Marriage Journey - 11 books and stories free download online pdf in Marathi

लग्नप्रवास - 11

लग्नप्रवास - ११

रोहन आणि प्रीतीच्या लग्नाला ४ महिने उरकून गेले होते. दोघांचाही रोजचा दिनक्रम असायचा. सकाळी उठून प्रीती नाश्ता करून ऑफिसला जायची. आणि संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर सासूबाईंना मदत करायची. रोहनचेही तसेच होते. हनिमून वरून आल्यानंतर ते दोघेही एकदम कामामध्ये बुडाले होते. रविवार असायच्या त्याच्या जोडीला.पण रविवारी एकतर कंटाळा नाहीतर दोघेही आपापली कामे करण्यात व्यस्त असायचे. गावी गणपतीला ह्यावर्षी लग्नानंतर रोहनच्या घरातले सर्व जाणार होते. आणि ह्याच वर्षी प्रीतीचा ओवसा असल्याकारणाने गावच्या काका काकूंनी प्रीती आणि रोहनला येण्याचे आग्रहाने आमंत्रण दिले. थोडा कामांमधून change मिळणार म्हणून प्रीती आणि रोहन खूप खुश होते. रोहनच्या वडिलांनी गावाची तिकिटे काढली. रोहन आणि प्रीतीने स्वतः बाजारात जाऊन सगळी खरेदी केली. दिवस ठरला. निघायची तयारी चालू झाली. घरातून बाहेर पडत असताना बाहेर हा धो धो पाऊस सुरु झाला. त्यात त्याच्या ६ बॅगा. रोहन आणि प्रीती भलतेच खुश होते. त्यांनी लोकल ट्रेन पकडून ठाणे स्टेशन गाठले. पण त्याची गाडी अद्याप आली नव्हती, तेव्हा रोहन आणि प्रीती सारखे online चेक करत होते.शेवटी anouncement झाली तेव्हा कळलं गाडी २० मिनिटे उशिरा येणार आहे. तेव्हाच घाईगडबडीत रोहनचे चुलत काकाही हजर झाले. थोड्यावेळेने गाडी प्लॅटफॉर्म क्रमांकावर आली. तेव्हा सगळ्यांनी गाडी मध्ये प्रवेश करून त्यात सफर करण्यास सुरुवात केली. रात्र केव्हा गेली कळले नाही, अत्यंत वेगाने जात असल्याकारणाने प्रीतीला झोप लागेना. प्रीती सारखी खिडकीच्या बाहेर बघत होती. त्यानंतर पहाट झाली. प्रीती जागी असल्यामुळे तिच्या कानांवर आवाज ऐकू आले. "चाई लेलो मॅडम चाई". चहाच्या सुगंधाने सर्व जण जागे झाले. सर्वानी मस्त एक एक कप चहाचा आस्वाद घेतला. त्यात सोनेपे सुहागा. चहा बरोबर वडापाव वालाही आवाज देण्यास आला. काय कॉम्बिनेशन आहे वडापाव आणि चहाच. सकाळी मस्त झाली. खिडकीबाहेर बघता सगळीकडे हिरवीगार झाडे, चोहूबाजूनी पक्ष्याची किलबिलाट. निसर्गरम्य दृश्य प्रीतीला कॅमेरामध्ये कैद करावेसे वाटत होते. वातावरणही खूप प्रसन्नदायक होते. थोड्यावेळेने गाव जवळ येऊ लागले. तसे सर्वानी आपापल्या बॅगा हातात घेऊन दरवाज्यापाशी उभे राहिले. गाव आले.आता ते रिक्षात बसून घरी आले.

