok bye.
क्रमशः