छेडल्या तारा हृदयाच्या - 1 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

छेडल्या तारा हृदयाच्या - 1

भाग ...१

अस्मिता ने आवरता आवरता घड्याळ पाहिलं आणि तिचे डोळेच मोठे झाले..सव्वा सात वाजले होते आणि सात ची बस केव्हाच निघून गेली असणार या विचाराने ती अस्वस्थ झाली होती.आता कॉलेज चे पहिले दोन लेक्चर चुकणार या विचाराने च ती थोडी पळतच बस स्टँड कडे गेली..पणं रस्त्यातच तिला बस आडवी आली..तिने हात दाखवून बस थांबवली. ती कॉलेज स्टूडेंट असल्यामुळे बस ड्रायव्हर ने ही बस मध्येच थांबवली व अस्मिता पटकन बस मध्ये चढली. इकडे बस मध्ये सिट वर बसलेला अखिल बराच वेळ अस्वस्थ होता पणं खिडकीतून अस्मिता पळत येताना दिसली तशी अखिल च्या चेहऱ्यावर मोठी शी स्माईल आली..आणि त्याचं तडफडणार मन शांत झालं..तो तिला दुरून पाहून च गालात हसत लाजला..त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या अमेय ने हळूच त्याला कोपर मारत विचारल," काय मग स्वारी खुश ना ? आली तुमची अस्मिता? "

अखिल नुसताच लाजला आणि पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला.तस्स पुन्हा अमेय ने त्याच्या कडे पाहत विचारल," अक्या किती दिवस तुझ्या भावना अशाच मनात ठेवणार आहेस ? अरे हायस्कूल पासून जीव लावून बसला आहेस अस्मिता वर एकदा तिला सांगून तर बघ ना तुझ्या मनातल ..काय माहित तिने होकार दिला तर ?"

अखिल ने आपली नजर बाहेरून अमेय कडे वळवली व थोड दुखी होत बोलला," अम्या भीती वाटते रे..तुला तर माहित आहे ना अस्मिता वर माझं किती प्रेम आहे ते ? पणं तिने कधीच फ्रेन्ड पलीकडे मला काहीच समजलं नाही..आणि तिच्या नजरेत स्पष्ट दिसत रे तिला माझ्या बद्दल तशा भावना नाहीत ..ज्या मला तिच्या बद्दल आहेत..मी तिला सांगायला गेलो आणि तिने माझ्या सोबत ची मैत्री ही तोडली तर मी काय करू ? तिचं प्रेम नसल तरी आमच्यात मैत्री आहे आणि मी त्या मैत्री मध्ये ही खुश आहे..मला तिला गमवायच नाही रे आम्या."

अमेय थोड वैतागत च बोलला," आक्या तू आणि तुझी भीती थोड्या दिवसांनी एकत्र विचार कराल त्या अमिताभ बच्चन सारखं ..की मैं और मेरी भीती अक्सर ये बाते करते है की तुम्हे बता दिया होता तो..?"आणि ती अस्मिता जाईल दुसऱ्या कोणाची तरी बनून..आणि तू बस मग तिच्या मुलांचा मामा बनून .."

अमेय चा टोमणा ऐकून अखिल चा चेहरा थोडा पडलाच आणि तो नाराज झाला पणं दुसऱ्याच क्षणाला अस्मिता ने बस मध्ये पाऊल ठेवलं आणि अखिल च्या चेहर्यावर तिला पाहताच पुन्हा स्माईल आली..निळ्या रंगाच्या चुडीदार मध्ये तिचा गोरा रंग जास्तच खुलून दिसत होता.. पुढच्या केसांचा पफ पाडून मागील केसांची लांबसडक वेणी घालून ती खांद्यावरून पुढे घेतली होती..कानात छोटंसं डुल चमकत होत ..हातात निळ्या च रंगाच्या बांगड्या खणखत होत्या... मेक अप चा लवलेश ही नव्हता तरी ही ती अप्रतिम सुंदर दिसत होती..आणि तिचं हेच साधे पण अखिल ला तिला पाहताच क्षणी भावल होत..प्रेम ही भावना कळण्या अगोदर पासून च अस्मिता त्याच्या मनोमनी वसली होती.अस्मिता आणि अखिल दोघे ही एकाच गावचे ..एकच शाळेत शिकलेले .पुढे अस्मिता ने ज्या कॉलेज ला प्रवेश घेतला अखिल ही तिच्या मागे मागे त्याचं कॉलेज मध्ये आला.अस्मिता,तो अमेय आणि सविता असे चौघे के डी कॉलेज ला पदवीच्या दुसऱ्या वर्षाला होते. अस्मिता अखिल सोबत बोलत होती पणं ते फक्त एक मित्र म्हणून तस्स ही तिला जास्त बोलायला आवडायचं नाही..तिचे बाबा तिच्या लहान पनीच देवा घरी गेले होते घरी आई आणि तिचा लहान भाई प्रतीक आणि ती अस तिघान च च कुटुंब .अस्मिता वर तिच्या कुटुंबाची जबाबदारी होती. आई ने खूप कष्टाने तिला शिकवलं होत ..प्रतीक अजून लहान होता .त्याला डॉक्टर करायचं स्वप्न होत तिच्या बाबा च आणि तेच आता अस्मिता पूर्ण करणार होती..बाबा ची जबाबदारी ती उचलणार होती.प्रतीक ला चांगलं शिक्षण देऊन डॉक्टर बनवायचं होत तिला...त्यामुळे ती नेहमी आपला अभ्यास आणि घर भल इतकाच विचार करायची ..इतर मुलीनं सारखं कॉलेज लाईफ एंजॉय करण, हौस मौज करण तर तिच्या विचारान पलीकडे होत.अखिल ला आपण आवडतो ही गोष्ट तिला माहित होती .त्याच्या बद्दल तिला सॉफ्ट कॉर्नर ही होता पणं प्रेम ही भावना मात्र तिच्या मनात ही नव्हती .अखिल तिच्या च गावातला कदमांचा एकुलता एक वारीस..भरपूर श्रीमंत त्यात हुशार ही होता..आणि दिसायला तर एखाद्या फिल्मी हिरो ला ही मागे सोडेल असा ..पणं तरीही त्याने कधी गर्व केला नव्हता ..कधी आपल्या श्रीमंतीचा बडेजाव केला नव्हता..सर्वांन सोबत च तो खूप नम्रपने वागायचा..कधी कोणाशी भांडण नाही की वाद विवाद नाही..पणं जिथे मनातच प्रेम नाही तर माणसात किती ही गुण असले तरी थोडी ना नात जुळत ?

अस्मिता दिसताच अखिल ने खिडकी जवळ ची सिट सोडली व अमेय ला तिथे बसवलं व स्वतः बाजूच्या सीटवर बसला.

अस्मिता ओढणी सांभाळत मोठ्याने श्वास घेत उभी होती. पळत आल्यामुळे तिला थोडी धाप ही लागली होती..आणि बस तर पूर्ण खचाखच भरली होती त्यामुळे तिला बसायला जागा मिळेल हा प्रश्न ही नव्हता..ती थोड पुढे जाऊन सविता बसलेल्या सिट ला टेकून उभी राहिली तस्स सविता तिला पाहत थोड हळू आवाजात च बोलली," आशू आज पणं लेट ? अग थोड लवकर येत जा ना ? तुला काय वाटतं अखीलनी तुझ्या साठी रोज रोज सिट पकडुन ठेवावी का ? "

अस्मिता ने तिच्या कडे पाहून रागाने डोळे मोठे केले ती काही बोलणार इतक्यात अखिल सिट वरून उठून तिच्या जवळ येत बोलला," अस्मिता बस ना..मी उभा राहतो .."

सविता अस्मिता कडे पाहून गालात हसली.अस्मिता मात्र अखिल कडे न पाहताच बोलली," नाही नको..तू बस मी राहते उभी."

पणं तिला ही चांगल माहित होत ती उभी असताना तो अजिबात सिट वर बसणार अखिल पुन्हा बोलला," अस्मिता बस तू पळत आली आहेस ..धाप लागली आहे तुला .."

शेवटी अस्मिता सिट वर जाऊन बसली.अखिल ने अमेय ला डोळ्यांनीच खूनावल ..पलीकडे सरकून बस म्हणून ..तस्स अमेय थोड रागातच त्याच्या कडे पाहत ओठातल्या ओठात पुटपुटला," हो बाबा ती तुझी च आहे ..मी साध तिच्या कडे पाहणार ही नाही .."

अखिल ला त्याच्या ओठांच्या हालचाली वरून समजलं की तो काय बोलला तस्स तो गालात हसला.

के डी कॉलेजच्या स्टॉप जवळ बस थांबली आणि चौघे ही खाली उतरले .सविता आणि अस्मिता पुढे चालत होत्या तर अमेय आणि अखिल त्यांच्या मागे होते.चौघे ही क्लास रूम जवळ पोहचले पणं लेक्चर अगोदरच सुरू होता.अस्मिता मात्र पुन्हा अस्वस्थ दिसू लागली व सविता कडे पाहत बोलली," झाला लेक्चर मिस फक्त दहा च मिनिट उशीर झालाय पणं पाटील सर काय आत मध्ये घेणार नाहीत ...फक्त दहा मिनिटे उशीरा येण्यामुळे पूर्ण लेक्चर मिस होतो यार.."

सविता थोड हसत च बोलली," अग जाऊ दे तस्स ही त्या पाटील सरांचा लेक्चर बोर च होतो ..किती सिरीयसली शिकवत असतात ..मध्ये थोडा वेळ ही देत नाहीत त्याचा पट्टा एकदा सुरू झाला की बेल होऊ पर्यंत थांबत नाही..आणि तस्स ही तुला इतकं वाइट वाटतय तर जा ना मध्येच लेक्चर मध्ये ?"

अस्मिता थोड रागात आणि थोड घाबरत बोलली," तू गप्प बस सवू..सारखं का माझं डोकं खाते..आणि ते खूप छान शिकवतात पणं मला त्यांची थोडी भीती ही वाटते ग.."

या दोघींचं बोलणं अमेय आणि अखिल मागे ऐकतच होते .अखिल थोड गालात च हसला व त्याने पुढे होऊन लेक्चर सुरू असताना बंद दरवाज्यावर टक टक केली ..तसा त्याच्या क्लास रूम चा दरवाजा उघडला गेला...आणि अस्मिता,सविता आणि अमेय मात्र थोड घाबरून मागे सरकले.

क्रमशः