गावी काका काकू चहा पीत असताना ते सर्व जण घरी आले. सर्व जण दमलेले आणि फ्रेश होऊन बायका कामी लागल्या. रोहन आणि प्रितीने दोघांनीही एकत्र गणपतीचे दर्शन घेतले. गणपतीचे डेकोरेशन अत्यंत सुंदर केले होते. ह्यावर्षी काका काकूंनी गौरीची सुंदर मूर्ती गणपतीजवळ बसवण्यात येणार होती. घरातील वातावरण खूप सुंदर होते त्याने प्रीतीचे मन खूप भारावून गेले. दुपारची आरती झाली. पगंती झाल्या. दिवस अत्यंत सुंदर गेला. गावातील भजन मंडळी आली त्यांनी अत्यंत सुंदर पद्दतीने भजने केली. दुसऱ्या दिवशी रोहन आणि प्रीतीची पूजा असल्याकारणाने रात्रीच सर्व तयारी करण्यात आली. केळीचे खांब बांधण्यात आले. चौरंग सजवण्यात आला. फुलांचे हार करून चौरंगी भवती लावण्यात आले. पूजेचा दिवस उजाडला. दोघांचाही उपवास होता पूजा होऊपर्यंत. सकाळी दोघेही तयार होऊन दोघांनी एक सेल्फी काढला. भटजी आले. पूजा जवळ जवळ १/२ तास चालली. मोठ्या पातेल्यात प्रसादाचा शिरा करण्यात आला. ते नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला. पूजा व्यवस्थित पार पडली. आता मात्र जेवण्याच्या तयारीस सुरुवात झाली. तो दिवसही अत्यंत सुंदररीतीने पार पडला. त्यादिवशी सर्व जण खूप दामले असल्याकारणाने लवकरच झोपी गेले. गौरीच्या तयारीस सर्व जण सज्ज झालेले. कोण फुलाचा हार, कोण रांगोळ्या, कोण ओवसा करण्याची पान. मोठे काका म्हणाले, प्रीतीला मी आल्यापासून बघतोय सारखं काम नि काम. तुम्ही दोघे जरा गावात फिरून या. आता मात्र एवढ्या दिवसानंतर प्रीती आणि रोहनला एकांत भेटला.आणि लगेचच रोहन आणि प्रीती दोघेही गावात फिरण्यास तयार झाले.दोघांनाही नदीकाठी फिरण्याचा खूप आस्वाद घेतला.


प्रेम म्हणजे काय असत

त्याने हसून एकदा तिला विचारले

प्रेमामध्ये फुलतात रंगीन फुले

प्रयत्नाने होतात सारे मार्ग खुले

त्याला नि तिला हवा असतो सहवास

सुखाचा एकांत आणि प्रेमाचा सुहास

प्रेम म्हणजे जीवनभराची साथ

जणू निर्जन वाटेवर आधाराची हात...

आता लक्षात आले पाच सूप ओवसासाठी सुद्धा लागणार होते. आता काही खैर नव्हती. कोणाच्याच लक्षात नव्हते. रोहन आणि प्रीती नदीकाठी फिरत असताना त्यांनी गावातील एक भेटला त्याला रोहनने विचारले, इथे कुठे सूप मिळेल का. तेव्हा तो देवासारखा भेटला तुम्हाला ऑर्डर द्याची आहे का. मी उद्या सकाळी तुम्हला सूप आणून देतो. रोहन आणि प्रीतीचा जीव भांड्यात पडला. रात्रीची आरती झाली आणि सर्व झोपी गेले.


आज घरी गौरी येणार होती. सर्वानी गौरीची मूर्ती गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवली. परंतु गौरीचे मुख झाकले होते.गावातील तो माणूस देवदूतासारखा ती सूप घेऊन आला. आता त्यांनी मोठ्या सुपामध्ये चार छोटी सूप ठेवली. मोठ्या सूपाला पुढच्या बाजूला दोरा गुंडाळलेला आणि हळद कुंकू वाहिले होते. त्या चार सुपामध्ये वेगवेगळया प्रकारची ओवसाची पाने होती, हळद कुंकू लावलेला नारळ, विड्याची पाने, सुपारी, खजूर, बदाम, काकडी, चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भोपळा, शिराळी. इ. वस्तू होत्या. हे सर्व तयार करून सर्व जणी स्वतःच्या तयारीस लागल्या. त्यांनी तुळशीकडे पान ठेवून घरात सर्व बायकांनी सूप हातात घेऊन प्रवेश केला. नंतर प्रीतीच्या सुपात काकीने सांगितले, प्रीती आता सासू सासर्यांना सुप देऊन तुमच्या पाय पडेल तेव्हा तुम्ही भेट म्हणून सुपात काही पैसे ठेवा. त्यानंतर ते सूप देवासमोर ठेऊन त्यावर पाणी सोडले. अशाप्रकारे प्रीतीचा पहिला ओवसा झाला. आता सर्व जण जेवायला बसले जेवण अत्यंत सुंदर झाले होते. सगळ्यांनी जेवणच पुरेपूर आस्वाद घेतला. अशाप्रकारे आजचा दिवस संपला.

आजचा भाग तुम्हला कसा वाटला, मला नक्की तुमची प्रतिक्रिया केले. तोपर्यंत थांबतो. भेटू पुढील भागात.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED