जानू - 20 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जानू - 20

जानू आज खूप खुश होती..इतकी सुंदर पहाट ..तिला सर्वच छान आणि सुंदर वाटत होत ..वाटणारच ..प्रेमात पडलं की असंच होत ना..कधी कॉलेज ला जाईन आणि कधी समीर ला पाहू अस झालं होत तिला..चेहऱ्यावरचं हसू तर एक मिनिट ही थांबत नव्हते..आज ची जानू जरा जास्तच वेगळी आणि सुंदर दिसत होती..प्रेमाची लाली जी चढली होती गालावर तिच्या..ती कॉलेज मध्ये पोहचली ..समिधा ला तिला पाहून आश्चर्य वाटत होते काल पर्यंत तर किती शांत आणि आपल्याच विचारात दंग होती ..किती वेळा विचारल तरी काही सांगितलं नाही तिने ..आणि आज मॅडम एकदम इतक्या खुश ..या मुलीचं काही कळतच नाही.. मला तर समिधा विचार करत होती ..जानू तिच्या जवळ आली.

समिधा : काय ग आज खूपच वेगळी दिसत आहेस ?

जानू : माझी प्यारी समु...आज मी खूप खुश आहे ग..

समिधा: ते तर दिसतंय च बाई साहेब तुमच्या चेहऱ्यावर ..पणं जरा या आपल्या दासीला कारण ही सांगा..

जानू :i am in love..

समिधा: काय ? आणि हे कधी घडल ? यार इतकी बेस्ट फ्रेन्ड म्हणतेस पणं सांगत काहीच नाहीस ?

जानू : सॉरी ना समिधा अग मी च कन्फ्युज होते मग तुला तर कसं सांगेन ?

समिधा : बर बर सांग तो लकी आहे तरी कोण ?

जानू : समीर..

समिधा समीर च नाव ऐकुन थोडीशी काळजीत पडते..

समिधा : जानू तुला खरंच विश्वास आहे ना ग त्याच्या वर ?

जानू : अशी का बोलतेस ? अग तो चांगला आहे .

समिधा : तो चांगलाच आहे ग..पणं तो असा ताप.. ट.आणि रागीट आणि तू अशी रागीट ..काळजी वाटली ग तुझी..

जानू : अग हो पणं माणसाचे विचार वेगवेगळे असले तरी..म्हणजे विरुद्ध टोकाचे जरी असले ना जर मनात खर प्रेम असेल ना तर त्याचं जुळतच ग...आणि आपण काय ठरवून प्रेम करत असतो का ? की याच्या सोबत प्रेम करायचं ..त्याच्या सोबत प्रेम करायचं..ते तर आपल्या न कळतच होत ..समीर रागीट असला तरी मनाने खूप चांगला आहे माझी तर खूप काळजी घेतो..

समिधा : ok बाई तुला विश्वास आहे आणि तू खूष असशील तर मला काही अडचण नाही...

जानू : that's like good girl

जानू आणि समीर आज प्रेमाच्या कबुली नंतर पहिल्यांदा भेटणार असतात..जानू तर खुश होतीच पण आज पुन्हा घाबरली होती पाहिलं जरी आपण भेटलो असलो समीर ला तरी तेव्हा तो आपला मित्र होता पणं आज माझं प्रेम आहे तो ..सकाळी तयार होण्यापासून जानू च हृदय जोर जोराने धडकत होत..ती स्वतः ला शांत करत होती ..तरी मनाला एक हुरहूर लागली होती..काय बोलायचं भेटलं की हे तर ठरवून ठरवून तिची बुद्धीचं काम करेणाशी झाली आहे अस तिला वाटत होत..
आज कॉफी शॉप मध्ये न भेटता शहरातल्या बागेत भेटायचं ठरवलं होतं त्यांनी ..समीर आणि जानू बागे जवळ पोहचले ..समीर नी चल तिकडे झाडा कडे बसू म्हणून सांगितलं ..ती त्याच्या मागून चालत गेली .. दोघं ही झाडा खाली बसली..जानू ला खूप बोलायचं होत समीर सोबत पणं शब्दच फुटेना झाले होते तिच्या ओठातून..समीरची ही तिचं अवस्था होती ...पणं त्याला..जानू चच आश्चर्य वाटत होत ...इतकी बडबड करते मॅसेज नी फोन वर ही हीच बोलणं बंद होत नाही आणि आज हिने तोंडाला कुलूप लावलाय?मग समीर बोलायला सुरवा त..करतो.

समीर : काय ग ,मॅसेज आणि फोन वर तर इतकी बोलतेस आणि समोर आहे तर अशी शांत का ?

जानू त्याच्या या प्रश्नाचं उत्तर काय देवू हेच विचार करत होती तिला कोणताच उत्तर सापडत नव्हते..तिने फक्त एक smile केली आणि आणि आपली मान दुसरी कडे वळवली.

समीर : अग बोल ना काही तरी..

जानू : आधी तू मित्र होतास आणि आता...

समीर : आता काय ?

जानू : काही नाही..
अस म्हणून जानू लाजली..समीर ला तर हसूच आलं..
समीर : बर एकदा इकडे तर बघ..
अस म्हणून समीर ने तिच्या समोर एक गुलाबाचे फूल धरल..जानू ने ते फूल लगेच त्याच्या हातातून घेतलं..फुल तर तिची आवडती होती..ना..पणं समीर जवळ अजून एक फुल होत ..दोन दोन फुल समीर अस म्हणून तिने त्याला विचारलं ?
समीर : अग अजून आणणार होतो पणं मिळाली दोनच म्हणून दोनच घेवून आलो.

जानू : ठीक आहे ..एक तुझ्या साठी आणि एक माझ्या साठी म्हणून तिने दुसरं फुल उचलून समीर ला दिलं..

समीर : थँक्यु मॅडम ..
जानू त्यावर हसली...समीर ने पुन्हा एक मोठी क्याडबरी..तिच्या समोर धरली..

जानू : अरे इतकी मोठी कशाला आणलीस ? आणि मी काय तुला मागितलं होत का ? कशाला आणलेस ? ये पणं मी एकटी नाही खाणार ..

समीर : अग किती प्रश्न विचारते स ..देतोय तर घे ना गप्प..आणि मला नाही आवडत क्याडबरी ..तू घरी जावून खा ok

जानू : बर

समीर : आता अजून एक गिफ्ट ..तुला आवडेल की नाही माहीत नाही पण मी माझ्या चॉईस नी आणल आहे ग..मला जास्त काही मुलींच्या आवडी मधलं नाही कळत ..पणं मी खूप साऱ्या वस्तू मधून हे निवडून आणल आहे अस म्हणून त्याने तिच्या समोर एक बॉक्स धरला ..त्यात एक छानशी रिंग होती ..

जानू : खूप छान आहे ..पणं नको मला ..

समीर : का ? आता काय त्या शॉप वाल्याला देऊ का परत ? तुला आवडली नाही का ?

जानू : अरे ..आवडली ना छान आहे ..पणं कशाला उगाच आणलीस .

समीर : तू बोलली होतीस ना तुला रिंग घालायला आवडते म्हणून वाटलं घ्यावं

जानू : बर घेते पणं तू घालायची माझ्या बोटात ..

समीर : नाही ह जानू मी अजिबात घालणार नाही..तुम्ही मुली लगेच सुतावरून स्वर्ग गाठता आणि तेच मला आवडत नाही..

जानू : बर ठीक आहे ..तू आणलेली नको घालू ..
अस म्हणून जानू ने तिच्या हातात आधीच असलेली एक रिंग काढली व ती समीर ला दिली..

जानू : ही तर घाल माझ्या बोटात.

समीर : हा ..ही घालतो ..म्हणून समीर ने तिची रिंग परत तिच्याच हातात घातली..आणि आपण आणलेली तिला घालायला सांगितलं..
पणं समीर ने आणलेली रिंग तिच्या बोटात सैल झाली..

समीर : अग जरा खात पीत जा ..किती बारीक आहेस ?

जानू : म्हणजे तू आणलेली रिंग बसली नाही म्हणून मी बारीक का ?

समीर : अग खरच सांगतो आहे ..तुला तर पटतच नाही.

जानू ती रिंग परत बॉक्स मध्ये ठेवून देते व नंतर घालेन म्हणून सांगते ..

समीरच्या हाताचा स्पर्श जानू च्या हाताला होतो...अंगावर काटा उभा राहून जानू दचकते पणं पुन्हा समीर च जानू चा हात हातात घेतो .. पहिले तर दोघांचे ही हात थरथर कापत असतात पणं काही वेळाने तो स्पर्श हवाहवासा वाटू लागतो..समीर झाडाला ठेकुन बसतो ..आणि आपल डोकं जानू च्या खांद्यावर ठेकावतो .. व बोलू लागतो.

समीर : तू भेटल्या पासून खरंच खूप छान वाटत..कधी कधी तुझे मॅसेज आठवून मी क्लास रूम मध्ये एकटाच हसत असतो ..सगळे मला वेडा म्हणत असतील ना ?

तूझको ना देखू तो
जी घबराता हैं

समीर हे गाणं गुणगुणत च असतो की पुढची ओळ जानू बोलते..

देख के तुझं को
दिलं को मेरे चैन आता हैं

मग दोघे ही एकदमच म्हणतात
ये कैसा रीश्ता हैं
कैसा नाता हैं .

दोघे ही खुप खुश असतात ...

क्रमशः