Marriage Joruney - 6 books and stories free download online pdf in Marathi

लग्नप्रवास - 6

लग्नप्रवास - ६

साथ माझीच असेल !

तुझ्या त्या

नजरेतील नजाकतीला

कसलीच तोड नाही

मला आता तुझ्याशिवाय

कसलीच ओढ नाही

तुझ्या निखळ मनात

अडकून राहायला होत

तुझ्या निरागस हसण्यात

हरवून जायला होत

तुझ्या आवाजातील बंदिश

जीव ओढून नेते

तुझ्या डोळ्यातील अश्रू

माझे प्राणच घेते

या वेड्याचे प्रेम

फक्त तुझ्यावरच असेल

तू प्रेम दे अथवा नको देऊ

पण साथ मात्र माझीच असेल.................

लग्न ही सुरूवात असेल तर हनिमून हा त्याचा कळस. स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण. जेव्हा मिलन होत तेव्हा लाभते ती परिपूर्णता आणि हीच परिपूर्णता जाणून घेण्याची किंवा स्वतःला पूर्णत्वाकडे नेण्याची संधी त्यांना हनिमून मधून मिळणार होती.लग्न जरी झाले असले तरी प्रीती आणि रोहन हे दोघांसाठी अनोखळीच होते. साखरपुड्यानंतर ते जेमतेम एकदा भेटलं असतील. त्यानंतर लगेचच लग्नाची तयारी. आणि त्यात प्रीतीने कधी कोणत्याच मुलांबरोबर एवढा लांबचा प्रवास केला नव्हता आणि रोहननेही कोणत्याच मुलींबरोबर प्रवास केला नव्हता. त्यामुळे दोघांसाठी हा प्रवास अनोखळी होता. रोहन आणि प्रीती बस स्टॉप वर बसची वाट बघत होते. तेव्हा दोघांमध्ये बोलण्यास सुरुवात झाली. ह्या संवादामध्ये अर्धा तास कसा गेला दोघांनाही कळलंच नाही. तितक्यात बस आली. आणि बसचा पास दाखवून रोहन आणि प्रीती त्याच्या सीटवर विराजमान झाले.

बस चालू झाल्यावर बराचवेळ दोघेही खिडकी बाहेर पाहत होते. दोघेही एकमेकांशी फक्त हसून लाजायचे. पण काही बोलायचे नाही. थोड्यावेळाने बसचा A/C चालू झाला. तेव्हा प्रीतीला खूप थंडी वाजायला लागली. पण तिने अगोदरच स्वेटर काढून ठेवले होते आणि ते तिने अंगात घातले. रोहनने मात्र काहीच आणले नव्हते. तेव्हा प्रितीने रोहनला विचारले.

"तुम्हाला थंडी वाजतेय का?

हो. पण रोहनने स्वेटर घेण्यास नकार दिला. तेव्हा मात्र प्रितीने A/C चा फ्लोव कमी करून आपल्याजवळ स्कार्फ रोहनला दिला. त्या संवादानंतर दोघांनाही भरपूर गप्पा मारल्या. कधी महाबळेश्वर आलं त्या दोघांनाही कळलं नाही. इतक्यात महाबळेश्वर आलं पण. मरणाची थंडी दोघांना वाजत होती. तेवढ्यात हॉटेलवाल्यानी टॅक्सी पाठवली.लगेचच टॅक्सी पकडून त्यांनी थेट हॉटेल गाठले. रोहन आणि प्रीती हॉटेलच्या reception ला जाऊन त्यांनी रूमच्या चाव्या घेतल्या, आणि रूमवर येऊन सुटकेचा श्वास घेतला. दोघंही फ्रेश होऊन गप्पा मारत होते. तेवढ्यात फोन आला.

'सर, नाश्ता तयार आहे.'

रोहनने हो लगेचच म्हटले. दोघांमध्ये आता चांगलीच मैत्री झाली होती. पण आता मात्र प्रीती खूप बिन्धास होती. दोघांचे विचारही जुळत होते. त्यांनतर प्रीतीच्या वडिलांनी फोन केला. तेव्हा प्रीती खडबडून जागी झाली,की तिला ह्या गोष्टीचा विसर पडला की आपण घरी फोन केलाच नाही. त्यानंतर फोन उचलला आणि तिने वडिलांच्या प्रश्नांची उत्तर देत होती. तितक्यात रोहनला ही आठवले आपण घरी अजून कळवले नाही. त्यानंतर पुन्हा दोघे गप्पा मारायला आणि सेल्फी काढायला लागले.पुन्हा एकदा फोनची बेल वाजली.'सर, येत आहात ना नाश्त्याला?'. हे कळल्यावर दोघांनीही स्वतःची तयारी करण्यास सुरुवात केली. आता थोडे थोडे रोहनला कळायला लागलं की, हीच ती वेळ एकमेंकाना समजून घेण्याची आणि ओळखण्याची. आणि हनिमूनला जाण्याचं एक उद्दिष्ट हे आहे की, तुम्ही एकमेकांबरोबर बराच वेळ घालवतात,एकमेकांच्या आवडी-निवडी तुम्हला कळतात हे त्या दोघांना कळले होते.

होता अंधकार सर्वत्र,

वाट एकटीच होती.....

चालताना एकटेच,

साथ कोणाचीच नव्हती.....

अशातच तुझे येणे झाले.....

शुभ सहवास तुझा,

मन चांदण्यात न्हाले.....

अन सोबत तुझ्या,

जीवन सुंदर झाले.....

रोहन तिच्या जवळ आला तेव्हा तिच्या छातीत धडधडायला लागलं. तो त्याचा स्पर्श तिला हळुवार लागत होता. तिचा हात हातात घेतल्यावर दोघांनाही वेगळंच जाणवलं. लगेचच त्याने तिच्या केसावरुन हात फिरवला. आणि तिला त्याने मिठीत घेतले. तिच्या मनात वेगळ्याच भावना निर्माण झाल्या. रोहनला प्रेम एकतर्फी होतंय असं वाटायला लागलं. पण प्रीती मात्र लाजतच होती. प्रीतींने पण पुढाकार घेतला हीच ती वेळ एकांतात सहवासाची. आणि रूमच्या lights खुशीने बंद केल्या.

सुन्या सुन्या मैफिलीत

तुझेच मी गीत गात आहे

अजूनही वाटते मला की

अजूनही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कोणाला

कळे ना हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे

तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे

तुझ्या घर सूर ओळखीचे

उभ्या तुझ्या अंगणी स्वाराचा

अबोल हा पारिजात आहे.

उगीच स्वप्नांत सावल्याची

कशास केली आज़र्व तू

दिलेस का प्रेम तू कुणाला

तुझ्यात जे अंतरात आहे.

सकाळ झाली, दोघानांही समजलेच नाही. दोघेही गाढ झोपेत होते. असं वाटत होत हि वेळ संपूच नव्हे. पण तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. चार बेल वाजून झाल्यावर रोहन उठला आणि त्याने दार उघडले. दार उघडता क्षणीच समोर रूम सेर्व्हन्ट दिसला.

"शुभ प्रभात सर", नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही नाश्त्याला या. तोपर्यंत आम्ही रूम साफ करून घेतो.

रोहन म्हणला, एक १५-२० मिनिट द्या आम्ही फ्रेश होऊ तुम्हला रूमची साफसफाई करण्यास चाव्या देतो.

नाश्ता करून दोघेही फिरण्यास सज्ज झाले. हॉटेल बाहेर गाडी उभीच होती. दोघेही गाडीत बसले आणि पुढच्या प्रवासास सज्ज झाले. उन्हाळाचे दिवस असले तरी महाबळेश्वर म्हटलं की, थंडी आलीच. लगेचच रोहनने प्रीतीला मिठीत घेतले. लहानपणी आई व वडिलांच्या मिठीनंतर लग्नानंतर नवऱ्याची मिठी तिला सुखकारक, हवीहवीशी वाटणारी आणि सुरक्षित होती.गाडी पंचगंगा देवळापुढे थांबवली. आणि दोघंही दर्शन घेण्यास निघाले. वाटेतच रोहनने प्रीतीसाठी खणा नारळाची ओटी घेतली, आणि दोघांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

ती उन्हाळ, दुपार,

ती जीर्ण पिंपळपार.....

ती जराशी धाकधूक,

नजरेची नजरेशी चुकामुक.....

नक्की कुणी घ्याचा पुढाकार?

उत्तर होकार असेल कि नकार?

मग ती धावती पहिली भेट,

हातात हात मिळवेलला थेट.....

तो स्पर्श थरथरता,

ती नजरेतली अधीरता.....

तो सळसळता पिंपळपार,

अजूनही लक्ख आठवते,

ती उन्हाळ, दुपार.....

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला. मला नक्की तुमची प्रितिक्रिया कळवा भेटू पुढील भागात.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED